अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१५ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२४)
Astroshodh- bestastrologerinpune, famousastrologerinpune, topastrologerinpune, bestastrologerinindia, famousastrologerinindia, topastrologerinindia
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी हर्षल, धनस्थानी गुरु(व), चतुर्थस्थानी मंगळ(व), षष्ठस्थानात केतू, अष्टमस्थानात सूर्य, बुध(व), दशमस्थानात शुक्र, प्लूटो, लाभस्थानात शनि आणि व्ययस्थानात राहू, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला चंद्राचा सुर्याशी प्रतियोग होईल व सूर्य धनु राशित प्रवेश करेल. १८ तारखेला चंद्राची मंगळाशी युती व शुक्राशी प्रतियोग होईल. १९ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २० तारखेला गुरुचा शुक्राशी त्रिकोण होईल आणि २१ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात प्रिय घटनांनी होईल. रविवारी आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल. नंतरचे दोन दिवस लाभदायक आहेत. भावंडांबद्दल चांगली बातमी कळेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. प्रवास फ़ायदेशीर ठरतील. ब्लॉगर्स, लेखक, कवी व चित्रकार यांना उत्तम ग्रहमान आहे. सप्ताह मध्य प्रॉपर्टीच्या कामांसाठी अनुकूल आहे. घरात छान वातावरण असेल. एखाद्या कार्यक्रम किंवा समारंभात सामील होण्याचे योग येऊ शकतात. सप्ताह अखेरीस मन प्रसन्न असेल. कलाकार, खेळाडू व विद्यार्थ्यांना कालावधी खूप चांगला आहे. काही लाभही होण्याची यादरम्यान शक्यता आहे.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी धनस्थानी गुरु(व), तृतीयस्थानी मंगळ(व), पंचमस्थानात केतू, सप्तमस्थानात सूर्य, बुध(व), भाग्यस्थानात शुक्र, प्लूटो, दशमस्थानात शनि, लाभस्थानात राहू, नेपचून आणि व्ययस्थानात हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला चंद्राचा सुर्याशी प्रतियोग होईल व सूर्य धनु राशित प्रवेश करेल. १८ तारखेला चंद्राची मंगळाशी युती व शुक्राशी प्रतियोग होईल. १९ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २० तारखेला गुरुचा शुक्राशी त्रिकोण होईल आणि २१ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला भाग्याची साथ मिळेल. मन आनंदी असेल. कुटुंबीयांबरोबर छान सूर जमलेला असेल. आवडत्या लोकांच्या भेटी होतील. लेखक, प्रकाशक यांना विशेष अनुकूल कालावधी आहे. एखादी चांगली बातमी ऎकायला मिळेल. सप्ताह मध्यात गायक, कलाकार व वक्त्यांना चांगला काळ आहे. तुमच्या छंदासाठी जरुर वेळ द्या. प्रवासाचे योग संभवतात. सप्ताहाच्या शेवटी ग्रहमान संमिश्र आहे. कौटुंबिक जीवनात एखादी चिंता लागून राहील. प्रॉपर्टीची कामे शक्यतो पुढे ढकला. घरातील दुरुस्ती किंवा अन्य विलंबित कामांसाठी वेळ काढावा लागेल. गूढ विषयांमध्ये मन रमेल.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात महालक्ष्मीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात मंगळ(व), चतुर्थस्थानात केतू, षष्ठस्थानात सूर्य, बुध(व), अष्टमस्थानात शुक्र, प्लूटो, भाग्यस्थानात शनि, दशमस्थानात राहू, नेपचून, लाभस्थानात हर्षल आणि व्ययस्थानात गुरु(व) अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला चंद्राचा सुर्याशी प्रतियोग होईल व सूर्य धनु राशित प्रवेश करेल. १८ तारखेला चंद्राची मंगळाशी युती व शुक्राशी प्रतियोग होईल. १९ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २० तारखेला गुरुचा शुक्राशी त्रिकोण होईल आणि २१ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला बोलण्यावर संयम ठेवावा. खर्च वाढतील. आरोग्याच्या काही समस्याही जाणवतील. जोखीम असलेल्या कामांपासून लांब रहा. कोणालाही विनाकारण दिलेला सल्ला या काळात त्रासदायक ठरु शकेल. मात्र नृत्यकलेशी संबंधितांना हा कालावधी छान जाईल. पूर्वी केलेला एखादा खर्च आता अचानक लाभ देऊन जाईल. सप्ताह मध्यात मिष्टान्न खायला मिळतील. मन प्रसन्न असेल. कुटुंबामधील वातावरण चांगले असेल. काही लाभही होतील. सप्ताहाच्या शेवटी शेजारी तसेच नातेवाईकांचा चांगला अनुभव येईल. या काळात केलेले प्रवास आनंद देणारे ठरतील.
या सप्ताहासाठी उपासना: मृत्युंजय मंत्राचा जप करणे या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथम स्थानात मंगळ(व), तृतीयस्थानी केतू, पंचमस्थानात सूर्य, बुध(व), सप्तमस्थानात शुक्र, प्लूटो, अष्टमस्थानात शनि, भाग्यस्थानात राहू, नेपचून, दशमस्थानात हर्षल आणि लाभस्थानात गुरु(व) अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला चंद्राचा सुर्याशी प्रतियोग होईल व सूर्य धनु राशित प्रवेश करेल. १८ तारखेला चंद्राची मंगळाशी युती व शुक्राशी प्रतियोग होईल. १९ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २० तारखेला गुरुचा शुक्राशी त्रिकोण होईल आणि २१ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला मनाला आनंद देणार्या घटना घडण्याची शक्यता आहे. मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग शक्य आहेत. काही लाभही होतील. चांगली खरेदी कराल. अती दगदग मात्र टाळावी. परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांना लाभदायक ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात जुनी येणी वसूल होतील. पूर्वीच्या एखाद्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. अध्यात्मिक उन्नतीसाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांना चांगला कालावधी आहे. घरातील वातावरण आनंदी असेल. सप्ताह अखेरीस काहींना धनलाभ शक्य आहे. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. गृहसौख्य लाभेल.
या सप्ताहासाठी उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी केतू, चतुर्थस्थानात सूर्य, बुध(व), षष्ठस्थानी शुक्र, प्लूटो, सप्तमस्थानात शनि, अष्टमस्थानात राहू, नेपचून, भाग्यस्थानात हर्षल, दशमस्थानात गुरु(व) आणि व्ययस्थानात मंगळ(व) अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला चंद्राचा सुर्याशी प्रतियोग होईल व सूर्य धनु राशित प्रवेश करेल. १८ तारखेला चंद्राची मंगळाशी युती व शुक्राशी प्रतियोग होईल. १९ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २० तारखेला गुरुचा शुक्राशी त्रिकोण होईल आणि २१ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहात सुरुवातीला वरीष्ठांशी जमवून घेतल्यास तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. परदेशासंबंधी ज्यांचा व्यवसाय आहे अशा लोकांना केलेल्या कामाचा मोबदला व्यवस्थित मिळाल्याने मन प्रसन्न राहील. सप्ताहाचा मध्य उत्तम आहे. आर्थिक सुयश लाभेल. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचा योग शक्य आहे. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. सप्ताहाच्या शेवटी मनासारखी खरेदी होईल. काही अनपेक्षित खर्चही करावे लागू शकतात. एखाद्या गोष्टीची उगीचच काळजी किंवा हूरहूर लागून राहील.
या सप्ताहासाठी उपासना: ’विठ्ठल’ नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात केतू, तृतीयस्थानी सूर्य, बुध(व), पंचमस्थानात शुक्र, प्लूटो, षष्ठस्थानी शनि, सप्तमस्थानात राहू, नेपचून, अष्टमस्थानात हर्षल, भाग्यस्थानात गुरु(व) आणि लाभस्थानात मंगळ(व) अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला चंद्राचा सुर्याशी प्रतियोग होईल व सूर्य धनु राशित प्रवेश करेल. १८ तारखेला चंद्राची मंगळाशी युती व शुक्राशी प्रतियोग होईल. १९ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २० तारखेला गुरुचा शुक्राशी त्रिकोण होईल आणि २१ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- रविवारी भाग्याची साथ मिळेल. तुमचे अंदाज व निर्णय अचूक ठरतील. कामे मार्गी लागतील. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. काहींना प्रवासाचे योग संभवतात. सप्ताह मध्यात तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होणार आहे. काहींना वरीष्ठांकडून कौतुकाचे शब्द ऐकायला मिळू शकतात. कलेच्या संबंधीत ज्यांचे कार्यक्षेत्र आहे त्यांना हा काळ विशेष चांगला आहे. काहींना धनलाभ संभवतात. मित्रांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग संभवतात. मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या शेवटी आयात-निर्यात करणार्या व्यापार्यांना अनुकूल काळ आहे. मात्र या दरम्यान बेकायदा गोष्टींपासून लांब रहावे.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात सूर्य, बुध(व), चतुर्थस्थानात शुक्र, प्लूटो, पंचमस्थानात शनि, षष्ठस्थानी राहू, नेपचून, सप्तमस्थानात हर्षल, अष्टमस्थानात गुरु(व), दशमस्थानात मंगळ(व) आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला चंद्राचा सुर्याशी प्रतियोग होईल व सूर्य धनु राशित प्रवेश करेल. १८ तारखेला चंद्राची मंगळाशी युती व शुक्राशी प्रतियोग होईल. १९ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २० तारखेला गुरुचा शुक्राशी त्रिकोण होईल आणि २१ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात कंटाळवाणी व अडथळ्याची जरी झाली तरी नंतर पूर्ण सप्ताह छान जाणार आहे. रविवार संमिश्र असेल. आपले आरोग्य सांभाळा. सोमवार व मंगळवारी मनासारखे काम झाल्याने खुश असाल. कौटुंबिक सौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. धनलाभ होण्याचेही योग आहेत. सप्ताहाचा मध्य उपासना करणार्यांना चांगला आहे. काही भाग्यवर्धक घडतील. बढती किंवा पगार वाढीसाठी अनुकूल काळ आहे. लांबच्या प्रवासाच्या योग येऊ शकतील. सप्ताहाच्या शेवटी जुने मित्र भेटण्याची शक्याता आहे. कलाकारांना तसेच शिक्षणक्षेत्राशी संबंधितांना अनुकूल ग्रहमान आहे. काही लाभ मनाला आनंद देतील.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात सूर्य, बुध(व), तृतीयस्थानी शुक्र, प्लूटो, चतुर्थस्थानात शनि, पंचमस्थानात राहू, नेपचून, षष्ठस्थानी हर्षल, सप्तमस्थानात गुरु(व), नवमस्थानात मंगळ(व) आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला चंद्राचा सुर्याशी प्रतियोग होईल व सूर्य धनु राशित प्रवेश करेल. १८ तारखेला चंद्राची मंगळाशी युती व शुक्राशी प्रतियोग होईल. १९ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २० तारखेला गुरुचा शुक्राशी त्रिकोण होईल आणि २१ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- रविवारी जोडीदाराबरोबर मस्त शॉपिंगला जायला हरकत नाही. वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्यां चांगला कालावधी आहे. त्यानंतरचे दोन दिवस विमाप्रतिनिधी, मानसोपचारतज्ञ, ज्योतिषी यांना अनुकूल आहेत. काहींना अचानक लाभाचे योग संभवतात. दुसर्यांच्या चुका दाखविण्याची तसेच स्पष्ट बोलण्याची सवय त्रासदायक ठरु शकेल. सप्ताह मध्यानंतर धार्मिक गोष्टींसाठी चांगला काळ आहे. प्रवासाचे बेत ठरतील. सासरकडच्या लोकांबाबत चांगली बातमी कळेल. सप्ताहाच्या शेवटी तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम झाल्याने खुश असाल. वरीष्ठांची बहाल मर्जी असेल. मन प्रसन्न असेल.
या सप्ताहासाठी उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात शुक्र, प्लूटो, तृतीयस्थानी शनि, चतुर्थस्थानात राहू, नेपचून, पंचमस्थानात हर्षल, षष्ठस्थानी गुरु(व), अष्टमस्थानी मंगळ(व), दशमस्थानात केतू आणि व्ययस्थानात सूर्य, बुध(व) अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला चंद्राचा सुर्याशी प्रतियोग होईल व सूर्य धनु राशित प्रवेश करेल. १८ तारखेला चंद्राची मंगळाशी युती व शुक्राशी प्रतियोग होईल. १९ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २० तारखेला गुरुचा शुक्राशी त्रिकोण होईल आणि २१ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला नोकरीसाठी प्रयत्न करणार्यांना अनुकूल ग्रहमान आहे. धनलाभ होतील. तब्येत मात्र यादरम्यान जपायला हवी. सप्ताहाचा मध्य संमिश्र आहे. खर्च वाढतील. जोडीदाराबरोबर वाद टाळावेत. मानसिक अस्वस्थता असेल. मनातील नकारात्मकता दूर करण्यासाठी उपासनेत मन रमवा. आयात-निर्यात करणार्या व्यापार्यांना मात्र अनुकूल दिवस आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर जोखीम असलेली कामे करु नका. महत्त्वाची कामे पुढे ढकला. वाहने सावकाश चालवा. ज्योतिषशात्र, रेकी, कुंडलिनी जागृती अशा विषयांकडे मनाचा ओढा असेल. सप्ताहाच्या शेवटी परदेशप्रवासासाठी अनुकूल ग्रहमान आहे.
या सप्ताहासाठी उपासना: रामरक्षेचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शुक्र, प्लूटो, धनस्थानात शनि, तृतीयस्थानी राहू, नेपचून, चतुर्थस्थानात हर्षल, पंचमस्थानात गुरु(व), सप्तमस्थानात मंगळ(व), नवमस्थानात केतू आणि लाभस्थानी सूर्य, बुध(व) अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला चंद्राचा सुर्याशी प्रतियोग होईल व सूर्य धनु राशित प्रवेश करेल. १८ तारखेला चंद्राची मंगळाशी युती व शुक्राशी प्रतियोग होईल. १९ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २० तारखेला गुरुचा शुक्राशी त्रिकोण होईल आणि २१ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस चांगला आहे. आवडत्या माणसांबरोबर मस्त मजेत वेळ जाईल. कलाकारांना दिवस अनुकूल आहे. सोमवार, मंगळवार नोकरदार लोकांसाठी चांगले आहेत. वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. मात्र तब्येतीच्या तक्रारी काहींना जाणवतील. सर्दी/ सायनसचा त्रास असेल तर काळजी घ्यावी. सप्ताहाच्या मध्यात जोडीदाराबरोबर वेळ चांगला जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांना फायदेशीर कालावधी आहे. सप्ताहाच्या शेवटी अचानक धनलाभाचे योग संभवतात. गूढ विषयांमध्ये मन रमेल. एखाद्या गोष्टीतील बदल किंवा परीवर्तन फायदेशीर ठरु शकेल.
या सप्ताहासाठी उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि, धनस्थानात राहू, नेपचून, तृतीयस्थानी हर्षल, चतुर्थस्थानात गुरु(व), षष्ठस्थानात मंगळ(व), अष्टमस्थानात केतू, दशमात सूर्य, बुध(व) आणि व्ययस्थानात शुक्र, प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला चंद्राचा सुर्याशी प्रतियोग होईल व सूर्य धनु राशित प्रवेश करेल. १८ तारखेला चंद्राची मंगळाशी युती व शुक्राशी प्रतियोग होईल. १९ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २० तारखेला गुरुचा शुक्राशी त्रिकोण होईल आणि २१ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला मौज-मजा करण्याकडे कल असेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. एखादी महत्वाची जबाबदारी तुमच्यावर सोपावली जाऊ शकेल. प्रॉपर्टी खरेदी/ विक्रीसाठी अनुकूल काळ आहे. सप्ताहाचा मध्य लाभदायक आहे. मानसन्मान मिळेल. संततीसौख्य लाभेल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. विद्यार्थ्यांना व कलाकारांना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल. प्रेमिकांसाठीही अनुकूल काळ आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर काहींना नवीन नोकरीच्या संधी चालून येतील. मात्र तब्येतीच्या काही तक्रारी जाणवतील. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर वेळ आनंदात जाईल. व्यापार्यांना फायदेशीर ग्रहमान आहे.
या सप्ताहासाठी उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, नेपचून, धनस्थानात हर्षल, तृतीयस्थानी गुरु(व), पंचमस्थानात मंगळ(व), सप्तमस्थानी केतू, भाग्यात सूर्य, बुध(व), लाभस्थानात शुक्र, प्लूटो आणि व्ययस्थानात शनि अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला चंद्राचा सुर्याशी प्रतियोग होईल व सूर्य धनु राशित प्रवेश करेल. १८ तारखेला चंद्राची मंगळाशी युती व शुक्राशी प्रतियोग होईल. १९ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २० तारखेला गुरुचा शुक्राशी त्रिकोण होईल आणि २१ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताह चांगला आहे. रविवारी प्रियजनांचा सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. काही लाभ होतील. त्यानंतरचे दोन दिवस मनोबल उत्तम राहील. प्रवास लाभदायी ठरतील. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. गुरु किंवा गुरुतुल्य व्यक्तीच्या भेटीचे योग शक्य. प्रॉपर्टी किंवा वाहन खरेदीसाठी चांगले आहेत. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मन प्रसन्न असेल. सप्ताह मध्यात संततीच्या प्रगतीमूळे खुश व्हाल. स्पर्धा परिक्षेत चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. एखादी शाबासकी किंवा कौतुकाची मिळालेली थाप, बक्षिस सुखावून टाकेल. धनलाभही या काळात होण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या शेवटी आरोग्याच्या काही समस्या जाणवू शकतील. ज्यांची कर्जप्रकरणे प्रलंबीत आहेत त्यांना मात्र अनुकूल ग्रहमान आहे.
या सप्ताहासाठी उपासना: ’ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: ’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)