अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२४)

Astroshodh- bestastrologerinpune, famousastrologerinpune, topastrologerinpune, bestastrologerinindia, famousastrologerinindia, topastrologerinindia

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी गुरु(व), हर्षल, तृतीयस्थानी मंगळ, षष्ठस्थानात केतू, सप्तमस्थानात सूर्य, बुध, अष्टमस्थानात शुक्र, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात शनि(व) आणि व्ययस्थानात राहू, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. २८ तारखेला चंद्राचा मंगळ व बुधाशी लाभयोग होईल. २९ तारखेला बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल. ३० तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल. ३१ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. १ तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला मुलांबरोबर वेळ छान जाईल. एखाद्या मेजवानी किंवा समारंभात भाग घ्याल. विद्यार्थी व कलाकारांना अनुकूल कालावधी आहे. प्रेमिकांना हा काळ विशेष चांगला आहे. विवाहोत्सूक व्यक्तींना विवाह ठरविण्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह मध्य नोकरदारांसाठी चांगला आहे. नोकरीबदल, बदली किंवा बढतीच्या प्रयत्नात असणार्‍यांना काही अनुकूल घटना अपेक्षित आहेत. मात्र अती दगदग यादरम्यान टाळा. सप्ताहाचा मध्यानंतर जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना चांगला कालावधी आहे. सप्ताहाच्या शेवटी जोखीम असलेली कामे करू नका.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु(व), हर्षल, धनस्थानी मंगळ, पंचमस्थानात केतू, षष्ठस्थानात सूर्य, बुध, सप्तमस्थानात शुक्र, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात शनि(व) आणि लाभस्थानात राहू, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. २८ तारखेला चंद्राचा मंगळ व बुधाशी लाभयोग होईल. २९ तारखेला बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल. ३० तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल. ३१ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. १ तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला काही चिंता मनाला सतावत असतील. आपल्या मनावर व रागावर नियंत्रण ठेवावे. घरातील शांतता बिघडणार नाही याची काळजी घावी. प्रॉपर्टी खरेदी/ विक्रीसाठी प्रतिकूल काळ आहे. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना व कलाकारांना अनुकूल आहे. कमी श्रमात जास्त यश मिळेल. अचानक धनलाभ सुखावून टाकेल. सप्ताहाच्या मध्यानंतर काहींना नवीन नोकरीच्या संधी चालून येतील. मात्र आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवत रहातील तिकडे दुर्लक्ष करु नका. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्या.
या सप्ताहासाठी उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात मंगळ, चतुर्थस्थानात केतू, पंचमस्थानात सूर्य, बुध, षष्ठस्थानात शुक्र, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात शनि(व), दशमस्थानात राहू, नेपचून आणि व्ययस्थानात गुरु(व), हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. २८ तारखेला चंद्राचा मंगळ व बुधाशी लाभयोग होईल. २९ तारखेला बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल. ३० तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल. ३१ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. १ तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला भावंडे/ नातेवाईक यांच्या भेटीची शक्यता आहे. प्रवासाचे योग संभवतात. कवी, कलाकार व लेखकांसाठी चांगला काळ आहे. सप्ताह मध्यात घरात छान वातावरण असेल. आपल्या आवडत्या लोकांबरोबर मस्त पार्टीचे आयोजन करायला हरकत नाही. प्रॉपर्टीचे व्यवहार करण्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर संततीच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे लागेल. सप्ताहाच्या शेवटी स्पर्धा परिक्षेत चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. अ‍ॅसिडिटी, पोटाचे/उष्णतेचे काही त्रास असतील तर त्यांनी या काळात काळजी घ्यावी.
या सप्ताहासाठी उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी केतू, चतुर्थस्थानात सूर्य, बुध, पंचमस्थानात शुक्र, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात शनि(व), भाग्यस्थानात राहू, नेपचून, लाभस्थानात गुरु(व), हर्षल आणि व्ययस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. २८ तारखेला चंद्राचा मंगळ व बुधाशी लाभयोग होईल. २९ तारखेला बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल. ३० तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल. ३१ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. १ तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात प्रिय घटनांची असेल. कुटुंबीयांबरोबर वेळ आनंदात जाईल. छानशी पार्टी किंवा मेजवानीचा बेत आखायलाही हरकत नाही. काही लाभही होतील. सप्ताह मध्यात मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. सोशल मिडियावर केलेली एखादी पोस्ट प्रसिध्दी मिळवून देऊ शकेल. प्रवासाचे योगही या काळात शक्य.
सप्ताह मध्यानंतर प्रॉपर्टीच्या कामांसाठी अनुकूल काळ आहे. छान खरेदी कराल. सप्ताह अखेरीस विद्यार्थी, कलाकार, खेळाडू यांना अनुकूल ग्रहमान आहे. मात्र शेअर मार्केट सारख्या जोखीम असलेल्या ठिकाणी गुंतवणूक करतांना योग्य ती काळजी घ्यावी.
या सप्ताहासाठी उपासना: या सप्ताहात रोज ’ॐ ह्रां ह्रीं ह्रौं स: सूर्याय नम:’ या मंत्राचा १ माळ जप करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी केतू, तृतीयस्थानी सूर्य, बुध, चतुर्थस्थानात शुक्र, षष्ठस्थानात प्लूटो, सप्तमस्थानात शनि(व), अष्टमस्थानात राहू, नेपचून, दशमस्थानात गुरु(व), हर्षल आणि लाभस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. २८ तारखेला चंद्राचा मंगळ व बुधाशी लाभयोग होईल. २९ तारखेला बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल. ३० तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल. ३१ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. १ तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल.
फलादेश- सप्ताह अतिशय चांगला असणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला आत्मविश्वास वाढविणार्‍या घटना घडतील. काहींना धनलाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबीक सौख्य मिळेल. व्यावसायिकांनाही अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यात अनुकूल ग्रहमान आहे. जिद्द व चिकाटी वाढेल. कामात सुयश लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मानसन्मान मिळेल. सप्ताहाच्या मध्यानंतर काही भाग्यवर्धक घटना घडण्याची शक्यता आहे. सप्ताह अखेरीस बेकायदा गोष्टी टाळाव्या. अचानक काही खर्च उद्भवू शकतात. प्रॉपर्टीच्या कामांसाठी प्रतिकूल ग्रहमान आहे.
या सप्ताहासाठी उपासना: ’ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: ’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात केतू, धनस्थानात सूर्य, बुध, तृतीयस्थानी शुक्र, पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी शनि(व), सप्तमस्थानात राहू, नेपचून, भाग्यस्थानात गुरु(व), हर्षल आणि दशमस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. २८ तारखेला चंद्राचा मंगळ व बुधाशी लाभयोग होईल. २९ तारखेला बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल. ३० तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल. ३१ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. १ तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला खरेदीसाठी काळ अनुकूल आहे. जुन्या गुंतवणुकीतून फायदा शक्य आहे. सप्ताह मध्यात आत्मविश्वास वाढविणार्‍या घटना शक्य आहेत. मन प्रसन्न असेल. गृहसौख्य लाभेल. सप्ताह मध्यात काहींना धनलाभाचे योग येतील. विद्यार्थी, कलाकार यांच्यासाठी हा काळ चांगला आहे. कमी श्रमात जास्त यश मिळेल. मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या शेवटी लाभदायक ग्रहमान आहे. लोकांचे सहकार्य मिळेल. अपेक्षित गाठीभेटी होतील. आर्थिक सुयश लाभेल.
उपासना: या काळात महालक्ष्मीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात सूर्य, बुध, धनस्थानात शुक्र, चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात शनि(व), षष्ठस्थानी राहू, नेपचून, अष्टमस्थानात गुरु(व), हर्षल, नवमस्थानात मंगळ आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. २८ तारखेला चंद्राचा मंगळ व बुधाशी लाभयोग होईल. २९ तारखेला बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल. ३० तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल. ३१ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. १ तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवातीला लाभदायक ग्रहमान आहे. मित्रांच्या किंवा आवडत्या व्यक्तींच्या भेटीचे योग शक्य. घरात एखादी पार्टी किंवा समारंभाचे आयोजन करायला हरकत नाही. सप्ताह मध्यात पूर्वी केलेल्या एखद्या गुंतवणूकीतून फ़ायदा होऊ शकेल. कलाकारांना विशेषत: नृत्यकलेशी संबंधितांना अतिशय चांगला काळ आहे. ज्यांनी अध्यात्मिक उन्नतीसाठी गुरु केले आहेत त्यांना या काळात चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे. अती दगदग मात्र या दरम्यान टाळावी. सप्ताह मध्यानंतर काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. सप्ताह अखेरीस काहींना धनलाभाचे योग संभवतात.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात शुक्र, तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात शनि(व), पंचमस्थानात राहू, नेपचून, सप्तमस्थानात गुरु(व), हर्षल, अष्टमस्थानात मंगळ, लाभस्थानात केतू आणि व्ययस्थानात सूर्य, बुध अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. २८ तारखेला चंद्राचा मंगळ व बुधाशी लाभयोग होईल. २९ तारखेला बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल. ३० तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल. ३१ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. १ तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला कार्यक्षेत्रात छान काम होणार आहे. वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. व्यवसायातील लोकांना केलेल्या कामाचा मोबदला व्यवस्थित मिळाल्याने मन प्रसन्न राहील. सप्ताह मध्यात प्रवासाचे योग येऊ शकतील. आवडत्या लोकांच्या भेटी होतील. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. सप्ताह मध्यानंतर मनाविरुध्द काही अनपेक्षित खर्च करावे लागू शकतात. जोखीम असलेली कामे करु नका. सप्ताह अखेरीस आपल्या कामात हलगर्जीपणा नको. आपली मते दुसर्‍यांवर लादू नका.
या सप्ताहासाठी उपासना: श्रीस्वामी समर्थांचा तारक मंत्र या काळात रोज म्हणावा किंवा ऐकावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी शनि(व), चतुर्थस्थानात राहू, नेपचून, षष्ठस्थानी गुरु(व), हर्षल, सप्तमस्थानी मंगळ, दशमस्थानात केतू, लाभस्थानी सूर्य, बुध आणि व्ययस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. २८ तारखेला चंद्राचा मंगळ व बुधाशी लाभयोग होईल. २९ तारखेला बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल. ३० तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल. ३१ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. १ तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला भाग्यवर्धक घटनांचा काळ आहे. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. काहींना प्रवासाचे योग संभवतात. सप्ताह मध्यात नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. त्यांच्याकडून एखादी मागणी मान्य करुन घेण्यासाठी अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यानंतर मित्रमैत्रिणिंच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग संभवतात. काहींना धनलाभ शक्य आहेत. घरात छान वातावरण असेल. सप्ताह अखेर पारमार्थिक उन्नतीसाठी अनुकूल आहे. मनासारखी खरेदी करु शकाल.
या सप्ताहासाठी उपासना: ’ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: ’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात शनि(व), तृतीयस्थानी राहू, नेपचून, पंचमस्थानात गुरु(व), हर्षल, षष्ठस्थानात मंगळ, नवमस्थानात केतू, दशमात सूर्य, बुध, आणि लाभस्थानी शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. २८ तारखेला चंद्राचा मंगळ व बुधाशी लाभयोग होईल. २९ तारखेला बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल. ३० तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल. ३१ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. १ तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला जोखीम असलेली कामे करु नका. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. मानसोपचार तज्ञ, ज्योतिषी, सर्जन यांना मात्र हा कालावधी चांगला जाणार आहे. सप्ताह मध्य भाग्यकारक घटनांचा ठरु शकेल. प्रवासयोग येतील. वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. शिक्षणक्षेत्रातील लोकांना हा काळ चांगला आहे. सप्ताह मध्यानंतर तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. व्यावसयिकांना विशेष लाभदायक ग्रहमान आहे. सप्ताह अखेरीस मित्रांच्या/ आप्तांच्या भेटीचे योग संभवतात. लाभदायक ग्रहमान आहे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि(व), धनस्थानात राहू, नेपचून, चतुर्थस्थानात गुरु(व), हर्षल, पंचमस्थानात मंगळ, अष्टमस्थानात केतू, भाग्यात सूर्य, बुध, दशमात शुक्र आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. २८ तारखेला चंद्राचा मंगळ व बुधाशी लाभयोग होईल. २९ तारखेला बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल. ३० तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल. ३१ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. १ तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराबरोबर मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांनाही चांगला काळ आहे. सप्ताह मध्यात तब्येतीची काळजी घ्यावी. धोका असलेले कुठलेही काम करु नये. विमा क्षेत्रातील लोकांना मात्र काळ अनुकूल आहे. सप्ताह मध्यानंतर धार्मिक गोष्टींसाठी चांगला काळ आहे. काहींना प्रवासाचे योग येतील. परदेशगमनासाठीही अनुकूल ग्रहमान आहे. कलाकारांना हा कालावधी छान आहे. सप्ताहाच्या शेवटी तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, नेपचून, तृतीयस्थानी गुरु(व), हर्षल, चतुर्थस्थानात मंगळ, सप्तमस्थानी केतू, अष्टमस्थानात सूर्य, बुध, भाग्यात शुक्र, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात शनि(व) अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. २८ तारखेला चंद्राचा मंगळ व बुधाशी लाभयोग होईल. २९ तारखेला बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल. ३० तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शुक्राशी लाभयोग होईल. ३१ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. १ तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात प्रतिकूल असणार आहे. आरोग्याची काळजी घ्यावी. कोणाशीही वादविवाद होणार नाही याची दक्षता घ्यावी. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वेळ छान व्यतीत कराल. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील. सप्ताह मध्यानंतर वाहने जपून चालवा व वाहतुकीचे नियम पाळावेत. ज्योतिष, अध्यात्म, मानसशास्त्र, योगशास्त्र या विषयाच्या अभ्यासकांना अनुकूल ग्रहमान आहे. काहींना सूचक स्वप्ने पडतील. सप्ताहाच्या शेवटी लाभदायक ग्रहमान आहे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)