
अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१ नोव्हेंबर ते ७ नोव्हेंबर २०२६)
Astroshodh, bestastrologerinpune, famousastrologerinpune, topastrologerinpune, bestastrologerinindia, famousastrologerinindia, topastrologerinindia
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी हर्षल, चतुर्थस्थानात मंगळ, पंचमस्थानात गुरु, केतू, सप्तमस्थानात सूर्य, बुध(व), शुक्र(व), दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात राहू आणि व्ययस्थानात शनि(व), नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला चंद्राची मंगळ व गुरुशी युती व शुक्राशी लाभयोग होईल. ४ तारखेला सूर्य व बुधाची युती होईल आणि चंद्राचा सूर्य व बुधाशी तर शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल. ५ तारखेला शुक्र वक्र गतीने कन्या राशीत प्रवेश करेल. ६ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. ७ तारखेला चंद्राची शुक्राशी युती आणि मंगळ व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला आवडत्या व्यक्तींबरोबर वेळ घालवाल. घरात छान वातावरण असेल. एखाद्या समारंभ किंवा पार्टीत सामिल होण्याचे योग आहेत. प्रॉपर्टी खरेदी किंवा विकण्यासाठीही ग्रहमान चांगले आहे. सप्ताह मध्यात लाभदायक ग्रहमान आहे. मानसन्मान मिळेल. संततीसौख्य लाभेल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. विद्यार्थ्यांना व कलाकारांना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल. संततीबद्दल चांगली बातमी कळेल. प्रेमिकांना लग्न ठरविण्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताहाच्या शेवटी ग्रहमान प्रतिकूल आहे. तब्येतीची काळजी घ्या. अती दगदग टाळा. कर्मचार्यांचे सहकार्य या काळात मिळणार नाही. हितशत्रूंवरही लक्ष ठेवा.
उपासना: ॐ ग्रां ग्रीं ग्रौं स: गुरुवे नम: या मंत्राचा रोज जप करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी हर्षल, तृतीयस्थानी मंगळ, चतुर्थस्थानात गुरु, केतू, षष्ठस्थानी सूर्य, बुध(व), शुक्र(व), भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात राहू आणि लाभस्थानात शनि(व), नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला चंद्राची मंगळ व गुरुशी युती व शुक्राशी लाभयोग होईल. ४ तारखेला सूर्य व बुधाची युती होईल आणि चंद्राचा सूर्य व बुधाशी तर शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल. ५ तारखेला शुक्र वक्र गतीने कन्या राशीत प्रवेश करेल. ६ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. ७ तारखेला चंद्राची शुक्राशी युती आणि मंगळ व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला भावंडांसंदर्भात चांगली बातमी कळेल. लेखक, ब्लॉगर्स व साहित्यिकांना अनुकूल ग्रहमान आहेत. तुमच्याकडून काहीतरी छान काम होईल. लोकांच्या कौतुकाला पात्र व्हाल. सप्ताह मध्यात लाभ देणारं ग्रहमान आहे. आर्थिक सुयश लाभेल. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचा योग शक्य आहे. मन प्रसन्न असेल. प्रॉपर्टी खरेदी-विक्रीसाठी ग्रहमान अनुकूल आहे. इस्टेट एजंट व बांधकाम व्यावसायिकांना विशेष अनुकूल काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी अती आत्मविश्वास टाळावा. अभ्यासाकडे दुर्लक्ष नको. परदेशात शिक्षणासाठी जायचे असेल तर त्यासंबंधी माहिती मिळविणे किंवा परदेशात कायमच्या निवासासाठी अर्ज करावयाचा असेल तर त्यासाठी हा कालावधी चांगला आहे.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी मंगळ, तृतीयस्थानी गुरु, केतू, पंचमस्थानात सूर्य, बुध(व), शुक्र(व), अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात राहू, दशमस्थानात शनि(व), नेपचून आणि व्ययस्थानात हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला चंद्राची मंगळ व गुरुशी युती व शुक्राशी लाभयोग होईल. ४ तारखेला सूर्य व बुधाची युती होईल आणि चंद्राचा सूर्य व बुधाशी तर शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल. ५ तारखेला शुक्र वक्र गतीने कन्या राशीत प्रवेश करेल. ६ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. ७ तारखेला चंद्राची शुक्राशी युती आणि मंगळ व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला कुटुंबीयांसोबत वेळ छान जाईल. एखादा धनलाभ होऊ शकतो. चमचमीत पदार्थ खायला तुम्हाला नेहमीच आवडतं. एखाद्या खाऊगल्लीला कुटुंबीयांसमवेत जरुर भेट द्या. सप्ताह मध्यात मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. तुमच्या कला-कौशल्याला वाव मिळेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. सोशल मिडियावर केलेली एखादी पोस्ट प्रसिध्दी मिळवून देऊ शकेल. प्रवासाचे योगही संभवतात. सप्ताह अखेरीस कौटुंबिक सौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. प्रॉपटींची कामे मार्गी लागतील. एखाद्या समारंभ किंवा पार्टीत सामिल होण्याचे योग आहेत.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, धनस्थानी गुरु, केतू, चतुर्थस्थानात सूर्य, बुध(व), शुक्र(व), सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात राहू, भाग्यस्थानात शनि(व), नेपचून आणि लाभस्थानात हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला चंद्राची मंगळ व गुरुशी युती व शुक्राशी लाभयोग होईल. ४ तारखेला सूर्य व बुधाची युती होईल आणि चंद्राचा सूर्य व बुधाशी तर शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल. ५ तारखेला शुक्र वक्र गतीने कन्या राशीत प्रवेश करेल. ६ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. ७ तारखेला चंद्राची शुक्राशी युती आणि मंगळ व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीस मन प्रसन्न असेल. आत्मविश्वास वाढविणार्या घटना घडतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. सप्ताह मध्यात लाभदायक ग्रहमान आहे. मनोबल उत्तम राहील. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. घरात आनंदी वातावरण असेल. आवडीच्या पदार्थांवर मस्त ताव माराल. तुमच्या संभाषणकौशल्याचा उपयोग एखादं काम मार्गी लावण्यासाठी कराल. सप्ताह अखेरीस कौटुंबिक सौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मुलांच्या प्रगतीबाबत समाधानी असाल. या काळात केलेले प्रवास मनाला आनंद देणारे ठरु शकतील.
उपासना: रविवारी नवग्रह मंदिरात जाऊन सूर्यनारायणाचे दर्शन जरुर घ्यावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात गुरु केतू, तृतीयस्थानी सूर्य, बुध(व), शुक्र(व), षष्ठस्थानी प्लूटो, सप्तमस्थानात राहू, अष्टमस्थानात शनि(व), नेपचून, दशमस्थानात हर्षल, आणि व्ययस्थानात मंगळ, अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला चंद्राची मंगळ व गुरुशी युती व शुक्राशी लाभयोग होईल. ४ तारखेला सूर्य व बुधाची युती होईल आणि चंद्राचा सूर्य व बुधाशी तर शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल. ५ तारखेला शुक्र वक्र गतीने कन्या राशीत प्रवेश करेल. ६ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. ७ तारखेला चंद्राची शुक्राशी युती आणि मंगळ व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात संमिश्र असेल. मनोनुकूल खरेदी होईल. मात्र काही खर्च अचानक वर डोके काढतील. कोणत्यातरी चिंता मनाला विनाकारण सतावत राहतील. उपासनेत मन रमेल. पारमार्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्यांना उत्तम ग्रहमान आहे. तसेच या दरम्यान केलेली गुंतवणूक दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरेल. सप्ताहाच्या मध्यात मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मन आनंदी राहील. सप्ताहाच्या शेवटी कौटुंबीक सौख्य मिळेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. काहींना धनलाभ शक्य आहे. शनिवारचा दिवस अविस्मरणीय घटनांचा ठरु शकेल.
उपासना: ’ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम:’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी सूर्य, बुध(व), शुक्र(व), पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी राहू, सप्तमस्थानात शनि(व), नेपचून, भाग्यस्थानात हर्षल, लाभस्थानात मंगळ आणि व्ययस्थानात गुरु, केतू अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला चंद्राची मंगळ व गुरुशी युती व शुक्राशी लाभयोग होईल. ४ तारखेला सूर्य व बुधाची युती होईल आणि चंद्राचा सूर्य व बुधाशी तर शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल. ५ तारखेला शुक्र वक्र गतीने कन्या राशीत प्रवेश करेल. ६ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. ७ तारखेला चंद्राची शुक्राशी युती आणि मंगळ व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात छान होईल. काही लाभ होऊ शकतात. मित्रांच्या किंवा आप्तांच्या भेटीचे योग येतील. मन प्रसन्न असेल. वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताहाचा मध्य संमिश्र असेल. जुनी येणी वसूल होतील. पूर्वीच्या एखाद्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. अध्यात्मिक क्षेत्रातील लोकांना चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे. मात्र या दरम्यान खर्चाचे प्रमाणही वाढेल. तसेच या काळात बेकायदा व्यवहारांपासून लांब रहा. सप्ताहाच्या शेवटी उत्तम ग्रहमान आहे. कौटुंबीक सौख्य मिळेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. धनलाभही आज शक्य आहे. कलाकारांना विशेषत: गायकांना यश देणारं ग्रहमान आहे.
उपासना: या काळात रोज गणपती स्तोत्र म्हणणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात सूर्य, बुध(व), शुक्र(व), चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात राहू, षष्ठस्थानी शनि(व), नेपचून, अष्टमस्थानात हर्षल, दशमस्थानात मंगळ आणि लाभस्थानात गुरु, केतू अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला चंद्राची मंगळ व गुरुशी युती व शुक्राशी लाभयोग होईल. ४ तारखेला सूर्य व बुधाची युती होईल आणि चंद्राचा सूर्य व बुधाशी तर शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल. ५ तारखेला शुक्र वक्र गतीने कन्या राशीत प्रवेश करेल. ६ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. ७ तारखेला चंद्राची शुक्राशी युती आणि मंगळ व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहात सुरुवातीला जिद्द व चिकाटी वाढेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम झाल्याने वरीष्ठ खूष असतील. काहींना वरीष्ठांकडून न मागता सहकार्य मिळेल. व्यावसायिकांना केलेल्या कामाचा चांगला मोबदला मिळाल्याने तेही खूष असतील. सप्ताह मध्यात ग्रहांची अनुकूलता अजूनच वाढणार आहे. लाभदायक घटना घडतील. आर्थिक सुयश लाभेल. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचा योग शक्य आहे. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. सप्ताहाच्या शेवटी पारमार्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्यांना उत्तम ग्रहमान असणार आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून फ़ायदा मिळेल. जोडीदारासाठी काही खरेदी कराल.
उपासना: श्रीसूक्ताचे नियमित पठण या कालावधीत केलेले चांगले.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात राहू, पंचमस्थानात शनि(व), नेपचून, सप्तमस्थानात हर्षल, भाग्यस्थानात मंगळ, दशमस्थानात गुरु, केतू आणि व्ययस्थानात सूर्य, बुध(व), शुक्र(व), अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला चंद्राची मंगळ व गुरुशी युती व शुक्राशी लाभयोग होईल. ४ तारखेला सूर्य व बुधाची युती होईल आणि चंद्राचा सूर्य व बुधाशी तर शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल. ५ तारखेला शुक्र वक्र गतीने कन्या राशीत प्रवेश करेल. ६ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. ७ तारखेला चंद्राची शुक्राशी युती आणि मंगळ व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. लांबच्या प्रवासाच्या योजना मनात घोळायला लागतील. सप्ताह मध्यात ग्रहमान संमिश्र आहे. वरीष्ठांची नाराजी होईल असे वर्तन टाळा. या दरम्यान गुंतवणूक करत असाल तर तज्ञ व्यक्तीचा सल्ला जरुर घ्या. सप्ताहाच्या शेवटी मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. अपेक्षित लाभ होतील. मात्र एखाद्या मित्राचा किंवा नातेवाईकाचा विचित्र अनुभव या काळात येण्याची शक्याता आहे. सावध असावे.
उपासना: श्रीस्वामी समर्थांचा तारक मंत्र या काळात रोज म्हणावा किंवा ऐकावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी राहू, चतुर्थस्थानात शनि(व), नेपचून, षष्ठस्थानी हर्षल, अष्टमस्थानात मंगळ, नवमस्थानात गुरु, केतू आणि लाभस्थानात सूर्य, बुध(व), शुक्र(व), अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला चंद्राची मंगळ व गुरुशी युती व शुक्राशी लाभयोग होईल. ४ तारखेला सूर्य व बुधाची युती होईल आणि चंद्राचा सूर्य व बुधाशी तर शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल. ५ तारखेला शुक्र वक्र गतीने कन्या राशीत प्रवेश करेल. ६ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. ७ तारखेला चंद्राची शुक्राशी युती आणि मंगळ व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला संमिश्र घटनांचा काळ आहे. जोखीम असलेली कामे या दरम्यान करु नका. महत्त्वाची कामे पुढे ढकला. वाहने सावकाश चालवा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनाचा तोल जाऊ देऊ नका. ज्योतिषशास्त्र, मानसशास्त्र, परामानसशास्त्र अशा गूढ विषयांचा अभ्यास करणार्यांना मात्र अनुकूल काळ आहे. सप्ताहाचा मध्यात कौटुंबीक सौख्य मिळेल. घरातील कामांसाठी वेळ काढावा लागेल. मन प्रसन्न असेल. काहींच्या बाबतीत भाग्यवर्धक घटना घडतील. प्रवासाचे योगही या दरम्यान शक्य आहेत. सप्ताहाच्या शेवटी तुमचा आत्मविश्वास चांगलाच वाढलेला असेल. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगलं काम घडॆल. त्याचा मोबदलाही चांगला मिळाल्याने खुशीत असाल. मानसन्मान मिळेल. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचा योग शक्य आहे. लाभदायक काळ आहे.
उपासना: रामरक्षेचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात राहू, तृतीयस्थानी शनि(व), नेपचून, पंचमस्थानात हर्षल, सप्तमस्थानात मंगळ, अष्टमस्थानात गुरु, केतू आणि दशमस्थानात सूर्य, बुध(व), शुक्र(व), अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला चंद्राची मंगळ व गुरुशी युती व शुक्राशी लाभयोग होईल. ४ तारखेला सूर्य व बुधाची युती होईल आणि चंद्राचा सूर्य व बुधाशी तर शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल. ५ तारखेला शुक्र वक्र गतीने कन्या राशीत प्रवेश करेल. ६ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. ७ तारखेला चंद्राची शुक्राशी युती आणि मंगळ व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराबरोबर वेळ छान व्यतीत करू शकाल. जोडीदाराबद्दल एखादी चांगली बातमी कळू शकेल. मस्त पार्टीचा मूड असेल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांना चांगले ग्रहमान आहे. सप्ताह मध्य प्रतिकूल घटनांचा ठरु शकेल. विमा व्यावसायिकांना मात्र अनुकूल काळ आहे. संशोधक, मानसोपचारतज्ञ, पुराणवस्तू संशोधक, इतिहासकार, ज्योतिषी इ. लोकांनाही हा काळ चांगला आहे. अचानक धनलाभ काहींना चकीत करु शकेल. सप्ताहाच्या शेवटी भाग्यवर्धक घटनांचा काळ आहे. आत्मविश्वास वाढेल. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. धार्मिक गोष्टीत मन रमेल. वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. काहींना प्रवासाचे योग संभवतात.
उपासना: विठ्ठल नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, धनस्थानात शनि(व), नेपचून, चतुर्थस्थानात हर्षल, षष्ठस्थानी मंगळ, सप्तमस्थानी गुरु, केतू, नवमस्थानात सूर्य, बुध(व), शुक्र(व), आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला चंद्राची मंगळ व गुरुशी युती व शुक्राशी लाभयोग होईल. ४ तारखेला सूर्य व बुधाची युती होईल आणि चंद्राचा सूर्य व बुधाशी तर शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल. ५ तारखेला शुक्र वक्र गतीने कन्या राशीत प्रवेश करेल. ६ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. ७ तारखेला चंद्राची शुक्राशी युती आणि मंगळ व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला तब्येतीची काळजी घ्या. शत्रूंच्या कारवायांकडे लक्ष द्या. नवीन नोकरीसाठी प्रयत्न करणारे, वकील तसेच केमिस्ट यांना मात्र हा कालावधी चांगला जाईल. स्पर्धा परीक्षेसाठीही यशदायक काळ आहे. सप्ताह मध्यात आर्थिक लाभदायक ग्रहमान आहे. मनोबल उत्तम राहील. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. घरात आनंदी वातावरण असेल. सासरकडच्या नातेवाईकांचे सहकार्य मिळेल. प्रवास लाभदायक ठरतील. सप्ताहाच्या शेवटी जोखीम असलेले कोणतेही काम करु नका. वाहने जपून चालवा. बेकायदा व्यवहारांपासून लांब रहा. ज्योतिषी/ विमा व्यवसायिकांना मात्र अनुकूल ग्रहमान आहे.
उपासना: रामरक्षेचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि(व), नेपचून, तृतीयस्थानी हर्षल, पंचमस्थानात मंगळ, षष्ठस्थानात गुरु, केतू, अष्टमस्थानात सूर्य, बुध(व), शुक्र(व), लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला चंद्राची मंगळ व गुरुशी युती व शुक्राशी लाभयोग होईल. ४ तारखेला सूर्य व बुधाची युती होईल आणि चंद्राचा सूर्य व बुधाशी तर शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल. ५ तारखेला शुक्र वक्र गतीने कन्या राशीत प्रवेश करेल. ६ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. ७ तारखेला चंद्राची शुक्राशी युती आणि मंगळ व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. मुलांकडून सुवार्ता कळतील. विद्यार्थी, कलाकार यांना चांगला काळ आहे. काही भाग्यवर्धक घटना शक्य. प्रेमी जीवांनाही हा कालावधी चांगला आहे. सप्ताह मध्य तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे याची जाणीव करुन देणारा आहे. वकील, फार्मासिस्ट आणि वैद्यकीय व्यावसायिकांसाठी मात्र हा काळ अनुकूल आहे. नोकरीत वरीष्ठांचे सहकार्य चांगले मिळेल. सप्ताहाच्या शेवटी रागावर नियंत्रण ठेवावे. जोडीदाराशी वाद संभवतात. काळजी घ्या. भागीदारीत व्यवसाय करणार्यांनी आपले व्यवहार पारदर्शक ठेवा. गैरसमजाला वाव देऊ नका.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)