अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१३ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबर २०२४)
Astroshodh, bestastrologerinpune, famousastrologerinpune, topastrologerinpune, bestastrologerinindia, famousastrologerinindia, topastrologerinindia
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी गुरु(व), हर्षल, तृतीयस्थानी मंगळ, षष्ठस्थानात सूर्य, केतू, सप्तमस्थानात बुध, अष्टमस्थानात शुक्र, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात शनि(व) आणि व्ययस्थानात राहू, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला चंद्र-गुरु त्रिकोण होईल. १४ तारखेला सूर्याचा मंगळाशी केंद्रयोग व गुरुशी त्रिकोण तर चंद्राची शनिशी युती होईल. १७ तारखेला सूर्य तूळ राशित प्रवेश करेल, चंद्राचा सूर्याशी प्रतियोग व गुरुशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग व मंगळाशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला धनलाभाचे योग आहेत. मित्रांशी किंवा आवडत्या लोकांशी संपर्क होईल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. आर्थिक मोबदला चांगला मिळेल. प्रसिध्दीही मिळेल. त्यामुळे खुश असाल. सप्ताह मध्यात काही अनपेक्षित खर्च करावे लागतील. धार्मिक गोष्टींमधे मन रमेल. परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांना चांगल्या संधी चालून येतील. पूर्वीच्या एखाद्या गुंतवणुकीतून फायदाही या काळात शक्य आहे. सप्ताहाचा शेवट संमिश्र घटनांचा असेल. आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. प्रवासयोग या काळात येऊ शकतील मात्र प्रवासात योग्य ती काळजी आवश्यक आहे. मानसशास्त्र, ज्य़ोतिष, इतिहास अशा विषयांचा अभ्यास करण्यास मात्र हा कालावधी चांगला आहे.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत रोज करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु(व), हर्षल, धनस्थानी मंगळ, पंचमस्थानात सूर्य, केतू, षष्ठस्थानात बुध, सप्तमस्थानात शुक्र, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात शनि(व) आणि लाभस्थानात राहू, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला चंद्र-गुरु त्रिकोण होईल. १४ तारखेला सूर्याचा मंगळाशी केंद्रयोग व गुरुशी त्रिकोण तर चंद्राची शनिशी युती होईल. १७ तारखेला सूर्य तूळ राशित प्रवेश करेल, चंद्राचा सूर्याशी प्रतियोग व गुरुशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग व मंगळाशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला भाग्यवर्धक घटना घडू शकतील. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. वरीष्ठांची मर्जी राहील. गुरु/ गुरुतुल्य व्यक्तीचे मार्गदर्शन मिळेल. सप्ताह मध्यात आवडत्या लोकांच्या भेटीचे योग येतील. एखाद्या मित्राच्या किंवा नातेवाईकाच्या मदतीमुळे काही कामे मार्गी लागू शकतील. धनलाभाचेही योग आहेत. ज्योतिषी, मानसोपचारतज्ञ, पुराणवस्तु संशोधक यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यानंतर जुनी येणी वसूल होतील. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून फायदा शक्य आहे. सप्ताह अखेर अचानक खर्चाची ठरु शकेल. बेकायदा व्यवहार टाळावेत. खरेदीसाठी मात्र हा काळ अनुकूल आहे.
उपासना: या काळात दत्तबावन्नी रोज म्हणावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात मंगळ, चतुर्थस्थानात सूर्य, केतू, पंचमस्थानात बुध, षष्ठस्थानात शुक्र, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात शनि(व), दशमस्थानात राहू, नेपचून आणि व्ययस्थानात गुरु(व), हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला चंद्र-गुरु त्रिकोण होईल. १४ तारखेला सूर्याचा मंगळाशी केंद्रयोग व गुरुशी त्रिकोण तर चंद्राची शनिशी युती होईल. १७ तारखेला सूर्य तूळ राशित प्रवेश करेल, चंद्राचा सूर्याशी प्रतियोग व गुरुशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग व मंगळाशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला संमिश्र घटनांचा काळ आहे. जोखीम असलेल्या गोष्टींपासून लांब रहावे. वडीलधारी व्यक्तीशी वाद टाळावेत. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. मात्र आपली मते दुसर्यांवर लादू नका. प्रवास या काळात करणार असाल तर योग्य ती सर्व काळजी घ्यावी. सप्ताह मध्यात रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. सप्ताह अखेरीस काहींना धनलाभ शक्य आहे. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मित्रांबरोबर किंवा नातेवाईकांबरोबर छान वेळ जाईल. मन प्रसन्न असेल.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी सूर्य, केतू, चतुर्थस्थानात बुध, पंचमस्थानात शुक्र, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात शनि(व), भाग्यस्थानात राहू, नेपचून, लाभस्थानात गुरु(व), हर्षल आणि व्ययस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला चंद्र-गुरु त्रिकोण होईल. १४ तारखेला सूर्याचा मंगळाशी केंद्रयोग व गुरुशी त्रिकोण तर चंद्राची शनिशी युती होईल. १७ तारखेला सूर्य तूळ राशित प्रवेश करेल, चंद्राचा सूर्याशी प्रतियोग व गुरुशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग व मंगळाशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला जोखीम असलेली कामे करु नका. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. जोडीदाराच्या आरोग्यासंबंधी काही समस्या जाणवतील. गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. सप्ताहाच्या मध्यात भाग्यवृध्दीकारक ग्रहमान आहे. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. सासरकडच्या नातेवाईकांचे सहकार्य मिळेल. प्रवासयोग शक्य. मात्र यादरम्यान तुमच्या तब्येतीला जपावे. मधूमेह किंवा यकृतासंबंधी काही आजार असतील तर योग्य ते पथ्यपाणी सांभाळावे. सप्ताहाच्या शेवटी तुमच्या कार्यक्षेत्रात सर्व कामे व्यवस्थीत होतील याची काळजी घ्या. कामातील दिरंगाई महागात पडू शकेल. वरीष्ठ नाराज होणार नाहीत याचीही काळजी घ्या.
उपासना: श्रीस्वामी समर्थांचा तारक मंत्र या काळात रोज म्हणावा किंवा ऐकावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी सूर्य, केतू, तृतीयस्थानी बुध, चतुर्थस्थानात शुक्र, षष्ठस्थानात प्लूटो, सप्तमस्थानात शनि(व), अष्टमस्थानात राहू, नेपचून, दशमस्थानात गुरु(व), हर्षल आणि लाभस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला चंद्र-गुरु त्रिकोण होईल. १४ तारखेला सूर्याचा मंगळाशी केंद्रयोग व गुरुशी त्रिकोण तर चंद्राची शनिशी युती होईल. १७ तारखेला सूर्य तूळ राशित प्रवेश करेल, चंद्राचा सूर्याशी प्रतियोग व गुरुशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग व मंगळाशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील. व्यावसयिकांना फायदा देणार्या नवीन संधी चालून येतील. सप्ताहाच्या मध्यात संमिश्र घटना शक्य आहेत. जोखीम असलेल्या गोष्टींपासून लांब रहा. विद्यार्थ्यांना हा काळ प्रतिकूल आहे. अती आत्मविश्वास घातक ठरु शकेल. चांगल्या यशासाठी अभ्यासाला पर्याय नाही याची जाणीव होईल. विमा व्यवसायातील लोकांना मात्र चांगला काळ आहे. सप्ताहाचा शेवट लाभदायक घटनांचा ठरु शकेल. वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. प्रवास फायदेशीर ठरतील. उपासनेत मन रमेल. काहींवर गुरुकृपा शक्य.
उपासना: या काळात रोज गणपती स्तोत्र म्हणणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात सूर्य, केतू, धनस्थानात बुध, तृतीयस्थानी शुक्र, पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी शनि(व), सप्तमस्थानात राहू, नेपचून, भाग्यस्थानात गुरु(व), हर्षल आणि दशमस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला चंद्र-गुरु त्रिकोण होईल. १४ तारखेला सूर्याचा मंगळाशी केंद्रयोग व गुरुशी त्रिकोण तर चंद्राची शनिशी युती होईल. १७ तारखेला सूर्य तूळ राशित प्रवेश करेल, चंद्राचा सूर्याशी प्रतियोग व गुरुशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग व मंगळाशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला नोकरीत चांगली स्थिती राहील. सामाजिक कार्यातही सहभाग राहील. वरीष्ठांशी जमवून घेतल्यास तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. वकील/ फिजिकल फिटनेस या क्षेत्रात काम करणार्यांना हा कालावधी चांगला आहे. मात्र तब्येतीच्या तक्रारी डोके वर काढतील. सप्ताह मध्यात लाभदायक काळ आहे. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील. व्यावसयिकांना फायदा देणार्या नवीन संधी चालून येतील. राहत्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. सप्ताहाच्या शेवटी जोखीम किंवा धोका असलेली कामे करू नये. कोणाशी झालेला वाद या काळात महागात पडू शकेल. काळजी घ्यावी. वाहनेही या काळात जपून चालवावीत.
उपासना: ’ श्री गुरुदेव दत्त ’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात बुध, धनस्थानात शुक्र, चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात शनि(व), षष्ठस्थानी राहू, नेपचून, अष्टमस्थानात गुरु(व), हर्षल, नवमस्थानात मंगळ आणि व्ययस्थानात सूर्य, केतू अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला चंद्र-गुरु त्रिकोण होईल. १४ तारखेला सूर्याचा मंगळाशी केंद्रयोग व गुरुशी त्रिकोण तर चंद्राची शनिशी युती होईल. १७ तारखेला सूर्य तूळ राशित प्रवेश करेल, चंद्राचा सूर्याशी प्रतियोग व गुरुशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग व मंगळाशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. काहींना एखादं बक्षिस, भेटवस्तू, बढती किंवा पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना व प्रेमिकांसाठी चांगला कालावधी आहे. प्रॉपर्टीच्या कामांसाठीही ग्रहमान चांगले आहे. सप्ताह मध्यात नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. कर्मचार्यांचे सहकार्य लाभेल. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीपासून लाभ संभवतात. काहींना नवीन नोकरीच्या संधी चालून येतील. मधूमेह किंवा पोटाचे आजार असणार्यांनी मात्र काळाजी घ्यावी. सप्ताहाच्या शेवटी लाभदायक ग्रहमान आहे. मनोबल उत्तम राहील. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. प्रवासयोग शक्य आहेत.
उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात शुक्र, तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात शनि(व), पंचमस्थानात राहू, नेपचून, सप्तमस्थानात गुरु(व), हर्षल, अष्टमस्थानात मंगळ, लाभस्थानात सूर्य, केतू आणि व्ययस्थानात बुध अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला चंद्र-गुरु त्रिकोण होईल. १४ तारखेला सूर्याचा मंगळाशी केंद्रयोग व गुरुशी त्रिकोण तर चंद्राची शनिशी युती होईल. १७ तारखेला सूर्य तूळ राशित प्रवेश करेल, चंद्राचा सूर्याशी प्रतियोग व गुरुशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग व मंगळाशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला घरातील वातावरण चांगले राहील. मन प्रसन्न असेल. प्रॉपर्टीची खरेदी-विक्री करणार्या लोकांना अनुकूल काळ आहे. बिल्डर्स, इंटेरिअर डेकोरेटर/ गृहसजावट करणारे यांनाही अनुकूल काळ आहे. नविन विषय शिकण्यासाठी किंवा तुमच्या एखाद्या छंदाला जरुर वेळ द्या. ग्रहमानाची चांगली साथ आहे. सप्ताह मध्य विद्यार्थ्यांसाठी व प्रेमिकांसाठी चांगला आहे. काही लाभ या काळात होण्याची शक्यता आहे. संततिसौख्य लाभेल. धार्मिक गोष्टींकडे मनाचा कल राहील. सप्ताहाच्या शेवटी तुमच्या कामाच्या ठिकाणी कर्मचार्यांचे सहकार्य मिळणार नाही. हितशत्रूंवर लक्ष ठेवा. आरोग्य सांभाळा. अॅसिडिटी किंवा पोटाचे त्रास या काळात शक्य. आहारावर नियंत्रण ठेवावे. अपघातभय आहे. योग्य ती काळजी घ्यावी.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी शनि(व), चतुर्थस्थानात राहू, नेपचून, षष्ठस्थानी गुरु(व), हर्षल, सप्तमस्थानी मंगळ, दशमस्थानात सूर्य, केतू, लाभस्थानी बुध आणि व्ययस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला चंद्र-गुरु त्रिकोण होईल. १४ तारखेला सूर्याचा मंगळाशी केंद्रयोग व गुरुशी त्रिकोण तर चंद्राची शनिशी युती होईल. १७ तारखेला सूर्य तूळ राशित प्रवेश करेल, चंद्राचा सूर्याशी प्रतियोग व गुरुशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग व मंगळाशी लाभयोग होईल.
फलादेश- ग्रहमानाची चांगली साथ पूर्ण सप्ताह लाभली आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला प्रवासाचे योग संभवतात. भावंडांबद्दल एखादी चांगली बातमी कळेल. साहित्यिक व लेखकांसाठी चांगला काळ आहे. तुमच्या कौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. लाभदायक ग्रहमान आहे. सप्ताहाच्या मध्यात कौटुंबिक सौख्याचा काळ आहे. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. सप्ताहाच्या शेवटी एखादा धनलाभ/ एखादी शाबासकीची मिळालेली थाप मिळाल्याने प्रसन्न असाल. प्रेमिकांना काळ उत्तम आहे. मुलांसाठी काही खरेदी कराल.
उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात शनि(व), तृतीयस्थानी राहू, नेपचून, पंचमस्थानात गुरु(व), हर्षल, षष्ठस्थानात मंगळ, नवमस्थानात सूर्य, केतू, दशमात बुध, आणि लाभस्थानी शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला चंद्र-गुरु त्रिकोण होईल. १४ तारखेला सूर्याचा मंगळाशी केंद्रयोग व गुरुशी त्रिकोण तर चंद्राची शनिशी युती होईल. १७ तारखेला सूर्य तूळ राशित प्रवेश करेल, चंद्राचा सूर्याशी प्रतियोग व गुरुशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग व मंगळाशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला कुटुंबियांसोबत वॆळ छान जाईल. आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील. काहींना धनलाभ शक्य आहे. सप्ताह मध्यात कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. हाती घेतलेल्या कामात सुयश मिळेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. भावंडांशी संपर्क होईल. सप्ताहाच्या अखेरीस घरात छान वातावरण असेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. एखाद्या समारंभ किंवा पार्टीत सामिल होण्याचे योग आहेत.
उपासना: मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसा रोज म्हणावी.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि(व), धनस्थानात राहू, नेपचून, चतुर्थस्थानात गुरु(व), हर्षल, पंचमस्थानात मंगळ, अष्टमस्थानात सूर्य, केतू, भाग्यात बुध, दशमात शुक्र आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला चंद्र-गुरु त्रिकोण होईल. १४ तारखेला सूर्याचा मंगळाशी केंद्रयोग व गुरुशी त्रिकोण तर चंद्राची शनिशी युती होईल. १७ तारखेला सूर्य तूळ राशित प्रवेश करेल, चंद्राचा सूर्याशी प्रतियोग व गुरुशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग व मंगळाशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात संमिश्र घटनांची असू शकेल. आत्मविश्वास वाढेल. जुन्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. खरेदीसाठी काळ चांगला आहे. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. मात्र एखाद्या गोष्टीची काळजी विनाकारणच वाटत राहू शकेल. सप्ताह मध्य कौटुंबिक सौख्याचा आहे. काहींना धनलाभ शक्य आहे. पाककलेत मन रमेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. सप्ताहाच्या शेवटी विद्यार्थी, लेखक, ब्लॉगर्स, खेळाडू यांना ग्रहमान अनुकूल आहे. भावंडांबद्दल चांगली बातमी कळेल. तुमच्यातील कला-कौशल्याला वाव मिळेल. कार्यक्षेत्रात सुयश मिळेल. काहींना प्रवास योग आहेत. मन आनंदी राहील.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, नेपचून, तृतीयस्थानी गुरु(व), हर्षल, चतुर्थस्थानात मंगळ, सप्तमस्थानी सूर्य, केतू, अष्टमस्थानात बुध, भाग्यात शुक्र, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात शनि(व) अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला चंद्र-गुरु त्रिकोण होईल. १४ तारखेला सूर्याचा मंगळाशी केंद्रयोग व गुरुशी त्रिकोण तर चंद्राची शनिशी युती होईल. १७ तारखेला सूर्य तूळ राशित प्रवेश करेल, चंद्राचा सूर्याशी प्रतियोग व गुरुशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग व मंगळाशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला जोखीम असलेली कामे करु नका. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. खरेदीसाठी मात्र हा काळ अनुकूल आहे. धार्मिक कार्यात सहभाग असेल. उपासनेत मन रमेल. सप्ताहाच्या मध्यात तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मन आनंदी व आशावादी राहील. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. सप्ताहाच्या शेवटी आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. कलाकौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. मात्र या काळात दातांसंबंधी किंवा डोळ्यांसंबंधी काही त्रास असतील तर काळजी घ्या.
उपासना: गणपतीची उपासना करणे या काळात श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)