अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (४ मे ते १० मे २०२५)
Astroshodh, bestastrologerinpune, famousastrologerinpune, topastrologerinpune, bestastrologerinindia, famousastrologerinindia, topastrologerinindia
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, धनस्थानी गुरु, हर्षल, चतुर्थस्थानात मंगळ, षष्ठस्थानात केतू, दशमस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात बुध, शुक्र, शनि, राहू, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला गुरुचा चंद्राशी व बुधाशी लाभयोग होईल. ७ तारखेला बुध मेष राशित प्रवेश करेल. ८ तारखेला चंद्राचा शुक्र व शनिशी प्रतियोग होईल. ९ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १० तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला कौटुंबिक सौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश मिळेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. मन प्रसन्न असेल. सप्ताह मध्यात लाभदायक ग्रहमान आहे. मानसन्मान मिळेल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. विद्यार्थी, खेळाडू व कलाकारांना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल. संततीबाबत चांगली बातमी कळेल. सप्ताह मध्यानंतर उपासनेत मन रमेल. या काळात केलेली गुंतवणूक दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरेल. नोकरीबदलासाठी प्रयत्न करणारांना अनुकूल ग्रहमान आहे. वैद्यकीय व्यावसायिकांनाही लाभदायक कालावधी आहे. सप्ताहाच्या शेवटी आवडत्या व्यक्तींबरोबर वेळ मजेत जाईल. खरेदीसाठी चांगले ग्रहमान आहे.
उपासना: रामरक्षेचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु, हर्षल, तृतीयस्थानी मंगळ, पंचमस्थानात केतू, भाग्यस्थानात प्लूटो, लाभस्थानात बुध, शुक्र, शनि, राहू, नेपचून आणि व्ययस्थानात सूर्य अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला गुरुचा चंद्राशी व बुधाशी लाभयोग होईल. ७ तारखेला बुध मेष राशित प्रवेश करेल. ८ तारखेला चंद्राचा शुक्र व शनिशी प्रतियोग होईल. ९ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १० तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- रविवारी नातेवाईकांच्या भेटीचे योग येऊ शकतील. लेखक/ साहित्यिकांना चांगला काळ आहे. मनासारखे काम झाल्याने खूष असाल. प्रवासाचे योगही संभवतात. सोमवार, मंगळवार घरासाठी कामांसाठी वेळ काढावा लागेल. घरासंबंधी काही दुरुस्ती, काही भरायची राहीलेली बिले प्रलंबित असल्यास त्या कामास प्राधान्य द्या. सप्ताहाच्या मध्यानंतर बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. विद्यार्थ्यांना व खेळाडूंना अतिशय उत्तम काळ आहे. केलेल्या कष्टाचे चीज होईल. आवडत्या व्यक्तीच्या भेटीचाही योग आहे. मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या शेवटी नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. सामाजिक कामात सहभागी व्हाल. शारीरिक सौख्यासाठी योग्य आहार व नियमित व्यायाम करायला हवा याची जाणीव होईल. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांनाही अनुकूल काळ आहे.
उपासना: ’ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: ’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात मंगळ, चतुर्थस्थानात केतू, अष्टमस्थानात प्लूटो, दशमस्थानात बुध, शुक्र, शनि, राहू, नेपचून, लाभस्थानात सूर्य आणि व्ययस्थानात गुरु, हर्षल, अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला गुरुचा चंद्राशी व बुधाशी लाभयोग होईल. ७ तारखेला बुध मेष राशित प्रवेश करेल. ८ तारखेला चंद्राचा शुक्र व शनिशी प्रतियोग होईल. ९ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १० तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात प्रियजनांच्या सहवासात छान होईल. काहींना धनलाभ शक्य आहे. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. मात्र तुमच्या बोलण्यामुळे यादरम्यान लोक दुखावले जाऊ शकतील. बोलण्यावर संयम ठेवावा. सप्ताह मध्यात मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. सोशल मिडियावर केलेली एखादी पोस्ट प्रसिध्दी मिळवून देऊ शकेल. लेखक, प्रकाशक यांना हा काळ उत्तम आहे. प्रवासाचे योगही संभवतात. सप्ताह मध्यानंतर घराच्या दुरुस्ती किंवा सुशोभीकरणासाठी काही खर्च करावे लागतील. प्रॉपर्टी खरेदी/विक्रीची कामे काही दिवसांसाठी पुढे ढकलावीत. सप्ताहाच्या अखेरीस मन प्रसन्न करणार्या घटना घडतील. एखादा धनलाभ सुखावेल. आपल्या एखाद्या छंदासाठी जरुर वेळ द्या. कलाकारांना, लेखकांना अनुकूल काळ आहे. विद्यार्थ्यांनाही यशदायक काळ आहे.
उपासना: रविवारी नवग्रह मंदिरात जाऊन सूर्यनारायणाचे दर्शन जरुर घ्यावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, तृतीयस्थानी केतू, सप्तमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात बुध, शुक्र, शनि, राहू, नेपचून, दशमस्थानात सूर्य आणि लाभस्थानात गुरु, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला गुरुचा चंद्राशी व बुधाशी लाभयोग होईल. ७ तारखेला बुध मेष राशित प्रवेश करेल. ८ तारखेला चंद्राचा शुक्र व शनिशी प्रतियोग होईल. ९ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १० तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताह चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला मन प्रसन्न असेल. आत्मविश्वास वाढविणार्या घटना घडतील. कुटुंबीयांबरोबर छान सुर जमलेला असेल. काही लाभही संभवतात. आपल्या कार्यक्षेत्रात छान यश मिळणार आहे. वरीष्ठ/ वडीलधारी व्यक्तींचं सहकार्य चांगलं मिळेल. सप्ताह मध्यात प्रवासयोग संभवतात. धार्मिक गोष्टींसाठी अनुकूल काळ आहे. काही भाग्यवृध्दीकारक घटना घडतील. सप्ताह अखेरीस कौटुंबिक सौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. राहत्या जागेचे व व्यवसायाच्या जागेचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील. मन प्रसन्न असेल.
उपासना: ’ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: ’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी केतू, षष्ठस्थानी प्लूटो, अष्टमस्थानात बुध, शुक्र, शनि, राहू, नेपचून, भाग्यस्थानात सूर्य, दशमस्थानात गुरु, हर्षल आणि व्ययस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला गुरुचा चंद्राशी व बुधाशी लाभयोग होईल. ७ तारखेला बुध मेष राशित प्रवेश करेल. ८ तारखेला चंद्राचा शुक्र व शनिशी प्रतियोग होईल. ९ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १० तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला अचानक काही खर्च करावे लागतील. धार्मिक कृत्यांसाठी अनुकूल काळ आहे. मनाला एखाद्या गोष्टीची काळजी किंवा हुरहुर लागून राहू शकेल. सप्ताह मध्यात भाग्यवृध्दी करणारे ग्रहमान आहे. वरीष्ठांची मर्जी राहील. प्रवासयोग शक्य. ज्यांनी अध्यात्मिक उन्नतीसाठी गुरु केले आहेत त्यांना या काळात चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यानंतर संमिश्र ग्रहमान आहे. आर्थिक स्थिती चांगली असेल. मात्र तुमच्या बोलण्यामुळे या दरम्यान लोक दुखावले जाऊ शकतील. बोलण्यावर संयम ठेवा. डोळे किंवा दातासंबंधी काही तक्रारी जाणवू शकतील. सप्ताहाच्या शेवटी सोशल मिडियावर काही शेअर करत असाल तर ते वादग्रस्त होणार नाही याची काळजी घ्या तसेच भावंडांशी वाद होणार नाहीत याचीही दक्षता या काळात घ्यावी.
उपासना: रामरक्षेचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात केतू, पंचमस्थानात प्लूटो, सप्तमस्थानात बुध, शुक्र, शनि, राहू, नेपचून, अष्टमस्थानात सूर्य, भाग्यस्थानात गुरु, हर्षल आणि लाभस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला गुरुचा चंद्राशी व बुधाशी लाभयोग होईल. ७ तारखेला बुध मेष राशित प्रवेश करेल. ८ तारखेला चंद्राचा शुक्र व शनिशी प्रतियोग होईल. ९ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १० तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- रविवारी मित्रांच्या व प्रियजनांच्या भेटीचे योग येतील. काही लाभही मन प्रसन्न करु शकतील. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. त्यानंतरचे दोन दिवस चांगले आहेत. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील. व्यावसयिकांना फायदा देणार्या नवीन संधी चालून येतील. काहींना धनलाभ शक्य आहे. सप्ताह मध्यात व नंतर लाभदायक ग्रहमान आहे. कौटुंबीक सौख्य मिळेल. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. प्रसिध्दी मिळेल. आर्थिक सुयश लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल. तुमच्या संभाषणकौशल्यामुळे काही कामे मार्गी लागण्याणी शक्यता आहे. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. एखाद्या खाऊगल्लीला आपल्या जिवलगांबरोबर फेरफटका मारुन यायला हरकत नाही.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी बुध, शुक्र, शनि, राहू, नेपचून, सप्तमस्थानात सूर्य, अष्टमस्थानात गुरु, हर्षल, दशमस्थानात मंगळ आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला गुरुचा चंद्राशी व बुधाशी लाभयोग होईल. ७ तारखेला बुध मेष राशित प्रवेश करेल. ८ तारखेला चंद्राचा शुक्र व शनिशी प्रतियोग होईल. ९ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १० तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताह चांगला जाणार आहे. सप्ताहाची सुरुवात चांगली होणार आहे. वरीष्ठांकडून सहकार्य मिळेल. नोकरी, व्यवसायातील लोक भरपूर आणि मनाजोगते काम झाल्याने खूष असाल. मुख्य म्हणजे केलेल्या कामाचा मोबदलाही व्यवस्थित मिळाल्याने मन प्रसन्न राहील. सप्ताह मध्यात लाभदायक घटना शक्य आहेत. वैहाहिक सौख्य मिळेल. व्यवसायातील निर्णय योग्य ठरतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. मित्रांच्या भेटी होतील. काही अडकलेली कामे मित्रांच्या किंवा परीचितांच्या मदतीने पूर्ण करु शकाल. एखाद्या कामातून चांगली कमाई होऊ शकेल. सप्ताह मध्यानंतर खर्चाचे प्रमाण वाढेल. मनोरंजनाकडे कल राहील. सप्ताह अखेरीस तब्येतीच्या काही तक्रारी जाणवू शकतील. कोणाशी झालेला वाद त्रासदायक ठरु शकेल. काळजी घ्या.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी प्लूटो, पंचमस्थानात बुध, शुक्र, शनि, राहू, नेपचून, षष्ठस्थानी सूर्य, सप्तमस्थानात गुरु, हर्षल, नवमस्थानात मंगळ आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला गुरुचा चंद्राशी व बुधाशी लाभयोग होईल. ७ तारखेला बुध मेष राशित प्रवेश करेल. ८ तारखेला चंद्राचा शुक्र व शनिशी प्रतियोग होईल. ९ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १० तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला लाभदायक ग्रहमान आहे. भाग्याची साथ मिळेल. वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. प्रवास लाभदायक ठरु शकतील. उपासनेत मन लागेल. काहींवर गुरुकृपा शक्य. सप्ताह मध्यात आपल्या कामामध्ये चूक होणार नाही याची काळजी घ्यावी. वरीष्ठांचे मन दुखावले जाणार नाही याचीही दक्षता घ्या. हितशत्रूंवर नजर ठेवा. तसेच आरोग्याकडे दूर्लक्ष या काळात करु नका. नोकरीबदल किंवा नविन नोकरीसाठी प्रयत्न करण्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर धनलाभाचे योग आहेत. विवाहोत्सूकांसाठीही अनुकूल ग्रहमान आहे. व्यावसयिकांना फायदा देणार्या नवीन संधी चालून येतील. आप्तेष्टांच्या किंवा मित्रांच्या भेटीचे योग संभवतात. सप्ताह अखेरीस छान खरेदीचे योग आहेत. जुनी येणी वसूल होतील. मनाजोगती खरेदी होऊ शकेल.
उपासना: ’विठ्ठल’ नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, चतुर्थस्थानात बुध, शुक्र, शनि, राहू, नेपचून, पंचमस्थानात सूर्य, षष्ठस्थानी गुरु, हर्षल, अष्टमस्थानी मंगळ आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला गुरुचा चंद्राशी व बुधाशी लाभयोग होईल. ७ तारखेला बुध मेष राशित प्रवेश करेल. ८ तारखेला चंद्राचा शुक्र व शनिशी प्रतियोग होईल. ९ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १० तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- रविवारी काही चिंता मनाला जाणवत रहातील. काहींना गूढ गोष्टींचं आकर्षण वाटत राहील. त्यानंतरचे दोन दिवस भाग्यकारक ग्रहमान आहे. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. प्रवासासाठीही अनुकूल ग्रहमान आहे. या काळात काही भाग्यवर्धक घटना घडतील. संततीबद्दल चांगली बातमी कळेल. मानसन्मानाचे योग आहेत. सप्ताहाच्या मध्यानंतर तुमच्या कार्यक्षेत्रात समाधानकारक स्थिती असेल. प्रलंबीत असलेली कामे मार्गी लावू शकाल. एखादी महत्वाची जबाबदारी तुमच्यावर सोपावली जाऊ शकेल. सप्ताहाच्या शेवटी आवडत्या माणसांच्या भेटी शक्य आहेत. काही लाभही होऊ शकतील.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, तृतीयस्थानी बुध, शुक्र, शनि, राहू, नेपचून, चतुर्थस्थानात सूर्य, पंचमस्थानात गुरु, हर्षल, सप्तमस्थानात मंगळ आणि नवमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला गुरुचा चंद्राशी व बुधाशी लाभयोग होईल. ७ तारखेला बुध मेष राशित प्रवेश करेल. ८ तारखेला चंद्राचा शुक्र व शनिशी प्रतियोग होईल. ९ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १० तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- रविवारी आवडत्या माणसांबरोबर वेळ छान व्यतीत करू शकाल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांना चांगला काळ आहे. नंतरचे दोन दिवस गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. काहींना या काळात सूचक स्वप्न पडणे किंवा भविष्यकाळातील घटनांचे काही संकेत मिळणे अशा घटना संभवतात. कुंडलिनी जागृती किंवा इतर अध्यात्मिक साधना करणार्यांना या काळात चांगले यश मिळेल. मात्र दैनंदिन जीवनात जोखीम असलेली कामे टाळा. महत्त्वाची कामे पुढे ढकला. सप्ताह मध्यानंतर काही भाग्यवर्धक घटना घडतील. मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. सोशल मिडियावर केलेली एखादी पोस्ट प्रसिध्दी मिळवून देऊ शकेल. वरीष्ठांकडून कौतूक होण्याची शक्यता आहे. कार्यालयीन कामासाठी प्रवासयोग या काळात शक्य.
उपासना: रोज महालक्ष्मीअष्टक या काळात जरुर म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात बुध, शुक्र, शनि, राहू, नेपचून, तृतीयस्थानी सूर्य, चतुर्थस्थानात गुरु, हर्षल, षष्ठस्थानात मंगळ, अष्टमस्थानात केतू आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला गुरुचा चंद्राशी व बुधाशी लाभयोग होईल. ७ तारखेला बुध मेष राशित प्रवेश करेल. ८ तारखेला चंद्राचा शुक्र व शनिशी प्रतियोग होईल. ९ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १० तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला तब्येतीची काळजी घेणे उचित ठरेल. कोणत्याही वादात पडू नका. आपल्या कार्यक्षेत्रातील लोक आपल्याला वादात अडकवून आपली कोंडी तर करत नाही ना याकडे लक्ष ठेवा. वैद्यकीय क्षेत्रात व कायदाविषयी कामे करणार्यांनी आपल्या कामात चूक होणार नाही याची दक्षता घ्यावी. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वेळ मजेत घालवायला मिळेल. प्रेमिकांनाही चांगला काळ आहे. प्रवासयोगही या काळात शक्य आहेत. सप्ताहाच्या मध्यानंतर गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. या दरम्यान जोखीम असलेली कामे करु नका. महत्त्वाची कामे पुढे ढकला. सप्ताह अखेर धार्मिक कार्यासाठी चांगला कालावधी आहे. धनलाभाचेही योग शक्य.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी बुध, शुक्र, शनि, राहू, नेपचून, धनस्थानात सूर्य, तृतीयस्थानी गुरु, हर्षल, पंचमस्थानात मंगळ, सप्तमस्थानी केतू आणि लाभस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. ५ तारखेला गुरुचा चंद्राशी व बुधाशी लाभयोग होईल. ७ तारखेला बुध मेष राशित प्रवेश करेल. ८ तारखेला चंद्राचा शुक्र व शनिशी प्रतियोग होईल. ९ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १० तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला काहींना सुवार्ता कळतील. विद्यार्थ्यांना चांगले ग्रहमान आहे. कलाकारांसाठीही चांगला काळ आहे. काहींना धनलाभही शक्य. सप्ताह मध्य नोकरदार मंडळींसाठी अनुकूल मात्र तब्येतीच्या काही तक्रारी जाणवू शकतील. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांसाठी अनुकूल कालावधी आहे. काहींना नोकरीच्या संधी प्राप्त होतील. प्रवासयोग येतील. सप्ताहाच्या मध्यानंतर जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. काहींना अचानक धनलाभाचे योग संभवतात. प्रेमिकांनाही हा कालावधी अनुकूल आहे.
उपासना: विठ्ठल नामाचा जप या काळात जरुर करावा. सप्ताह अखेर संमिश्र ग्रहमान आहे. गूढ विषयांकडे आज तुमच्या मनाचा ओढा असेल. अचानक धनलाभाचे योग शक्य. मात्र कोणतीही जोखीम या काळात नको.
उपासना: या काळात रोज गणपती स्तोत्र म्हणणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)