अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (६ डिसेंबर ते १२ डिसेंबर २०२०) Astroshodh- astrologerinpune, vastuconsultantinpune, pune)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी हर्षल, धनस्थानात राहू, सप्तमस्थानात शुक्र, अष्टमस्थानात सूर्य, बुध, केतू, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात गुरु, शनि, लाभस्थानात नेपचून आणि व्ययस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला शुक्र व मंगळाचा षडाष्ट्क योग होईल. ८ तारखेला चंद्राचा गुरु व शनिशी त्रिकोण आणि शुक्राशी लाभयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १० तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग, चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल. ११ तारखेला शुक्र वृश्चिक राशित प्रवेश करेल. १२ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व शुक्राशी युती होईल.
रविवारी दुपारपर्यंत घरातील कामांसाठी वेळ काढावा लागेल. मौज-मजा करण्याकडे कल असेल. त्यानंतर मंगळवारी रात्रीपर्यंत कलाकार, खेळाडू व विद्यार्थ्यांना काळ खडतर आहे. प्रत्येक गोष्टीसाठी जास्त मेहनत घ्यावी लागेल. ज्यांचा सध्या ज्योतिषशास्त्रासारख्या गूढ विद्यांचा अभ्यास सुरू आहे त्यांना मात्र हा काळ उत्तम आहे. सप्ताह मध्य वकील, नेते, फ़ार्मासिस्ट तसेच वैद्यकीय क्षेत्रातील लोकांसाठी अनुकूल आहे. तब्येतीची मात्र काळजी घ्यावी. सप्ताहाच्या शेवटी घरातील वातावरण चांगले राहील. जोडीदाराकडून काही लाभ संभवतात. प्रेमिकांनाही छान काळ आहे.
उपासना: कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, षष्ठस्थानात शुक्र, सप्तमस्थानात सूर्य, बुध, केतू, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात गुरु, शनि, दशमस्थानात नेपचून, लाभस्थानात मंगळ आणि व्ययस्थानात हर्शल अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला शुक्र व मंगळाचा षडाष्ट्क योग होईल. ८ तारखेला चंद्राचा गुरु व शनिशी त्रिकोण आणि शुक्राशी लाभयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १० तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग, चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल. ११ तारखेला शुक्र वृश्चिक राशित प्रवेश करेल. १२ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व शुक्राशी युती होईल.
रविवार सकाळ प्रवासासाठी अनुकूल आहे. भावंडांशी संवाद साधाल. त्यानंतर मंगळवार रात्रीपर्यंत घरात छान वातावरण असेल. प्रॉपर्टीची कामे करण्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे. व्यावसायिकांना चांगले लाभ होऊ शकतील. सप्ताह मध्यात कलाकार, खेळाडू व विद्यार्थ्यांना ग्रहमान चांगले आहे. प्रेमिकांना हा काळ लग्न ठरविण्यास अनुकूल आहे. सप्ताहाचा शेवट नोकरदार व्यक्तींना चांगला आहे. वैद्यकिय व्यवसाय करणारे, वकिल, फ़िजिकल फ़िटनेस ट्रेनर्स यांनाही चांगला काळ आहे. तब्येतीच्या किरकोळ तक्रारी जाणवतील.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला पंचमस्थानात शुक्र, षष्ठस्थानात सूर्य, बुध, केतू, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात गुरु, शनि, भाग्यस्थानात नेपचून, दशमस्थानात मंगळ, लाभस्थानात हर्शल आणि व्ययस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला शुक्र व मंगळाचा षडाष्ट्क योग होईल. ८ तारखेला चंद्राचा गुरु व शनिशी त्रिकोण आणि शुक्राशी लाभयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १० तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग, चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल. ११ तारखेला शुक्र वृश्चिक राशित प्रवेश करेल. १२ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व शुक्राशी युती होईल.
चागले ग्रहमान आहे. आठवडा छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला प्रियजनांचा सहवास लाभेल. भावंडांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग येऊ शकतात. काहींना प्रवासाचे योग संभवतात. आवडत्या ठिकाणांना भेटी द्याल. सप्ताह मध्यात छान पार्टीचा मूड असेल. काहींना अचानक लाभ संभवतात. सप्ताह मध्यानंतर  काहींना एखाद्या उत्सव/ समारंभात सहभागी होण्याचे योग येतील. सप्ताह अखेर मन प्रसन्न करणाऱ्या घटना घडतील. एखादा धनलाभ सुखावेल. विद्यार्थ्यांना, कलाकारांना तसेच प्रेमिकांना काळ अनुकूल आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला चतुर्थस्थानात शुक्र, पंचमस्थानात सूर्य, बुध, केतू, षष्ठस्थानात प्लूटो, सप्तमस्थानात गुरु, शनि, अष्टमस्थानात नेपचून, भाग्यस्थानात मंगळ, दशमस्थानात हर्शल, आणि लाभस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला शुक्र व मंगळाचा षडाष्ट्क योग होईल. ८ तारखेला चंद्राचा गुरु व शनिशी त्रिकोण आणि शुक्राशी लाभयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १० तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग, चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल. ११ तारखेला शुक्र वृश्चिक राशित प्रवेश करेल. १२ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व शुक्राशी युती होईल.
संपूर्ण सप्ताह छान आहे. सप्ताहात सुरुवातीला एखादा धनलाभ शक्य. आवडत्या पदार्थाच्या मेजवानीचे योग येतील. मन आनंदी असेल. घरातील वातावरणही प्रसन्न राहील. धनलाभाची शक्यता आहे. सप्ताह मध्यात भावंडांची खबरबात कळेल. लेखक, ब्लॉगर्स यांना हा काळ खूप चांगला आहे. काहींना जवळपासच्या सहलीचे योग येऊ शकतात. प्रवास फ़ायदेशीर ठरतील. सप्ताहाच्या शेवटी मन प्रसन्न असेल. प्रॉपर्टीच्या कामांमधून लाभ संभवतात. इस्टेट ब्रोकर, बिल्डर यांना हा काळ चांगला आहे.
उपासना: गायत्री मंत्राचा जप करणे या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला तृतियस्थानी शुक्र, चतुर्थस्थानात सूर्य, बुध, केतू, पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानात गुरु, शनि, सप्तमस्थानात नेपचून, अष्टमस्थानात मंगळ, भाग्यस्थानात हर्शल आणि दशमस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला शुक्र व मंगळाचा षडाष्ट्क योग होईल. ८ तारखेला चंद्राचा गुरु व शनिशी त्रिकोण आणि शुक्राशी लाभयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १० तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग, चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल. ११ तारखेला शुक्र वृश्चिक राशित प्रवेश करेल. १२ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व शुक्राशी युती होईल.
अतिशय छान सप्ताह आहे. रविवार सकाळ खरेदीसाठी चांगली आहे. त्यानंतर मंगळवारपर्यंतचा काळ घरगुती गोष्टींसाठी अनुकूल आहे. घरासंबंधी काही कामे प्रलंबीत असतील तर ती आता उरकून घेऊ शकतात. काही भाग्यवर्धक घटनाही घडू शकतील. मन प्रसन्न असेल. सप्ताह मध्यात काहींना धनलाभाचे योग संभवतात. घरात उत्सव/ समारंभाचे वातावरण असेल. धार्मिक गोष्टींसाठीही अनुकूल ग्रहमान आहे. भावंडांच्या भेटीचे योग आहेत. सप्ताहाच्या शेवटी लेखक व साहीत्यिक यांना ग्रहमान अनुकूल आहे.
उपासना: ’ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: ’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात शुक्र, तृतियस्थानी सूर्य, बुध, केतू, चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात गुरु, शनि, षष्ठस्थानात नेपचून, सप्तमस्थानात मंगळ, अष्टमस्थानात हर्शल आणि भाग्यस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला शुक्र व मंगळाचा षडाष्ट्क योग होईल. ८ तारखेला चंद्राचा गुरु व शनिशी त्रिकोण आणि शुक्राशी लाभयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १० तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग, चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल. ११ तारखेला शुक्र वृश्चिक राशित प्रवेश करेल. १२ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व शुक्राशी युती होईल.
रविवारची सकाळ एकदम मस्त असेल. आवडती माणसं भेटतील. काहींना धनलाभाचे योग आहेत. त्यानंतर मंगळवारपर्यंत खर्चाचे प्रसंग येऊ शकतात. प्रवासात असाल तर आपल्या चीजवस्तू सांभाळा. भावंडांची भेट शक्य आहे. सप्ताह मध्यात तुमचा आत्मविश्वास वाढविणारे ग्रहमान आहे. लेखक, कवी, प्रकाशक यांच्यासाठी यशदायक काळ आहे. सप्ताह अखेर मन प्रसन्न असेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. काही धनलाभही होण्याची शक्यता आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी शुक्र, धनस्थानात सूर्य, बुध, केतू, तृतियस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात गुरु, शनि, पंचमस्थानात नेपचून, षष्ठस्थानात मंगळ, सप्तमस्थानात हर्शल आणि अष्टमस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला शुक्र व मंगळाचा षडाष्ट्क योग होईल. ८ तारखेला चंद्राचा गुरु व शनिशी त्रिकोण आणि शुक्राशी लाभयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १० तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग, चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल. ११ तारखेला शुक्र वृश्चिक राशित प्रवेश करेल. १२ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व शुक्राशी युती होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला काहींना वरीष्ठांकडून सहकार्य मिळेल. धनलाभ होतील. नोकरी, व्यवसायातील लोक भरपूर आणि मनाजोगते काम झाल्याने खूष असतील. मुख्य म्हणजे केलेल्या कामाचा मोबदलाही व्यवस्थित मिळाल्याने मन प्रसन्न राहील. आवडत्या लोकांच्या सहवासात रहाण्याचे योग येतील. सप्ताह मध्यात मनासारखी खरेदीचे योग आहेत. परदेशी नोकरीच्या शोधात असाल तर त्यासाठी ही वेळ योग्य आहे. कलाकारांना विशेषत: नृत्यकलेशी संबंधीत असलेल्यांना हा कालावधी जास्त अनुकूल आहे. सप्ताहाच्या शेवटी काही भाग्यवर्धक घटना घडू शकतात.
उपासना: कुलस्वामिनीची उपासना करावी.
–अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, बुध, केतू, धनस्थानात प्लूटो, तृतियस्थानी गुरु, शनि, चतुर्थस्थानात नेपचून, पंचमस्थानात मंगळ, षष्ठस्थानात हर्शल, सप्तमस्थानात राहू आणि व्ययस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला शुक्र व मंगळाचा षडाष्ट्क योग होईल. ८ तारखेला चंद्राचा गुरु व शनिशी त्रिकोण आणि शुक्राशी लाभयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १० तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग, चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल. ११ तारखेला शुक्र वृश्चिक राशित प्रवेश करेल. १२ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व शुक्राशी युती होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला भाग्यवर्धक घटना शक्य. आत्मविश्वास वाढविणार्‍या घटना घडतील. वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. बढती किंवा पगारवाढीसाठी प्रयत्न करीत असाल तर वरीष्ठांकडे शब्द टाकायला हरकत नाही. व्यावसायिकांना चांगला लाभ होण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यात मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटी शक्य आहेत. लाभदायक ग्रहमान आहे. सप्ताह अखेरीस छान खरेदीचे योग आहेत. चैन करण्याकडे कल असेल. कलाकारांना व परदेशाशी ज्यांचा कामाचा संबंध असतो त्यांना हा कालावधी विशेष चांगला आहे.
उपासना: या काळात सुर्योपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात गुरु, शनि, तृतियस्थानी नेपचून, चतुर्थस्थानात मंगळ, पंचमस्थानात हर्शल, षष्ठस्थानात राहू, लाभस्थानात शुक्र, आणि व्ययस्थानात सूर्य, बुध, केतू अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला शुक्र व मंगळाचा षडाष्ट्क योग होईल. ८ तारखेला चंद्राचा गुरु व शनिशी त्रिकोण आणि शुक्राशी लाभयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १० तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग, चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल. ११ तारखेला शुक्र वृश्चिक राशित प्रवेश करेल. १२ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व शुक्राशी युती होईल.
संपूर्ण सप्ताह लाभदायक आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना चांगला काळ आहे. काहींना प्रवासयोग संभवतात. धार्मिक गोष्टींसाठी चांगला काळ आहे. सप्ताह मध्यात तुमच्या कार्यक्षेत्रात मनासारखे काम होईल, सहकाऱ्यांचे चांगले सहकार्य मिळेल. वरीष्ठ तुमच्या कामावर खुष असतील. छान मोबदलाही मिळाल्याने मन प्रसन्न असेल. विद्यार्थ्यांना व कलाकारांना चांगला काळ आहे. सप्ताहाच्या अखेरीस मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग येतील. संपूर्ण सप्ताह खरेदीसाठी अनुकूल आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी गुरु, शनि, धनस्थानात नेपचून, तृतियस्थानी मंगळ, चतुर्थस्थानात हर्शल, पंचमस्थानात राहू, दशमस्थानात शुक्र, लाभस्थानात सूर्य, बुध, केतू आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला शुक्र व मंगळाचा षडाष्ट्क योग होईल. ८ तारखेला चंद्राचा गुरु व शनिशी त्रिकोण आणि शुक्राशी लाभयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १० तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग, चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल. ११ तारखेला शुक्र वृश्चिक राशित प्रवेश करेल. १२ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व शुक्राशी युती होईल.
सप्ताहाची सुरुवात संमिश्र असेल. काही चांगले तर काही प्रतिकूल प्रसंग घडतील. विमा व्यावसायिकांना मात्र चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे. कोणाच्यातरी मृत्यूमुळे रिकामी झालेली जागा किंवा पैसे मिळणे अशा विचित्र घटनांमधून लाभ शक्य आहेत. सप्ताह मध्य भाग्यवर्धक घटनांचा असेल. उपासनेसाठी हा काळ चांगला आहे. धार्मिक स्थळांना भेटी देण्याचे योग संभावतात. प्रॉपर्टीच्या बाबतीतही अनुकूल काळ आहे. सप्ताहाचा शेवट उत्त्म असेल. मनासारखं काम घडेल. वरीष्ठ खूष असतील.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी नेपचून, धनस्थानात मंगळ, तृतियस्थानी हर्शल, चतुर्थस्थानात राहू, भाग्यस्थानात शुक्र, दशमस्थानात सूर्य, बुध, केतू, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात गुरु, शनि अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला शुक्र व मंगळाचा षडाष्ट्क योग होईल. ८ तारखेला चंद्राचा गुरु व शनिशी त्रिकोण आणि शुक्राशी लाभयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १० तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग, चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल. ११ तारखेला शुक्र वृश्चिक राशित प्रवेश करेल. १२ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व शुक्राशी युती होईल.
सप्ताहाची सुरुवात चांगली होईल. जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीतल्या व्यवहारात फ़ायदा होण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभाचेही योग आहेत. सप्ताह मध्यात ज्योतिषी, सर्जन, मानसशास्त्राशी संबंधीत लोक यांना चांगला काळ आहे. सायनस/ सर्दी अशा स्वरुपाच्या आजाराची शक्यता आहे. काळजी घ्यावी. सप्ताहाच्या शेवटी ग्रहस्थिती अनुकूल आहे. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळू शकेल. काही भाग्यवर्धक घटना घडू शकतात. धार्मिक गॊष्टींमध्ये मन रमेल. काहींवर गुरुकृपा शक्य आहे.
उपासना: या काळात सुर्योपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी मंगळ, धनस्थानात हर्शल, तृतियस्थानी राहू, अष्टमस्थानात शुक्र, भाग्यस्थानात सूर्य, बुध, केतू, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात गुरु, शनि आणि व्ययस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला शुक्र व मंगळाचा षडाष्ट्क योग होईल. ८ तारखेला चंद्राचा गुरु व शनिशी त्रिकोण आणि शुक्राशी लाभयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १० तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग, चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल. ११ तारखेला शुक्र वृश्चिक राशित प्रवेश करेल. १२ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व शुक्राशी युती होईल.
रविवारची सकाळ छान असेल. धार्मिक गॊष्टींमध्ये मन रमेल. वडीलधारी मंडळींकडून कौतुकाचे शब्द ऎकायला मिळतील. नंतर मंगळवारपर्यंतचा काळ नोकरीच्या शोधात असणार्‍यांना चांगला आहे. जुन्या गुंतवणूकीतून लाभ होतील. फ़िजिकल फ़िटनेसच्या व वैद्यकीय क्षेत्रात काम करणार्‍यांना अनुकूल काळ आहे. मात्र तब्येतीबाबत थोडी काळजी घ्यावी. सप्ताह मध्यात जोडीदाराकडून काही लाभ होतील. मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या शेवटी मानसोपचारतज्ञ, विमा व्यावसायिक यांना चांगला कालावधी आहे. गूढ गोष्टींचे आकर्षण वाटत राहील.
उपासना: विठ्ठल नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)