अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२६)

Astroshodh, bestastrologerinpune, famousastrologerinpune, topastrologerinpune, bestastrologerinindia, famousastrologerinindia, topastrologerinindia

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी हर्षल, तृतीयस्थानी मंगळ, चतुर्थस्थानात सूर्य, बुध, गुरु, पंचमस्थानात केतू, षष्ठस्थानी शुक्र, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात राहू आणि व्ययस्थानात शनि(व), नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. १० तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. ११ तारखेला चंद्राची बुध व गुरुशी युती आणि शुक्राशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल. १३ तारखेला चंद्राचा मंगळाशी तर बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला भावंडांच्या, आप्तेष्टांच्या किंवा जिवलगांच्या भेटीचे योग येतील. एखाद्या समारंभ किंवा पार्टीत सामिल होण्याचे योग आहेत. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. घरातील कामांसाठी वेळ काढावा लागेल. प्रॉपर्टीची कामे फायदेशीर ठरतील. प्रवासयोगही शक्य आहेत. मध्यात घरातील वातावरण चांगले रहाणार आहे. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. उच्च शिक्षण किंवा करीयरशी निगडीत काही कोर्सेस करायचे असतील तर त्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह अखेरीस लाभदायक ग्रहमान आहे. मानसन्मान मिळेल. संततीसौख्य लाभेल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. विद्यार्थ्यांना व कलाकारांना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल.
उपासना: गणपतीची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी हर्षल, धनस्थानी मंगळ, तृतीयस्थानी सूर्य, बुध, गुरु, चतुर्थस्थानात केतू, पंचमस्थानात शुक्र, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात राहू आणि लाभस्थानात शनि(व), नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. १० तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. ११ तारखेला चंद्राची बुध व गुरुशी युती आणि शुक्राशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल. १३ तारखेला चंद्राचा मंगळाशी तर बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताह उत्तम आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला कुटुंबीयांसोबत वॆळ छान जाईल. काहींना धनलाभाचे योग आहेत. संभाषणकौशल्यामुळे कामे होतील. गायकांना त्यांच्या कलेचा आनंद मिळेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. सप्ताह मध्यात आप्तेष्टांच्या भेटी होतील. काहींना सूचक स्वप्ने पडतील. लेखक व साहित्यिक यांना अनुकूल काळ आहे. सोशल मिडियावर केलेली एखादी पोस्ट प्रसिध्दी मिळवून देऊ शकेल. सप्ताह मध्यानंतर प्रॉपर्टी खरेदी-विक्री करणारे तसेच प्रिंटिंग/ प्रकाशन क्षेत्राशी संबंधितांना ग्रहमान अनुकूल आहे. एखादी चांगली घटना घडल्यामुळे खुश असाल. सप्ताह अखेरीस वक्ते, विद्यार्थी व कलाकारांना अनुकूल काळ आहे. काहींना केलेल्या कामाचा चांगला मोबदला मिळेल. एखादा विषय किंवा एखादी कला शिकायला सुरुवात करणार असाल तर हा संपूर्ण सप्ताह अत्यंत शुभ आहे.
उपासना: ’ विठ्ठल ’ नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, धनस्थानी सूर्य, बुध, गुरु, तृतीयस्थानी केतू, चतुर्थस्थानात शुक्र, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात राहू, दशमस्थानात शनि(व), नेपचून आणि व्ययस्थानात हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. १० तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. ११ तारखेला चंद्राची बुध व गुरुशी युती आणि शुक्राशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल. १३ तारखेला चंद्राचा मंगळाशी तर बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला भाग्यवर्धक घटना शक्य. घरात उत्सव/ समारंभाचे वातावरण असेल. एखादी पार्टी किंवा गेट-टुगेदरचं आयोजन घरात करायला हरकत नाही. धार्मिक कार्यक्रमांसाठीही अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यात आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. सप्ताह अखेर घरात छान वातावरण असणार आहे. आत्मविश्वासाची व पराक्रमाची वृध्दी होईल. भावंडांबद्दल चांगली बातमी कळेल. शेजार्‍यांचा/ नातेवाईकांचा सुखद अनुभव येईल. कलाकार, लेखक व कवी यांना अनुकूल ग्रहमान आहे. छान खरेदी होईल. धनलाभ होण्याचेही योग आहेत.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, बुध, गुरु, धनस्थानी केतू, तृतीयस्थानी शुक्र, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात राहू, भाग्यस्थानात शनि(व), नेपचून, लाभस्थानात हर्षल आणि व्ययस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. १० तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. ११ तारखेला चंद्राची बुध व गुरुशी युती आणि शुक्राशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल. १३ तारखेला चंद्राचा मंगळाशी तर बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात आपल्या प्रियजनांबरोबर मस्त खरेदीची ठरु शकेल. परदेश प्रवास करण्यासाठी अनुकूल कालावधी आहे. पारमार्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्‍या लोकांना विशेष अनुकूल ग्रहमान आहे. मात्र या दरम्यान बेकायदा गोष्टींपासून लांब रहा. अती दगदग टाळा.
सप्ताह मध्यात मन प्रसन्न असेल. आत्मविश्वास वाढेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. काही लाभदायक घटना या काळात शक्य. तुमची काही आवड किंवा छंद असतील तर त्यासाठी अवश्य वेळ द्या. सप्ताहाच्या शेवटी काहींना धनलाभ शक्य आहे. लेखक, ब्लॉगर्स व कलाकार यांना अनुकुल काळ आहे. भावंडांशी संपर्क होईल. चांगला कालावधी आहे.
उपासना: ’विठ्ठल’ नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात केतू, धनस्थानी शुक्र, षष्ठस्थानी प्लूटो, सप्तमस्थानात राहू, अष्टमस्थानात शनि(व), नेपचून, दशमस्थानात हर्षल, लाभस्थानात मंगळ आणि व्ययस्थानात सूर्य, बुध, गुरु अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. १० तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. ११ तारखेला चंद्राची बुध व गुरुशी युती आणि शुक्राशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल. १३ तारखेला चंद्राचा मंगळाशी तर बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होईल. लाभदायक ग्रहमान आहे. अपेक्षित गाठीभेटी होतील. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. आर्थिक सुयश लाभेल. तुमच्या काही महत्वाकांक्षा या काळात पूर्ण हॊऊ शकतील. कुटुंबात आनंदी व उत्साही वातावरण असेल. सप्ताह मध्यात छान खरेदीचा मूड असेल. जोडीदाराला छानसं गिफ़्ट द्यायला हरकत नाही. काही अनपेक्षित खर्चही करावे लागतील. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. सप्ताहाच्या शेवटी खर्च वाढतील. कामाचा ताण जाणवेल. उपासनेत मन रमवल्यास मनातील नकारात्मक विचार दूर करायला मदत मिळेल.
उपासना: ’ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: ’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात शुक्र, पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी राहू, सप्तमस्थानात शनि(व), नेपचून, भाग्यस्थानात हर्षल, दशमस्थानात मंगळ, लाभस्थानात सूर्य, बुध, गुरु आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. १० तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. ११ तारखेला चंद्राची बुध व गुरुशी युती आणि शुक्राशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल. १३ तारखेला चंद्राचा मंगळाशी तर बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला आत्मविश्वासात वाढ झाल्याचं तुम्हाला जाणवेल. कार्यक्षेत्रात चांगले काम झाल्याने वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल. वरीष्ठ कामाचं कौतुक करतील त्यामुळे खुश असाल. सप्ताह मध्यात चांगला धनलाभ होईल. अचानक एखाद्या जुन्या मित्राची भेट सुखावून टाकेल. मित्राच्या मदतीने एखादं अडलेलं काम मार्गी लागू शकेल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. सप्ताहाच्या शेवटी काही खर्च करावे लागतील. परदेशगमनासाठी अनुकूल काळ आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून फायदा या दरम्यान शक्य. मात्र या काळात नियम मोडून कॊणतीही गॊष्ट करु नका.
उपासना: श्रीसूक्ताचे नियमित पठण या कालावधीत केलेले चांगले.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात राहू, षष्ठस्थानी शनि(व), नेपचून, अष्टमस्थानात हर्षल, भाग्यस्थानात मंगळ, दशमस्थानात सूर्य, बुध, गुरु आणि लाभस्थानात केतू, व्ययस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. १० तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. ११ तारखेला चंद्राची बुध व गुरुशी युती आणि शुक्राशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल. १३ तारखेला चंद्राचा मंगळाशी तर बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताह अतिशय छान आहे. सप्ताहाच्या सुरूवातीसच काही भाग्यवर्धक घटना शक्य. उपासना करणार्‍यांसाठीही काळ चांगला आहे. काहींना प्रवास योग येऊ शकतात. वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. सप्ताह मध्यात नोकरीत किंवा व्यवसायात चांगले काम होईल. काहींना बढतीचे योग शक्य आहेत. सप्ताह मध्यानंतर काहींना धनलाभ शक्य आहे. मित्रांबरोबर किंवा नातेवाईबरोबर छान वेळ जाईल. सप्ताह अखेरीस अचानक एखादा खर्च करावा लागू शकतो. जुन्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. मनोरंजनाकडे मनाचा कल राहील.
उपासना: गणपती उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात राहू, पंचमस्थानात शनि(व), नेपचून, सप्तमस्थानात हर्षल, अष्टमस्थानात मंगळ, भाग्यस्थानात सूर्य, बुध, गुरु आणि दशमस्थानात केतू, लाभस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. १० तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. ११ तारखेला चंद्राची बुध व गुरुशी युती आणि शुक्राशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल. १३ तारखेला चंद्राचा मंगळाशी तर बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला संमिश्र ग्रहमान आहे. अती दगदग टाळावी. जीवनशक्तीची कमतरता किंवा थकवा या काळात जाणवत राहू शकेल. वाहने जपून चालवावीत. ज्योतिषी, मानसोपचारतज्ञ, थेरपिस्ट यांना मात्र ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह मध्यात काही भाग्यवर्धक घटना शक्य. वक्ते, पुरोहीत, शिक्षक यांना अनुकूल काळ आहे. प्रवासाचे योग येऊ शकतात. सप्ताह अखेरीस नोकरीत किंवा व्यवसायात चांगले काम झाल्याने खुश असाल. वरिष्ठांकडून एखादी मागणी मान्य करुन घेण्यास अनुकूल काळ आहे.
उपासना: स्वामी समर्थांच्या तारक मंत्राचा जप करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी राहू, चतुर्थस्थानात शनि(व), नेपचून, षष्ठस्थानी हर्षल, सप्तमस्थानात मंगळ, अष्टमस्थानात सूर्य, बुध, गुरु आणि नवमस्थानात केतू, दशमस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. १० तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. ११ तारखेला चंद्राची बुध व गुरुशी युती आणि शुक्राशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल. १३ तारखेला चंद्राचा मंगळाशी तर बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. जोडीदाराला एखादी छानशी भॆटवस्तु देऊन खुश करु शकाल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांसाठी ग्रहमान अनुकूल आहे. विशेषत: आयात निर्यातीच्या व्यवसायिकांना जास्त चांगला काळ आहे. सप्ताह मध्यात अचानक आलेल्या अडचणींनी त्रस्त व्हाल. मन शांत ठेवावे. महादेवाची किंवा मारुतीची उपासना उपयोगी ठरेल. सप्ताहाच्या शेवटी पुन्हा ग्रहस्थिती अनुकुल होत आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगलं काम घडेल. मन प्रसन्न करणार्‍या घटना घडण्याची शक्यता आहे. छोटासा प्रवासही घडू शकतो.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात राहू, तृतीयस्थानी शनि(व), नेपचून, पंचमस्थानात हर्षल, षष्ठस्थानी मंगळ, सप्तमस्थानात सूर्य, बुध, गुरु आणि अष्टमस्थानात केतू, नवमस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. १० तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. ११ तारखेला चंद्राची बुध व गुरुशी युती आणि शुक्राशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल. १३ तारखेला चंद्राचा मंगळाशी तर बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहात सुरुवातीला नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. नोकरीच्या शोधात असणार्‍यांना काही संधी दृष्टीक्षेपात येतील. स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. सामाजिक कामात सहभागी व्हाल. मात्र अती दगदग टाळा. आपले आरोग्य सांभाळा. सप्ताह मध्य चांगला आहे. जोडीदाराबरोबर वेळ छान जाईल. भागीदारीतील व्यावसायिकांना अनुकूल कालावधी आहे. सप्ताह अखेरीस जोखीम असलेली कामे आज करु नका. महत्त्वाची कामे पुढे ढकला. वाहने सावकाश चालवा. मात्र एखाद्या गोष्टीतील बदल किंवा परीवर्तन भविष्यात फायदेशीर ठरु शकेल.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, धनस्थानात शनि(व), नेपचून, चतुर्थस्थानात हर्षल, पंचमस्थानात मंगळ, षष्ठस्थानी सूर्य, बुध, गुरु, सप्तमस्थानी केतू, अष्टमस्थानात शुक्र आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. १० तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. ११ तारखेला चंद्राची बुध व गुरुशी युती आणि शुक्राशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल. १३ तारखेला चंद्राचा मंगळाशी तर बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला लाभदायक ग्रहमान आहे. मानसन्मान मिळेल. संततीसौख्य लाभेल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. विद्यार्थ्यांना व कलाकारांना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल. काहींना छोटसं बक्षिस, भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यात नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. नोकरी बदल किंवा नवीन नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर तुम्हाला काही संधी चालून येऊ शकतील. मात्र तब्येतीच्या काही समस्या या काळात जाणवू शकतील. काळजी घ्यावी. सप्ताह मध्यानंतर आपल्या जिवलग माणसांसोबत वेळ छान जाणार आहे. सप्ताह अखेर जोखीम टाळा.
उपासना: या काळात मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसा रोज म्हणणे उचित ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि(व), नेपचून, तृतीयस्थानी हर्षल, चतुर्थस्थानात मंगळ, पंचमस्थानात सूर्य, बुध, गुरु, षष्ठस्थानात केतू, सप्तमस्थानी शुक्र, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. ९ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. १० तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. ११ तारखेला चंद्राची बुध व गुरुशी युती आणि शुक्राशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल. १३ तारखेला चंद्राचा मंगळाशी तर बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला उत्तम ग्रहमान आहे. घरातील वातावरण चांगले राहील. उत्सव/ समारंभात भाग घ्याल. मन प्रसन्न असेल. प्रॉपर्टीची खरेदी विक्री करणार्‍या लोकांना अनुकूल काळ आहे. मानसिक सौख्य लाभेल. सप्ताह मध्यात संततीसौख्य लाभेल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. मानसन्मान मिळेल. खेळाडूंना विशेष यशाचा काळ असेल. विद्यार्थ्यांना अनुकूल ग्रहमान असेल. नवी विषयाच्या अभ्यासाला सुरुवात करायची असेल तर हा काळ चागला आहे. सप्ताहाच्या शेवटी तब्येत सांभाळावी. जोडीदाराबरोबर वाद टाळावेत. मात्र स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे.
उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)