अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१७ ऑगस्ट ते २३ ऑगस्ट २०२५)

Astroshodh, bestastrologerinpune, famousastrologerinpune, topastrologerinpune, bestastrologerinindia, famousastrologerinindia, topastrologerinindia

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी हर्षल, तृतीयस्थानी गुरु, शुक्र, चतुर्थस्थानात बुध, पंचमस्थानात सूर्य, केतू, षष्ठस्थानी मंगळ, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात राहू आणि व्ययस्थानात शनि(व), नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १८ तारखेला बुधाचा मंगळाशी व चंद्राचा सूर्याशी लाभयोग आणि शनिशी केंद्रयोग होईल. १९ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. २० तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल. २१ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व बुधाशी युती होईल आणि शुक्र कर्क राशित प्रवेश करेल. २३ तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल.
फलादेश- सप्ताह अतिशय छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला धनलाभाचे योग आहेत. कुटुंबियांसोबत वॆळ छान जाईल. आवडीच्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. कलाकारांना त्यांच्या कलेत विशेष यश मिळेल. सप्ताह मध्यात लेखक, ब्लॉगर्स यांना काळ चांगला आहे. धार्मिक कार्यात सहभाग असेल. अध्यात्मिक उन्नतीसाठी गुरु केलेल्यांना चांगले अनुभव येतील. विवाहोत्सूक असलेल्यांना विवाह ठरविण्यास अनुकूल काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी घरात आनंदी वातावरण असेल. तुमच्या कामाचं कौतुक होईल. एखादं बक्षिस, वरीष्ठांकडून मिळालेली शाबासकी/ पदोन्नती/ पगारवाढ आनंदीत करु शकेल. विद्यार्थ्यांना कमी श्रमात जास्त यश मिळेल.
या सप्ताहासाठी उपासना: महादेवाची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी हर्षल, धनस्थानी गुरु, शुक्र, तृतीयस्थानी बुध, चतुर्थस्थानात सूर्य, केतू, पंचमस्थानात मंगळ, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात राहू आणि लाभस्थानात शनि(व), नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १८ तारखेला बुधाचा मंगळाशी व चंद्राचा सूर्याशी लाभयोग आणि शनिशी केंद्रयोग होईल. १९ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. २० तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल. २१ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व बुधाशी युती होईल आणि शुक्र कर्क राशित प्रवेश करेल. २३ तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला ग्रहमान उत्तम आहे. आर्थिक स्थिती चांगली असेल. तुमच्या संभाषणकौशल्यामुळे एखादं काम मार्गी लागण्याणी शक्यता आहे. कौटुंबीक सौख्य मिळेल. मन प्रसन्न असेल. सप्ताह मध्यात धनलाभ होऊ शकतील. आत्मविश्वास वाढलेला असेल. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. व्यावसयिकांना फायदा देणार्‍या नवीन संधी चालून येतील. मन आनंदी व उत्साही राहील. सप्ताहाच्या शेवटी मन आनंदी राहील. कौटुंबिक सौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. सोशल मिडियावर केलेली एखादी पोस्ट प्रसिध्दी मिळवून देऊ शकेल. प्रॉपटींची कामे मार्गी लागतील.
या सप्ताहासाठी उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु, शुक्र, धनस्थानी बुध, तृतीयस्थानी सूर्य, केतू, चतुर्थस्थानात मंगळ, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात राहू, दशमस्थानात शनि(व), नेपचून आणि व्ययस्थानात हर्षल, अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १८ तारखेला बुधाचा मंगळाशी व चंद्राचा सूर्याशी लाभयोग आणि शनिशी केंद्रयोग होईल. १९ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. २० तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल. २१ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व बुधाशी युती होईल आणि शुक्र कर्क राशित प्रवेश करेल. २३ तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला ग्रहमान संमिश्र आहे. धार्मिक कार्यात सहभाग असेल. खरेदीसाठी काळ अनुकूल आहे. तुमच्या जोडीदाराला एखादी छानशी भेटवस्तू देऊन खूष करु शकाल. मात्र खर्चही यादरम्यान वाढते रहातील. सप्ताहाच्या मध्यात उत्तम ग्रहमान आहे. आर्थिक सुयश लाभेल. तुमच्या संभाषणकौशल्यामुळे एखादं काम मार्गी लागण्याणी शक्यता आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर कौटुंबीक सौख्याचा काळ आहे. मन प्रसन्न असेल. धनलाभ होण्याचे योग आहेत. अनेकांचे सहकार्य लाभेल. सप्ताहाच्या अखेरीस कामात सुयश लाभेल. प्रवासयोग आज शक्य. सोशल मिडियावर केलेली एखादी पोस्ट प्रसिध्दी मिळवून देऊ शकेल.
या सप्ताहासाठी उपासना: ’ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम:’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी बुध, धनस्थानी सूर्य, केतू, तृतीयस्थानी मंगळ, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात राहू, भाग्यस्थानात शनि(व), नेपचून, लाभस्थानात हर्षल आणि व्ययस्थानात गुरु, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १८ तारखेला बुधाचा मंगळाशी व चंद्राचा सूर्याशी लाभयोग आणि शनिशी केंद्रयोग होईल. १९ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. २० तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल. २१ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व बुधाशी युती होईल आणि शुक्र कर्क राशित प्रवेश करेल. २३ तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात छान होईल. काही लाभ होऊ शकतील. मित्रांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. मन प्रसन्न असेल. अडकलेले एखादे काम मित्रामुळे किंवा ऒळखीमुळे पटकन होऊन जाईल. कलाकारांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात खर्च वाढतील. काही अनपेक्षित खर्चही अचानक सामोरे येतील. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. सप्ताहाचा शेवट अनुकूल आहे. मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. काही लाभदायक घटना या काळात शक्य. राहत्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे काही प्रश्न असतील तर त्यासाठी वेळ द्याल.
या सप्ताहासाठी उपासना: या सप्ताहात रोज ’ॐ ह्रां ह्रीं ह्रौं स: सूर्याय नम:’ या मंत्राचा १ माळ जप करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात सूर्य, केतू, धनस्थानी मंगळ, षष्ठस्थानी प्लूटो, सप्तमस्थानात राहू, अष्टमस्थानात शनि(व), नेपचून, दशमस्थानात हर्षल, लाभस्थानात गुरु, शुक्र आणि व्ययस्थानात बुध, अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १८ तारखेला बुधाचा मंगळाशी व चंद्राचा सूर्याशी लाभयोग आणि शनिशी केंद्रयोग होईल. १९ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. २० तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल. २१ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व बुधाशी युती होईल आणि शुक्र कर्क राशित प्रवेश करेल. २३ तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. काहींना वरीष्ठांकडून न मागता सहकार्य मिळेल. एखाद्या लाभदायक कामासाठी तुमची निवड होऊ शकेल. भरपूर आणि मनाजोगते काम झाल्याने व्यावसायिक खुश असतील. छान लाभ होतील. सप्ताह मध्यात मित्रांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटी आनंद देतील. सप्ताह मध्यानंतर उपासनेत मन रमेल. या दरम्यान केलेली गुंतवणूक दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरेल. सप्ताहाच्या शेवटी मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील. मन आनंदी राहील.
या सप्ताहासाठी उपासना: श्रीसूक्ताचे नियमित पठण या कालावधीत केलेले चांगले.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात मंगळ, पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी राहू, सप्तमस्थानात शनि(व), नेपचून, भाग्यस्थानात हर्षल, दशमस्थानात गुरु, शुक्र, लाभस्थानात बुध, आणि व्ययस्थानात सूर्य, केतू, अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १८ तारखेला बुधाचा मंगळाशी व चंद्राचा सूर्याशी लाभयोग आणि शनिशी केंद्रयोग होईल. १९ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. २० तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल. २१ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व बुधाशी युती होईल आणि शुक्र कर्क राशित प्रवेश करेल. २३ तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताह चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला काहींना प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. वरीष्ठांशी जुळवुन घेतल्यास तुमची एखादी मागणी त्यांच्याकडून पूर्ण करून घेता येईल. ज्यांनी अध्यात्मिक उन्नतीसाठी गुरु केला आहे त्यांना हा कालावधी विशेष चांगला आहे. सप्ताह मध्यात व त्यानंतर लाभदायक काळ आहे. मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग संभवतात. अचानक धनलाभही शक्य आहेत. मन प्रसन्न असेल. शनिवारी बेकायदा गोष्टी टाळाव्या.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात रोज महालक्ष्मीअष्टक जरुर म्हणावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात राहू, षष्ठस्थानी शनि(व), नेपचून, अष्टमस्थानात हर्षल, भाग्यस्थानात गुरु, शुक्र, दशमस्थानात बुध, आणि लाभस्थानात सूर्य, केतू, व्ययस्थानात मंगळ, अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १८ तारखेला बुधाचा मंगळाशी व चंद्राचा सूर्याशी लाभयोग आणि शनिशी केंद्रयोग होईल. १९ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. २० तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल. २१ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व बुधाशी युती होईल आणि शुक्र कर्क राशित प्रवेश करेल. २३ तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला संमिश्र ग्रहमान आहे. प्रवासात अडथळे, वाहनांसाठी खर्च संभवू शकतो. गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. मात्र अचानक धनलाभाचे योग शक्य. विम्याचे किंवा आयकरसंबंधीत काम करणार्‍यांनाही चांगला कालावधी आहे. ज्योतिषी, संशोधन व सर्जन यांनाही हा काळ अनुकूल आहे. सप्ताहाचा मध्य उपासना करण्यास चांगला आहे. काही भाग्यवर्धक घटना घडतील. तुमच्या पराक्रमात वृध्दी होईल. कामात सुयश लाभेल. प्रवासयोगही शक्य. सप्ताहाच्या शेवटी घरात छान वातावरण असेल आणि तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. केलेल्या कामाचं चीज़ होईल. काही लाभही होऊ शकतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल.
या सप्ताहासाठी उपासना: ’विठ्ठल’ नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात राहू, पंचमस्थानात शनि(व), नेपचून, सप्तमस्थानात हर्षल, अष्टमस्थानात गुरु, शुक्र, भाग्यस्थानात बुध, आणि दशमस्थानात सूर्य, केतू, लाभस्थानात मंगळ, अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १८ तारखेला बुधाचा मंगळाशी व चंद्राचा सूर्याशी लाभयोग आणि शनिशी केंद्रयोग होईल. १९ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. २० तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल. २१ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व बुधाशी युती होईल आणि शुक्र कर्क राशित प्रवेश करेल. २३ तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला कौटुंबिक जीवनात एखादी चिंता लागून राहील. जोडीदाराबरोबर वाद टाळा. भागीदारीतील निर्णय शक्यतो पुढे ढकला. सप्ताह मध्य संमिश्र घटनांचा असू शकेल. काही मनाविरुध्द घटना घडतील. वाहने हळू चालवा. याच्या बरोबर उलट काहींना अचानक धनलाभाचा संभव आहे. वारसा हक्काने किंवा विम्याद्वारे लाभ या काळात शक्य आहेत. सप्ताह मध्यानंतर भाग्यवर्धक गोष्टी घडू शकतात. प्रवास फायदेशीर ठरणार आहेत. सप्ताहाच्या शेवटी वरीष्ठ तुमच्या कामावर खुश असतील. एखादा धनलाभ, पगारवाढ, बढती अशा सुखद धक्का देणार्‍या घटना या काळात शक्य.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात गणपती अथर्वशीर्षाचे नित्य पठण करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी राहू, चतुर्थस्थानात शनि(व), नेपचून, षष्ठस्थानी हर्षल, सप्तमस्थानात गुरु, शुक्र, अष्टमस्थानात बुध, आणि नवमस्थानात सूर्य, केतू, दशमस्थानात मंगळ, अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १८ तारखेला बुधाचा मंगळाशी व चंद्राचा सूर्याशी लाभयोग आणि शनिशी केंद्रयोग होईल. १९ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. २० तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल. २१ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व बुधाशी युती होईल आणि शुक्र कर्क राशित प्रवेश करेल. २३ तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला तब्येतीची काळजी घेणे उचित ठरेल. अती दगदग टाळा. वैद्यकीय क्षेत्रात व कायदेविषयी काम करणार्‍यांसाठी मात्र फ़ायदेशीर ग्रहमान आहे. सप्ताह मध्य भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांसाठी चांगला जाईल. पती/ पत्नीविषयक चांगली बातमी कळेल. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील. सप्ताहाच्या मध्यानंतर जोखीम किंवा धोका असलेली कामे करू नका. वाहने हळू चालवा. सप्ताह अखेर धार्मिक कार्यासाठी चांगला कालावधी आहे. काहींना प्रवासाचे योग येतील. काही लाभही होतील.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात राहू, तृतीयस्थानी शनि(व), नेपचून, पंचमस्थानात हर्षल, षष्ठस्थानी गुरु, शुक्र, सप्तमस्थानात बुध, आणि अष्टमस्थानात सूर्य, केतू, नवमस्थानात मंगळ, अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १८ तारखेला बुधाचा मंगळाशी व चंद्राचा सूर्याशी लाभयोग आणि शनिशी केंद्रयोग होईल. १९ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. २० तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल. २१ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व बुधाशी युती होईल आणि शुक्र कर्क राशित प्रवेश करेल. २३ तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला संमिश्र ग्रहमान आहे. नित्योपासनेत लक्ष लागणे कठीण आहे. विद्यार्थ्यांनी अती आत्मविश्वास टाळावा. अभ्यासाकडे दुर्लक्ष नको. सप्ताहाच्या मध्यात काहींची बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. नवीन नोकरीच्या संधी शक्य आहेत. आहारतज्ञ, जीम ट्रेनर तसेच वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना अनुकूल ग्रहमान आहे. शारीरिक सौख्यासाठी नियमित व्यायाम करायला हवा याची जाणीव होईल. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. व्यावसयिकांना फायदा देणार्‍या नवीन संधी चालून येतील. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांसाठी चांगला कालावधी आहे.
या सप्ताहासाठी उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, धनस्थानात शनि(व), नेपचून, चतुर्थस्थानात हर्षल, पंचमस्थानात गुरु, शुक्र, षष्ठस्थानी बुध, सप्तमस्थानी सूर्य, केतू, अष्टमस्थानात मंगळ, आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १८ तारखेला बुधाचा मंगळाशी व चंद्राचा सूर्याशी लाभयोग आणि शनिशी केंद्रयोग होईल. १९ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. २० तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल. २१ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व बुधाशी युती होईल आणि शुक्र कर्क राशित प्रवेश करेल. २३ तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला चांगले ग्रहमान आहे. आर्थिक सुयश लाभेल. घरात प्रसन्नता असेल. प्रॉपर्टीची कामे करणाऱ्यांना अनुकूल कालावधी आहे. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. कलाकारांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना व खेळाडूंना अनुकूल आहे. कमी कष्टात जास्त यश मिळण्याची शक्यता आहे. धनलाभाचेही योग आहेत. तुमच्या छंदासाठी वेळ जरूर काढा. सप्ताहाच्या मध्यानंतर तब्येतीची काळजी घ्यावी. गुंतवणूक करतांनाही पुरेशी काळजी घ्यावी. सप्ताहाच्या शेवटी मनोबल उत्तम राहील. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. स्पर्धा परीक्षेत यश मिळेल.
या सप्ताहासाठी उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि(व), नेपचून, तृतीयस्थानी हर्षल, चतुर्थस्थानात गुरु, शुक्र, पंचमस्थानात बुध, षष्ठस्थानात सूर्य, केतू, सप्तमस्थानी मंगळ, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १८ तारखेला बुधाचा मंगळाशी व चंद्राचा सूर्याशी लाभयोग आणि शनिशी केंद्रयोग होईल. १९ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. २० तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल. २१ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व बुधाशी युती होईल आणि शुक्र कर्क राशित प्रवेश करेल. २३ तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक गोष्टींमध्ये भाग घ्याल. ब्लॉगर्स, साहित्यिक व कलाकारांसाठी चांगला काळ आहे. मनासारखे काम झाल्याने खूष असाल. सप्ताहाच्या मध्यात घरातील वातावरण प्रसन्न राहील. प्रॉपर्टी खरेदी-विक्रीसाठी चांगला काळ आहे. बांधकाम व्यावसायिकांनाही अनुकूल ग्रहमान आहे. शेअर मार्केट किंवा तत्सम क्षेत्रात थोडीफार गुंतवणूक करायला हरकत नाही. मात्र मोठी गुंतवणूक करायची असेल तर तज्ञ व्यक्तीचा सल्ला जरूर घ्यावा. सप्ताहाच्या शेवटी शारीरिक सौख्यासाठी योग्य आहार व नियमित व्यायाम करायला हवा याची जाणीव होईल.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)