अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१४ एप्रिल ते २० एप्रिल २०२४) 

(Astroshodh- bestastrologerinpune, famousastrologerinpune, topastrologerinpune, bestastrologerinindia, famousastrologerinindia, topastrologerinindia)

 

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, गुरु, हर्षल, षष्ठस्थानात केतू, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात मंगळ, शनि आणि व्ययस्थानात बुध(व), शुक्र, राहू, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग, मंगळाचा गुरुशी लाभयोग व बुधाची शुक्राशी युती होईल. २० तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग तर गुरुशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला तुमची कल्पनाशक्ती तुम्हाला चांगली साथ देणार आहे. मात्र लेखक, ब्लॉगर्स, कवी यांनी सोशल मिडियावर लिहितांना लोकांच्या भावना दुखवल्या जाणार नाहीत याची काळजी घेतल्यास अनुकूल ग्रहमान आहे. भावंडांशी संपर्क साधाल. सप्ताह मध्यात कौटुंबिक सौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. प्रॉपटींची कामे मार्गी लागतील. घरातील वातावरण चांगले रहाणार आहे. सप्ताह अखेरीस काहींना अचानक धनलाभ संभवतात. तुमचं कौतुक या काळात होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी, कलाकार, खेळाडू यांना अनुकूल कालावधी आहे. मात्र या दरम्यान तब्येतीसंबंधी काही कुरबुरी जाणवतील. काळजी घ्यावी.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला पंचमस्थानात केतू, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात मंगळ, शनि, लाभस्थानात बुध(व), शुक्र, राहू, नेपचून आणि व्ययस्थानात सूर्य, गुरु, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग, मंगळाचा गुरुशी लाभयोग व बुधाची शुक्राशी युती होईल. २० तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग तर गुरुशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताह उत्तम आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला कुटुंबीयांसोबत वॆळ छान जाईल. काहींना धनलाभाचे योग आहेत. तुमच्या संभाषण कौशल्याच्या जोरावर काही कामे मार्गी लागतील. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. एखादा नवीन पदार्थ स्वत: बनवून बघायला हरकत नाही. सप्ताह मध्यात आप्तेष्टांच्या भेटी होतील. काहींना सूचक स्वप्ने पडतील. लेखक, वक्ते व साहित्यिक यांना अनुकूल काळ आहे. भावंडांशी संवाद साधाल. काहींना केलेल्या कामाचा चांगला मोबदला मिळेल. सप्ताह अखेरीस प्रॉपर्टी खरेदी-विक्री करणारे तसेच प्रिंटिंग/ प्रकाशन क्षेत्राशी संबंधितांना ग्रहमान अनुकूल आहे. एखादी चांगली घटना घडल्यामुळे खुश असाल. एखादा नवीन विषय किंवा एखादी कला शिकायला सुरुवात करणार असाल तर हा संपूर्ण सप्ताह अत्यंत शुभ आहे.
उपासना: रामरक्षेचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात केतू, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात मंगळ, शनि, दशमस्थानात बुध(व), शुक्र, राहू, नेपचून आणि लाभस्थानात सूर्य, गुरु, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग, मंगळाचा गुरुशी लाभयोग व बुधाची शुक्राशी युती होईल. २० तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग तर गुरुशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला अनुकूल काळ आहे. आत्मविश्वास वाढेल. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. दैनंदिन कामे मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. घरात उत्सव/ समारंभाचे वातावरण असेल. एखादी पार्टी किंवा गेट-टुगेदरचं आयोजन घरात करायला हरकत नाही. सप्ताह मध्यात आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. तुमच्या आवडीच्या पदार्थांची घरात रेलचेल असेल. सप्ताह अखेर घरात छान वातावरण असणार आहे. तुमच्या आत्मविश्वासाची व पराक्रमाची वृध्दी होईल. भावंडांबद्दल चांगली बातमी कळेल. शेजार्‍यांचा/ नातेवाईकांचा सुखद अनुभव येईल. कलाकार, लेखक व कवी यांना अनुकूल ग्रहमान आहे. छान खरेदी होईल.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी केतू, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात मंगळ, शनि, भाग्यस्थानात बुध(व), शुक्र, राहू, नेपचून आणि दशमस्थानात सूर्य, गुरु, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग, मंगळाचा गुरुशी लाभयोग व बुधाची शुक्राशी युती होईल. २० तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग तर गुरुशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात संमिश्र असणार आहे. काही खरेदी किंवा खर्च आपलं महिन्याचं बजेट बिघडवू शकेल. मात्र पारमार्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्‍या लोकांना हाच कालावधी विशेष अनुकूल आहे. सप्ताह मध्यात मन प्रसन्न असेल. तुमची काही आवड किंवा छंद असतील तर त्यासाठी अवश्य वेळ द्या. सप्ताहाच्या शेवटी तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम घडणार आहे. काहींना धनलाभ शक्य आहे. लेखक व वक्त्यांना अनुकूल ग्रहमान आहे.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी केतू, षष्ठस्थानात प्लूटो, सप्तमस्थानात मंगळ, शनि, अष्टमस्थानात बुध(व), शुक्र, राहू, नेपचून आणि भाग्यस्थानात सूर्य, गुरु, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग, मंगळाचा गुरुशी लाभयोग व बुधाची शुक्राशी युती होईल. २० तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग तर गुरुशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होईल. लाभदायक ग्रहमान आहे. मित्रमैत्रिणींशी किंवा आप्तेष्टांशी संपर्क होईल. काहींना धनलाभाचे योग आहेत. अपेक्षित गाठीभेटी होतील. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. आर्थिक सुयश लाभेल. तुमच्या काही महत्वाकांक्षा या काळात पूर्ण हॊऊ शकतील. कुटुंबात आनंदी व उत्साही वातावरण असेल. सप्ताह मध्य थोडासा प्रतिकूल असेल. काही अनपेक्षित खर्चही करावे लागतील. मनाचा तोल जाणार नाही याची या काळात काळजी घ्यावी. मेडीटेशन/ धार्मिक गोष्टींमध्ये मन रमवलेले चांगले ठरेल. सप्ताह मध्यानंतर भाग्याची साथ मिळेल. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. प्रवास लाभदायक ठरतील. सप्ताहाच्या शेवटी काही प्रसन्न करणार्‍या घटना शक्य आहेत.
उपासना: या सप्ताहात सूर्योपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात केतू, पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी मंगळ, शनि, सप्तमस्थानात बुध(व), शुक्र, राहू, नेपचून आणि अष्टमस्थानात सूर्य, गुरु, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग, मंगळाचा गुरुशी लाभयोग व बुधाची शुक्राशी युती होईल. २० तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग तर गुरुशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला तुम्हाला आत्मविश्वासात वाढ झाल्याचं जाणवेल. कार्यक्षेत्रात चांगले काम झाल्याने वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल. वरीष्ठ कामाचं कौतुक करतील त्यामुळे खुश असाल. पगारवाढ किंवा पाहिजे त्या ठिकाणी बदली यासाठी इच्छूक असाल तर आत्ता वरीष्ठांकडे शब्द टाकून बघायला हरकत नाही. सप्ताह मध्यात चांगला धनलाभ होईल. अचानक एखाद्या जुन्या मित्राची भेट सुखावून टाकेल. मित्राच्या मदतीने एखादं अडलेलं काम मार्गी लागू शकेल. सप्ताहाच्या शेवटी काही खर्च करावे लागतील. परदेशगमनासाठी अनुकूल काळ आहे. मात्र या काळात नियम मोडून कोणतीही गोष्ट करु नका.
उपासना: ’ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: ’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात मंगळ, शनि, षष्ठस्थानी बुध(व), शुक्र, राहू, नेपचून, सप्तमस्थानात सूर्य, गुरु, हर्षल आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग, मंगळाचा गुरुशी लाभयोग व बुधाची शुक्राशी युती होईल. २० तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग तर गुरुशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताह अतिशय छान आहे. सप्ताहाच्या सुरूवातीलाच काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. गुरु किंवा वरीष्ठांचे सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. उपासना करणार्‍यांसाठीही काळ चांगला आहे. सप्ताह मध्यात नोकरीत किंवा व्यवसायात चांगले काम झाल्याने खुश असाल. सप्ताह मध्यानंतर काहींना धनलाभ शक्य आहेत. मित्र किंवा नातेवाईकांबरोबर छान वेळ जाईल. सप्ताह अखेरीस तब्येतीसंबंधी काही कुरबुरी जाणवतील. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना मात्र दिवस अनुकूल आहे.
उपासना: गणपतीची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात मंगळ, शनि, पंचमस्थानात बुध(व), शुक्र, राहू, नेपचून, षष्ठस्थानी सूर्य, गुरु, हर्षल आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग, मंगळाचा गुरुशी लाभयोग व बुधाची शुक्राशी युती होईल. २० तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग तर गुरुशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताह थोडासा प्रतिकूल ठरण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला अती दगदग टाळावी. जीवनशक्तीची कमतरता किंवा थकवा जाणवत राहू शकेल. काही आजार असतील तर अंगावर काढू नका. वाहने जपून चालवा. सप्ताह मध्यात काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. वक्ते, पुरोहीत, शिक्षक यांना अनुकूल काळ आहे. सप्ताह अखेरीस तुमच्या हितशत्रूंवर लक्ष ठेवावे. नोकरीत किंवा व्यवसायात कामाच्या तुलनेत मोबदला कमी मिळेल. नाउमेद होऊ नका. ग्रहमान लवकरच बदलेल.
उपासना: गुरुउपासना किंवा स्वामी समर्थांच्या तारक मंत्राचा जप करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी मंगळ, शनि, चतुर्थस्थानात बुध(व), शुक्र, राहू, नेपचून, पंचमस्थानात सूर्य, गुरु, हर्षल आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग, मंगळाचा गुरुशी लाभयोग व बुधाची शुक्राशी युती होईल. २० तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग तर गुरुशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. जोडीदाराला एखादी छानशी भेटवस्तु देऊन खुश करु शकाल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांसाठी ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह मध्यात अचानक आलेल्या अडचणींनी त्रस्त व्हाल. मन शांत ठेवावे. महादेवाची किंवा मारुतीची उपासना उपयोगी ठरेल. सप्ताह मध्यानंतर थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. धार्मिक स्थळांना भेट देण्याचे योग आहेत. सप्ताहाच्या शेवटी तुमच्या कार्यक्षेत्रात चांगलं काम घडेल. मन प्रसन्न करणार्‍या घटना घडण्याची शक्यता आहे.
उपासना: ’विठ्ठल’ नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात मंगळ, शनि, तृतीयस्थानी बुध(व), शुक्र, राहू, नेपचून, चतुर्थस्थानात सूर्य, गुरु, हर्षल आणि नवमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग, मंगळाचा गुरुशी लाभयोग व बुधाची शुक्राशी युती होईल. २० तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग तर गुरुशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला काही भाग्यवर्धक घटना घडू शकतील. नोकरदारांसाठी व कलाकारांसाठी अत्यंत अनुकूल काळ आहे. नोकरीच्या शोधात असणार्‍यांना उत्तम घटनांचा कालावधी आहे. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. दूरच्या प्रवासाचे विचार मनात घोळत रहातील. मात्र आपल्या तब्येतीकडे या काळात दुर्लक्ष करु नका तसेच अती दगदग टाळलेली बरी. सप्ताह मध्य चांगला आहे. कौटुंबिक सौख्य मिळेल. व्यवसायातील निर्णय योग्य ठरतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. जोडीदाराबरोबर वेळ छान जाईल. सप्ताह अखेरीस तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. प्रवासयोग शक्य. सोशल मिडियावर केलेली एखादी पोस्ट प्रसिध्दी मिळवून देऊ शकेल.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, शनि, धनस्थानात बुध(व), शुक्र, राहू, नेपचून, तृतीयस्थानी सूर्य, गुरु, हर्षल, अष्टमस्थानात केतू आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग, मंगळाचा गुरुशी लाभयोग व बुधाची शुक्राशी युती होईल. २० तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग तर गुरुशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात चांगली असणार आहे. काहींना छोटसं बक्षिस, भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल. मात्र संततीशी या दरम्यान वाद टाळावेत. नवीन गुंतवणूक करतांना सावध रहाणे गरजेचे आहे. शेअर मार्केट सारख्या किंवा ज्या-ज्या क्षेत्रात जोखीम आहे अशा क्षेत्रात सध्या गुंतवणूक न केलेलीच बरी. सप्ताह मध्यात नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. नोकरी बदल किंवा नवीन नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर तुम्हाला काही संधी चालून येऊ शकतील. मात्र तब्येतीच्या काही समस्या या काळात जाणवू शकतील. काळजी घ्यावी. सप्ताह अखेर आपल्या जिवलग माणसांसोबत वेळ छान जाणार आहे.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी बुध(व), शुक्र, राहू, नेपचून, धनस्थानात सूर्य, गुरु, हर्षल, सप्तमस्थानी केतू, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात मंगळ, शनि अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग, मंगळाचा गुरुशी लाभयोग व बुधाची शुक्राशी युती होईल. २० तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग तर गुरुशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला उत्तम ग्रहमान आहे. घरातील वातावरण चांगले राहील. उत्सव/ समारंभात भाग घ्याल. मन प्रसन्न असेल. प्रॉपर्टीच्या कामांसाठी अनुकूल काळ आहे. मानसिक सौख्य लाभेल. सप्ताह मध्य लाभदायक आहे. मानसन्मानाचे योग आहेत. विद्यार्थ्यांना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल. नवी विषयाच्या अभ्यासाला सुरुवात करायची असेल तर त्यासाठीही हा काळ चागला आहे. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. सप्ताहाच्या शेवटी नोकरीत समाधानकारक स्थिती असेल. व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील. मात्र या दरम्यान तब्येतीसंबंधी काही कुरबुरी जाणवतील. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना मात्र ग्रहमान अनुकूल आहे.
उपासना: ’विठ्ठल’ नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)