Weekly horoscope 15 July- 21 July
(This weekly prediction is prepared on the basis of transit of moon & other planets & their aspects with each other for the all twelve zodiac signs).
अॅस्ट्रोशोध आठवड्याचे राशिभविष्य (१५ जुलै ते २१ जुलै)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, तृतिय स्थानी रवि, चतुर्थात बुध, राहू, पंचमात शुक्र, सप्तमात गुरु, भाग्यात शनी व प्लुटो, दशमात मंगळ, केतू व लाभात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला रवि कर्क राशीत प्रवेश करेल. आणि शुक्राचा मंगळाशी व बुधाचा प्लूटोशी षडाष्टक होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला खेळाडूंना व विद्यार्थ्यांना काळ चांगला आहे. कलाकार व खेळाडूंनाही हा कालावधी चांगला आहे. सप्ताह मध्य वकील, फ़िजिकल फ़िटनेस, वैद्यकीय क्षेत्रातील लोकांसाठी अनुकुल आहे. नवीन नोकरीसाठी किंवा नोकरीबदल करायची इच्छा असेल तर काळ अनुकूल आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीपासून लाभ संभवतात. तब्बेतीची मात्र काळजी घ्यावी. सप्ताहाच्या शेवटी घरातील वातावरण चांगले राहील. जोडीदाराकडुन काही लाभ संभवतात. प्रेमिंकांनाही छान काळ आहे.
—अॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी रवि, तृतियेत बुध, राहू, चतुर्थात शुक्र, षष्ठात गुरु, अष्टमात शनी व प्लुटो, भाग्यात मंगळ व केतू, दशमात नेपचून आणि व्ययस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला रवि कर्क राशीत प्रवेश करेल. आणि शुक्राचा मंगळाशी व बुधाचा प्लूटोशी षडाष्टक होईल.
ग्रहमानाची चांगली साथ लाभली आहे. एकूणच आठवडा चांगला जाणार आहे. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. मन प्रसन्न करणार्या घटना घडतील. घरात छान पार्टीचा मूड असेल. सप्ताह मध्यात संततीसंबंधी चांगली बातमी कळेल. विद्यार्थ्यांना अनुकुल कालावधी आहे. लेखक, प्रकाशक, ब्लॉगर्स यांना चांगला काळ आहे. सप्ताहाचा शेवट नोकरदार व्यक्तींना चांगला आहे. नोकरीबदल किंवा नोकरीच्या शोधात असणार्यांना अनुकुल कालावधी आहे. वैद्यकिय व्यवसाय करणारे, वकिल, फ़िजिकल फ़िटनेस ट्रेनर्स यांना खुप चांगला काळ आहे.
—अॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नास्थानी रवि , धनस्थानी बुध, राहू, तृतिय स्थानात शुक्र, पंचमात गुरु, सप्तमात शनी, प्लुटो, अष्टमात मंगळ, केतू, भाग्यात नेपचून आणि लाभस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला रवि कर्क राशीत प्रवेश करेल. आणि शुक्राचा मंगळाशी व बुधाचा प्लूटोशी षडाष्टक होईल.
चागले ग्रहमान आहे. आठवडा छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला प्रियजनांचा सहवास लाभेल. भावंडांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग येऊ शकतात. काहींना प्रवासाचे योग संभवतात. सप्ताह मध्यात छान पार्टीचा मूड असेल. काहींना अचानक लाभ संभवतात. सप्ताह मध्यानंतर काहींना एखाद्या उत्सव/ समारंभात सहभागी होण्याचे योग येतील. सप्ताह अखेर विद्यार्थ्यांना, कलाकारांना चांगली आहे. प्रेमिंकांनाही काळ अनुकूल आहे.
—अॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी बुध, राहू, धनस्थानात शुक्र, चतुर्थात गुरु, षष्ठात शनी व प्लुटो, सप्तमात मंगळ, केतू, अष्टमात नेपचून, दशमात हर्षल आणि व्ययात रवि, अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला रवि कर्क राशीत प्रवेश करेल. आणि शुक्राचा
मंगळाशी व बुधाचा प्लूटोशी षडाष्टक होईल.
संपूर्ण सप्ताह छान आहे. सप्ताहात सुरुवातीला एखादा धनलाभ शक्य. आवडत्या पदार्थाच्या
मेजवानीचे योग येतील. घरातील वातावरण प्रसन्न राहील. सप्ताह मध्यात भावंडांची खबरबात
कळेल. लेखक, ब्लॉगर्स यांना हा काळ खूप चांगला आहे. काहींना जवळपासच्या सहलीचे योग येऊ शकतात. प्रवास फ़ायदेशीर ठरतील. सप्ताहाच्या शेवटी प्रॉपर्टीच्या कामांमधून लाभ संभवतात. इस्टेट ब्रोकर, बिल्डर यांना हा काळ चांगला आहे.
—अॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानात शुक्र, तृतियेत गुरु, पंचमात शनी, प्लुटो, षष्ठात मंगळ, केतू, सप्तमात नेपचून, भाग्यात हर्षल, लाभस्थानात रवि आणि व्ययस्थानी बुध, राहू अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला रवि कर्क राशीत प्रवेश करेल. आणि शुक्राचा मंगळाशी व बुधाचा प्लूटोशी षडाष्टक होईल.
आपल्यासाठी अतिशय छान सप्ताह आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला मन प्रसन्न असेल. आपल्या कार्यक्षेत्रात मनासारखं काम होणार आहे. वरिष्ठ आपल्यावर खूष असतील. वडीलधारी व्यक्तींचे सहकार्य मिळेल. सरकारी कामे काही प्रलंबीत असतील तर ती मार्गी लागतील. सप्ताह मध्यात घरात उत्सव/ समारंभाचे वातावरण असेल. छान पार्टी करायला हरकत नाही. काहींना धनलाभाचे योग संभवतात. प्रवासासाठी अनुकुल काळ आहे. भावंडांच्या भेटीचे योग आहेत.
—अॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी गुरु, चतुर्थात शनी, प्लुटो, पंचमात मंगळ, केतू, षष्ठात नेपचून, अष्टमात हर्षल, दशमात रवि आणि लाभस्थानी बुध, राहू,
व्ययस्थानी शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला रवि कर्क राशीत प्रवेश करेल. आणि
शुक्राचा मंगळाशी व बुधाचा प्लूटोशी षडाष्टक होईल.
सप्ताहात सुरुवातीला खिशात पैसे खुळखुळत असल्याने चैन कराविशी वाटेल. छान खरेदी
कराल. काहींच्या बाबतीत भाग्यवर्धक घटना घडतील. आयात – निर्यातीचा व्यवसाय करणार्या व्यावसायिकांना अनुकुल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात काही लाभ संभवतात. मन प्रसन्न करणार्या घटना घडतील. सप्ताहाच्या शेवटी एखादा अचानक खर्च करावा लागेल. पारमार्थिक उन्नतीसाठी योग्य काळ आहे.
—अॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी गुरु, तृतियेत शनी, प्लुटो, चतुर्थात मंगळ, केतू, पंचमात नेपचून, सप्तमात हर्षल, भाग्यात रवि, दशमस्थानी बुध, राहू आणि लभात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला रवि कर्क राशीत प्रवेश करेल. आणि शुक्राचा मंगळाशी व बुधाचा प्लूटोशी षडाष्टक होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीलाच धनलाभाचे योग संभवतात. आवडत्या लोकांच्या सहवात रहाण्याचे योग येतील. काहींना प्रवासयोग संभवतात. धार्मिक गोष्टींसाठी चांगला काळ आहे. सप्ताह मध्यात मनासारखी खरेदीचे योग आहेत. परदेशगमनासाठी ही वेळ योग्य आहे. कलाकारांना विशेषत: नर्तन कलेशी संबंधीत असलेल्यांना हा कालावधी जास्त अनुकुल आहे. सप्ताहाच्या शेवटी काही भाग्यवर्धक घटना घडू शकतात.
—अॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी शनी, प्लुटो, तृतियेत मंगळ, केतू, चतुर्थात नेपचून आणि षष्ठस्थानात हर्षल, अष्टमस्थानात रवि, भाग्यस्थानी बुध, राहू,
दशमस्थानात शुक्र व व्ययस्थानी गुरु अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला रवि कर्क राशीत प्रवेश करेल आणि शुक्राचा मंगळाशी व बुधाचा प्लूटोशी षडाष्टक होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला आपल्या कार्यक्षेत्रात संमिश्र फ़ळे मिळतील. आपले काम चोख केल्यास व वरीष्ठांशी जुळवुन घेतल्यास अनुकुल काळ आहे. सप्ताह मध्यात आवडत्या लोकांबरोबर वेळ मजेत जाणार आहे. काही लाभही अपेक्षित आहेत. त्यामुळे खुशीत असाल. सप्ताहाच्या शेवटी तब्बेतीला जपावे. ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध परदेशाशी आहे त्यांना ग्रहमान अनुकूल आहे.
—अॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शनी, प्लुटो, धनस्थानी मंगळ, केतू, तृतिय स्थानात नेपचून पंचमस्थानात हर्षल, सप्तमस्थानात रवि, अष्टमस्थानी बुध, राहू,
भाग्यस्थानी शुक्र आणि लाभस्थानी गुरु अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला रवि कर्क राशीत
प्रवेश करेल. आणि शुक्राचा मंगळाशी व बुधाचा प्लूटोशी षडाष्टक होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. भागीदारीत व्यवसाय करणार्यांना चांगला काळ आहे. काहींना प्रवासयोग संभवतात. सप्ताह मध्य थोडा कटकटीचा ठरु शकतो. आपल्या कार्यक्षेत्रात आपण बरं आणि आपलं काम बरं असे धोरण ठेवणे चांगले. सप्ताहाच्या अखेरीस भाग्यवर्धक घटना घडू शकतील. मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग येतील. छान लाभ झाल्याने प्रसन्न असाल. एखाद्या धार्मिक कार्यक्रमात भाग घेऊ शकाल.
—अॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी मंगळ, केतू, धनस्थानी नेपचून, चतुर्थस्थानी हर्षल, षष्टात रवि, सप्तमस्थानी बुध, शुक्र, राहू, दशमस्थानी गुरु आणि व्ययस्थानी शनी, प्लुटो, अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला रवि कर्क राशीत प्रवेश करेल. आणि शुक्राचा मंगळाशी व बुधाचा प्लूटोशी षडाष्टक होईल.
सप्ताहाची सुरुवात संमिश्र असेल. काही चांगले तर काही त्रासदायक प्रसंग घडतील. तब्बेत
सांभाळावी सप्ताह मध्य उत्तम प्रवासाचे असतील. काही छान, लाभदायक घटना घडू शकतात.
उपासनेसाठी हा काळ चांगला आहे. धार्मिक स्थळांना भेटी देण्याचे योग संभावतात. सप्ताहाचा
शेवट मात्र तितकासा चांगला नसेल. रागावर नियंत्रण ठेवावे.
—अॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी नेपचून, तृतिय स्थानात हर्षल,
पंचमात रवि, षष्ठस्थानी बुध, शुक्र, राहू, भाग्यस्थानी गुरु, लाभस्थानी शनी, प्लुटो आणि
व्ययस्थानी मंगळ, केतू अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला रवि कर्क राशीत प्रवेश करेल.
आणि शुक्राचा मंगळाशी व बुधाचा प्लूटोशी षडाष्टक होईल.
सप्ताहाची सुरुवात चांगली होईल. जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीतल्या व्यवहारात फ़ायदा होण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभाचेही योग आहेत. सप्ताह मध्यात ज्योतिषी, सर्जन, मानसशास्त्राशी संबंधीत लोक यांना चांगला काळ आहे. सायनस/ सर्दी अशा स्वरुपाच्या आजाराची शक्यता आहे. काळजी घ्यावी. सप्ताहाच्या शेवटी ग्रहस्थिती अनुकुल आहे. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळू शकेल.
—अॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात हर्षल, चतुर्थात रवि, पंचमस्थानी बुध, शुक्र, राहू, अष्टम स्थानी गुरु, दशमस्थानी शनी, प्लुटो, लाभ स्थानी मंगळ, केतू आणि व्ययस्थानी नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १६ तारखेला रवि कर्क राशीत प्रवेश करेल. आणि शुक्राचा मंगळाशी व बुधाचा प्लूटोशी षडाष्टक होईल.
सप्ताहात सुरुवातीला तब्बेतीच्या तक्रारी जाणवत रहातील. आहारावर नियंत्रण ठेवावे. मात्र
फ़िजिकल फ़िटनेसच्या व वैद्यकीय क्षेत्रात काम कर्णार्यांना अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यात
जवळच्या व्यक्तींच्या भेटीचे योग येतील. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांना चांगला काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी इंशूरन्सचे काम करणार्यांसाठी चांगला कालावधी आहे.
—अॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)