अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१७ मार्च ते २३ मार्च)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी मंगळ, हर्षल, चतुर्थात राहू, अष्टमात गुरु, भाग्यात शनी व प्लुटो, दशमात शुक्र, केतू, लाभात बुध, नेपचून आणि व्ययात रवी अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला बुधाचा मंगळाशी लाभयोग होईल. २० तारखेला बुधाचा शनीशी लाभयोग होईल. २१ तारखेला शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल आणि त्यानंतर शुक्र कुंभ राशित प्रवेश करेल. २२ तारखेला मंगळ वृषभ राशित प्रवेश करेल आणि २३ तारखेला राहू व केतू राशांतर करुन अनुक्रमे मिथुन व धनु राशित प्रवेश करतील.
सप्ताहातील सुरुवातीला घरात छान वातावरण असेल. आवडत्या व्यक्तींबरोबर वेळ घालवाल. एखादं छानसं गेट टुगेदर किवा घरात मस्त पार्टी आयोजित करायला हरकत नाही. ज्यांना प्रॉपर्टी विकायची असेल त्यांना चांगले ग्रहमान आहे. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना अनुकूल नाही. अती आत्मविश्वास टाळलेला बरा. परदेशगमनासाठी मात्र अनुकूल ग्रहमान आहे. काहींना चांगले लाभ होतील. सप्ताहाच्या शेवटी कायदेविषयक कामे करणार्‍यांसाठी व नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांना अनुकुल काळ आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून फ़ायदा होईल. तब्बेतीची मात्र काळजी घ्यावी. मारुतीची उपासना फ़ायदेशीर ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियस्थानात राहू, सप्तमात गुरु, अष्टमात शनी व प्लुटो, भाग्यात शुक्र, केतू, दशमात बुध, नेपचून, लाभात रवी आणि व्ययस्थानी मंगळ, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला बुधाचा मंगळाशी लाभयोग होईल. २० तारखेला बुधाचा शनीशी लाभयोग होईल. २१ तारखेला शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल आणि त्यानंतर शुक्र कुंभ राशित प्रवेश करेल. २२ तारखेला मंगळ वृषभ राशित प्रवेश करेल आणि २३ तारखेला राहू व केतू राशांतर करुन अनुक्रमे मिथुन व धनु राशित प्रवेश करतील.
सप्ताहाच्या सुरूवातीला प्रवासाचे योग संभवतात. मात्र प्रवासात काळजी घ्यावी असे ग्रहांचे संकेत आहेत. भावंडांसंदर्भात चांगली बातमी कळेल. साहित्यिकांनी आपल्या लेखात वादग्रस्त विषय टाळावेत. सप्ताह मध्य प्रॉपर्टी खरेदी विक्रीसाठी अनुकुल आहे. बांधकाम व्यावसायिकांनाही अनुकुल ग्रहमान आहे. घरातील वातावरण चांगले राहील. सप्ताहाच्या शेवटी एखादा धनलाभ संभवतो. कलाकारांना अनुकुल कालावधी आहे. आपल्या कार्यक्षेत्रात छान काम होईल. त्यामुळे आनंदी असाल. संततीसंदर्भातील एखादी छान घटना घडेल. कुलदेवतेची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी राहू, षष्ठात गुरु, सप्तमात शनी, प्लुटो, अष्टमात शुक्र, केतू, भाग्यात बुध, नेपचून, दशमात रवी, आणि लाभस्थानी मंगळ, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला बुधाचा मंगळाशी लाभयोग होईल. २० तारखेला बुधाचा शनीशी लाभयोग होईल. २१ तारखेला शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल आणि त्यानंतर शुक्र कुंभ राशित प्रवेश करेल. २२ तारखेला मंगळ वृषभ राशित प्रवेश करेल आणि २३ तारखेला राहू व केतू राशांतर करुन अनुक्रमे मिथुन व धनु राशित प्रवेश करतील.
सप्ताहाच्या सुरूवातीस कुटुंबियांसोबत वॆळ छान जाईल. एखादा धनलाभ होऊ शकतो. सप्ताह मध्यात मनासारखं काम होईल. त्यामुळे खुषीत असाल. आपला आत्मविश्वास वाढलेला असेल. वरीष्ठांचे व वडिलधारी मंडळींचे चांगले सहकार्य मिळणार आहे. लेखकांना चांगला काळ आहे. सप्ताह अखेरीस गृह सौख्य चांगले दर्शवित आहे. ज्यांना घर किंवा गाडी घ्यायची आहे त्यांच्यासाठी अनुकुल ग्रहमान आहे. प्रॉपर्टीच्या सर्वच कामांसाठी चांगला काळ आहे. मन प्रसन्न असेल. विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पाठ करावेत.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी राहू, पंचमात गुरु, षष्ठात शनी व प्लुटो, सप्तमात शुक्र, केतू, अष्टमात बुध, नेपचून, भाग्यस्थानात रवी आणि दशमात मंगळ, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला बुधाचा मंगळाशी लाभयोग होईल. २० तारखेला बुधाचा शनीशी लाभयोग होईल. २१ तारखेला शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल आणि त्यानंतर शुक्र कुंभ राशित प्रवेश करेल. २२ तारखेला मंगळ वृषभ राशित प्रवेश करेल आणि २३ तारखेला राहू व केतू राशांतर करुन अनुक्रमे मिथुन व धनु राशित प्रवेश करतील.
संपूर्ण सप्ताह चांगला आहे. आत्मविश्वास वाढविणार्‍या घटना घडतील. छान मूड असेल. आत्मविश्वास वाढलेला असेल. मात्र आपल्या बोलण्यामुळे कोणी दुखावले जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. सप्ताह मध्यात घरात छान बेत किंवा मस्त पार्टीचा बेत ठरवायला हरकत नाही. कुटुंबियांकडून/ मित्रमंडळींकडून काही लाभ संभवतात. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. काही भाग्यवर्धक घटना घडतील. सप्ताहाच्या शेवटी प्रवास करणार असाल तर सर्व प्रकारची काळजी घेणे गरजेचे आहे. लेखक, ब्लॉगर्स यांनी सोशल मिडियावर पोस्ट करतांना कोणाचं मन दुखावलं जाणार नाही तसेच कोणत्याही वादात आपण सापडणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. श्रीगणेशाची उपासना जरुर करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थात गुरु, पंचमात शनी, प्लुटो, षष्ठात शुक्र, केतू, सप्तमात बुध, नेपचून, अष्टमात रवी, भाग्यात मंगळ, हर्षल आणि व्ययस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला बुधाचा मंगळाशी लाभयोग होईल. २० तारखेला बुधाचा शनीशी लाभयोग होईल. २१ तारखेला शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल आणि त्यानंतर शुक्र कुंभ राशित प्रवेश करेल. २२ तारखेला मंगळ वृषभ राशित प्रवेश करेल आणि २३ तारखेला राहू व केतू राशांतर करुन अनुक्रमे मिथुन व धनु राशित प्रवेश करतील.
सप्ताहाच्या सुरुवातीला धार्मिक गोष्टींसाठी किंवा घरासाठी लागणार्‍या गोष्टींसाठी चांगली खरेदी होईल. पारमार्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्‍यांसाठी उत्तम ग्रहमान आहे. सप्ताहाच्या मध्यात मनाविरुध्द घटनांनी नाराज होऊ नका. वाहने जपून चालवा. कायदा हातात घेऊ नका. सप्ताह अखेर भाग्यवर्धक घटनांचा असू शकेल. काहींना धनलाभ होतील. कुटुंबीयांबरोबर वेळ मजेत जाईल. जोडीदाराचा उत्कर्ष शक्य. कुलस्वामिनिची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियस्थानात गुरु, चतुर्थात शनी, प्लुटो, पंचमात शुक्र, केतू, षष्ठात बुध, नेपचून, सप्तमात रवी, अष्टमात मंगळ, हर्षल आणि लाभस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला बुधाचा मंगळाशी लाभयोग होईल. २० तारखेला बुधाचा शनीशी लाभयोग होईल. २१ तारखेला शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल आणि त्यानंतर शुक्र कुंभ राशित प्रवेश करेल. २२ तारखेला मंगळ वृषभ राशित प्रवेश करेल आणि २३ तारखेला राहू व केतू राशांतर करुन अनुक्रमे मिथुन व धनु राशित प्रवेश करतील.
सप्ताहाची सुरूवात छान होईल. काही लाभ होऊ शकतात. मित्रांच्या भेटीचे योग येतील. मन प्रसन्न असेल. वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताहाच्या मध्यात जोडीदाराबरोबर मस्त खरेदीला जायला हरकत नाही. अचानक काही खर्चही उद्भवू शकतात. परदेशगमनासाठीही अनुकूल कालावधी आहे. धार्मिक गोष्टींसाठी काळ चांगला आहे. सप्ताहाचा शेवट खुप छान जाणार आहे. धनलाभ होतील. कुटुंबात आनंदी वातावरण असेल. विद्यार्थ्यांना विशेषत: गायकांना हा काळ अतिशय अनुकूल आहे. गुरु उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी गुरु, तृतियस्थानात शनी, प्लुटो, चतुर्थात शुक्र, केतू, पंचमात बुध, नेपचून, षष्टात रवी, सप्तमात मंगळ, हर्षल आणि दशमस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला बुधाचा मंगळाशी लाभयोग होईल. २० तारखेला बुधाचा शनीशी लाभयोग होईल. २१ तारखेला शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल आणि त्यानंतर शुक्र कुंभ राशित प्रवेश करेल. २२ तारखेला मंगळ वृषभ राशित प्रवेश करेल आणि २३ तारखेला राहू व केतू राशांतर करुन अनुक्रमे मिथुन व धनु राशित प्रवेश करतील.
सप्ताहात सुरुवातीला आपल्या कार्यक्षेत्रात चांगले काम झाल्याने वरीष्ठ खूष असतील. काहींना वरीष्ठांकडून न मागता सहकार्य मिळेल. व्यावसायिक लोकांना केलेल्या कामाचा चांगला मोबदला मिळाल्याने खूष असतील. सप्ताह मध्यात मित्रांबरोबर/ आप्तेष्टांबरोबर वाद होणार नाहीत याची काळजी घ्यावी. तब्येतीची काळजी घ्या. उन्हामुळे होणारे आजार तु्म्हाला या कालावधीत होण्याची शक्यता आहे. शक्य असेल तर उन्हात जाणे टाळावे. सप्ताहाच्या शेवटी पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून फ़ायदा मिळण्याची शक्यता आहे. कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी गुरु, धनस्थानी शनी, प्लुटो, तृतियस्थानात शुक्र, केतू, चतुर्थात बुध, नेपचून, पंचमात रवी, षष्ठस्थानात मंगळ, हर्षल आणि भाग्यस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला बुधाचा मंगळाशी लाभयोग होईल. २० तारखेला बुधाचा शनीशी लाभयोग होईल. २१ तारखेला शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल आणि त्यानंतर शुक्र कुंभ राशित प्रवेश करेल. २२ तारखेला मंगळ वृषभ राशित प्रवेश करेल आणि २३ तारखेला राहू व केतू राशांतर करुन अनुक्रमे मिथुन व धनु राशित प्रवेश करतील.
संपूर्ण सप्ताह खूप चांगला जाणार आहे. सुरुवातीलाच काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. सप्ताह मध्यात वरीष्ठांकडून तुमची एखादी मागणी पूर्ण करून घेता येईल. मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या शेवटी धनलाभ शक्य. मित्रांच्या भेटीचे योग संभवतात. मजेत वेळ व्यतीत करु शकाल. मित्रांच्या मदतीने काही कामे सहजगत्या होतील. गुरु उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शनी, प्लुटो, धनस्थानी शुक्र, केतू, तृतियस्थानात बुध, नेपचून, चतुर्थात रवी, पंचमस्थानात मंगळ, हर्षल, अष्टमस्थानी राहू आणि व्ययस्थानी गुरु  अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला बुधाचा मंगळाशी लाभयोग होईल. २० तारखेला बुधाचा शनीशी लाभयोग होईल. २१ तारखेला शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल आणि त्यानंतर शुक्र कुंभ राशित प्रवेश करेल. २२ तारखेला मंगळ वृषभ राशित प्रवेश करेल आणि २३ तारखेला राहू व केतू राशांतर करुन अनुक्रमे मिथुन व धनु राशित प्रवेश करतील.
सप्ताहाच्या सुरुवातीला मनाविरुद्ध घटना घडू शकतात. मनाचा तोल जाऊ देऊ नये. ज्योतिषशास्त्र, मानसशास्त्र, परामानसशास्त्र अशा गूढ विषयांचा अभ्यास करणार्‍यांना अनुकूल काळ आहे. सप्ताहाचा मध्य उपासना करण्यास चांगला आहे. लांबच्या प्रवासाच्या योग संभवतात. काही भाग्यवर्धक गोष्टी घडतील. सप्ताहाच्या शेवटी चांगले काम झाल्याने मन प्रसन्न असेल. वरीष्ठांकडून एखादी मागणी मान्य करून घ्यायची असेल तर हा योग्य काळ आहे. विद्यार्थ्यांना नविन विषयाचा अभ्यास सुरु करायला अनुकुल काळ आहे. मारुतीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शुक्र, केतू, धनस्थानी बुध, नेपचून, तृतियस्थानात रवी, चतुर्थस्थानी मंगळ, हर्षल, सप्तमस्थानी राहू, लाभस्थानी गुरु आणि व्ययस्थानी शनी, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला बुधाचा मंगळाशी लाभयोग होईल. २० तारखेला बुधाचा शनीशी लाभयोग होईल. २१ तारखेला शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल आणि त्यानंतर शुक्र कुंभ राशित प्रवेश करेल. २२ तारखेला मंगळ वृषभ राशित प्रवेश करेल आणि २३ तारखेला राहू व केतू राशांतर करुन अनुक्रमे मिथुन व धनु राशित प्रवेश करतील.
सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराबरोबर वेळ छान व्यतीत करू शकाल. जोडीदाराबद्दल एखादी चांगली बातमी कळू शकेल. छान पार्टीचा मूड असेल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना छान ग्रहमान आहे. सप्ताह मध्य काहींना अचानक धनलाभाचा ठरु शकेल. विमा व्यावसायिकांना अनुकुल काळ आहे. मानसोपचातज्ञ, पुराणवस्तू संशोधक, इतिहासकार, ज्योतिषी इ. लोकांनाही हा काळ चांगला आहे. सप्ताहाच्या शेवटी भाग्यवर्धक गोष्टी घडू शकतात. धार्मिक गोष्टीत मन रमेल. काहींना प्रवासाचे योग संभवतात. गुरु उपासना भाग्यकारक ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी बुध, नेपचून, धनस्थानात रवी, तृतियस्थानात मंगळ, हर्षल, षष्ठस्थानी राहू, दशमस्थानी गुरु, लाभस्थानी शनी, प्लुटो आणि व्ययस्थानी शुक्र, केतू अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला बुधाचा मंगळाशी लाभयोग होईल. २० तारखेला बुधाचा शनीशी लाभयोग होईल. २१ तारखेला शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल आणि त्यानंतर शुक्र कुंभ राशित प्रवेश करेल. २२ तारखेला मंगळ वृषभ राशित प्रवेश करेल आणि २३ तारखेला राहू व केतू राशांतर करुन अनुक्रमे मिथुन व धनु राशित प्रवेश करतील.
सप्ताहाच्या सुरूवातीला तब्बेतीची काळजी घ्यावी. शत्रूंच्या कारवाया वाढतील. नविन नोकरीसाठी प्रयत्न करणारे, वकिल तसेच केमिस्ट यांना मात्र हा कालावधी चांगला जाईल. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वेळ छान व्यतीत होईल. चांगले धनलाभ होण्याची शक्यता आहे. भागीदरीत व्यवसाय करणार्‍यांसाठीही चांगला काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी जोखिम असलेले कुठलेही काम करु नका. काहींना सूचक स्वप्ने पडू शकतील. विद्यार्थ्यांना प्रतिकूल काळ आहे. विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पाठ करावेत.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी रवी, धनस्थानात मंगळ, हर्षल, पंचमस्थानी राहू, भाग्यस्थानी गुरु, दशमस्थानी शनी, प्लुटो, लाभस्थानी शुक्र, केतू आणि व्ययस्थानी बुध, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला बुधाचा मंगळाशी लाभयोग होईल. २० तारखेला बुधाचा शनीशी लाभयोग होईल. २१ तारखेला शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल आणि त्यानंतर शुक्र कुंभ राशित प्रवेश करेल. २२ तारखेला मंगळ वृषभ राशित प्रवेश करेल आणि २३ तारखेला राहू व केतू राशांतर करुन अनुक्रमे मिथुन व धनु राशित प्रवेश करतील.
सप्ताहाच्या सुरूवातीला मुलांकडून सुवार्ता कळतील. विद्यार्थी, कलाकार यांना चांगला काळ आहे. काही भाग्यवर्धक घटना शक्य. प्रेमी जीवांनाही हा कालावधी चांगला आहे. सप्ताह मध्य तब्बेतीची काळजी घ्यायला पाहिजे याची जाणिव करुन देणारा आहे. वैद्यकीय व्यावसायिकांसाठी मात्र हा काळ अनुकूल आहे. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर वाद टाळलेले बरे. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांनी भागीदाराला गृहीत धरु नये. सर्व व्यवहार पारदर्शक होतील असे बघावे.  अनुकुल काळ आहे. शिव उपासना जरुर करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

#राशिभविष्य
#ज्योतिषशास्त्र
#अ‍ॅस्ट्रोशोध