Weekly horoscope ( 19 Aug – 25 Aug 2018)by Atul H. Kulkarni-Astrologer in Pune -Astroshodh

Weekly horoscope ( 19 Aug to 25 Aug 2018)
(by Astroshodh- Astrologer in Pune -Atul H. Kulkarni 9422088979)

अ‍ॅस्ट्रोशोध आठवड्याचे राशिभविष्य (१९ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, चतुर्थात बुध, राहू, पंचमात रवि, षष्टात शुक्र, सप्तमात गुरु,  भाग्यात शनी व प्लुटो, दशमात मंगळ,  केतू व लाभात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल.  १९ तारखेला गुरुचा नेपचूनशी त्रिकोण होईल. २१ तारखेला रविचा मंगळाशी षडाष्टक योग होईल. २५ तारखेला रविचा शनीशी त्रिकोण होणार आहे.
सप्ताहाच्या सुरुवातीला मनाविरुद्ध घटना घडू शकतात. मतभेद टाळावेत. मनाचा तोल जाऊ देऊ नये. वाहने हळू चालवावीत. इन्शुरन्सचे काम करणारे, ज्योतिषी यांना मात्र हा काळ चांगला आहे. सप्ताहाचा मध्य उपासना करण्यास चांगला आहे. लांबच्या प्रवासाच्या योग संभवतात. परदेशगमनासाठीही अनुकूल काळ आहे. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना ग्रहमान अनुकुल आहे. सप्ताह मध्यानंतर कार्यक्षेत्रातील परिस्थिती अनुकुल असेल. सप्ताहाच्या शेवटी मनासारखे काम झाल्याने मन प्रसन्न असेल. वरीष्ठांकडून एखादी मागणी मान्य करून घ्यायची असेल तर हा योग्य काळ आहे.
(by Astroshodh- Astrologer in Pune, contact: Atul H. Kulkarni 9422088979)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियेत बुध, राहू, चतुर्थात रवि , पंचमात शुक्र, षष्ठात गुरु, अष्टमात शनी व प्लुटो, भाग्यात मंगळ व केतू, दशमात नेपचून आणि व्ययस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला गुरुचा नेपचूनशी त्रिकोण होईल. २१ तारखेला रविचा मंगळाशी षडाष्टक योग होईल. २५ तारखेला रविचा शनीशी त्रिकोण होणार आहे.
सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराबरोबर वेळ छान व्यतीत करू शकाल. जोडीदाराबद्दल एखादी चांगली बातमी कळू शकेल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना छान ग्रहमान आहे. सप्ताह मध्य तब्बेतीच्या तक्रारींचा ठरु शकेल. मानसोपचातज्ञ, पुराणवस्तू संशोधक, इतिहासकार इ. लोकांनाही हा काळ चांगला आहे. सप्ताहाच्या शेवटी भाग्यवर्धक गोष्टी घडू शकतात. धार्मिक गोष्टीत मन रमेल. काहींना प्रवासाचे योग संभवतात. मात्र प्रवासात उशीर होणे, मनाविरुध्द घटना घडणे शक्य.
(by Astroshodh- Astrologer in Pune, contact: Atul H. Kulkarni 9422088979)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी बुध, राहू, तृतियेत रवि , चतुर्थात शुक्र, पंचमात गुरु, सप्तमात शनी, प्लुटो, अष्टमात मंगळ, केतू, भाग्यात नेपचून आणि लाभस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला गुरुचा नेपचूनशी त्रिकोण होईल. २१ तारखेला रविचा मंगळाशी षडाष्टक योग होईल. २५ तारखेला रविचा शनीशी त्रिकोण होणार आहे.
सप्ताहाच्या सुरूवातीला तब्बेतीच्या काही तक्रारी जाणवू शकतील. काळजी घ्यावी. शत्रूंच्या कारवाया वाढतील.  नोकरी बदलासाठी प्रयत्न करणार्‍यांनी तुर्तास आहे तीच नोकरी टिकेल असाच प्रयत्न करावा. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वेळ छान व्यतीत होईल. जोडीदाराला काही लाभ होऊ शकतील. भागीदरीत व्यवसाय करणार्‍यांसाठी चांगला काळ आहे. प्रेमात पडलेल्यांनी लग्न ठरविण्यास अनुकुल काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी जोखिम असलेले कुठलेही काम करु नका. वाहने जपून चालवावीत. जोडीदाराशी वाद होण्याची शक्यता आहे.
(by Astroshodh- Astrologer in Pune, contact: Atul H. Kulkarni 9422088979)

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी बुध, राहू, धनस्थानी रवि, तृतियेत शुक्र, चतुर्थात गुरु, षष्ठात शनी व प्लुटो, सप्तमात मंगळ, केतू,  अष्टमात नेपचून आणि दशमात हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला गुरुचा नेपचूनशी त्रिकोण होईल. २१ तारखेला रविचा मंगळाशी षडाष्टक योग होईल. २५ तारखेला रविचा शनीशी त्रिकोण होणार आहे.
सप्ताहाच्या सुरूवातीला मुलांकडून सुवार्ता कळतील. विद्यार्थी, कलाकार यांना चांगला काळ आहे. काही भाग्यवर्धक घटना शक्य. प्रेमी जीवांनाही हा कालावधी चांगला आहे. सप्ताह मध्य तब्बेतीची काळजी घ्यायला पाहिजे याची जाणिव करुन देणारा आहे. वैद्यकीय व्यावसायिकांसाठी मात्र हा काळ अनुकूल आहे. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर वाद होणार
नाहीत याची काळजी घ्यावी. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांनी व्यवहार पारदर्शक ठेवावेत.
(by Astroshodh- Astrologer in Pune, contact: Atul H. Kulkarni 9422088979)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी रवि, धनस्थानी शुक्र, तृतियेत गुरु,  पंचमात शनी, प्लुटो, षष्ठात मंगळ,  केतू, सप्तमात नेपचून, भाग्यात हर्षल आणि व्ययस्थानी बुध, राहू  अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला गुरुचा नेपचूनशी त्रिकोण होईल. २१ तारखेला रविचा मंगळाशी षडाष्टक योग होईल. २५ तारखेला रविचा शनीशी त्रिकोण होणार आहे.
सप्ताहातील सुरुवातीला घरात वाद टाळावेत. काहींना पॊटदुखी/ अ‍ॅसिडिटी/ पित्ताचा त्रास होऊ शकेल. जास्त दगदग करणे टाळावे. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना व खेळाडूंना अनुकूल आहे. एखादं बक्षिस/ धनलाभ होऊ शकेल. लेखक, ब्लॉगर्स, कवी यांना छान काळ आहे. प्रवास सुखकर होतील. एखाद्या नविन विषयाचा अभ्यास सुरु करायचा असेल तर ग्रहमान अनुकुल आहे. सप्ताहाच्या शेवटी तब्बेतीची काळजी घ्यावी. खर्चावर निय़ंत्रण ठेवावे. जुन्या गुंतवणुकीतून लाभ होऊ शकतील. वकील किंवा कायदाविषयक कामे करणार्‍यांना चांगला कालावधी आहे.
(by Astroshodh- Astrologer in Pune, contact: Atul H. Kulkarni 9422088979)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शुक्र धनस्थानी गुरु,  चतुर्थात शनी, प्लुटो, पंचमात मंगळ, केतू,  षष्ठात नेपचून, अष्टमात हर्षल लाभस्थानी बुध, राहू आणि
व्ययस्थानी रवि, अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला गुरुचा नेपचूनशी त्रिकोण होईल. २१ तारखेला रविचा मंगळाशी षडाष्टक योग होईल.  २५ तारखेला रविचा शनीशी त्रिकोण होणार आहे.
सप्ताहाच्या सुरूवातीला प्रवासाचे योग संभवतात. भावंडांच्या भेटीचे योग येतील. साहित्यिकांसाठी चांगला काळ. मनासारखे काम झाल्याने खूष असाल. लेखकांना व खेळाडूंना छान काळ आहे. सप्ताह मध्य प्रॉपर्टी खरेदी विक्रीसाठी अनुकुल. बांधकाम व्यावसायिकांनाही अनुकुल ग्रहमान आहे. घरातील वातावरण चांगले राहील. मस्त पार्टीचा मूड असेल. जोडीदाराला खूश करण्यासाठी काही खरेदी होऊ शकेल. सप्ताहाच्या शेवटी एखादा धनलाभ संभवतो. कलाकारांना अनुकुल कालावधी.
(by Astroshodh- Astrologer in Pune, contact: Atul H. Kulkarni 9422088979)

तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी गुरु,  तृतियेत शनी, प्लुटो, चतुर्थात मंगळ, केतू, पंचमात नेपचून, सप्तमात हर्षल, दशमस्थानी बुध, राहू लाभस्थानी रवि, आणि व्ययस्थानी शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला गुरुचा नेपचूनशी त्रिकोण होईल. २१ तारखेला रविचा मंगळाशी षडाष्टक योग होईल.  २५ तारखेला रविचा शनीशी त्रिकोण होणार आहे.
सप्ताह अतिशय छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीस कुटुंबियांसोबत वॆळ छान जाईल. मिष्ठान्न भोजन किंवा पार्टीचा योग येऊ शकतो. सप्ताह मध्यात प्रवासयोग शक्य. प्रवास सुखकर होतील. सप्ताह मध्यानंतर प्रॉपर्टीच्या कामांमधे यश संभवते. घरातील डागडुजी किंवा तत्सम गोष्टींसाठी अनुकुल काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी विद्यार्थी, खेळाडू यांना चांगला काळ आहे. शेअर्ससारख्या ठिकाणी गुंतवणुक करीत असाल तर जपुन.
(by Astroshodh- Astrologer in Pune, contact: Atul H. Kulkarni 9422088979)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी शनी, प्लुटो, तृतियेत मंगळ,  केतू,
चतुर्थात नेपचून आणि षष्ठस्थानात हर्षल, भाग्यस्थानी बुध, राहू, दशमस्थानी रवि, लाभस्थानी शुक्र व व्ययस्थानी गुरु  अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला गुरुचा नेपचूनशी त्रिकोण होईल. २१ तारखेला रविचा मंगळाशी षडाष्टक योग होईल. २५ तारखेला रविचा शनीशी त्रिकोण होणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. तुमच्या कलागुणांना वाव मिळेल. तुमवी प्रतिष्टा वाढू शकेल. काहींना प्रवासयोग संभवतात. मात्र प्रवासात पुरेशी काळाजी घ्यावी. सप्ताह मध्यात खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवावे.
डोळ्यासंबंधी काही तक्रारी जाणवत राहू शकतात. सप्ताह भावंडांशी/ शेजारी-पाजार्‍यांशी वाद
टाळावेत. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा. एखाद्या कामात चांगला लाभ संभवतो. गणपती अथर्वशीर्षाची आवर्तने करणे श्रेयस्कर राहील.
(by Astroshodh- Astrologer in Pune, contact: Atul H. Kulkarni 9422088979)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शनी, प्लुटो,  धनस्थानी मंगळ, केतू, तृतिय स्थानात नेपचून, पंचमस्थानात हर्षल, अष्टमस्थानी बुध, राहू, भाग्यस्थानी रवि, दशमस्थानी शुक्र आणि लाभस्थानी गुरु  अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला गुरुचा नेपचूनशी त्रिकोण होईल. २१ तारखेला रविचा मंगळाशी षडाष्टक योग होईल. २५ तारखेला रविचा शनीशी त्रिकोण होणार आहे.
सप्ताहाची सुरुवात छान खरेदीची. पारमार्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्‍यांसाठी उत्तम असणार आहे. धार्मिक गोष्टींसाठी खर्च कराल. घर किंवा घरासाठी लागणार्‍या गोष्टींसाठी अनुकूल कालावधी आहे. सप्ताहाच्या मध्यात काही आनंद देणार्‍या घटना शक्य. भावंडं किंवा आप्तेष्ट यांच्या भेटीचे योग येतील. काहींना धनलाभ शक्य. कुटुंबीयांबरोबर वेळ मजेत जाईल. सप्ताहाच्या शेवटी खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा.
(by Astroshodh- Astrologer in Pune, contact: Atul H. Kulkarni 9422088979)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी मंगळ, केतू,  धनस्थानी नेपचून,
चतुर्थस्थानी हर्षल, सप्तमस्थानी  बुध, राहू,  अष्टमस्थानी रवि, भाग्यस्थानी शुक्र,  दशमस्थानी गुरु आणि व्ययस्थानी शनी, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला गुरुचा नेपचूनशी त्रिकोण होईल. २१ तारखेला रविचा मंगळाशी षडाष्टक योग होईल. २५ तारखेला रविचा शनीशी त्रिकोण होणार आहे.
सप्ताहाच्या सुरूवात छान होईल. काही लाभ होऊ शकतात. मित्रांच्या भेटीचे योग येतील. मन प्रसन्न असेल. वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. मित्रांबरोबर छान सहलीला जायला हरकत नाही. ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताहाच्या मध्यात अचानक खर्च उद्भवू शकतात. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून लाभ संभवतात. सप्ताहाच्या शेवटी आत्मविश्वास वाढविणार्‍या घटना घडतील. सप्ताहाच्या शेवटी आहारावर व बोलण्यावर नियंत्रण ठेवावे.
(by Astroshodh- Astrologer in Pune, contact: Atul H. Kulkarni 9422088979)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी नेपचून, तृतिय स्थानात हर्षल,
षष्ठस्थानी बुध,  राहू,  सप्तमस्थानी रवि, अष्टमस्थानी शुक्र,  भाग्यस्थानी गुरु, लाभस्थानी शनी, प्लुटो आणि व्ययस्थानी मंगळ,  केतू अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला गुरुचा नेपचूनशी त्रिकोण होईल. २१ तारखेला रविचा मंगळाशी षडाष्टक योग होईल. २५ तारखेला रविचा शनीशी त्रिकोण होणार आहे.
आपल्याला सप्ताह एकदम छान आहे. सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. वरीष्ठ तुमच्या कामावर खूष असतील. काहींना वरीष्ठांकडून न मागता सहकार्य मिळेल. व्यावसायिक लोकांना केलेल्या कामाचा चांगला मोबदला मिळाल्याने खूष असतील. सप्ताह मध्यात मित्रांबरोबर/ आप्तेष्टांबरोबर एखाद्या कार्यक्रमाचा किंवा मेजवानीचा बेत आखावयास हरकत नाही. सप्ताहाचा शेवट खरेदीसाठी अनुकुल आहे. काही अनपेक्षित खर्चही संभवतात. सप्ताहाच्या शेवटी पारमार्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्‍यांसाठी उत्तम ग्रहमान असणार आहे.
(by Astroshodh- Astrologer in Pune, contact: Atul H. Kulkarni 9422088979)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात हर्षल, पंचमस्थानी बुध, राहू,  षष्ठस्थानात रवि, सप्तमस्थानी शुक्र,  अष्टम स्थानी गुरु,  दशमस्थानी शनी, प्लुटो, लाभ स्थानी मंगळ, केतू  आणि व्ययस्थानी नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला गुरुचा नेपचूनशी त्रिकोण होईल. २१ तारखेला रविचा मंगळाशी षडाष्टक योग होईल.  २५ तारखेला रविचा शनीशी त्रिकोण होणार आहे.
संपूर्ण सप्ताह खूप चांगला जाणार आहे. सुरुवातीलाच काही भाग्यवर्धक घटना घटना शक्य आहेत. प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. सप्ताह मध्यात वरीष्ठांकडून तुमची एखादी मागणी पूर्ण करून घेता येईल. सप्ताह मध्यात नविन नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांसाठी हा कालावधी चांगला आहे. व्यावसायिकांनाही अनुकूल काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी धनलाभ शक्य. मित्रांच्या भेटीगाठीचे योग संभवतात. मित्रांच्या मदतीने काही कामे सहजगत्या होतील.
(by Astroshodh- Astrologer in Pune, contact: Atul H. Kulkarni 9422088979)

#weekly-horoscope
#horoscope
#astroshodh
#astrology
#rashi
#bhavishya