अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१० मे ते १६ मे २०२६)

Astroshodh, bestastrologerinpune, famousastrologerinpune, topastrologerinpune, bestastrologerinindia, famousastrologerinindia, topastrologerinindia

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, बुध, धनस्थानी शुक्र, हर्षल, तृतीयस्थानी गुरु, पंचमस्थानात केतू, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात राहू आणि व्ययस्थानात मंगळ, शनि, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ११ तारखेला सूर्याचा गुरुशी लाभयोग होईल आंणि मंगळ मेष राशित प्रवेश करेल. १२ तारखेला चंद्राचा बुध व सूर्याशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोण होईल. १३ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल आणि बुधाचा गुरुशी लाभयोग होईल. १४ तारखेला सूर्याची बुधाशी तर चंद्राची मंगळाशी युती होईल आणि चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल, तसेच शुक्र मिथुन राशित प्रवेश करेल. १५ तारखेला अनुक्रमे बुध व सूर्य वृषभ राशित प्रवेश करतील. १६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग आणि मंगळाशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला नातेवाईकांच्या किंवा मित्रांच्या भेटीचे योग येऊ शकतील. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. अनेकांचे सहकार्य लाभेल. एखादा छानसा धनलाभ मन प्रसन्न करेल. छान खरेदी होईल. या काळात केलेली गुंतवणूक भविष्यात चांगला फायदा देऊ शकेल. मात्र गुंतवणूक करतांना तज्ञ व्यक्तीचा सल्ला जरुर घ्यावा. सप्ताहाचा मध्य अध्यात्मिक उन्नतीसाठी चांगला आहे. परदेशाशी कार्यक्षेत्राचा संबंध ज्यांचा आहे त्यांना आणि नृत्यकलेशी संबंधितांना अनुकूल ग्रहमान आहे. जुनी येणी वसूल होतील. पूर्वी केलेल्या एखाद्या गुंतवणुकीतून चांगला फायदा होईल. सप्ताहाच्या अखेरीस नशीबाची साथ लाभेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. लोकांचे अपेक्षित सहकार्य लाभेल. परदेशगमनासाठी हा पूर्ण सप्ताह अनुकूल आहे.
उपासना: रोज संध्याकाळी मारुती स्तोत्र म्हणावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शुक्र, हर्षल, धनस्थानी गुरु, चतुर्थस्थानात केतू, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात राहू, लाभस्थानात मंगळ, शनि, नेपचून आणि व्ययस्थानात सूर्य, बुध अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ११ तारखेला सूर्याचा गुरुशी लाभयोग होईल आंणि मंगळ मेष राशित प्रवेश करेल. १२ तारखेला चंद्राचा बुध व सूर्याशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोण होईल. १३ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल आणि बुधाचा गुरुशी लाभयोग होईल. १४ तारखेला सूर्याची बुधाशी तर चंद्राची मंगळाशी युती होईल आणि चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल, तसेच शुक्र मिथुन राशित प्रवेश करेल. १५ तारखेला अनुक्रमे बुध व सूर्य वृषभ राशित प्रवेश करतील. १६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग आणि मंगळाशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला तुमच्या कार्यक्षेत्रात भाग्यवृध्दी करणारे योग येतील. अडकलेल्या गोष्टी मार्गी लागतील. शिक्षण क्षेत्र व कायद्याच्या क्षेत्रातील लोकांना हा कालावधी विशेष चांगला असेल. गुरु किंवा गुरुतुल्य व्यक्तींचे सहाय्य मिळण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यात मित्रांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटी होतील. लाभदायक ग्रहमान आहे. आर्थिक सुयश लाभेल. सप्ताह मध्यानंतर काही खर्च अचानक समोर येतील. खरेदीसाठी हा काळ अनुकूल आहे. उपासनेत मन रमेल. यदरम्यान केलेली गुंतवणूक दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरेल. सप्ताहाच्या अखेरीस बेकायदा गोष्टींपासून लांब रहा. अती दगदग टाळा. नकारात्मक विचारांना मनात थारा देऊ नका.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा. सोमवारी महादेवाचे दर्शन घ्यावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु, तृतीयस्थानी केतू, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात राहू, दशमस्थानात मंगळ, शनि, नेपचून, लाभस्थानात सूर्य, बुध आणि व्ययस्थानात शुक्र, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ११ तारखेला सूर्याचा गुरुशी लाभयोग होईल आंणि मंगळ मेष राशित प्रवेश करेल. १२ तारखेला चंद्राचा बुध व सूर्याशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोण होईल. १३ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल आणि बुधाचा गुरुशी लाभयोग होईल. १४ तारखेला सूर्याची बुधाशी तर चंद्राची मंगळाशी युती होईल आणि चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल, तसेच शुक्र मिथुन राशित प्रवेश करेल. १५ तारखेला अनुक्रमे बुध व सूर्य वृषभ राशित प्रवेश करतील. १६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग आणि मंगळाशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाचे पहिले दोन दिवस संमिश्र आहेत. कोणतीही जोखीम घेणे या काळात महागाचे ठरू शकेल. वाहने जपून चालवा. कामात कुचराई किंवा दिरंगाई होऊ देऊ नका. आपले काम बरे व आपण बरे असे धोरण असू द्या तसेच वरीष्ठांची मर्जी खपा होईल असे कोणतेही वर्तन या काळात टाळावे. सप्ताह मध्यात हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल. व्यवसायात नवीन तंत्र अंमलात आणाल. सप्ताह मध्यानंतर आर्थिक लाभ होतील. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचा योग यादरम्यान शक्य आहे. शनिवारी पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. खरेदीसाठीही काळ चांगला आहे. जोडीदाराला एखादी छानशी भेटवस्तु देऊन खुश करु शकाल.
उपासना: या काळात रोज गणपती स्तोत्र म्हणणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी केतू, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात राहू, भाग्यस्थानात मंगळ, शनि, नेपचून, दशमस्थानात सूर्य, बुध, लाभस्थानात शुक्र, हर्षल आणि व्ययस्थानात गुरु अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ११ तारखेला सूर्याचा गुरुशी लाभयोग होईल आंणि मंगळ मेष राशित प्रवेश करेल. १२ तारखेला चंद्राचा बुध व सूर्याशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोण होईल. १३ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल आणि बुधाचा गुरुशी लाभयोग होईल. १४ तारखेला सूर्याची बुधाशी तर चंद्राची मंगळाशी युती होईल आणि चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल, तसेच शुक्र मिथुन राशित प्रवेश करेल. १५ तारखेला अनुक्रमे बुध व सूर्य वृषभ राशित प्रवेश करतील. १६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग आणि मंगळाशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात कंटाळवाणी व अडथळ्याची जरी झाली तरी नंतर सप्ताह चांगला जाणार आहे. सुरुवातीला दोन दिवस तुमच्या घरात आरोग्याच्या काही समस्या जाणवतील. जोडीदाराशी वाद टाळावेत. त्यानंतर सप्ताह मध्य न्यायक्षेत्र आणि शिक्षण क्षेत्रातील लोकांना चांगला आहे. आध्यात्मिक गोष्टींमध्ये मन गुंतलेले असेल. सप्ताह अखेरीस उत्तम ग्रहमान आहे. तुमच्यातल्या कलाकौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. आवडत्या व्यक्ती भेटतील. काही लाभही होतील. प्रवास योग शक्य. शनिवारी अपेक्षित गाठीभेटी होतील. नवीन दिशा व नवा मार्ग दिसेल. पैशांची कामे मार्गी लागतील.
उपासना: या काळात गणपती अथर्वशीर्षाचे नित्य पठण करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात केतू, षष्ठस्थानी प्लूटो, सप्तमस्थानात राहू, अष्टमस्थानात मंगळ, शनि, नेपचून, भाग्यस्थानात सूर्य, बुध, दशमस्थानात शुक्र, हर्षल आणि लाभस्थानात गुरु अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ११ तारखेला सूर्याचा गुरुशी लाभयोग होईल आंणि मंगळ मेष राशित प्रवेश करेल. १२ तारखेला चंद्राचा बुध व सूर्याशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोण होईल. १३ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल आणि बुधाचा गुरुशी लाभयोग होईल. १४ तारखेला सूर्याची बुधाशी तर चंद्राची मंगळाशी युती होईल आणि चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल, तसेच शुक्र मिथुन राशित प्रवेश करेल. १५ तारखेला अनुक्रमे बुध व सूर्य वृषभ राशित प्रवेश करतील. १६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग आणि मंगळाशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराबरोबर वाद होऊ देऊ नका. जोडीदाराच्या तब्येतीबाबत काही समस्या असतील तर तिकडे लक्ष द्या. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना कालावधी फ़ारसा चांगला नाही. व्यवहार पारदर्शक ठेवा. सप्ताह मध्यात काहींना सूचक स्वप्ने पडू शकतील. धार्मिक स्थळांना भेटी देण्याचे योगही येऊ शकतील. इतिहासकार, ज्योतिषी, पुराण वस्तु संशोधक तसेच मानसशास्त्राचा अभ्यास करणार्‍यांना कालावधी अनुकूल आहे. काहींना अचानक धनलाभाचे योग आहेत. सप्ताह मध्यानंतर उपासनेत मन लागेल. काहींवर गुरुकृपा शक्य. सप्ताहाचा शेवट सुखद ठरु शकेल. काही लाभ होण्याचीही शक्यता आहे. प्रवास लाभदायक ठरतील. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचा योग शक्य आहे.
उपासना: रविवारी नवग्रह मंदिरात जाऊन सूर्यनारायणाचे दर्शन जरुर घ्यावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी राहू, सप्तमस्थानात मंगळ, शनि, नेपचून, अष्टमस्थानात सूर्य, बुध, भाग्यस्थानात शुक्र, हर्षल, दशमस्थानात गुरु आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ११ तारखेला सूर्याचा गुरुशी लाभयोग होईल आंणि मंगळ मेष राशित प्रवेश करेल. १२ तारखेला चंद्राचा बुध व सूर्याशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोण होईल. १३ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल आणि बुधाचा गुरुशी लाभयोग होईल. १४ तारखेला सूर्याची बुधाशी तर चंद्राची मंगळाशी युती होईल आणि चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल, तसेच शुक्र मिथुन राशित प्रवेश करेल. १५ तारखेला अनुक्रमे बुध व सूर्य वृषभ राशित प्रवेश करतील. १६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग आणि मंगळाशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांना चांगली ठरु शकेल. तब्येतीच्या तक्रारी मात्र डोके वर काढण्याची शक्यता आहे त्याकडे दुर्लक्ष नको. तुमच्या हितशत्रूंवर लक्ष ठेवा. सप्ताह मध्यात ग्रहस्थिती चांगली असेल. व्यावसयिकांना फायदा देणार्‍या नवीन संधी चालून येतील. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील. सप्ताह मध्यानंतर अचानक धनलाभाचे योग शक्य. मात्र या काळात वाहने हळू चालवावीत. शनिवारी भाग्यवर्धक ग्रहमान आहे. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल.
उपासना: श्रीसूक्ताचे नियमित पठण या कालावधीत केलेले चांगले.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात राहू, षष्ठस्थानी मंगळ, शनि, नेपचून, सप्तमस्थानात सूर्य, बुध, अष्टमस्थानात शुक्र, हर्षल, भाग्यस्थानात गुरु आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ११ तारखेला सूर्याचा गुरुशी लाभयोग होईल आंणि मंगळ मेष राशित प्रवेश करेल. १२ तारखेला चंद्राचा बुध व सूर्याशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोण होईल. १३ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल आणि बुधाचा गुरुशी लाभयोग होईल. १४ तारखेला सूर्याची बुधाशी तर चंद्राची मंगळाशी युती होईल आणि चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल, तसेच शुक्र मिथुन राशित प्रवेश करेल. १५ तारखेला अनुक्रमे बुध व सूर्य वृषभ राशित प्रवेश करतील. १६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग आणि मंगळाशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला मुलांकडून सुवार्ता कळतील. विद्यार्थ्यांना, लेखकांना व कलाकारांना छान कालावधी आहे. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. सोमवार दुपार ते मंगळवार सकाळपर्यंतचा काळ मानसिक चिंतेचा असू शकतो. या काळात तुमची तब्येतही सांभाळणे आवश्यक आहे. सप्ताह मध्यात संमिश्र ग्रहमान आहे. वरीष्ठांशी जमवून घेतल्यास तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. स्पर्धा परीक्षेत यश मिळू शकेल. मात्र मधूमेह असलेल्यांनी योग्य ते पथ्यपाणी या दरम्यान सांभाळावे. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर दिवस आनंदात जाणार आहे. व्यावसयिकांना फायदा देणार्‍या नवीन संधी चालून येतील. भागीदारीत ज्यांचा व्यवसाय आहे त्यांनी मात्र या काळात सर्व व्यवहार पारदर्शी राहतील याची काळजी घ्यावी, गैरसमज होण्यास एखादी छोटी घटनाही पुरेशी असते हे लक्षात ठेवावे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात राहू, पंचमस्थानात मंगळ, शनि, नेपचून, नेपचून, षष्ठस्थानी सूर्य, बुध, सप्तमस्थानात शुक्र, हर्षल, अष्टमस्थानात गुरु आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ११ तारखेला सूर्याचा गुरुशी लाभयोग होईल आंणि मंगळ मेष राशित प्रवेश करेल. १२ तारखेला चंद्राचा बुध व सूर्याशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोण होईल. १३ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल आणि बुधाचा गुरुशी लाभयोग होईल. १४ तारखेला सूर्याची बुधाशी तर चंद्राची मंगळाशी युती होईल आणि चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल, तसेच शुक्र मिथुन राशित प्रवेश करेल. १५ तारखेला अनुक्रमे बुध व सूर्य वृषभ राशित प्रवेश करतील. १६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग आणि मंगळाशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात एखादी सहल/ मौजमजा यांनी होऊ शकेल. घरकामासाठी वेळ काढावा लागेल. राहत्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे काही प्रश्न असतील तर ते मार्गी लावू शकाल. घरात छान वातावरण असेल. एखाद्या समारंभ किंवा पार्टीत सामिल होण्याचे योग आहेत. सप्ताहाचा मध्यात लाभदायक ग्रहमान आहे. मानसन्मान मिळेल. संततीसौख्य लाभेल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. विद्यार्थ्यांना व कलाकारांना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल. सप्ताहाच्या शेवटी कायदा व वैद्यक शास्त्राशी निगडीत व्यावसायिकांना फायदेशीर ग्रहमान आहे. मात्र आरोग्यासंबंधी काही समस्या जाणवतील. अ‍ॅसिडीटी/ पोटाचे काही त्रास असतील तर योग्य पथ्यपाणी सांभाळणे आवश्यक आहे.
उपासना: या काळात मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसा रोज म्हणणे उचित ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी राहू, चतुर्थस्थानात मंगळ, शनि, नेपचून, पंचमस्थानात सूर्य, बुध, षष्ठस्थानी शुक्र, हर्षल, सप्तमस्थानात गुरु आणि नवमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ११ तारखेला सूर्याचा गुरुशी लाभयोग होईल आंणि मंगळ मेष राशित प्रवेश करेल. १२ तारखेला चंद्राचा बुध व सूर्याशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोण होईल. १३ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल आणि बुधाचा गुरुशी लाभयोग होईल. १४ तारखेला सूर्याची बुधाशी तर चंद्राची मंगळाशी युती होईल आणि चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल, तसेच शुक्र मिथुन राशित प्रवेश करेल. १५ तारखेला अनुक्रमे बुध व सूर्य वृषभ राशित प्रवेश करतील. १६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग आणि मंगळाशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला घरच्यांबरोबर वेळ छान व्यतीत करू शकाल. भावंडांची खबरबात कळेल. प्रवास करणार असाल तर ते लाभदायक ठरतील. लेखक, ब्लॉगर्स यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात घरातील डागडुजी/ दुरुस्ती यासाठी खर्च करावा लागेल. घरात छान वातावरण असेल. सप्ताह मध्यानंतर लाभदायक ग्रहमान आहे. मानसन्मान मिळेल. संततीसौख्य लाभेल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. विद्यार्थ्यांना व कलाकारांना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल. सप्ताहाचा शेवट कार्यालयीन कामांसाठी चांगला आहे. नोकरीच्या शोधात असणार्‍यांना काही संधी दृष्टीक्षेपात येतील.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा. सोमवारी महादेवाचे दर्शन घ्यावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात राहू, तृतीयस्थानी मंगळ, शनि, नेपचून, चतुर्थस्थानात सूर्य, बुध, पंचमस्थानात शुक्र, हर्षल, षष्ठस्थानी गुरु आणि अष्टमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ११ तारखेला सूर्याचा गुरुशी लाभयोग होईल आंणि मंगळ मेष राशित प्रवेश करेल. १२ तारखेला चंद्राचा बुध व सूर्याशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोण होईल. १३ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल आणि बुधाचा गुरुशी लाभयोग होईल. १४ तारखेला सूर्याची बुधाशी तर चंद्राची मंगळाशी युती होईल आणि चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल, तसेच शुक्र मिथुन राशित प्रवेश करेल. १५ तारखेला अनुक्रमे बुध व सूर्य वृषभ राशित प्रवेश करतील. १६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग आणि मंगळाशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. तुमच्या संभाषणकौशल्यामुळे एखादं काम मार्गी लागण्याची शक्यता आहे. कौटुंबीक सौख्य लाभेल. सप्ताह मध्यात दैनंदिन कामे मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. भावंडांशी संपर्क होईल. कागदपत्रांसंबंधीच्या कामांतून फायदा होऊ शकेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुयश मिळेल. कलाकौशल्याला वाव मिळेल. प्रवास योगही शक्य. सप्ताहाच्या शेवटी कौटुंबिक सौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. प्रॉपटींची कामे मार्गी लागतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. अपेक्षित लाभ होतील.
उपासना: मारुती स्तोत्र रोज मोठ्या आवाजात म्हणावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, धनस्थानात मंगळ, शनि, नेपचून, तृतीयस्थानी सूर्य, बुध, चतुर्थस्थानात शुक्र, हर्षल, पंचमस्थानात गुरु, सप्तमस्थानी केतू आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ११ तारखेला सूर्याचा गुरुशी लाभयोग होईल आंणि मंगळ मेष राशित प्रवेश करेल. १२ तारखेला चंद्राचा बुध व सूर्याशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोण होईल. १३ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल आणि बुधाचा गुरुशी लाभयोग होईल. १४ तारखेला सूर्याची बुधाशी तर चंद्राची मंगळाशी युती होईल आणि चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल, तसेच शुक्र मिथुन राशित प्रवेश करेल. १५ तारखेला अनुक्रमे बुध व सूर्य वृषभ राशित प्रवेश करतील. १६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग आणि मंगळाशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला उत्तम ग्रहमान आहे. आत्मविश्वास वाढेल. गृहसौख्य लाभेल. पूर्वी केलेल्या एखाद्या गुंतवणुकीतून यादरम्यान फायदा शक्य. खरेदीसाठीही काळ चांगला आहे. सप्ताह मध्यात काहींना धनलाभाचे योग असतील. संततीसौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मानसन्मानाचे योग आहेत. मन आनंदी असेल. विद्यार्थ्यांना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल. सप्ताह अखेरीस मनोबल उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. तुमच्यातल्या कलाकौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. सोशल मिडियावर केलेली एखादी पोस्ट प्रसिध्दी मिळवून देऊ शकेल.
उपासना: श्रीस्वामी समर्थांचा तारक मंत्र या काळात रोज म्हणावा किंवा ऐकावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, शनि, नेपचून, धनस्थानी सूर्य, बुध, तृतीयस्थानी शुक्र, हर्षल, चतुर्थस्थानात गुरु, षष्ठस्थानात केतू, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. ११ तारखेला सूर्याचा गुरुशी लाभयोग होईल आंणि मंगळ मेष राशित प्रवेश करेल. १२ तारखेला चंद्राचा बुध व सूर्याशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोण होईल. १३ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल आणि बुधाचा गुरुशी लाभयोग होईल. १४ तारखेला सूर्याची बुधाशी तर चंद्राची मंगळाशी युती होईल आणि चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल, तसेच शुक्र मिथुन राशित प्रवेश करेल. १५ तारखेला अनुक्रमे बुध व सूर्य वृषभ राशित प्रवेश करतील. १६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग आणि मंगळाशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला छान खरेदी होईल. खर्चही वाढणार आहेत. परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांना हा कालावधी खूप महत्वाचा ठरणार आहे. जुनी येणी वसूल होतील. पूर्वीच्या एखाद्या गुंतवणुकीतून फायदा या काळात शक्य. सप्ताह मध्यात भाग्याची साथ मिळेल. तुमचा आत्मविश्वास वाढलेला तुम्हाला जाणवेल. व्यावसयिकांना लाभदायक ग्रहमान आहे. कामे मार्गी लागतील. घरात छान वातावरण असेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. सप्ताहाच्या शेवटी आर्थिक स्थिती चांगली असेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. काहींना धनलाभ शक्य आहे. तुमच्या संभाषणकौशल्यामुळे एखादं काम मार्गी लागण्याची शक्यता आहे. मात्र डोळे किंवा दातांसंबंधी काही त्रास या दरम्यान तुम्हाला जाणवू शकतात. काळजी घ्या.
उपासना: या काळात गुरुतत्वाची सेवा करावी. (ज्यांनी दत्तगुरु/ स्वामी समर्थ/ गजानन महाराज/ साईबाबा अशा विभूतींना गुरु मानलं असेल त्यांनी या काळात त्यांचे दर्शन अवश्य घ्यावे).
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)