अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२५ मे ते ३१ मे २०२५)
Astroshodh, bestastrologerinpune, famousastrologerinpune, topastrologerinpune, bestastrologerinindia, famousastrologerinindia, topastrologerinindia
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी सूर्य, बुध, हर्षल, तृतीयस्थानी गुरु, चतुर्थस्थानात मंगळ, षष्ठस्थानात केतू, दशमस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात शुक्र, शनि, राहू, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल आणि शनिचा चंद्राशी व बुधाशी लाभयोग होईल. २७ तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल. २८ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल आणि चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ३० तारखेला सूर्याची बुधाशी युती होईल. ३१ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाशी लाभयोग होईल व शुक्र मेष राशित प्रवेश करेल.
फ़लादेश- सप्ताहाची सुरुवात अनुकूल राहील. आत्मविश्वास वाढेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. घरात छान वातावरण असेल. मन प्रसन्न असेल. ज्यांच्या पत्रिकेत अचानक धनलाभाचे योग आहेत त्यांना यादरम्यान पैसा/ जमीन किंवा इतर मार्गांनी अचानकपणे काही लाभ होण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यात कुटुंबीयांबरोबर छान सुर जमलेला असेल. आर्थिक सुयश लाभेल. मनाजोगती खरेदी होऊ शकेल. मनोरंजनाकडे कल राहील. परदेशातील व्यवहारांसाठी हा कालावधी चांगला असेल. सप्ताहाच्या शेवटी बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. तुमच्यातल्या कौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. प्रवासयोग संभवतात. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. सोशल मिडियावर केलेली एखादी पोस्ट प्रसिध्दी मिळवून देऊ शकेल.
या सप्ताहासाठी उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, बुध, हर्षल, धनस्थानी गुरु, तृतीयस्थानी मंगळ, पंचमस्थानात केतू, भाग्यस्थानात प्लूटो आणि लाभस्थानात शुक्र, शनि, राहू, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल आणि शनिचा चंद्राशी व बुधाशी लाभयोग होईल. २७ तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल. २८ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल आणि चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ३० तारखेला सूर्याची बुधाशी युती होईल. ३१ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाशी लाभयोग होईल व शुक्र मेष राशित प्रवेश करेल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला जुनी येणी वसूल होतील. पूर्वीच्या एखाद्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. अध्यात्मिक क्षेत्रातील लोकांना चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे. छान खरेदी होऊ शकेल. परदेशप्रवासासाठी ग्रहमान अनुकूल आहे. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. सप्ताहाच्या मध्यात आर्थिक स्थिती चांगली असेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. तुमच्या संभाषणकौशल्यामुळे एखादं काम मार्गी लागण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या शेवटी तुमची जिद्द व चिकाटी वाढेल. कामात सुयश मिळेल. कलाकौशल्याला वाव मिळेल. कार्यक्षेत्रात सुयश मिळेल. प्रवास योगही आहेत. भावंडांशी झालेला वार्तालाप मनाला आनंद देईल.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात रोज महालक्ष्मीअष्टक जरुर म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु, धनस्थानात मंगळ, चतुर्थस्थानात केतू, अष्टमस्थानात प्लूटो, दशमस्थानात शुक्र, शनि, राहू, नेपचून आणि व्ययस्थानात सूर्य, बुध, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल आणि शनिचा चंद्राशी व बुधाशी लाभयोग होईल. २७ तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल. २८ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल आणि चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ३० तारखेला सूर्याची बुधाशी युती होईल. ३१ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाशी लाभयोग होईल व शुक्र मेष राशित प्रवेश करेल.
फलादेश- सोमवार रात्रीपर्यंतचा कालावधी उत्तम असणार आहे. आर्थिक सुयश लाभेल. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचा योग येईल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. त्यानंतरचे दोन दिवस गायकांना व नृत्यकलेशी संबंध असणार्या लोकांना खुप चांगले आहेत. काही चांगल्या संधी चालून येतील. धार्मिक गोष्टींसाठी वेळ काढाल. परदेशगमनासाठीही अनुकूल काळ आहे. मात्र खर्च या काळात वाढणार आहेत. या काळात केलेली गुंतवणूक दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरणार आहे. सप्ताहाच्या शेवटी आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. मन प्रसन्न असेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. घरातील कामांसाठी वेळ काढावा लागेल.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात रोज गणपती स्तोत्र म्हणणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, तृतीयस्थानी केतू, सप्तमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात शुक्र, शनि, राहू, नेपचून आणि लाभस्थानात सूर्य, बुध, हर्षल आणि व्ययस्थानात गुरु अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल आणि शनिचा चंद्राशी व बुधाशी लाभयोग होईल. २७ तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल. २८ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल आणि चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ३० तारखेला सूर्याची बुधाशी युती होईल. ३१ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाशी लाभयोग होईल व शुक्र मेष राशित प्रवेश करेल.
फ़लादेश- सप्ताहाची सुरुवात छान असणार आहे. काहींना वरीष्ठांकडून न मागता सहकार्य मिळेल. नोकरी, व्यवसायातील लोक भरपूर आणि मनाजोगते काम झाल्याने खूष असतील. विद्यार्थी व खेळाडू यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या मध्यात छान लाभ होतील. मित्रांच्या/ आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. आवडत्या व्यक्तींबरोबर मजेत वेळ घालवाल. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील. सप्ताहाच्या शेवटी जुनी येणी वसूल होतील. पूर्वीच्या एखाद्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. अध्यात्मिक क्षेत्रातील लोकांना चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे. शनिवारी मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. मन आनंदी राहील.
या सप्ताहासाठी उपासना: श्रीसूक्ताचे नियमित पठण या कालावधीत केलेले चांगले.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी केतू, षष्ठस्थानी प्लूटो, अष्टमस्थानात शुक्र, शनि, राहू, नेपचून, दशमस्थानात सूर्य, बुध, हर्षल, लाभस्थानात गुरु आणि व्ययस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल आणि शनिचा चंद्राशी व बुधाशी लाभयोग होईल. २७ तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल. २८ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल आणि चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ३० तारखेला सूर्याची बुधाशी युती होईल. ३१ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाशी लाभयोग होईल व शुक्र मेष राशित प्रवेश करेल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला भाग्यकारक ग्रहमान आहे. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल.
प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. अध्यात्मिक उन्नतीसाठी गुरु केलेल्यांना चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे. प्रॉपर्टीच्या कामांसाठी मात्र सध्या अनुकूल काळ नाही. सप्ताह मध्य संमिश्र आहे. व्यापार्यांना अनुकूल काळ आहे मात्र अती दगदग करू नका. तसेच जोखीम असलेली कामे यादरम्यान करु नका. महत्त्वाची कामे पुढे ढकला. सप्ताहाच्या मध्यानंतर आवडत्या लोकांच्या भेटीचे योग येतील. काही लाभही होतील. तुमच्या कौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. आर्थिक सुयश लाभेल. मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या शेवटी धार्मिक कार्यात सहभाग असेल. अध्यात्मिक उन्नतीसाठी गुरु केलेल्यांना चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे.
या सप्ताहासाठी उपासना: ’ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: ’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात केतू, पंचमस्थानात प्लूटो, सप्तमस्थानात शुक्र, शनि, राहू, नेपचून, भाग्यस्थानात सूर्य, बुध, हर्षल, दशमस्थानात गुरु, आणि लाभस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल आणि शनिचा चंद्राशी व बुधाशी लाभयोग होईल. २७ तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल. २८ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल आणि चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ३० तारखेला सूर्याची बुधाशी युती होईल. ३१ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाशी लाभयोग होईल व शुक्र मेष राशित प्रवेश करेल.
फ़लादेश- सप्ताहाची सुरुवात कंटाळवाणी व अडथळ्याची जरी झाली तरी नंतर पूर्ण सप्ताह छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला अध्यात्मिक उन्नतीसाठी काळ अनुकूल आहे. काहींना सूचक स्वप्ने पडतील. अचानक धनलाभाचे योगही शक्य.आहेत. सप्ताहाचा मध्य विद्यार्थी, कलाकार व उपासक यांना चांगला आहे. लांबच्या प्रवासाच्या योजना मनात घोळू लागतील. काही भाग्यवर्धक घटनाही घडण्याची शक्याता आहे. सप्ताह मध्यानंतर तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. सप्ताहाचा शेवट उत्तम असणार आहे. काही लाभ होतील. आवडत्या व्यक्ती भेटतील. मन आनंदी असेल.
या सप्ताहासाठी उपासना: ’विठ्ठल’ नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी शुक्र, शनि, राहू, नेपचून, अष्टमस्थानात सूर्य, बुध, हर्षल, भाग्यस्थानात गुरु, दशमस्थानात मंगळ आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल आणि शनिचा चंद्राशी व बुधाशी लाभयोग होईल. २७ तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल. २८ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल आणि चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ३० तारखेला सूर्याची बुधाशी युती होईल. ३१ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाशी लाभयोग होईल व शुक्र मेष राशित प्रवेश करेल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला घरात आनंदी वातावरण असेल. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. व्यावसायिक भेटीगाठी होतील. तुमचे अंदाज व निर्णय अचूक ठरतील. व्यवसायात नवीन तंत्र अमलात आणू शकाल. कामे मार्गी लागतील. मन आनंदी व उत्साही राहील. सप्ताहाच्या मध्यात व नंतर कोणाशी वाद होणार नाहीत याची दक्षता घ्या. आपले आरोग्य सांभाळा आणि तुमच्या हितशत्रूंवर लक्ष ठेवा. जोखीम असलेली कामे करु नका. महत्त्वाची कामे पुढे ढकला. राजकारणाशी संबंधीत लोकांना मात्र हा कालावधी काही नवीन संधी देणारा ठरु शकेल. संशोधक, मानसोपचारतज्ञ, ज्योतिषी यांनाही अनुकूल काळ आहे. सप्ताहाचा शेवट चांगला आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगलं काम होणार आहे.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात गणपतीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी प्लूटो, पंचमस्थानात शुक्र, शनि, राहू, नेपचून, सप्तमस्थानात सूर्य, बुध, हर्षल, अष्टमस्थानात गुरु, नवमस्थानात मंगळ आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल आणि शनिचा चंद्राशी व बुधाशी लाभयोग होईल. २७ तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल. २८ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल आणि चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ३० तारखेला सूर्याची बुधाशी युती होईल. ३१ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाशी लाभयोग होईल व शुक्र मेष राशित प्रवेश करेल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना चांगला कालावधी आहे. वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांनाही अनुकूल ग्रहमान आहे. मात्र तब्येतीच्या तक्रारी डोके वर काढतील. गुप्तशत्रूंच्या कारवायाही वाढतील.काळजी घ्यावी. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. संततीसौख्य लाभेल. विद्यार्थ्यांना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांनाही हा कालावधी चांगला आहे. सासरकडच्या नातेवाईकांची भेट होण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यानंतर जोखीम किंवा धोका असलेली कामे करू नका. कौटुंबिक जीवनात एखादी चिंता लागून राहील. भागीदारीतील निर्णय पुढे ढकला. सप्ताहाच्या शेवटी काही भाग्यवर्धक घटना चकित करतील. प्रवासासाठी व धार्मिक गोष्टींसाठी अनुकूल ग्रहमान आहे.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, चतुर्थस्थानात शुक्र, शनि, राहू, नेपचून, षष्ठस्थानी सूर्य, बुध, हर्षल, सप्तमस्थानात गुरु, अष्टमस्थानी मंगळ आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल आणि शनिचा चंद्राशी व बुधाशी लाभयोग होईल. २७ तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल. २८ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल आणि चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ३० तारखेला सूर्याची बुधाशी युती होईल. ३१ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाशी लाभयोग होईल व शुक्र मेष राशित प्रवेश करेल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला विद्यार्थ्यांनी अती आत्मविश्वास टाळावा. अभ्यासाकडे दुर्लक्ष नको. संततीशी वाद टाळा. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी मात्र ग्रहांची अनुकूलता आहे. सप्ताह मध्य वैद्यकीय व्यवसाय करणारे, केमिस्ट, वकील, जीम ट्रेनर, न्युट्रीशियन यांना अनुकूल आहे. तब्येतीच्या कुरबुरी मात्र या काळात जाणवतील. सप्ताह मध्यानंतर जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. जोडीदाराचा उत्कर्ष किंवा जोडीदाराबद्दल एखादी चांगली घटना घडण्याची शक्यता आहे. भाग्याची साथ मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. सप्ताहाचा शेवट संमिश्र आहे. जोखीम असलेली कामे टाळा. ज्यांनी अध्यात्मिक उन्नतीसाठी गुरु केले आहेत त्यांना या काळात चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे.
या सप्ताहासाठी उपासना: ’ श्री गुरुदेव दत्त ’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, तृतीयस्थानी शुक्र, शनि, राहू, नेपचून, पंचमस्थानात सूर्य, बुध, हर्षल, षष्ठस्थानी गुरु, सप्तमस्थानात मंगळ आणि नवमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल आणि शनिचा चंद्राशी व बुधाशी लाभयोग होईल. २७ तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल. २८ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल आणि चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ३० तारखेला सूर्याची बुधाशी युती होईल. ३१ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाशी लाभयोग होईल व शुक्र मेष राशित प्रवेश करेल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला आराम तसेच मौज-मजा करण्याकडे कल असेल. एखाद्या समारंभात किंवा कार्यक्रमात सहभागी होण्याचे योग संभवतात. जुने मित्र भेटतील. धनलाभ होण्याचेही योग आहेत. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना अनुकूल आहे. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. केलेल्या कष्टाचे चीज होईल. मोठ्यांनी केलेलं कौतुक किंवा अचानक मिळालेल्या बक्षिसामुळे खुश व्हाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. प्रेमी युगुलांसाठी विशेष चांगला काळ आहे. प्रेमिकांना लग्न ठरविण्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह मध्यानंतर तब्येत सांभाळावी. नोकरीमध्ये आपल्या कामाकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात रोज महालक्ष्मीअष्टक म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात शुक्र, शनि, राहू, नेपचून, चतुर्थस्थानात सूर्य, बुध, हर्षल, पंचमस्थानात गुरु, षष्ठस्थानात मंगळ, अष्टमस्थानात केतू आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल आणि शनिचा चंद्राशी व बुधाशी लाभयोग होईल. २७ तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल. २८ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल आणि चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ३० तारखेला सूर्याची बुधाशी युती होईल. ३१ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाशी लाभयोग होईल व शुक्र मेष राशित प्रवेश करेल.
फ़लादेश- सोमवार रात्रीपर्यंत संमिश्र ग्रहमान आहे. तुमची जिद्द व चिकाटी वाढेल. दैनंदिन कामात कष्ट जास्त पडतील. या दरम्यान वादग्रस्त होईल असं लेखन सोशल मिडियावर करु नका तसेच कोणाशीही वाद होणार याची दक्षता घ्या. आरोग्याचीही काळजी या काळात घ्यायला हवी. त्यानंतरचे दोन दिवस लाभदायक आहेत. कौटुंबिक सौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. प्रॉपटींची कामे मार्गी लागतील. घरात आनंदी वातावरण असेल. एखाद्या समारंभ किंवा पार्टीत सामिल होण्याचे योग शक्य आहेत. संततीबद्दल चांगली बातमी कळेल. प्रेमिकांना लग्न ठरविण्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताहाच्या शेवटी शारीरिक सौख्यासाठी योग्य आहार व नियमित व्यायाम करायला हवा याची जाणीव होईल.
या सप्ताहासाठी उपासना: श्रीसूक्ताचे नियमित पठण या कालावधीत केलेले चांगले.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शुक्र, शनि, राहू, नेपचून, तृतीयस्थानी सूर्य, बुध, हर्षल, चतुर्थस्थानात गुरु, पंचमस्थानात मंगळ, सप्तमस्थानी केतू आणि लाभस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल आणि शनिचा चंद्राशी व बुधाशी लाभयोग होईल. २७ तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल. २८ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल आणि चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ३० तारखेला सूर्याची बुधाशी युती होईल. ३१ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाशी लाभयोग होईल व शुक्र मेष राशित प्रवेश करेल.
फ़लादेश- सप्ताहाची सुरूवात प्रिय घटनांनी होईल. आर्थिक सुयश लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल. वेळ छान जाईल. प्रिय व्यक्तींच्या किंवा गुरुतुल्य व्यक्तींच्या भेटीचे योग येतील. धार्मिक गोष्टींसाठीही चांगला काळ आहे. सप्ताह मध्यात कामात सुयश लाभेल. प्रवासयोग शक्य. सोशल मिडियावर केलेली एखादी पोस्ट प्रसिध्दी मिळवून देऊ शकेल. तुमच्या तांत्रिक कौशल्याचा उपयोग होईल. एखादं बक्षिस, कौतुकाचे शब्द किंवा पाठीवर मिळालेली शाबासकीची थाप तुम्हाला नवीन उमेद मिळवून देईल. सप्ताह मध्यानंतर प्रॉपर्टीच्या कामांसाठी अनुकूल कालावधी आहे. घरात छान वातावरण असेल. तुमच्या छंदासाठीही जरुर वेळ काढा. सप्ताहाच्या शेवटी विद्यार्थ्यांना व कलाकारांना कमी श्रमात जास्त यश देणारे योग आहेत. संततीसौख्य लाभेल. उत्तम काळ आहे.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात गणपती अथर्वशीर्षाचे नित्य पठण करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)