अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२० ऑक्टोबर ते २६ ऑक्टोबर २०२४)

Astroshodh- bestastrologerinpune, famousastrologerinpune, topastrologerinpune, bestastrologerinindia, famousastrologerinindia, topastrologerinindia

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी गुरु(व), हर्षल, तृतीयस्थानी मंगळ, षष्ठस्थानात केतू, सप्तमस्थानात सूर्य, बुध, अष्टमस्थानात शुक्र, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात शनि(व) आणि व्ययस्थानात राहू, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला मंगळ कर्क राशित प्रवेश करेल आणि चंद्र-शनि केंद्रयोग होईल. २१ तारखेला चंद्र-गुरु युती होईल. २३ तारखेला चंद्र-मंगळ युती होईल. २५ तारखेला चंद्र-गुरु लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्र-सूर्य लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताह अतिशय छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला धनलाभाचे योग आहेत. कुटुंबियांसोबत वॆळ छान जाईल. आवडीच्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. कलाकारांना त्यांच्या कलेत विशेष यश मिळेल. सप्ताह मध्यात लेखक, ब्लॉगर्स यांना काळ चांगला आहे. धार्मिक कार्यात सहभाग असेल. अध्यात्मिक उन्नतीसाठी गुरु केलेल्यांना चांगले अनुभव येतील. विवाहोत्सूक असलेल्यांना विवाह ठरविण्यास अनुकूल काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी घरात आनंदी वातावरण असेल. तुमच्या कामाचं कौतुक होईल. एखादं बक्षिस, वरीष्ठांकडून मिळालेली शाबासकी/ पदोन्नती/ पगारवाढ आनंदीत करु शकेल. विद्यार्थ्यांना कमी श्रमात जास्त यश मिळेल.
या सप्ताहासाठी उपासना: गणपतीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु(व), हर्षल, धनस्थानी मंगळ, पंचमस्थानात केतू, षष्ठस्थानात सूर्य, बुध, सप्तमस्थानात शुक्र, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात शनि(व) आणि लाभस्थानात राहू, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला मंगळ कर्क राशित प्रवेश करेल आणि चंद्र-शनि केंद्रयोग होईल. २१ तारखेला चंद्र-गुरु युती होईल. २३ तारखेला चंद्र-मंगळ युती होईल. २५ तारखेला चंद्र-गुरु लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्र-सूर्य लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला आत्मविश्वास वाढलेला असेल. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. व्यावसयिकांना फायदा देणार्‍या नवीन संधी चालून येतील. मन आनंदी व उत्साही राहील. सप्ताह मध्यात धनलाभ होऊ शकतील. कोर्ट-कचेरीची प्रकरणे मार्गी लागू शकतील. मात्र तुमच्या बोलण्यामुळे लोक दुखावले जाणार नाहीत याची या दरम्यान दक्षता घ्या. सप्ताहाच्या शेवटी मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. सोशल मिडियावर केलेली एखादी पोस्ट प्रसिध्दी मिळवून देऊ शकेल.
या सप्ताहासाठी उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात मंगळ, चतुर्थस्थानात केतू, पंचमस्थानात सूर्य, बुध, षष्ठस्थानात शुक्र, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात शनि(व), दशमस्थानात राहू, नेपचून आणि व्ययस्थानात गुरु(व), हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला मंगळ कर्क राशित प्रवेश करेल आणि चंद्र-शनि केंद्रयोग होईल. २१ तारखेला चंद्र-गुरु युती होईल. २३ तारखेला चंद्र-मंगळ युती होईल. २५ तारखेला चंद्र-गुरु लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्र-सूर्य लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला ग्रहमान संमिश्र आहे. धार्मिक कार्यात सहभाग असेल. खरेदीसाठी काळ अनुकूल आहे. तुमच्या जोडीदाराला एखादी छानशी भेटवस्तू देऊन खूश करु शकाल. मात्र खर्चही यादरम्यान वाढते रहातील. सप्ताहाच्या मध्यामधे लाभदायक ग्रहमान आहे. मानसन्मान मिळेल. संततीसौख्य लाभेल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. विद्यार्थ्यांना व कलाकारांना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल. सप्ताहाच्या अखेरीस कौटुंबीक सौख्याचा काळ आहे. मन प्रसन्न असेल. आर्थिक सुयश लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.
या सप्ताहासाठी उपासना: ’ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम:’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी केतू, चतुर्थस्थानात सूर्य, बुध, पंचमस्थानात शुक्र, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात शनि(व), भाग्यस्थानात राहू, नेपचून, लाभस्थानात गुरु(व), हर्षल आणि व्ययस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला मंगळ कर्क राशित प्रवेश करेल आणि चंद्र-शनि केंद्रयोग होईल. २१ तारखेला चंद्र-गुरु युती होईल. २३ तारखेला चंद्र-मंगळ युती होईल. २५ तारखेला चंद्र-गुरु लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्र-सूर्य लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात छान होईल. काही लाभ होऊ शकतील. मित्रांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. मन प्रसन्न असेल. अडकलेले एखादे काम मित्रामुळे किंवा ऒळखीमुळे पटकन होऊन जाईल. कलाकारांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात खर्च वाढतील. काही अनपेक्षित खर्चही अचानक सामोरे येतील. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. सप्ताहाचा शेवट अनुकूल आहे. मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. काही लाभदायक घटना या काळात शक्य. राहत्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे काही प्रश्न असतील तर त्यासाठी वेळ द्याल.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी केतू, तृतीयस्थानी सूर्य, बुध, चतुर्थस्थानात शुक्र, षष्ठस्थानात प्लूटो, सप्तमस्थानात शनि(व), अष्टमस्थानात राहू, नेपचून, दशमस्थानात गुरु(व), हर्षल आणि लाभस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला मंगळ कर्क राशित प्रवेश करेल आणि चंद्र-शनि केंद्रयोग होईल. २१ तारखेला चंद्र-गुरु युती होईल. २३ तारखेला चंद्र-मंगळ युती होईल. २५ तारखेला चंद्र-गुरु लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्र-सूर्य लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. काहींना वरीष्ठांकडून न मागता सहकार्य मिळेल. एखाद्या लाभदायक कामासाठी तुमची निवड होऊ शकेल. भरपूर आणि मनाजोगते काम झाल्याने व्यावसायिक खुश असतील. छान लाभ होतील. सप्ताह मध्यात मित्रांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटी आनंद देतील. सप्ताह मध्यानंतर उपासनेत मन रमेल. या दरम्यान केलेली गुंतवणूक दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरेल. सप्ताहाच्या शेवटी मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील. मन आनंदी राहील.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात रोज महालक्ष्मीअष्टक जरुर म्हणावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात केतू, धनस्थानात सूर्य, बुध, तृतीयस्थानी शुक्र, पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी शनि(व), सप्तमस्थानात राहू, नेपचून, भाग्यस्थानात गुरु(व), हर्षल आणि दशमस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला मंगळ कर्क राशित प्रवेश करेल आणि चंद्र-शनि केंद्रयोग होईल. २१ तारखेला चंद्र-गुरु युती होईल. २३ तारखेला चंद्र-मंगळ युती होईल. २५ तारखेला चंद्र-गुरु लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्र-सूर्य लाभयोग होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताह चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला काहींना प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. वरीष्ठांशी जुळवुन घेतल्यास तुमची एखादी मागणी त्यांच्याकडून पूर्ण करून घेता येईल. ज्यांनी अध्यात्मिक उन्नतीसाठी गुरु केला आहे त्यांना हा कालावधी विशेष चांगला आहे. सप्ताह मध्यात व त्यानंतर लाभदायक काळ आहे. मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग संभवतात. अचानक धनलाभही शक्य आहेत. मन प्रसन्न असेल. शनिवारी जुनी येणी वसूल होतील. पूर्वीच्या एखाद्या गुंतवणुकीतून फायदा शक्य.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात गणपती अथर्वशीर्षाचे नित्य पठण करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात सूर्य, बुध, धनस्थानात शुक्र, चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात शनि(व), षष्ठस्थानी राहू, नेपचून, अष्टमस्थानात गुरु(व), हर्षल, नवमस्थानात मंगळ आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला मंगळ कर्क राशित प्रवेश करेल आणि चंद्र-शनि केंद्रयोग होईल. २१ तारखेला चंद्र-गुरु युती होईल. २३ तारखेला चंद्र-मंगळ युती होईल. २५ तारखेला चंद्र-गुरु लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्र-सूर्य लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला संमिश्र ग्रहमान आहे. प्रवासात अडथळे, वाहनांसाठी खर्च संभवू शकतो. गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. मात्र अचानक धनलाभाचे योग शक्य. विम्याचे किंवा आयकरसंबंधीत काम करणार्‍यांनाही चांगला कालावधी आहे. सप्ताहाचा मध्य उपासना करण्यास चांगला आहे. काही भाग्यवर्धक घटना घडतील. तुमच्या पराक्रमात वृध्दी होईल. कामात सुयश लाभेल. प्रवासयोगही शक्य. सप्ताहाच्या शेवटी घरात छान वातावरण असेल आणि तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. केलेल्या कामाचं चीज़ होईल. काही लाभही होऊ शकतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल.
या सप्ताहासाठी उपासना: ’विठ्ठल’ नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात शुक्र, तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात शनि(व), पंचमस्थानात राहू, नेपचून, सप्तमस्थानात गुरु(व), हर्षल, अष्टमस्थानात मंगळ, लाभस्थानात केतू आणि व्ययस्थानात सूर्य, बुध अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला मंगळ कर्क राशित प्रवेश करेल आणि चंद्र-शनि केंद्रयोग होईल. २१ तारखेला चंद्र-गुरु युती होईल. २३ तारखेला चंद्र-मंगळ युती होईल. २५ तारखेला चंद्र-गुरु लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्र-सूर्य लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला धनलाभाचे योग आहेत. कौटुंबीक सौख्य मिळेल. तुमच्या संभाषणकौशल्यामुळे एखादं काम मार्गी लागण्याणी शक्यता आहे. मन प्रसन्न असेल. भागीदारीत व्यवसाय सुरु करायचा असेल तर हा कालावधी उत्तम आहे. सप्ताह मध्य संमिश्र घटनांचा असू शकेल. काही मनाविरुध्द घटना घडतील. वाहने हळू चालवा. याच्या बरोबर उलट काहींना अचानक धनलाभाचा संभव आहे. वारसा हक्काने किंवा विम्याद्वारे लाभ या काळात शक्य आहेत. सप्ताह मध्यानंतर भाग्यवर्धक गोष्टी घडू शकतात. प्रवास फायदेशीर ठरणार आहेत. सप्ताहाच्या शेवटी वरीष्ठ तुमच्या कामावर खुश असतील. एखादा धनलाभ, पगारवाढ, बढती अशा सुखद धक्का देणार्‍या घटना या काळात शक्य.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी शनि(व), चतुर्थस्थानात राहू, नेपचून, षष्ठस्थानी गुरु(व), हर्षल, सप्तमस्थानी मंगळ, दशमस्थानात केतू, लाभस्थानी सूर्य, बुध आणि व्ययस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला मंगळ कर्क राशित प्रवेश करेल आणि चंद्र-शनि केंद्रयोग होईल. २१ तारखेला चंद्र-गुरु युती होईल. २३ तारखेला चंद्र-मंगळ युती होईल. २५ तारखेला चंद्र-गुरु लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्र-सूर्य लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला तब्येतीची काळजी घेणे उचित ठरेल. अती दगदग टाळा. वैद्यकीय क्षेत्रात व कायदेविषयी काम करणार्‍यांसाठी मात्र फ़ायदेशीर ग्रहमान आहे. सप्ताह मध्य भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांसाठी चांगला जाईल. पती/ पत्नीविषयक चांगली बातमी कळेल. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील. सप्ताहाच्या मध्यानंतर जोखीम किंवा धोका असलेली कामे करू नका. वाहने हळू चालवा. सप्ताह अखेर धार्मिक कार्यासाठी चांगला कालावधी आहे. काहींना प्रवासाचे योग येतील. काही लाभही होतील.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात शनि(व), तृतीयस्थानी राहू, नेपचून, पंचमस्थानात गुरु(व), हर्षल, षष्ठस्थानात मंगळ, नवमस्थानात केतू, दशमात सूर्य, बुध, आणि लाभस्थानी शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला मंगळ कर्क राशित प्रवेश करेल आणि चंद्र-शनि केंद्रयोग होईल. २१ तारखेला चंद्र-गुरु युती होईल. २३ तारखेला चंद्र-मंगळ युती होईल. २५ तारखेला चंद्र-गुरु लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्र-सूर्य लाभयोग होईल.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला काही लाभदायक घटना शक्य. संततीसौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मानसन्मानाचे योग आहेत. कलाकारांसाठी उत्तम यशाचा काळ आहे. विद्यार्थ्यांनाही कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल. धार्मिक गोष्टींकडे मनाचा कल असेल. सप्ताहाच्या मध्यात काहींची बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. नवीन नोकरीच्या संधी शक्य आहेत. आहारतज्ञ, जीम ट्रेनर तसेच वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना अनुकूल ग्रहमान आहे. शारीरिक सौख्यासाठी नियमित व्यायाम करायला हवा याची जाणीव होईल. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. व्यावसयिकांना फायदा देणार्‍या नवीन संधी चालून येतील. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांसाठी चांगला कालावधी आहे.
या सप्ताहासाठी उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि(व), धनस्थानात राहू, नेपचून, चतुर्थस्थानात गुरु(व), हर्षल, पंचमस्थानात मंगळ, अष्टमस्थानात केतू, भाग्यात सूर्य, बुध, दशमात शुक्र आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला मंगळ कर्क राशित प्रवेश करेल आणि चंद्र-शनि केंद्रयोग होईल. २१ तारखेला चंद्र-गुरु युती होईल. २३ तारखेला चंद्र-मंगळ युती होईल. २५ तारखेला चंद्र-गुरु लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्र-सूर्य लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला चांगले ग्रहमान आहे. आर्थिक सुयश लाभेल. घरात प्रसन्नता असेल. प्रॉपर्टीची कांमे करणाऱ्यांना अनुकूल कालावधी आहे. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. कलाकारांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना व खेळाडूंना अनुकूल आहे. कमी कष्टात जास्त यश मिळण्याची शक्यता आहे. धनलाभाचेही योग आहेत. तुमच्या छंदासाठी वेळ जरूर काढा. सप्ताहाच्या मध्यानंतर तब्येतीची काळजी घ्यावी. गुंतवणूक करतांनाही पुरेसी काळजी घ्यावी. सप्ताहाच्या शेवटी मनोबल उत्तम राहील. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. प्रवासयोग शक्य आहेत.
या सप्ताहासाठी उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, नेपचून, तृतीयस्थानी गुरु(व), हर्षल, चतुर्थस्थानात मंगळ, सप्तमस्थानी केतू, अष्टमस्थानात सूर्य, बुध, भाग्यात शुक्र, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात शनि(व) अशी ग्रहस्थिती असेल. २० तारखेला मंगळ कर्क राशित प्रवेश करेल आणि चंद्र-शनि केंद्रयोग होईल. २१ तारखेला चंद्र-गुरु युती होईल. २३ तारखेला चंद्र-मंगळ युती होईल. २५ तारखेला चंद्र-गुरु लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्र-सूर्य लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक गोष्टींमध्ये भाग घ्याल. ब्लॉगर्स, साहित्यिक व कलाकारांसाठी चांगला काळ आहे. मनासारखे काम झाल्याने खूष असाल. सप्ताहाच्या मध्यात घरातील वातावरण प्रसन्न राहील. प्रॉपर्टी खरेदी-विक्रीसाठी चांगला काळ आहे. बांधकाम व्यावसायिकांनाही अनुकूल ग्रहमान आहे. शेअर मार्केट किंवा तत्सम क्षेत्रात थोडीफ़ार गुंतवणूक करायला हरकत नाही. मात्र मोठी गुंतवणूक करायची असेल तर तज्ञ व्यक्तीचा सल्ला जरूर घ्यावा. सप्ताहाच्या शेवटी शारीरिक सौख्यासाठी योग्य आहार व नियमित व्यायाम करायला हवा याची जाणीव होईल.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)