अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (३ नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबर २०२४)
Astroshodh- bestastrologerinpune, famousastrologerinpune, topastrologerinpune, bestastrologerinindia, famousastrologerinindia, topastrologerinindia
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी गुरु(व), हर्षल, चतुर्थस्थानी मंगळ, षष्ठस्थानात केतू, सप्तमस्थानात सूर्य, अष्टमस्थानात बुध, शुक्र, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात शनि(व) आणि व्ययस्थानात राहू, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राची बुधाशी युती व गुरुशी शुक्राशी प्रतियुती होईल. ४ तारखेला चंद्राची गुरुशी प्रतियुती व शुक्राशी युती होईल. ६ तारखेला चंद्राचा सूर्याशी व शनिशी लाभयोग होईल आणि शुक्र धनु राशित प्रवेश करेल. ८ तारखेला चंद्राची मंगळाशी प्रतियुती व बुधाशी लाभयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला अचानक धनलाभाचे योग शक्य आहेत मात्र या काळात आरोग्याची काळजी घ्यावी तसेच वाहने जपून चालवावीत. ज्योतिषशास्त्र, रेकी, अध्यात्म अशा गूढ शास्त्रांचं आकर्षण वाटेल. सप्ताह मध्यात एखादी भाग्यवर्धक घटना घडू शकेल. धार्मिक कार्यक्रमात भाग घ्याल. खरेदीसाठी काळ अनुकूल आहे. या दरम्यान केलेली गुंतवणूक दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरेल. धनलाभाचेही योग आहेत. सप्ताह मध्यानंतर तुमचा आत्मविश्वास वाढविणार्या घटना घडतील. तुमच्या कार्यक्षेत्रात मनासारखे काम होईल व सहकार्यांचे चांगले सहकार्य मिळेल. केलेल्या कष्टाचे चीज होईल व छान मोबदलाही मिळाल्याने मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या अखेरीस मित्रांच्या भेटीचे योग येतील. काहींना धनलाभ संभवतात.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु(व), हर्षल, तृतीयस्थानी मंगळ, पंचमस्थानात केतू, षष्ठस्थानात सूर्य, सप्तमस्थानात बुध, शुक्र, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात शनि(व) आणि लाभस्थानात राहू, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राची बुधाशी युती व गुरुशी शुक्राशी प्रतियुती होईल. ४ तारखेला चंद्राची गुरुशी प्रतियुती व शुक्राशी युती होईल. ६ तारखेला चंद्राचा सूर्याशी व शनिशी लाभयोग होईल आणि शुक्र धनु राशित प्रवेश करेल. ८ तारखेला चंद्राची मंगळाशी प्रतियुती व बुधाशी लाभयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला आत्मविश्वास वाढेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. सोशल मिडियावर केलेली एखादी पोस्ट प्रसिध्दी मिळवून देऊ शकेल. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. व्यावसयिकांना फायदा देणार्या नवीन संधी चालून येतील. मन आनंदी व उत्साही राहील. प्रवासाचे योगही या काळात शक्य. सप्ताह मध्यात अचानक धनलाभाचे योग शक्य. ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध मानसशास्त्र, ज्योतिषशास्त्र, इतिहास, संशोधन, Data Analysis इ. गोष्टींशी आहे त्यांना उत्तम ग्रहमान आहे. जुने मित्र अचानक भेटतील. वेळ मजेत जाईल. सप्ताह मध्यात भाग्यकारक ग्रहमान आहे. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. सप्ताहाचा शेवट चांगला जाईल. वरिष्ठांकडून एखादी मागणी मान्य करुन घेता येईल.
उपासना: मारुतीची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात मंगळ, चतुर्थस्थानात केतू, पंचमस्थानात सूर्य, षष्ठस्थानात बुध, शुक्र, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात शनि(व), दशमस्थानात राहू, नेपचून आणि व्ययस्थानात गुरु(व), हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राची बुधाशी युती व गुरुशी शुक्राशी प्रतियुती होईल. ४ तारखेला चंद्राची गुरुशी प्रतियुती व शुक्राशी युती होईल. ६ तारखेला चंद्राचा सूर्याशी व शनिशी लाभयोग होईल आणि शुक्र धनु राशित प्रवेश करेल. ८ तारखेला चंद्राची मंगळाशी प्रतियुती व बुधाशी लाभयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात आरोग्याच्या तक्रारीची असू शकते. तुमच्या बोलण्यामुळे कोणी नाराज होणार नाहीत याची काळजी घ्यावी. मात्र नोकरीच्या शोधात असणार्यांना काही संधी दृष्टीक्षेपात येतील. तुमचे मित्रमैत्रिणी/ ओळखी यासाठी उपयोगी पडू शकतील. सप्ताह मध्यात मनासारखी खरेदी होईल. जोडीदारासाठी छान भॆटवस्तू देऊन खुश करु शकाल. आयात-निर्यात किंवा परदेशाशी ज्यंच्या व्यवसायाचा सबंध आहे त्यांना ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह अखेरीस अचानक आलेल्या अडचणींनी त्रस्त व्हाल. चिडचीड वाढेल. वाहने जपून चालवावीत. जोखीम असलेले कोणतेही काम या काळात करु नका. वरीष्ठ किंवा वडीलधारी मंडळींशी या काळात वाद होण्याची शक्यता आहे. मन शांत ठेवावे. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमवा.
उपासना: या काळात सूर्योपासना करावी. रविवारी नवग्रह मंदिरात जाऊन सूर्यनारायणाचे दर्शन जरुर घ्यावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथम स्थानात मंगळ, तृतीयस्थानी केतू, चतुर्थस्थानात सूर्य, पंचमस्थानात बुध, शुक्र, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात शनि(व), भाग्यस्थानात राहू, नेपचून, लाभस्थानात गुरु(व), हर्षल आणि व्ययस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राची बुधाशी युती व गुरुशी शुक्राशी प्रतियुती होईल. ४ तारखेला चंद्राची गुरुशी प्रतियुती व शुक्राशी युती होईल. ६ तारखेला चंद्राचा सूर्याशी व शनिशी लाभयोग होईल आणि शुक्र धनु राशित प्रवेश करेल. ८ तारखेला चंद्राची मंगळाशी प्रतियुती व बुधाशी लाभयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला उत्तम ग्रहमान आहे. तुमच्यातल्या कलाकौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. काही लाभ होतील. संततीबद्दल चांगली बातमी कळू शकेल. विद्यार्थ्यांना व कलाकारांना यशदायक ग्रहमान आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. प्रसिध्दी मिळेल. सप्ताह मध्यात नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. नोकरीच्या शोधात असणार्यांना काही संधी दृष्टीक्षेपात येतील. धनलाभाचेही योग आहेत. सामाजिक कामात सहभागी व्हाल. वकील, न्यायाधीश तसेच वैद्यकीय व्यवसाय करणार्यांना कालावधी चांगला आहे. मात्र अती दगदग यादरम्यान टाळा. सप्ताह अखेरीस जोडीदाराची काळजी घ्या. जोडीदाराबरोबर वाद टाळा. नित्योपासनेत या काळात लक्ष लागणार नाही असे दिसते आहे मात्र हा काळ पुराण, अध्यात्म, ज्योतिष किंवा अन्य गूढ गोष्टींच्या अभ्यासास चांगला आहे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी केतू, तृतीयस्थानी सूर्य, चतुर्थस्थानात बुध, शुक्र, षष्ठस्थानात प्लूटो, सप्तमस्थानात शनि(व), अष्टमस्थानात राहू, नेपचून, दशमस्थानात गुरु(व), हर्षल आणि व्ययस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राची बुधाशी युती व गुरुशी शुक्राशी प्रतियुती होईल. ४ तारखेला चंद्राची गुरुशी प्रतियुती व शुक्राशी युती होईल. ६ तारखेला चंद्राचा सूर्याशी व शनिशी लाभयोग होईल आणि शुक्र धनु राशित प्रवेश करेल. ८ तारखेला चंद्राची मंगळाशी प्रतियुती व बुधाशी लाभयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- रविवार सकाळ छान खरेदीची असू शकेल. मात्र तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावे. घरात वाद होणार नाहीत याची काळजी आज घ्या. नंतर सोमवार संध्याकाळपर्यंत राहत्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे काही प्रश्न असतील तर ते मार्गी लावू शकाल. सप्ताह मध्यात कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. प्रसिध्दी मिळेल. नवीन परिचय होतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. संततीसौख्य लाभेल. विद्यार्थ्यांना व कलाकारांना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल. सप्ताह अखेरीस तब्येतीची काळजी घ्या. अती दगदग टाळा. जोडीदाराबरोबर वाद टाळा.
उपासना: ’ श्री गुरुदेव दत्त ’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात केतू, धनस्थानात सूर्य, तृतीयस्थानी बुध, शुक्र, पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी शनि(व), सप्तमस्थानात राहू, नेपचून, भाग्यस्थानात गुरु(व), हर्षल आणि लाभस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राची बुधाशी युती व गुरुशी शुक्राशी प्रतियुती होईल. ४ तारखेला चंद्राची गुरुशी प्रतियुती व शुक्राशी युती होईल. ६ तारखेला चंद्राचा सूर्याशी व शनिशी लाभयोग होईल आणि शुक्र धनु राशित प्रवेश करेल. ८ तारखेला चंद्राची मंगळाशी प्रतियुती व बुधाशी लाभयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला उत्तम ग्रहमान आहे. मनोबल उत्तम राहील. तुमच्यातल्या कलाकौशल्याला वाव मिळेल. साहित्यिकांसाठी चांगला काळ आहे. मानसन्मान मिळेल. प्रवासाचे योग संभवतात. भावंडांच्या भेटीचे योग शक्य. सप्ताह मध्यात कौटुंबीक सौख्य लाभेल. घरातील कामांसाठी वेळ काढावा लागेल. मन प्रसन्न असेल. प्रॉपर्टीच्या कामांसाठी अनुकूल दिवस आहे. सप्ताह अखेरीस संततीसौख्य लाभेल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. वकील व वैद्यकीय क्षेत्रात काम करणार्यांना फायदेशीर काळ आहे.
उपासना: श्रीस्वामी समर्थांचा तारक मंत्र या काळात रोज म्हणावा किंवा ऐकावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात सूर्य, धनस्थानात बुध, शुक्र, चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात शनि(व), षष्ठस्थानी राहू, नेपचून, अष्टमस्थानात गुरु(व), हर्षल, दशमस्थानात मंगळ आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राची बुधाशी युती व गुरुशी शुक्राशी प्रतियुती होईल. ४ तारखेला चंद्राची गुरुशी प्रतियुती व शुक्राशी युती होईल. ६ तारखेला चंद्राचा सूर्याशी व शनिशी लाभयोग होईल आणि शुक्र धनु राशित प्रवेश करेल. ८ तारखेला चंद्राची मंगळाशी प्रतियुती व बुधाशी लाभयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- आठवडा छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. वरीष्ठांची मर्जी राहील. काहींना धनलाभ शक्य आहे. कौटुंबीक सौख्य मिळेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. सप्ताह मध्यात नोकरीनिमित्त प्रवासयोग शक्य. मात्र लोकांशी व्यवहार करतांना तसेच सोशल मिडियावर काही शेअर करतांना ते वादग्रस्त होणार नाही याची काळजी घ्या. एखादी महत्वाची जबाबदारी तुमच्यावर सोपावली जाऊ शकेल. परीवर्तनाला तुम्ही तयार असलात तर हीच भविष्यातील लाभदायक संधी ठरु शकेल. सप्ताह अखेर मन प्रसन्न करणार्या घटना घडतील. एखादा धनलाभ सुखावेल. विद्यार्थांना चांगला कालावधी आहे.
उपासना: या काळात रोज गणपती स्तोत्र म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात बुध, शुक्र, तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात शनि(व), पंचमस्थानात राहू, नेपचून, सप्तमस्थानात गुरु(व), हर्षल, नवमस्थानात मंगळ, लाभस्थानात केतू आणि व्ययस्थानात सूर्य अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राची बुधाशी युती व गुरुशी शुक्राशी प्रतियुती होईल. ४ तारखेला चंद्राची गुरुशी प्रतियुती व शुक्राशी युती होईल. ६ तारखेला चंद्राचा सूर्याशी व शनिशी लाभयोग होईल आणि शुक्र धनु राशित प्रवेश करेल. ८ तारखेला चंद्राची मंगळाशी प्रतियुती व बुधाशी लाभयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला भाग्यकारक ग्रहमान आहे. मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. सप्ताह मध्यात धनलाभाचे योग आहेत. कौटुंबीक सौख्य मिळेल. वैवाहिक सौख्य मिळेल. प्रेमिकांनाही विवाह ठरविण्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे. तुमच्या संभाषणकौशल्यामुळे एखादं काम मार्गी लागण्याणी शक्यता आहे. सप्ताह अखेरीस भावंडांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग संभवतात. लेखक, ब्लॉगर्स यांना हा काळ खूप चांगला आहे. काहींना जवळपासच्या सहलीचे योग येऊ शकतात. प्रॉपर्टीच्या कामांमधून लाभ संभवतात. मात्र कागदपत्रे योग्य व्यक्तीकडून तपासून घेऊनच व्यवहार करावेत.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जप या काळात करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी शनि(व), चतुर्थस्थानात राहू, नेपचून, षष्ठस्थानी गुरु(व), हर्षल, अष्टमस्थानी मंगळ, दशमस्थानात केतू, लाभस्थानी सूर्य आणि व्ययस्थानात बुध, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राची बुधाशी युती व गुरुशी शुक्राशी प्रतियुती होईल. ४ तारखेला चंद्राची गुरुशी प्रतियुती व शुक्राशी युती होईल. ६ तारखेला चंद्राचा सूर्याशी व शनिशी लाभयोग होईल आणि शुक्र धनु राशित प्रवेश करेल. ८ तारखेला चंद्राची मंगळाशी प्रतियुती व बुधाशी लाभयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला ग्रहमान प्रतिकूल आहे. जोखीम असलेली कामे करु नका. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. बेकायदा गोष्टींपासून लांब रहा. अती दगदग टाळा. नकारात्मक विचारांना मनात थारा देऊ नका. सप्ताह मध्यात शारीरिक सौख्यासाठी योग्य आहार व नियमित व्यायाम करायला हवा याची जाणीव होईल. नोकरीच्या शोधात असणार्यांना काही संधी दृष्टीक्षेपात येतील. सप्ताह अखेर आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. भावंडांची खुशाली कळेल. कलाकौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. साहित्यिक, लेखक, कलाकार यांना हा कालावधी विशेष चांगला आहे.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात शनि(व), तृतीयस्थानी राहू, नेपचून, पंचमस्थानात गुरु(व), हर्षल, सप्तमस्थानात मंगळ, नवमस्थानात केतू, दशमात सूर्य आणि लाभस्थानी बुध, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राची बुधाशी युती व गुरुशी शुक्राशी प्रतियुती होईल. ४ तारखेला चंद्राची गुरुशी प्रतियुती व शुक्राशी युती होईल. ६ तारखेला चंद्राचा सूर्याशी व शनिशी लाभयोग होईल आणि शुक्र धनु राशित प्रवेश करेल. ८ तारखेला चंद्राची मंगळाशी प्रतियुती व बुधाशी लाभयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला लाभदायक ग्रहमान आहे. मित्रमैत्रिणींच्या भेटीचे योग संभवतात. काही लाभही या काळात होण्याची शक्यता आहे. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. प्रेमिकांना लग्न ठरविण्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह मध्यात खिशात पैसे खुळखुळत असल्याने चैन करावीशी वाटेल. छान खरेदी कराल. काही अचानक उद्भवलेले खर्चही करावे लागतील. परदेश प्रवासासाठी अनुकूल काळ आहे. कलेच्या क्षेत्रात चांगले काम होईल. सप्ताह अखेरीस आर्थिक स्थिती चांगली असेल. घरात आनंदी वातावरण असेल.
उपासना: या काळात मारुतीची उपासना करणे, मारुतीचे दर्शन घेणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि(व), धनस्थानात राहू, नेपचून, चतुर्थस्थानात गुरु(व), हर्षल, षष्ठस्थानात मंगळ, अष्टमस्थानात केतू, भाग्यात सूर्य, दशमात बुध, शुक्र आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राची बुधाशी युती व गुरुशी शुक्राशी प्रतियुती होईल. ४ तारखेला चंद्राची गुरुशी प्रतियुती व शुक्राशी युती होईल. ६ तारखेला चंद्राचा सूर्याशी व शनिशी लाभयोग होईल आणि शुक्र धनु राशित प्रवेश करेल. ८ तारखेला चंद्राची मंगळाशी प्रतियुती व बुधाशी लाभयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहात सुरुवातीला काहींना वरीष्ठांकडून सहकार्य मिळेल. नोकरी, व्यवसायातील लोक भरपूर आणि मनाजोगते काम झाल्याने खूष असतील. मुख्य म्हणजे केलेल्या कामाचा मोबदलाही व्यवस्थित मिळाल्याने मन प्रसन्न राहील. भावंडांचे सौख्य लाभेल. तुमच्या पराक्रमात वृध्दी होईल. सप्ताह मध्यात आर्थिक स्थिती चांगली असेल. मन प्रसन्न असेल. आप्तेष्टांच्या किंवा मित्रमंडळींच्या भेटीची शक्यता आहे. मनासारखी खरेदी होईल. काहींना प्रवासाचे किंवा परदेशगमनाचे योग संभवतात. सप्ताहाच्या शेवटी जुनी येणी वसूल होतील. पूर्वीच्या एखाद्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. अध्यात्मिक क्षेत्रातील लोकांना चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे.
उपासना: श्रीसूक्ताचे नियमित पठण या कालावधीत केलेले चांगले.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, नेपचून, तृतीयस्थानी गुरु(व), हर्षल, पंचमस्थानात मंगळ, सप्तमस्थानी केतू, अष्टमस्थानात सूर्य, भाग्यात बुध, शुक्र, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात शनि(व) अशी ग्रहस्थिती असेल. ३ तारखेला चंद्राची बुधाशी युती व गुरुशी शुक्राशी प्रतियुती होईल. ४ तारखेला चंद्राची गुरुशी प्रतियुती व शुक्राशी युती होईल. ६ तारखेला चंद्राचा सूर्याशी व शनिशी लाभयोग होईल आणि शुक्र धनु राशित प्रवेश करेल. ८ तारखेला चंद्राची मंगळाशी प्रतियुती व बुधाशी लाभयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- छान आठवडा आहे. सप्ताहात सुरुवातीला भाग्याची चांगली साथ मिळणार आहे. अध्यात्मिक उन्नतीसाठी गुरु केलेल्यांना चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे. वरीष्ठ तुमच्या कामावर खुश असतील. सप्ताह मध्यात नोकरीनिमित्त प्रवासयोग शक्य. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. प्रसिध्दी मिळेल. लाभदायक ग्रहमान आहे. मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या शेवटी संमिश्र ग्रहमान आहे. मित्रमैत्रिणींच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग संभवतात. काही लाभ या काळात होण्याची शक्यता आहे. खरेदीसाठी काळ अनुकूल आहे. मात्र खर्चही या काळात वाढणार आहेत.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)