मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी रवि, हर्षल, धनस्थानी शुक्र, चतुर्थात राहू,  सप्तमात गुरु,  भाग्यात मंगळ, शनी व प्लुटो, दशमात केतू, लाभात नेपचून आणि व्ययस्थानी बुध  अशी ग्रहस्थिती असेल. २४ तारखेला मंगळाचा गुरुशी लाभयोग होईल आणि  २५ तारखेला बुधाचा शनीशी केंद्रयोग होईल.
ग्रहमानाची चांगली साथ लाभली आहे. एकूणच आठवडा चांगला जाणार आहे. खोळंबलेली कामे मार्गी लागतील. मनाजोगत्या घटना घडतील. घरात छान बेत ठरतील. उत्साहाच्या भरात अती दगदग मात्र टाळावी. सप्ताह मध्य धार्मिक गोष्टींसाठी चांगला आहे. संततीसंबंधी चांगली बातमी कळेल. विद्यार्थ्यांना अनुकुल कालावधी आहे. कलाकार व खेळाडूंनाही चांगला काळ आहे. सप्ताह अखेरीस तब्बेतीला जपावे. गुंतवणुक करत असाल तर सावधतेने व्यवहार करावेत. नोकरीबदल किंवा नोकरीच्या शोधात असणार्‍यांना अनुकुल कालावधी आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शुक्र, तृतियेत राहू, षष्ठात गुरु, अष्टमात मंगळ, शनी, व प्लुटो, भाग्यात केतू, दशमात नेपचून, लाभात बुध आणि व्ययस्थानी रवि, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल.  २४ तारखेला मंगळाचा गुरुशी लाभयोग होईल आणि  २५ तारखेला बुधाचा शनीशी केंद्रयोग होईल.
चागले ग्रहमान आहे. आठवडा छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला प्रियजनांचा सहवास लाभेल. छान पार्टीचा मूड असेल. सप्ताह मध्यात भावंडांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग येऊ शकतात. काहींना प्रवासयोग संभवतात. लेखक, वक्ते, कवी यांच्यासाठी चांगला कालावधी आहे. काहींना अचानक लाभ संभवतात. सप्ताह मध्यानंतर  काहींना एखाद्या उत्सव/ समारंभात सहभागी होण्याचे योग येतील. सप्ताह अखेर घरासाठी/ घरातील वस्तुंच्या डागडुजीसाठी खर्च करावा लागेल. घरातील शांतता भंग पावणार नाही यासाठी प्रयत्न करावे लागतील. मन शांत
ठेवावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी राहू, पंचमात गुरु, सप्तमात मंगळ,
शनी, प्लुटो, अष्टमात केतू, भाग्यात नेपचून, दशमात बुध, लाभस्थानी रवि, हर्षल आणि
व्ययस्थानी शुक्र, अशी ग्रहस्थिती असेल. २४ तारखेला मंगळाचा गुरुशी लाभयोग होईल आणि
२५ तारखेला बुधाचा शनीशी केंद्रयोग होईल.
सप्ताहात सुरुवातीला एखादा धनलाभ शक्य. आवडत्या पदार्थाच्या मेजवानीचे योग येतील.
घरातील वातावरण प्रसन्न राहील. मनासारखी खरेदी होईल. सप्ताह मध्यात भावंडांची खबरबात
कळेल. लेखक, ब्लॉगर्स यांना हा काळ खूप चांगला आहे. काहींना जवळपासच्या सहलीचे
योग येऊ शकतात. प्रवास फ़ायदेशीर ठरतील. जोडीदारबद्दल चांगली बातमी कळू शकेल.
सप्ताहाच्या शेवटी घरगुती कांमांना वेळ द्यावा लागेल. प्रॉपर्टीच्या कामांमधून लाभ संभवतात.
इस्टेट ब्रोकर, बिल्डर यांना हा काळ चांगला आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी राहू, चतुर्थात गुरु, षष्ठात मंगळ, शनी व प्लुटो, सप्तमात केतू,  अष्टमात नेपचून भाग्यात बुध, दशमात रवि, हर्षल आणि लाभात शुक्र, अशी ग्रहस्थिती असेल.  २४ तारखेला मंगळाचा गुरुशी लाभयोग होईल आणि  २५ तारखेला बुधाचा शनीशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला मन प्रसन्न असेल. मात्र एक प्रकारची हुरहुर किंवा एखाद्या गोष्टीची
चिंता विनाकारण वाटत राहील. सप्ताह मध्यात घरात उत्सव/ समारंभाचे वातावरण असेल.
नोकरी/ व्यवसायामध्ये मनासारखे काम होईल. त्यामधुन काही लाभही होण्याची शक्यता आहे.
सप्ताह अखेर काहींना भाग्यवर्धक घटनांची ठरेल. प्रवासासाठी अनुकुल काळ आहे. धार्मिक
कार्यक्रमांसाठीही अनुकुल काळ आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियेत गुरु,  पंचमात मंगळ,  शनी, प्लुटो, षष्ठात केतू, सप्तमात नेपचून, अष्टमात बुध,  भाग्यात रवि, हर्षल दशमस्थानात शुक्र, आणि व्ययस्थानी राहू,  अशी ग्रहस्थिती असेल. २४ तारखेला मंगळाचा गुरुशी लाभयोग होईल आणि  २५ तारखेला बुधाचा शनीशी केंद्रयोग होईल.
सप्ताहात सुरुवातीला खिशात पैसे खुळखुळत असल्याने चैन कराविशी वाटेल. छान खरेदी कराल. काही अचानक उद्भवलेले खर्चही करावे लागतील. परदेश प्रवासासाठी अनुकुल काळ आहे. सप्ताह मध्यात काही भाग्यवर्धक घटना घडू शकतात. मन प्रसन्न असेल. अध्यात्मिक मार्गातील लोकांना गुरुभेट/ गुरुमंत्र मिळण्याचा योग येऊ शकतो. कलाकार, वादक, कवी यांच्यासाठी हा काळ विशेष चांगला आहे. सप्ताह मध्यानंतर आपल्या रागाच्या भरात बोलण्यामुळे/ वागण्या मोठे नुकसान होऊ शकते. काळजी घ्यावी. सप्ताहाच्या शेवटी एखादा छानसा धनलाभ हॊऊ शकतो.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी गुरु,  चतुर्थात मंगळ, शनी, प्लुटो, पंचमात केतू,  षष्ठात नेपचून, सप्तमात बुध, अष्टमात रवि, हर्षल, भाग्यात शुक्र  आणि लाभस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. २४ तारखेला मंगळाचा गुरुशी लाभयोग होईल आणि  २५ तारखेला बुधाचा शनीशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला छान ग्रहमान आहे. काहींना वरीष्ठांकडून सहकार्य मिळेल. नोकरी, व्यवसायात मनाजोगते काम होईल. मुख्य म्हणजे केलेल्या कामाचा मोबदलाही व्यवस्थित मिळाल्याने मन प्रसन्न राहील. आप्तेष्ठांच्या किंवा मित्रमंडळींची भेट होण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यात मनासारखी खरेदी सप्ताहाच्या शेवटी मनासारखी खरेदी होईल. लांबचे प्रवास किंवा परदेशग प्रवासाचे बेत मनात
घोळत राहतील. सप्ताहाच्या शेवटी जोडीदारासाठी वेळ काढा. घरातील वातावरण छान असेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी गुरु,  तृतियेत मंगळ, शनी, प्लुटो, चतुर्थात केतू, पंचमात नेपचून, षष्टात बुध, सप्तमात रवि, हर्षल, अष्टमात शुक्र,  आणि दशमस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल.  २४ तारखेला मंगळाचा गुरुशी लाभयोग होईल आणि  २५ तारखेला बुधाचा शनीशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला वरीष्ठांशी जुळवुन घेतल्यास अनुकुल काळ आहे. सप्ताह मध्यात आवडत्या लोकांबरोबर वेळ मजेत जाणार आहे. काही लाभही अपेक्षित आहेत. त्यामुळे खुशीत असाल. सप्ताहाच्या शेवटी तब्बेतीला जपावे. विशेषत: हात व कानाची काही दुखणी असतील तर काळजी घेणे गरजेचे आहे. बेकायदेशीर कृत्ये टाळावीत अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागु शकते.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी मंगळ,  शनी, प्लुटो, तृतियेत केतू,  चतुर्थात नेपचून पंचमात बुध, आणि षष्ठस्थानात रवि, हर्षल, सप्तमस्थानी शुक्र, भाग्यस्थानी राहू व व्ययस्थानी गुरु  अशी ग्रहस्थिती असेल. २४ तारखेला मंगळाचा गुरुशी लाभयोग होईल आणि  २५ तारखेला बुधाचा शनीशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीलाच एखादी भाग्यवर्धक घटना घडू शकेल. धार्मिक कार्यक्रमात भाग घेऊ शकाल. काहींना प्रवासाचे योग संभवतात. सप्ताह मध्यात आपल्या कार्यक्षेत्रातील लोकांशी विशेषत: वरीष्ठांशी वाद होणार नाहीत याची काळजी घ्यावी. काहींना ऊष्माघाताने (सनस्ट्रोक) त्रास होण्याचे योग आहेत. योग्य ती काळजी जरुर घ्यावी. सप्ताह मध्यानंतर आत्मविश्वास वाढविणार्‍या घटना घडतील. केलेल्या कष्टाचे चीज होईल. मनासारखे काम होईल व छान मोबदलाही मिळाल्याने मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या अखेरीस मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग येतील.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी मंगळ, शनी, प्लुटो,  धनस्थानी केतू, तृतिय स्थानात नेपचून चतुर्थात बुध, पंचमस्थानात रवि, हर्षल, षष्टस्थानात शुक्र,  अष्टमस्थानी राहू आणि लाभस्थानी गुरु  अशी ग्रहस्थिती असेल.  २४ तारखेला मंगळाचा गुरुशी लाभयोग होईल आणि २५ तारखेला बुधाचा शनीशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाची सुरुवात कंटाळवाणी व कटकटीची झाली तरी नंतर जसजसा आठवडा पुढे जाईल तसतसा कामाचा उत्साह वाढता राहील. सप्ताह मध्य उपासनेसाठी चांगला आहे. विद्यार्थ्यांना व कलाकारांना चांगला कालावधी आहे. एखादं अचानक मिळालेलं गिफ़्ट/ बक्षिस मनाला आनंद देऊन जाईल. काहींना प्रवासाचे योग संभवतात. नवनवीन कल्पना सुचतील. सप्ताहाचा शेवट चांगला जाईल.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी केतू,  धनस्थानी नेपचून, तृतियस्थानात बुध, चतुर्थस्थानी रवि, हर्षल, पंचमात शुक्र, सप्तमस्थानी राहू,  दशम स्थानी गुरु, आणि व्ययस्थानी मंगळ, शनी, प्लुटो, अशी ग्रहस्थिती असेल. २४ तारखेला मंगळाचा गुरुशी लाभयोग होईल आणि २५ तारखेला बुधाचा शनीशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाची सुरुवात चांगली होईल. जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीतल्या व्यवहारात फ़ायदा होण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यात अचानक आलेल्या अडचणींनी त्रस्त व्हाल. चिडचीड वाढेल. घरातील वातावरण बिघडणार नाही याची काळजी घ्यावी. सप्ताहाच्या शेवटी पुन्हा ग्रहस्थिती अनुकुल होत आहे. धार्मिक गॊष्टींमध्ये मन रमेल. काहींना गुरुकृपा शक्य. गुरुची उपासना जरुर करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी नेपचून, धनस्थानी बुध, तृतिय स्थानात रवि, हर्षल, चतुर्थात शुक्र,  षष्ठस्थानी राहू, भाग्यस्थानी गुरु, लाभस्थानी मंगळ,  शनी, प्लुटो आणि व्ययस्थानी केतू अशी ग्रहस्थिती असेल.  २४ तारखेला मंगळाचा गुरुशी लाभयोग होईल आणि २५ तारखेला बुधाचा शनीशी केंद्रयोग होईल.
सप्ताहात सुरुवातीला तब्बेतीच्या तक्रारी जाणवत रहातील. पोटाच्या आजाराची शक्यता आहे. आहारावर नियंत्रण ठेवावे. सप्ताह मध्यात जवळच्या व्यक्तींच्या भेटीचे योग येतील. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल. काहींना धनलाभाची शक्यता आहे. प्रवासासठी अनुकुल काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी काहींना अचानक धनलाभाचे योग येऊ शकतात. बर्‍याच काळापासुन अडकलेले पैसे अचानकपणे मिळू शकतील. इंशूरन्सचे काम करणार्‍यांसाठी चांगला कालावधी आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी बुध, धनस्थानात रवि,  हर्षल, तृतिय्स्थानी शुक्र,  पंचमस्थानी राहू,  अष्टम स्थानी गुरु,  दशमस्थानी मंगळ, शनी, प्लुटो, लाभ स्थानी केतू  आणि व्ययस्थानी नेपचून अशी ग्रहस्थिती असेल.  २४ तारखेला मंगळाचा गुरुशी लाभयोग होईल आणि २५ तारखेला बुधाचा शनीशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला खेळाडूंना व विद्यार्थ्यांना काळ चांगला आहे. कलाकार व खेळाडूंनाही हा कालावधी चांगला आहे. सप्ताह मध्य वकील, फ़िजिकल फ़िटनेस, वैद्यकीय क्षेत्रातील लोकांसाठी अनुकुल आहे. नवीन नोकरीसाठी किंवा नोकरीबदल करायची इच्छा असेल तर काळ अनुकूल आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीपासून लाभ संभवतात. डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर वैद्यकीय सल्ला जरुर घ्यावा. सप्ताहाच्या शेवटी घरातील वातावरण चांगले राहील. जोडीदाराकडुन काही लाभ संभवतात.
—अ‍ॅस्ट्रोशोध (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)