साप्ताहिक राशिभविष्य

अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२० एप्रिल ते २६ एप्रिल २०२५)

Astroshodh, bestastrologerinpune, famousastrologerinpune, topastrologerinpune, bestastrologerinindia, famousastrologerinindia, topastrologerinindia

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, धनस्थानी गुरु, हर्षल, चतुर्थस्थानात मंगळ, षष्ठस्थानात केतू, दशमस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात बुध, शुक्र, शनि, राहू, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला चंद्राचा शुक्र व शनिशी लाभयोग होईल. २१ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग, शनि-राहू पापकर्तरीयोग व बुधाशी लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. २४ तारखेला शुक्राची शनिशी युती होईल. २५ तारखेला चंद्राची बुध, शुक्र व शनिशी युती होईल. २६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताह चांगला जाणार आहे. रविवार भाग्यवर्धक घटनांचा असू शकेल. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. प्रवासयोगही शक्य. त्यानंतरचे दोन दिवस तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. वरीष्ठांशी जुळवून घेतल्यास त्यांच्याकडून एखादी मागणी मान्य करुन घेता येईल. सप्ताहाच्या मध्यात एखादा सन्मान, बक्षिस किंवा शाबासकीची मिळालेली थाप सुखावून टाकेल. काहींना लाभ संभवतात. मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. सप्ताहाच्या शेवटी पूर्वी केलेल्या एखाद्या गुंतवणुकीतून लाभ होऊ शकेल. उपासनेत मन रमेल. छान खरेदी होईल. मनोरंजनाकडे कल राहील. नृत्यकलाकारांना उत्तम कालावधी आहे.
या सप्ताहासाठी उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु, हर्षल, तृतीयस्थानी मंगळ, पंचमस्थानात केतू, भाग्यस्थानात प्लूटो, लाभस्थानात बुध, शुक्र, शनि, राहू, नेपचून आणि व्ययस्थानात सूर्य अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला चंद्राचा शुक्र व शनिशी लाभयोग होईल. २१ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग, शनि-राहू पापकर्तरीयोग व बुधाशी लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. २४ तारखेला शुक्राची शनिशी युती होईल. २५ तारखेला चंद्राची बुध, शुक्र व शनिशी युती होईल. २६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात म्हणजे रविवार कंटाळवाणा व अडथळ्याचा जरी असला तरी नंतर पूर्ण सप्ताह छान जाणार आहे. रविवारनंतरच्या दोन दिवसात तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम झाल्याने तुमचे मन प्रसन्न असेल. घरातील वडीलधारी मंडळींचा व कार्यक्षेत्रातील वरीष्ठांचा पाठींबा व मदत या काळात तुम्हाला मिळणार आहे. सप्ताहाचा मध्य व नंतरचा कालावधी धार्मिक कार्यक्रम/ उपासना करण्यास चांगला असणार आहे. काही भाग्यवर्धक घटना घडू शकतील. सासरकडच्या नातेवाईकांचे सहकार्य मिळेल. प्रवास लाभदायक ठरतील. सप्ताह अखेरीस आवडती माणसे भेटतील. धनलाभाचेही योग आहेत. व्यवसायिकांना विशेष अनुकूल काळ आहे.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात मारुतीची उपासना करणे, मारुतीचे दर्शन घेणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात मंगळ, चतुर्थस्थानात केतू, अष्टमस्थानात प्लूटो, दशमस्थानात बुध, शुक्र, शनि, राहू, नेपचून, लाभस्थानात सूर्य आणि व्ययस्थानात गुरु, हर्षल, अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला चंद्राचा शुक्र व शनिशी लाभयोग होईल. २१ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग, शनि-राहू पापकर्तरीयोग व बुधाशी लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. २४ तारखेला शुक्राची शनिशी युती होईल. २५ तारखेला चंद्राची बुध, शुक्र व शनिशी युती होईल. २६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस लाभदायक आहे. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. वरीष्ठांची मर्जी राहील. मात्र व्यवसायातील आर्थिक निर्णय शक्यतो संध्याकाळपूर्वीच घ्यावेत. त्यानंतरचे चार दिवस स्वत:च्या तब्येतीची काळजी घ्यावी. धोका असलेले कोणतेही काम यादरम्यान करु नका. वाहने जपून चालवा. बेकायदा व्यवहारांपासून लांब रहा. धार्मिक गोष्टींसाठी मात्र अनुकूल काळ आहे. विमा क्षेत्रात काम करणार्‍यांनाही हा काळ अनुकूल आहे. सप्ताहाच्या शेवटी रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. व्यावसयिकांना फायदा देणार्‍या नवीन संधी चालून येतील. आवडत्या माणसांच्या भेटीचे योग येतील. शनिवारी संमिश्र ग्रहमान आहे. दैनंदिन कामे रेंगाळतील.
या सप्ताहासाठी उपासना: श्रीस्वामी समर्थांचा तारक मंत्र या काळात रोज म्हणावा किंवा ऐकावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, तृतीयस्थानी केतू, सप्तमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात बुध, शुक्र, शनि, राहू, नेपचून, दशमस्थानात सूर्य आणि लाभस्थानात गुरु, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला चंद्राचा शुक्र व शनिशी लाभयोग होईल. २१ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग, शनि-राहू पापकर्तरीयोग व बुधाशी लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. २४ तारखेला शुक्राची शनिशी युती होईल. २५ तारखेला चंद्राची बुध, शुक्र व शनिशी युती होईल. २६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांना व वकिलांना चांगली असेल. रविवारी धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. भाग्यवृध्दीकारक गोष्टी शक्य आहेत. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. मात्र तब्येतीच्या कुरबुरी जाणवू शकतील. नंतरचे चार दिवस संमिश्र आहेत. तुमच्या स्वत:च्या व जोडीदाराच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे. कोणतेही आजार अंगावर काढू नका. जोखीम असलेली कामे या काळात करु नका. घरात वाद होणार नाहीत याचीही काळजी घ्या आणि वाहने सावकाश चालवा. सप्ताहाच्या शेवटी वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. कामे मार्गी लागतील. ज्यांनी अध्यात्मिक उन्नतीसाठी गुरु केले आहेत त्यांना या काळात चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी केतू, षष्ठस्थानी प्लूटो, अष्टमस्थानात बुध, शुक्र, शनि, राहू, नेपचून, भाग्यस्थानात सूर्य, दशमस्थानात गुरु, हर्षल आणि व्ययस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला चंद्राचा शुक्र व शनिशी लाभयोग होईल. २१ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग, शनि-राहू पापकर्तरीयोग व बुधाशी लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. २४ तारखेला शुक्राची शनिशी युती होईल. २५ तारखेला चंद्राची बुध, शुक्र व शनिशी युती होईल. २६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला विद्यार्थ्यांना अनुकूल ग्रहमान आहे. मात्र अती आत्मविश्वास टाळावा. शेअर्स/ कमोडीटी सारख्या बेभरवशाच्या व्यवहारांपसून सध्या लांब रहावे. आरोग्याच्या काही समस्या जाणवतील. विशेषत: वातामुळे ज्यांना त्रास किंवा आजारपण आहे त्यांनी योग्य ते पथ्यपाणी सांभाळावे. सप्ताह मध्य वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना व वकीलांना अनुकूल आहे. नोकरी बदल किंवा नवीन नोकरीसाठी प्रयत्न
करणार्‍यांनी एखादी ऑफ़र मिळाल्यास ती पूर्ण तपासल्याशिवाय कोणताही निर्णय तातडीने घेऊ नका. सप्ताहाच्या शेवटी गूढ विषय तुम्हाला आकर्षित करतील.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात सूर्योपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात केतू, पंचमस्थानात प्लूटो, सप्तमस्थानात बुध, शुक्र, शनि, राहू, नेपचून, अष्टमस्थानात सूर्य, भाग्यस्थानात गुरु, हर्षल आणि लाभस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला चंद्राचा शुक्र व शनिशी लाभयोग होईल. २१ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग, शनि-राहू पापकर्तरीयोग व बुधाशी लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. २४ तारखेला शुक्राची शनिशी युती होईल. २५ तारखेला चंद्राची बुध, शुक्र व शनिशी युती होईल. २६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला घरात छान वातावरण असेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. कौटुंबिक सौख्य लाभेल. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. मन प्रसन्न असेल. सप्ताहाचा मध्य तसा चांगला आहे. काहींना धनलाभाचे योग येतील मात्र त्यासाठी थोडी जास्त वाट पहावी लागेल. विद्यार्थ्यांनाही जास्त अभ्यास करण्याची गरज आहे. प्रेमिकांनाही मात्र लग्न ठरविण्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह मध्यानंतर तब्येतीची काळजी घ्यावी. वकील, वैद्यकीय क्षेत्रातील लोक तसे आहारतज्ञ यांना हा काळ अनुकूल आहे. सप्ताहाच्या शेवटी लाभदायक ग्रहमान आहे. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल.
या सप्ताहासाठी उपासना: स्वामी समर्थांच्या तारक मंत्राचा जप करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी बुध, शुक्र, शनि, राहू, नेपचून, सप्तमस्थानात सूर्य, अष्टमस्थानात गुरु, हर्षल, दशमस्थानात मंगळ आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला चंद्राचा शुक्र व शनिशी लाभयोग होईल. २१ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग, शनि-राहू पापकर्तरीयोग व बुधाशी लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. २४ तारखेला शुक्राची शनिशी युती होईल. २५ तारखेला चंद्राची बुध, शुक्र व शनिशी युती होईल. २६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला लेखकांसाठी चांगला काळ आहे. भावंडाशी संवाद साधाल. तुमच्या कलाकौशल्याला आज वाव मिळेल. कार्यक्षेत्रात सुयश मिळेल. काहींना प्रवास योग आहेत. सप्ताहाच्या मध्यात प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मन प्रसन्न असेल. घरातील साफसफाई किंवा गृहसजावटीसाठी वेळ काढाल. मात्र अती दगदग टाळावी. सप्ताहाच्या मध्यानंतर संततीच्या प्रगतीमुळे खुश व्हाल. स्पर्धा परिक्षेत चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. नवीन विषय शिकण्यासाठी किंवा आपल्या छंदासाठी जरूर वेळ द्या. सप्ताहाच्या शेवटी आपले आरोग्य सांभाळा. कर्मचार्‍यांचे सहकार्य मिळणार नाही. हितशत्रूंवर लक्ष ठेवा. मधूमेह असणार्‍यांनी पथ्यपाणी व्यवस्थित पाळावे.
या सप्ताहासाठी उपासना: रामरक्षेचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी प्लूटो, पंचमस्थानात बुध, शुक्र, शनि, राहू, नेपचून, षष्ठस्थानी सूर्य, सप्तमस्थानात गुरु, हर्षल, नवमस्थानात मंगळ आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला चंद्राचा शुक्र व शनिशी लाभयोग होईल. २१ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग, शनि-राहू पापकर्तरीयोग व बुधाशी लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. २४ तारखेला शुक्राची शनिशी युती होईल. २५ तारखेला चंद्राची बुध, शुक्र व शनिशी युती होईल. २६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात प्रिय घटनांनी होईल. आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. कलाकौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. प्रिय व्यक्तींच्या भेटी किंवा संपर्क मनाला आनंद देतील. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. संततीबद्दल चांगली बातमी कळेल. प्रेमिकांना लग्न ठरविण्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे. लेखक, वक्ते व कलाकार यांच्यासाठीही चांगला कालावधी आहे. सप्ताह मध्यात मनासारखी कामे झाल्याने खुश असाल. प्रॉपर्टीची कामे फ़ायदा मिळवून देतील. विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षेत्रात चांगली कामगिरी करता येईल. मन प्रसन्न असेल. सप्ताह अखेरीस आत्मविश्वास वाढलेला असेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. काही लाभदायक घटनाही शक्य. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी राहील.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात रोज गणपती स्तोत्र म्हणणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, चतुर्थस्थानात बुध, शुक्र, शनि, राहू, नेपचून, पंचमस्थानात सूर्य, षष्ठस्थानी गुरु, हर्षल, अष्टमस्थानी मंगळ आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला चंद्राचा शुक्र व शनिशी लाभयोग होईल. २१ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग, शनि-राहू पापकर्तरीयोग व बुधाशी लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. २४ तारखेला शुक्राची शनिशी युती होईल. २५ तारखेला चंद्राची बुध, शुक्र व शनिशी युती होईल. २६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- रविवारी संमिश्र ग्रहमान आहे. रागावर नियंत्रण ठेवा, घरात वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. त्यानंतर संपूर्ण सप्ताह मस्त जाणार आहे. सोमवार ते गुरुवार उत्तम ग्रहमान आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. घरातील कामांसाठी वेळ काढावा लागेल. मन प्रसन्न असेल. गृहसौख्य लाभेल. कुटुंबीयांबरोबर छान सुर जमलेला असेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. प्रॉपर्टीची कामे पार पडतील. मन प्रसन्न असेल. सप्ताह अखेरीस एखाद्या पार्टीत किंवा समारंभात सामिल होण्याचे योग आहेत. मन प्रसन्न असेल. मात्र यादरम्यान तब्येतीची काळजी घ्या. अती दगदग टाळा.
या सप्ताहासाठी उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, तृतीयस्थानी बुध, शुक्र, शनि, राहू, नेपचून, चतुर्थस्थानात सूर्य, पंचमस्थानात गुरु, हर्षल, सप्तमस्थानात मंगळ आणि नवमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला चंद्राचा शुक्र व शनिशी लाभयोग होईल. २१ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग, शनि-राहू पापकर्तरीयोग व बुधाशी लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. २४ तारखेला शुक्राची शनिशी युती होईल. २५ तारखेला चंद्राची बुध, शुक्र व शनिशी युती होईल. २६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला लाभदायक ग्रहमान आहे. मनाजोगती खरेदी होऊ शकेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. नृत्यकलेशी ज्यांचा संबंध आहे त्यांना विशेष चांगला कालावधी आहे. परदेशगमन किंवा त्यासंबंधीत काही कामे असतील तर त्याला गती देऊ शकाल. सप्ताहाच्या मध्यात आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. कलाकौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. तुमच्या संभाषणकौशल्याच्या जोरावर काही लाभ मिळतील. सप्ताहाच्या मध्यानंतर कवी, लेखक, ब्लॉगर्स यांच्यासाठी चांगला कालावधी आहे. मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या शेवटी मनोबल उत्तम राहील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात बुध, शुक्र, शनि, राहू, नेपचून, तृतीयस्थानी सूर्य, चतुर्थस्थानात गुरु, हर्षल, षष्ठस्थानात मंगळ, अष्टमस्थानात केतू आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला चंद्राचा शुक्र व शनिशी लाभयोग होईल. २१ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग, शनि-राहू पापकर्तरीयोग व बुधाशी लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. २४ तारखेला शुक्राची शनिशी युती होईल. २५ तारखेला चंद्राची बुध, शुक्र व शनिशी युती होईल. २६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला अनुकूल काळ आहे. धनलाभ होण्याचे योग आहेत. लोकांचे सहकार्य मिळेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. एकंदरीतच लाभदायक ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात संमिश्र काळ आहे. खरेदीसाठी काळ अनुकूल आहे. धार्मिक कार्यात सहभाग असेल. जुन्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. कलाकारांना विशेष चांगला काळ आहे. बेकायदा गोष्टींपासून मात्र लांब रहावे तसेच नकारात्मक विचार मनात येणार नाहीत याचीही काळजी घ्यावी. सप्ताहाच्या शेवटी आर्थिक स्थिती चांगली असेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. मन प्रसन्न असेल.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात दत्तबावनी रोज म्हणावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी बुध, शुक्र, शनि, राहू, नेपचून, धनस्थानात सूर्य, तृतीयस्थानी गुरु, हर्षल, पंचमस्थानात मंगळ, सप्तमस्थानी केतू आणि लाभस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला चंद्राचा शुक्र व शनिशी लाभयोग होईल. २१ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग, शनि-राहू पापकर्तरीयोग व बुधाशी लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. २४ तारखेला शुक्राची शनिशी युती होईल. २५ तारखेला चंद्राची बुध, शुक्र व शनिशी युती होईल. २६ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताह छान जाणार आहे. धनलाभ होतील. वरीष्ठ खुश असतील. एखादी मागणी असेल तर आता वरीष्ठांकडे शब्द टाकायला हरकत नाही. व्यवसायातील लोकांना केलेल्या कामाचा मोबदला व्यवस्थित मिळेल. मन प्रसन्न राहील. सप्ताहाच्या मध्यात लाभदायक ग्रहमान आहे. अपेक्षित गाठीभेटी होतील. आर्थिक सुयश लाभेल. राजकारणी व्यक्तींना प्रगतीदायक काळ आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर मनासारखी खरेदी होईल तसेच काही अनपेक्षित खर्चही करावे लागू शकतील. बेकायदा कोणतीही गोष्ट यादरम्यान करु नका. सप्ताह अखेरीस धार्मिक गॊष्टींमध्ये मन रमेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मन आनंदी व आशावादी राहील.
या सप्ताहासाठी उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)