अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (३१ मार्च ते ६ एप्रिल २०२४)

(Astroshodh- bestastrologerinpune, famousastrologerinpune, topastrologerinpune, bestastrologerinindia, famousastrologerinindia, topastrologerinindia)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी बुध, गुरु, हर्षल, षष्ठस्थानात केतू, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात मंगळ, शुक्र, शनि आणि व्ययस्थानात सूर्य, राहू, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ३१ तारखेला शुक्र मीन राशित प्रवेश करेल. १ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ४ चंद्राचा सूर्याशी लाभयोग व गुरुशी केंद्रयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग तर मंगळ व शनिशी युती होईल.
फलादेश- रविवारी रात्रीपर्यंचा काळ संमिश्र आहे. अचानक धनलाभाचे योग शक्य आहेत मात्र या काळात आरोग्याची काळजी घ्यावी तसेच वाहने जपून चालवावीत. नंतरच्या दोन दिवसात एखादी भाग्यवर्धक घटना घडू शकेल. धार्मिक कार्यक्रमात भाग घ्याल. खरेदीसाठी काळ अनुकूल आहे. या दरम्यान केलेली गुंतवणूक दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरु शकेल. सप्ताह मध्यानंतर तुमचा आत्मविश्वास वाढविणार्‍या घटना घडतील. तुमच्या कार्यक्षेत्रात मनासारखे काम होईल व सहकार्‍यांची मदत मिळेल. केलेल्या कष्टाचे चीज होईल व छान मोबदलाही मिळेल. मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या अखेरीस मित्रांच्या भेटीचे योग येतील. काहींना धनलाभ संभवतात.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला पंचमस्थानात केतू, भाग्यस्थानात मंगळ, प्लूटो, दशमस्थानात मंगळ, शुक्र, शनि, लाभस्थानात सूर्य, राहू, नेपचून आणि व्ययस्थानात बुध, गुरु, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ३१ तारखेला शुक्र मीन राशित प्रवेश करेल. १ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ४ चंद्राचा सूर्याशी लाभयोग व गुरुशी केंद्रयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग तर मंगळ व शनिशी युती होईल.
फलादेश- रविवारी लाभदायक ग्रहमान आहे. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील. नंतरचे दोन दिवस गूढ विषय तुम्हाला आकर्षित करतील. अचानक धनलाभाचे योग या काळात शक्य आहेत. ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध मानसशास्त्र, ज्योतिषशास्त्र, इतिहास, संशोधन इ. गोष्टींशी आहे त्यांना ग्रहमान उत्तम आहे. जुने मित्र अचानक भेटतील. वेळ मजेत जाईल. सप्ताह मध्यात भाग्यकारक ग्रहमान आहे. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. काहींना प्रवासाचे योग संभवतात. सप्ताहाचा शेवट चांगला जाईल. वरिष्ठांकडून एखादी मागणी मान्य करुन घेता येईल.
उपासना: मारुतीची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात केतू, अष्टमस्थानात मंगळ, प्लूटो, भाग्यस्थानात मंगळ, शुक्र, शनि, दशमस्थानात सूर्य, राहू, नेपचून आणि लाभस्थानात बुध, गुरु, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ३१ तारखेला शुक्र मीन राशित प्रवेश करेल. १ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ४ चंद्राचा सूर्याशी लाभयोग व गुरुशी केंद्रयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग तर मंगळ व शनिशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात आरोग्याच्या तक्रारीची असू शकते. तुमच्या बोलण्यामुळे कोणी नाराज होणार नाहीत याची काळजी घ्या. सप्ताह मध्यात लाभदायक ग्रहमान आहे. धनलाभ होण्याचे योग आहेत. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. तुमच्या जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल. व्यवसायात नवीन तंत्र अमलात आणाल. शासकीय कामे मार्गी लागतील. भागीदारीत ज्यांचा व्यवसाय आहे त्यांना अनुकूल कालावधी आहे. सप्ताह मध्यानंतर अचानक आलेल्या अडचणींनी त्रस्त व्हाल. चिडचीड वाढेल. वाहने जपून चालवावीत. जोखीम असलेले कोणतेही काम या काळात करु नका. वरीष्ठ किंवा वडीलधारी मंडळींशी या काळात वाद होण्याची शक्यता आहे. मन शांत ठेवावे. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमवा.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी केतू, सप्तमस्थानात मंगळ, प्लूटो, अष्टमस्थानात मंगळ, शुक्र, शनि, भाग्यस्थानात सूर्य, राहू, नेपचून आणि दशमस्थानात बुध, गुरु, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ३१ तारखेला शुक्र मीन राशित प्रवेश करेल. १ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ४ चंद्राचा सूर्याशी लाभयोग व गुरुशी केंद्रयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग तर मंगळ व शनिशी युती होईल.
फलादेश- रविवार संध्याकाळपर्यंतचा काळ चांगला आहे. मन प्रसन्न असेल. काही लाभ होतील. संततीबद्दल चांगली बातमी कळू शकेल. त्यानंतर मंगळवार रात्रीपर्यंत संमिश्र ग्रहमान आहे. तब्येतीची काळजी घ्या. वैद्यकीय व्यवसाय करणार्‍यांना मात्र दिवस अनुकूल आहे. याचबरोबर शिक्षण क्षेत्रातील लोक, न्यायाधीश यांना तसेच कायदेविषयक कामांसाठी हा कालावधी चांगला आहे. सप्ताह मध्यात व नंतर जोडीदाराची काळजी घ्यावी. जोडीदाराबरोबर वाद टाळावेत. नित्योपासनेत या काळात लक्ष लागणार नाही असे दिसते आहे मात्र हा काळ पुराण, अध्यात्म, ज्योतिष किंवा अन्य गूढ गोष्टींच्या अभ्यासास चांगला आहे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी केतू, षष्ठस्थानात मंगळ, प्लूटो, सप्तमस्थानात मंगळ, शुक्र, शनि, अष्टमस्थानात सूर्य, राहू, नेपचून आणि भाग्यस्थानात बुध, गुरु, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ३१ तारखेला शुक्र मीन राशित प्रवेश करेल. १ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ४ चंद्राचा सूर्याशी लाभयोग व गुरुशी केंद्रयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग तर मंगळ व शनिशी युती होईल.
फलादेश- रविवारी कौटुंबिक सौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. प्रॉपटींची कामे मार्गी लागतील. बांधकाम व्यावसायिक तसेच इस्टेट एजंट यांना चांगल्या संधी चालून येतील. नंतरचे दोन दिवस चांगले आहेत. भाग्यवृध्दी होईल. वरीष्ठांची मर्जी राहील. संततीसौख्य लाभेल. विद्यार्थ्यांना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल. प्रवासयोग या काळात शक्य. काही लाभही होतील. सप्ताह मध्यात व त्यानंतर सप्ताह अखेरपर्यंत कायदा/ न्यायव्यवस्थेशी संबंधीत असणार्‍यांना चांगला फायदा देणारा काळ ठरु शकेल. मात्र या काळात काहींना आरोग्याच्या समस्या जाणवू शकतील. जोडीदाराशी वाद टाळावेत.
उपासना: ’ श्री गुरुदेव दत्त ’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात केतू, पंचमस्थानात मंगळ, प्लूटो, षष्ठस्थानी मंगळ, शुक्र, शनि, सप्तमस्थानात सूर्य, राहू, नेपचून आणि अष्टमस्थानात बुध, गुरु, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ३१ तारखेला शुक्र मीन राशित प्रवेश करेल. १ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ४ चंद्राचा सूर्याशी लाभयोग व गुरुशी केंद्रयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग तर मंगळ व शनिशी युती होईल.
फलादेश- रविवारी मनोबल उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. मित्रमैत्रिणींचा/ आप्तेष्टांचा सहवास लाभेल. काही लाभ शक्य. त्यानंतरचे दोन दिवस रागावर नियंत्रण ठेवावे. घरात वाद होणार नाहीत याचीही काळजी घ्या. प्रॉपर्टीची कामे शक्यतो पुढे ढकला. सप्ताह मध्य व त्यानंतरचा पूर्ण कालावधी चांगला जाणार आहे. खोळंबलेली कामे मार्गी लागतील. मनाजोगत्या घटना घडतील. घरात छान बेत ठरतील. व्यावसायिक भेटीगाठी होतील. कामे मार्गी लागतील. विद्यार्थ्यांना अनुकूल कालावधी आहे. एखादा कोर्स किंवा कामाशी संबंधीत काही शिक्षण घ्यायचं असेल तर ग्रहमान अनुकूल आहे. संततीसंबंधी चांगली बातमी कळेल. मात्र शेअर मार्केट किंवा तत्सम क्षेत्रात गुंतवणूक सध्या तरी टाळलेली बरी.
उपासना: या काळात गणपती अथर्वशीर्षाचे नित्य पठण करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात मंगळ, प्लूटो, पंचमस्थानात मंगळ, शुक्र, शनि, षष्ठस्थानी सूर्य, राहू, नेपचून, सप्तमस्थानात बुध, गुरु, हर्षल आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ३१ तारखेला शुक्र मीन राशित प्रवेश करेल. १ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ४ चंद्राचा सूर्याशी लाभयोग व गुरुशी केंद्रयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग तर मंगळ व शनिशी युती होईल.
फलादेश- चागले ग्रहमान आहे. आठवडा छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला आर्थिक सुयश लाभेल. प्रियजनांचा सहवास लाभेल. कलाकार, लेखक, वक्ते, कवी यांच्यासाठी चांगला व फ़ायदेशीर कालावधी आहे. व्यावसयिकांना लाभदायक ग्रहमान आहे. कामे मार्गी लागतील. घरात छान वातावरण असेल. सप्ताह मध्यात काहींना एखाद्या उत्सव/ समारंभात सहभागी होण्याचे योग येतील. काहींना शाबासकी/ कौतुक/ एखादं बक्षिस मिळण्याची शक्यता आहे. प्रवास लाभदायक ठरतील. सप्ताह अखेर मन प्रसन्न करणार्‍या घटना घडतील. एखादा धनलाभ सुखावेल. विद्यार्थांना चांगला कालावधी आहे.
उपासना: या काळात रोज गणपती स्तोत्र म्हणावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी मंगळ, प्लूटो, चतुर्थस्थानात मंगळ, शुक्र, शनि, पंचमस्थानात सूर्य, राहू, नेपचून, षष्ठस्थानी बुध, गुरु, हर्षल आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ३१ तारखेला शुक्र मीन राशित प्रवेश करेल. १ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ४ चंद्राचा सूर्याशी लाभयोग व गुरुशी केंद्रयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग तर मंगळ व शनिशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला संमिश्र ग्रहमान आहे. तब्येतीच्या तक्रारी जाणवत राहतील. तुमच्या बोलण्याने कोणी दुखावले जाण्याची शक्यता आहे. अ‍ॅसिडिटी किंवा उष्णतेचे विकारही जाणवू शकतील. काळजी घ्यावी. याच काळात धनलाभही शक्य आहेत मात्र त्यासाठी थोडे जास्त कष्ट पडण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यात भावंडांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग संभवतात. लेखक, ब्लॉगर्स यांना हा काळ खूप चांगला आहे. काहींना जवळपासच्या सहलीचे योग येऊ शकतात. घरगुती कामांना वेळ द्यावा लागेल. प्रॉपर्टीच्या कामांमधून लाभ संभवतात. मात्र कागदपत्रे योग्य व्यक्तीकडून तपासून घेऊनच व्यवहार करावेत.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात मंगळ, प्लूटो, तृतीयस्थानी मंगळ, शुक्र, शनि, चतुर्थस्थानात सूर्य, राहू, नेपचून, पंचमस्थानात बुध, गुरु, हर्षल आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ३१ तारखेला शुक्र मीन राशित प्रवेश करेल. १ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ४ चंद्राचा सूर्याशी लाभयोग व गुरुशी केंद्रयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग तर मंगळ व शनिशी युती होईल.
फलादेश- रविवारचा दिवस खरेदीसाठी अनुकूल आहे. पारमार्थिक उन्नतीसाठीसुध्दा हा कालावधी चांगला आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. नंतरचे दोन दिवस भाग्यवर्धक असतील. आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. संततीबाबत चांगली बातमी कळेल. कलाकौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. गायक व कलाकार यांना हा कालावधी विशेष चांगला आहे. सप्ताह मध्यानंतर आर्थिक सुयश लाभेल. काही लाभ या काळात शक्य आहेत. सप्ताह अखेर प्रवासासाठी अनुकूल काळ आहे. भावंडांची खुशाली कळेल. वरीष्ठांची अनुकूलता राहील. साहित्यिक, लेखक, कलाकार यांना हा कालावधी चांगला आहे.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, प्लूटो, धनस्थानात मंगळ, शुक्र, शनि, तृतीयस्थानी सूर्य, राहू, नेपचून, चतुर्थस्थानात बुध, गुरु, हर्षल आणि नवमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ३१ तारखेला शुक्र मीन राशित प्रवेश करेल. १ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ४ चंद्राचा सूर्याशी लाभयोग व गुरुशी केंद्रयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग तर मंगळ व शनिशी युती होईल.
फलादेश- रविवारचा दिवस लाभदायक आहे. मित्रमैत्रिणींच्या भेटीचे योग संभवतात. काही लाभही या काळात होण्याची शक्यता आहे. त्यानंतरचे दोन दिवस खिशात पैसे खुळखुळत असल्याने चैन करावीशी वाटेल. छान खरेदी कराल. काही अचानक उद्भवलेले खर्चही करावे लागतील. परदेश प्रवासासाठी अनुकूल काळ आहे. कलेच्या क्षेत्रात चांगले काम होईल. जुनी येणी वसूल होतील. मन समाधानी असेल. सप्ताह मध्यात व नंतर अनुकूल ग्रहमान आहे. आर्थिक स्थिती चांगली असेल. घरात आनंदी वातावरण असेल. तुमचे अंदाज व निर्णय अचूक ठरतील. कामे मार्गी लागतील.
उपासना: या काळात मारुतीची उपासना करणे, मारुतीचे दर्शन घेणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, शुक्र, शनि, धनस्थानात सूर्य, राहू, नेपचून, तृतीयस्थानी बुध, गुरु, हर्षल, अष्टमस्थानात केतू आणि व्ययस्थानात मंगळ, प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. ३१ तारखेला शुक्र मीन राशित प्रवेश करेल. १ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ४ चंद्राचा सूर्याशी लाभयोग व गुरुशी केंद्रयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग तर मंगळ व शनिशी युती होईल.
फलादेश- सप्ताहात सुरुवातीला काहींना वरीष्ठांकडून सहकार्य मिळेल. नोकरी, व्यवसायातील लोक भरपूर आणि मनाजोगते काम झाल्याने खूष असतील. मुख्य म्हणजे केलेल्या कामाचा मोबदलाही व्यवस्थित मिळाल्याने मन प्रसन्न राहील. भावंडांचे सौख्य लाभेल. तुमच्या पराक्रमात वृध्दी होईल. सप्ताह मध्यात आर्थिक स्थिती चांगली असेल. मन प्रसन्न असेल. आप्तेष्टांच्या किंवा मित्रमंडळींच्या भेटीची शक्यता आहे. मनासारखी खरेदी होईल. काहींना प्रवासाचे किंवा परदेशगमनाचे योग संभवतात. सप्ताहाचा शेवट प्रतिकूल आहे. महत्वाचे व्यवहार पुढे ढकलावेत.
उपासना: श्रीसूक्ताचे नियमित पठण या कालावधीत केलेले चांगले.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, राहू, नेपचून, धनस्थानात बुध, गुरु, हर्षल, सप्तमस्थानी केतू, लाभस्थानात मंगळ, प्लूटो आणि व्ययस्थानात मंगळ, शुक्र, शनि अशी ग्रहस्थिती असेल. ३१ तारखेला शुक्र मीन राशित प्रवेश करेल. १ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ४ चंद्राचा सूर्याशी लाभयोग व गुरुशी केंद्रयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग तर मंगळ व शनिशी युती होईल.
फलादेश- छान आठवडा आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला भाग्याची चांगली साथ मिळणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. वरीष्ठ तुमच्या कामावर खुश असतील. काहींना धनलाभ शक्य आहे. गुरु किंवा गुरुतुल्य व्यक्तीचे मार्गदर्शन लाभेल. प्रवासयोग आहेत. सप्ताह मध्यात आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. कलाकौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. मित्रमैत्रिणींच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग संभवतात. काही लाभही या काळात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खुशीत असाल. सप्ताहाच्या शेवटी पूर्वीच्या गुंतवणूकीतून लाभ संभवतात. मनासारखी खरेदी होऊ शकेल. खर्चही वाढतील.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)