अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२७ ऑगस्ट ते २ सप्टेंबर २०२३)

(Astroshodh- astrology, vastu, numerology, astrologerinpune, bestastrologerinpune, famousastrologerinpune, astrologerinkothrud, vastucosultantinpune)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु, राहू, हर्षल, चतुर्थस्थानात शुक्र(व), पंचमस्थानात सूर्य, बुध(व), षष्ठस्थानात मंगळ, सप्तमस्थानात केतू, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात शनि(व) आणि व्ययस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला सूर्याचा शनिशी प्रतियोग व चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. २९ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. ३० तारखेला चंद्राची शनिशी युती होईल. ३१ चंद्राचा सूर्याशी व बुधाशी प्रतियोग व चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीलाच काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. शिक्षण क्षेत्र तसेच न्यायव्यवस्थेशी संबंधित असलेल्यांना चांगले ग्रहमान आहेत. धार्मिक कृत्ये व उपासना करणार्‍यासही हा कालावधी चांगला आहे. प्रवासयोग शक्य. खर्च मात्र या काळात वाढणार आहेत. सप्ताह मध्यात नोकरीत किंवा व्यवसायात चांगले काम झाल्याने वरीष्ठ खुश असतील. काहींना बढतीचे योग येऊ शकतील. घरातील वातावरण छान असेल. सप्ताह अखेरीस काही धनलाभ सुखावून टाकेल. मित्रांबरोबर किंवा नातेवाईकांबरोबर वेळ छान जाईल. जुनी येणी वसूल होतील. पूर्वीच्या एखाद्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. अध्यात्मिक क्षेत्रातील लोकांना चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे. अध्यात्मिक क्षेत्रातील लोकांना हा संपूर्ण सप्ताह अनुभुतीचा ठरु शकेल.
या सप्ताहासाठी उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या काळात जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी शुक्र(व), चतुर्थस्थानात सूर्य, बुध(व), पंचमस्थानात मंगळ, षष्ठस्थानात केतू, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात शनि(व), लाभस्थानात नेपचून आणि व्ययस्थानात गुरु, राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला सूर्याचा शनिशी प्रतियोग व चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. २९ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. ३० तारखेला चंद्राची शनिशी युती होईल. ३१ चंद्राचा सूर्याशी व बुधाशी प्रतियोग व चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात काहींसाठी शारिरीक कुरबुरीची असू शकेल. जीवनशक्तीची कमतरता किंवा थकवा जाणवत राहू शकेल. जोखीम असलेली कामे या दरम्यान करु नका. महत्त्वाची कामे पुढे ढकला. या काळात गूढ विषय तुम्हाला आकर्षित करतील. अचानक धनलाभाचे योग काहींना या काळात सुखावतील. सप्ताह मध्यात भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. वक्ते, लेखक, पुरोहीत, शिक्षक यांना अनुकूल काळ आहे. प्रवास लाभदायक ठरतील. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. सप्ताह अखेरीस उत्तम ग्रहमान आहे. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. धनलाभ होण्याचेही योग आहेत. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. मन प्रसन्न असेल.
या सप्ताहासाठी उपासना: या कालावधीत हनुमान चालिसा किंवा मारुती स्तोत्र रोज संध्याकाळी मोठ्या आवाजात म्हणावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी शुक्र(व), तृतीयस्थानी सूर्य, बुध(व), चतुर्थस्थानात मंगळ, पंचमस्थानात केतू, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात शनि(व), दशमस्थानात नेपचून आणि गुरु, राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला सूर्याचा शनिशी प्रतियोग व चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. २९ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. ३० तारखेला चंद्राची शनिशी युती होईल. ३१ चंद्राचा सूर्याशी व बुधाशी प्रतियोग व चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात चांगली होईल. जोडीदारासंबंधी एखादी चांगली घटना घडेल. व्यावसयिकांना फायदा देणार्‍या नवीन संधी चालून येतील. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांसाठीही चांगला काळ आहे. सप्ताह मध्यात मात्र अचानक आलेल्या अडचणींनी त्रस्त व्हाल. प्रवासात खिसे/ पाकिट सांभाळा. जोखीम असलेली कामे आज करु नका. महत्त्वाची कामे पुढे ढकला. वाहने सावकाश चालवा. तुमची धार्मिक मत्ते दुसर्‍यांवर लादू नका. सप्ताह अखेरीस उत्तम ग्रहमान आहे. अपेक्षित गाठीभेटी होतील. आर्थिक सुयश लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.
तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.
या सप्ताहासाठी उपासना: ’ श्री गुरुदेव दत्त ’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात शुक्र(व), धनस्थानी सूर्य, बुध(व), तृतीयस्थानी मंगळ, चतुर्थस्थानात केतू, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात शनि(व), भाग्यस्थानात नेपचून आणि दशमस्थानात गुरु, राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला सूर्याचा शनिशी प्रतियोग व चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. २९ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. ३० तारखेला चंद्राची शनिशी युती होईल. ३१ चंद्राचा सूर्याशी व बुधाशी प्रतियोग व चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. सामाजिक कामात सहभागी व्हाल. आहारतज्ञ व वैद्यकीय व्यवसाय करणार्‍यांना हा काळ विशेष चांगला आहे. तब्येतीच्या तक्रारी मात्र जाणवत रहातील. मधूमेह किंवा यकृतासंबंधी काही त्रास असतील तर योग्य ते पथ्यपाणी सांभाळावे. सप्ताह मध्यात जोडीदाराशी वाद विवाद टाळावेत. जोडीदाराचे काही प्रश्न असतील तर त्याकडे लक्ष द्यावे. व्यापार्‍यांनी मोठे धोके या काळात घेऊ नयेत. सप्ताह अखेरीस दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. वाहने जपून चालवावीत. रागावर नियंत्रण ठेवावे.
विमा/ वैद्यकीय क्षेत्रात काम करणार्‍यांना मात्र अनुकूल कालावधी आहे. काहींना अचानक धनलाभाचे योग शक्य.
या सप्ताहासाठी उपासना: ’ॐ नम: शिवाय’ किंवा मृत्युंजय मंत्राचा जप जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात सूर्य, बुध(व), धनस्थानी मंगळ, तृतीयस्थानी केतू, षष्ठस्थानात प्लूटो, सप्तमस्थानात शनि(व), अष्टमस्थानात नेपचून, भाग्यस्थानात गुरु, राहू, हर्षल आणि व्ययस्थानात शुक्र(व), अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला सूर्याचा शनिशी प्रतियोग व चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. २९ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. ३० तारखेला चंद्राची शनिशी युती होईल. ३१ चंद्राचा सूर्याशी व बुधाशी प्रतियोग व चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात उत्तम असणार आहे. संततीसौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मानसन्मानाचे योग आहेत. काहींना छोटसं बक्षिस, भेटवस्तू, प्रमोशन, पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थी, खेळाडू व कलाकारांना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल. सप्ताह मध्यात काहींना नोकरीच्या संधी चालून येतील. मात्र तब्येतीची काळजी घ्यावी. योग्य ते पथ्यपाणी सांभाळावे. अती दगदग टाळावी तसेच आपल्या जिवलग माणसांसोबत वाद होणार नाहीत याचीही काळजी घ्यावी. सप्ताह अखेरीस धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. वाहने जपून चालवा.
या सप्ताहासाठी उपासना: श्रीस्वामी समर्थांचा तारक मंत्र या काळात रोज म्हणावा किंवा ऐकावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात मंगळ, धनस्थानात केतू, पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी शनि(व), सप्तमस्थानात नेपचून, अष्टमस्थानात गुरु, राहू, हर्षल, लाभस्थानात शुक्र(व), आणि व्ययस्थानात सूर्य, बुध(व) अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला सूर्याचा शनिशी प्रतियोग व चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. २९ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. ३० तारखेला चंद्राची शनिशी युती होईल. ३१ चंद्राचा सूर्याशी व बुधाशी प्रतियोग व चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला घरातील वातावरण संमिश्र राहील. घरातील कामांसाठी वेळ काढावा लागेल. घरात वाद होणार नाहीत याचीही काळजी घ्या. प्रॉपर्टीची कामे शक्यतो पुढे ढकला. प्रॉपर्टीची खरेदी विक्री करणार्‍यांना मात्र अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्य कलाकार, विद्यार्थी व प्रेमिकांना चांगला जाईल. काही लाभही होतील. नवीन विषयाच्या अभ्यासाला सुरुवात करायची असेल तर हा काळ चागला आहे. सप्ताहाच्या शेवटी तब्येत सांभाळावी. मात्र वैद्यकीय व्यवसाय करणारे तसेच वकील यांना ग्रहमान अनुकूल आहे. पूर्वी केलेल्या एखाद्या गुंतवणुकीतून फ़ायदा संभवतो. कर्ज प्रकरणे मंजुर होण्यासाठी कालावधी अनुकूल आहे.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात शनि(व), षष्ठस्थानी नेपचून, सप्तमस्थानात गुरु, राहू, हर्षल, दशमस्थानात शुक्र(व), लाभस्थानात सूर्य, बुध(व) आणि व्ययस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला सूर्याचा शनिशी प्रतियोग व चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. २९ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. ३० तारखेला चंद्राची शनिशी युती होईल. ३१ चंद्राचा सूर्याशी व बुधाशी प्रतियोग व चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल.
फलादेश- ग्रहमानाची चांगली साथ लाभली आहे. एकूणच आठवडा चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला काहींना प्रवासयोग शक्य आहेत. तुमच्यातल्या कौशल्याला वाव मिळेल. लेखक, ब्लॉगर्स यांना विशेष अनुकूल काळ आहे. भावंडांची खुशाली कळेल. विवाहोत्सुकांना विवाह ठरविण्यास ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह मध्यात घरातील वातावरण चांगले रहाणार आहे. नवीन प्रॉपर्टी खरेदीसाठीही अनुकूल काळ आहे. सप्ताह अखेरीस काहींना अचानक धनलाभ संभवतात. संततीसौख्य लाभेल. नवीन परिचय होतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. खेळाडू व विद्यार्थ्यांना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल.
या सप्ताहासाठी उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात शनि(व), पंचमस्थानात नेपचून, षष्ठस्थानी गुरु, राहू, हर्षल, नवमस्थानात शुक्र(व), दशमस्थानात सूर्य, बुध(व), लाभस्थानात मंगळ आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला सूर्याचा शनिशी प्रतियोग व चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. २९ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. ३० तारखेला चंद्राची शनिशी युती होईल. ३१ चंद्राचा सूर्याशी व बुधाशी प्रतियोग व चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला प्रिय व्यक्तींच्या भेटीचे योग येतील. छान मेजवानीचे योग येतील. लाभदायक घटना घडतील. धनलाभ होण्याचीही शक्यता आहे. सप्ताह मध्यात नशीबाची साथ मिळेल. भावंडांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग संभवतात. एखादी अचानक मिळालेली भेटवस्तू सुखावून टाकेल. प्रवासयोग येतील. लेखक, ब्लॉगर्स यांना अनुकूल ग्रहमान आहे. घराच्या दुरुस्तीसाठी किंवा सजावटीसाठी काही खरेदी कराल. प्रॉपर्टी खरेदी-विक्री करणार्‍यांना अनुकूल ग्रहमान आहे. आर्थिक सुयश लाभेल. सप्ताह अखेर संततीचे प्रश्न मार्गी लागतील. मात्र तुमचे आरोग्य सांभाळा. अती दगदग टाळा.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात रोज गणपती स्तोत्र म्हणणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी शनि(व), चतुर्थस्थानात नेपचून, पंचमस्थानात गुरु, राहू, हर्षल, अष्टमस्थानात शुक्र(व), नवमस्थानात सूर्य, बुध(व), दशमस्थानात मंगळ, आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला सूर्याचा शनिशी प्रतियोग व चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. २९ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. ३० तारखेला चंद्राची शनिशी युती होईल. ३१ चंद्राचा सूर्याशी व बुधाशी प्रतियोग व चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला घरात उत्सव/ समारंभाचे वातावरण असेल. राहत्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. संततीबद्दल चांगली बातमी कळेल. उपासनेसाठी/ धार्मिक कार्यक्रमांसाठी अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्य काहींना भाग्यवर्धक ठरेल. आत्मविश्वास वाढलेला असेल. तुमच्या मनातील कल्पनांना आता मूर्त रुप देऊ शकाल. आर्थिक सुयश लाभेल. सप्ताहाच्या मध्यानंतर काहींना प्रवासाचे योग संभवतात. लेखक/ कवी यांना अनुकूल कालावधी आहे. भावंडांची ख्यालीखुशाली कळेल. मन प्रसन्न असेल.
या सप्ताहासाठी उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात शनि(व), तृतीयस्थानी नेपचून, चतुर्थस्थानात गुरु, राहू, हर्षल, सप्तमस्थानी शुक्र(व), अष्टमस्थानात सूर्य, बुध(व), नवमस्थानात मंगळ आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला सूर्याचा शनिशी प्रतियोग व चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. २९ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. ३० तारखेला चंद्राची शनिशी युती होईल. ३१ चंद्राचा सूर्याशी व बुधाशी प्रतियोग व चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान खरेदीची असेल. काही अचानक खर्चही उद्भवू शकतील. नृत्यकलेशी संबंधीत व्यक्तींसाठी तसेच परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे अशा व्यक्तींना फायदेशीर काळ आहे. जुनी येणी वसूल होतील. पूर्वीच्या एखाद्या गुंतवणुकीतून फायदा या काळात शक्य. अध्यात्मिक क्षेत्रातील लोकांनाही चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यात ग्रहमान चांगले आहे. मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. काही लाभदायक घटना शक्य. सप्ताह अखेरीस काही धनलाभाचे योग आहेत. घरातील वातावरण छान असेल. आवडत्या व्यक्तींची भेट शक्य.
या सप्ताहासाठी उपासना: या कालावधीत हनुमान चालिसा किंवा मारुती स्तोत्र रोज संध्याकाळी मोठ्या आवाजात म्हणावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि(व), धनस्थानात नेपचून, तृतीयस्थानी गुरु, राहू, हर्षल, षष्ठस्थानात शुक्र(व), सप्तमस्थानी सूर्य, बुध(व), अष्टमस्थानात मंगळ, भाग्यस्थानात केतू आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला सूर्याचा शनिशी प्रतियोग व चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. २९ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. ३० तारखेला चंद्राची शनिशी युती होईल. ३१ चंद्राचा सूर्याशी व बुधाशी प्रतियोग व चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होईल. मित्रमैत्रिणींच्या भेटीचे योग येतील. भाग्यवर्धक घटना घडतील. धनलाभ संभवतो. वरीष्ठांचे छान सहकार्य मिळेल. सप्ताह मध्यात छान खरेदीचा मूड असेल. पारमार्थिक उन्नती/ मेडिटेशन यासाठी हा कालावधी चांगला आहे. आरोग्याच्या किरकोळ समस्या जाणवतील. काही अनावश्यक खर्च डोके वर काढतील. आपल्या वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. परदेशासंबंधीत कामांसाठी मात्र हाच कालावधी चांगला असणार आहे. सप्ताहाच्या शेवटी आर्थिक स्थिती चांगली असेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. मन प्रसन्न असेल.
या सप्ताहासाठी उपासना: ’ श्री गुरुदेव दत्त ’ या मंत्राचा रोज जप करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी नेपचून, धनस्थानात गुरु, राहू, हर्षल, पंचमस्थानात शुक्र(व), षष्ठस्थानात सूर्य, बुध(व), सप्तमस्थानी मंगळ, अष्टमस्थानात केतू, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात शनि(व) अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला सूर्याचा शनिशी प्रतियोग व चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. २९ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. ३० तारखेला चंद्राची शनिशी युती होईल. ३१ चंद्राचा सूर्याशी व बुधाशी प्रतियोग व चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम झाल्याने खुश असाल. वरिष्ठांकडून अपेक्षित असलेलं सहकार्य मिळवता येईल. सप्ताह मध्यात चांगला धनलाभ होईल. मित्रांच्या किंवा परिचितांच्या भेटी होतील. काही अडकलेली कामे मित्रांच्या किंवा परिचितांमुळे सहजगत्या होतील. मन प्रसन्न करणार्‍या घटना घडतील. सप्ताह अखेरीस कायदा/ नियम मोडून कॊणतीही गॊष्ट करु नका. पूर्वी केलेल्या एखाद्या खर्चातून किंवा गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता आहे. परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांच्यासाठी अनुकूल घटनांचा हा कालावधी असेल.
या सप्ताहासाठी उपासना: श्रीस्वामी समर्थांचा तारक मंत्र या काळात रोज म्हणावा किंवा ऐकावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)