अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१३ ऑगस्ट ते १९ ऑगस्ट २०२३)
(Astroshodh- astrology, vastu, numerology, astrologerinpune, bestastrologerinpune, famousastrologerinpune, astrologerinkothrud, vastucosultantinpune)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु, राहू, हर्षल, चतुर्थस्थानात सूर्य, शुक्र(व), पंचमस्थानात मंगळ, बुध, सप्तमस्थानात केतू, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात शनि(व) आणि व्ययस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला सूर्याची शुक्राशी युती होईल व चंद्राचा अनुक्रमे गुरु, बुध व मंगळाशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल. १६ तारखेला सूर्याची चंद्राशी युती होईल. १७ तारखेला सूर्य सिंह राशित प्रवेश करेल व चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. १८ तारखेला मंगळ कन्या राशित प्रवेश करेल व चंद्राची बुधाशी युती होईल. १९ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल.
फलादेश- सप्ताह छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला आवडत्या व्यक्तींच्या भेटीचे योग येऊ शकतील. प्रेमी जिवांना लग्न ठरविण्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे. खेळाडू, साहित्यिक व कलाकारांसाठीही उत्तम काळ आहे. मनासारखे काम झाल्याने खूष असाल. प्रवासाचे योग संभवतात. एखादी पावसाळी सहल आयोजित करायला हरकत नाही. सप्ताहाच्या मध्यात घरासाठी वेळ काढावा लागेल. घरातील वातावरण छान असेल. सप्ताहाच्या मध्यानंतर जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांना चांगला कालावधी आहे. काहींना अचानक धनलाभाचे योग संभवतात. शनिवारी नोकरीच्या शोधात असणार्यांसाठी काही नवीन संधी दृष्टोत्पत्तीस येऊ शकतील.
या सप्ताहासाठी उपासना: रोज महालक्ष्मीअष्टक या काळात जरुर म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभचंद्राचा शनिशी लाभयोग होईल. विष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी सूर्य, शुक्र(व), चतुर्थस्थानात मंगळ, बुध, षष्ठस्थानात केतू, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात शनि(व), लाभस्थानात नेपचून आणि व्ययस्थानात गुरु, राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला सूर्याची शुक्राशी युती होईल व चंद्राचा अनुक्रमे गुरु, बुध व मंगळाशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल. १६ तारखेला सूर्याची चंद्राशी युती होईल. १७ तारखेला सूर्य सिंह राशित प्रवेश करेल व चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. १८ तारखेला मंगळ कन्या राशित प्रवेश करेल व चंद्राची बुधाशी युती होईल. १९ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल.
फलादेश- उत्तम ग्रहमान आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला कुटुंबियांसोबत वॆळ छान जाईल. छान पार्टी करायला हरकत नाही. धनलाभाचे योग आहेत. सप्ताह मध्यात आप्तेष्टांच्या भेटी होतील. काहींना सूचक स्वप्ने पडतील. प्रवासाचे योग संभवतात. लेखक, ब्लॉगर्स, कवी यांना अनुकूल काळ आहे. इस्टेट एजंट, बिल्डर्स यांना व्यावसायिक उत्कर्षाचा कालावधी आहे. सप्ताहाच्या अखेरीस कलाकारांना व विद्यार्थ्यांना अनुकूल काळ आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर त्यात चांगली प्रगती दिसेल.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात रोज गणपती स्तोत्र म्हणणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी सूर्य, शुक्र(व), तृतीयस्थानी मंगळ, बुध, पंचमस्थानात केतू, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात शनि(व), दशमस्थानात नेपचून आणि गुरु, राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला सूर्याची शुक्राशी युती होईल व चंद्राचा अनुक्रमे गुरु, बुध व मंगळाशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल. १६ तारखेला सूर्याची चंद्राशी युती होईल. १७ तारखेला सूर्य सिंह राशित प्रवेश करेल व चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. १८ तारखेला मंगळ कन्या राशित प्रवेश करेल व चंद्राची बुधाशी युती होईल. १९ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल.
फलादेश- सप्ताह चांगला आहे. घरात छान वातावरण असेल. कुटुंबीयांमध्ये छान वातावरण असेल. मन प्रसन्न असेल. विवाहेच्छूक लोकांना लग्न ठरवण्यासाठी अनुकूल काळ आहे. कलाकारांना, लेखकांना विशेषत: नृत्यकलाकारांना अनुकूल काळ आहे. घराची दुरुस्ती, सजावट करायचं मनात घोळत असेल किंवा नवीन घर घ्यायचं असेल तर त्यासाठी आता अनुकूलता आहे. प्रेमिकांना हा सप्ताह विशेष चांगला आहे. नविन विषयाचा अभ्यास करायला सुरुवात करण्यासाठीही अनुकूल ग्रहमान आहे. धनलाभाचे अचानक आलेले योग काहींना सुखावून टाकतील.
या सप्ताहासाठी उपासना: श्रीसूक्ताचे नियमित पठण या कालावधीत केलेले चांगले.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात सूर्य, शुक्र(व), धनस्थानी मंगळ, बुध, चतुर्थस्थानात केतू, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात शनि(व), भाग्यस्थानात नेपचून आणि दशमस्थानात गुरु, राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला सूर्याची शुक्राशी युती होईल व चंद्राचा अनुक्रमे गुरु, बुध व मंगळाशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल. १६ तारखेला सूर्याची चंद्राशी युती होईल. १७ तारखेला सूर्य सिंह राशित प्रवेश करेल व चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. १८ तारखेला मंगळ कन्या राशित प्रवेश करेल व चंद्राची बुधाशी युती होईल. १९ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात छान खरेदीने होऊ शकेल. आपल्या आवडत्या व्यक्तींबरोबर मस्त शॉपिंगला जायला हरकत नाही. एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्य व त्यानंतरचा पूर्ण काळ छान आहे. आत्मविश्वास वाढेल. काहींच्या बाबतीत भाग्यवर्धक घटना घडतील, धनलाभ होतील. लेखक, कलाकार, ब्लॉगर्स यांना अत्यंत चांगला कालावधी आहे. भावंडांच्या भेटीचे योग संभवतात. प्रवास फ़ायदेशीर व आनंददायक ठरतील.
उपासना: रोज महालक्ष्मीअष्टक या काळात जरुर म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात मंगळ, बुध, तृतीयस्थानी केतू, षष्ठस्थानात प्लूटो, सप्तमस्थानात शनि(व), अष्टमस्थानात नेपचून, भाग्यस्थानात गुरु, राहू, हर्षल आणि व्ययस्थानात सूर्य, शुक्र(व) अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला सूर्याची शुक्राशी युती होईल व चंद्राचा अनुक्रमे गुरु, बुध व मंगळाशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल. १६ तारखेला सूर्याची चंद्राशी युती होईल. १७ तारखेला सूर्य सिंह राशित प्रवेश करेल व चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. १८ तारखेला मंगळ कन्या राशित प्रवेश करेल व चंद्राची बुधाशी युती होईल. १९ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला मित्रांच्या व प्रियजनांच्या भेटीचे योग येतील. घराच्या देखभालीसाठी किंवा सजावटीकडे लक्ष द्याल. मन प्रसन्न असेल. सप्ताह मध्यात छान खरेदीचा तसेच काही अनपेक्षित खर्चाचाही योग आहेत. या काळात रागावर नियंत्रण ठेवा. मनाचा गेलेला तोल तुमच्यासाठी त्रासदायक ठरु शकेल. सप्ताहाच्या अखेरीस लाभदायक ग्रहमान आहे. मन प्रसन्न असेल. एखादा धनलाभ होण्याची शक्यता या काळात आहे. कौटुंबीक सौख्य मिळेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. काहींना धनलाभ शक्य आहे.
या सप्ताहासाठी उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात केतू, पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी शनि(व), सप्तमस्थानात नेपचून, अष्टमस्थानात गुरु, राहू, हर्षल, लाभस्थानात सूर्य, शुक्र(व) आणि व्ययस्थानात मंगळ, बुध अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला सूर्याची शुक्राशी युती होईल व चंद्राचा अनुक्रमे गुरु, बुध व मंगळाशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल. १६ तारखेला सूर्याची चंद्राशी युती होईल. १७ तारखेला सूर्य सिंह राशित प्रवेश करेल व चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. १८ तारखेला मंगळ कन्या राशित प्रवेश करेल व चंद्राची बुधाशी युती होईल. १९ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये छान काम होईल. केलेल्या कामाचं कौतुक होण्याची शक्यता आहे. तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल. कार्यालयीन कामासाठी प्रवास करावा लागू शकेल. सप्ताह मध्यात एखाद्या उत्सव किंवा समारंभात सहभागी व्हाल. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचे योग आहेत. धनलाभ होतील. सप्ताह मध्यानंतर अचानक काही खर्च करावे लागतील. सप्ताह अखेरीस वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. अचानक काही खर्च उद्भवू शकतील.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात शनि(व), षष्ठस्थानी नेपचून, सप्तमस्थानात गुरु, राहू, हर्षल, दशमस्थानात सूर्य, शुक्र(व) आणि लाभस्थानात मंगळ, बुध अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला सूर्याची शुक्राशी युती होईल व चंद्राचा अनुक्रमे गुरु, बुध व मंगळाशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल. १६ तारखेला सूर्याची चंद्राशी युती होईल. १७ तारखेला सूर्य सिंह राशित प्रवेश करेल व चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. १८ तारखेला मंगळ कन्या राशित प्रवेश करेल व चंद्राची बुधाशी युती होईल. १९ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल.
फलादेश- चांगले ग्रहमान आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला काहींना प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. धनलाभाचे योग आहेत. काहींच्या बाबतीत भाग्यवर्धक घटना घडतील. सप्ताह मध्यात आपल्या कार्यक्षेत्रामध्ये छान काम होईल. वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. त्यांच्याकडून एखादी मागणी मान्य करुन घ्यायची असेल तर वरीष्ठांकडे आता शब्द टाकायला हरकत नाही. व्यावसायिकांनाही चांगला काळ आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर मित्रांच्या किंवा नातेवाईच्या भेटीची शक्यता आहे. वेळ मजेत जाईल. सप्ताहाच्या शेवटी बेकायदा गोष्टी करु नका.
या सप्ताहासाठी उपासना: या सप्ताहात रोज ’ॐ ह्रां ह्रीं ह्रौं स: सूर्याय नम:’ या मंत्राचा १ माळ जप करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात शनि(व), पंचमस्थानात नेपचून, षष्ठस्थानी गुरु, राहू, हर्षल, नवमस्थानात सूर्य, शुक्र(व), दशमस्थानात मंगळ, बुध आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला सूर्याची शुक्राशी युती होईल व चंद्राचा अनुक्रमे गुरु, बुध व मंगळाशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल. १६ तारखेला सूर्याची चंद्राशी युती होईल. १७ तारखेला सूर्य सिंह राशित प्रवेश करेल व चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. १८ तारखेला मंगळ कन्या राशित प्रवेश करेल व चंद्राची बुधाशी युती होईल. १९ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात मनाविरुध्द घटनांची ठरु शकेल. मात्र हा कालावधी विमा क्षेत्रात काम करणारे, संशोधक, मनसोपचारतज्ञ तसेच ज्योतिषी यांना अनुकूल आहे. सप्ताहाचा मध्य उपासना करण्यास चांगला आहे. अध्यात्मिक उन्नतीसाठी गुरु केलेल्यांना चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे. प्रवासयोग शक्य. सप्ताहाच्या मध्यानंतर व्यवसायात नवीन तंत्र अमलात आणाल. शासकीय कामे मार्गी लागतील. सप्ताहाच्या शेवटी काही लाभ होऊ शकतात. मित्रमंडळींच्या भेटी शक्य आहेत.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात रोज महालक्ष्मीअष्टक म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी शनि(व), चतुर्थस्थानात नेपचून, पंचमस्थानात गुरु, राहू, हर्षल, अष्टमस्थानात सूर्य, शुक्र(व), नवमस्थानात मंगळ, बुध आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला सूर्याची शुक्राशी युती होईल व चंद्राचा अनुक्रमे गुरु, बुध व मंगळाशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल. १६ तारखेला सूर्याची चंद्राशी युती होईल. १७ तारखेला सूर्य सिंह राशित प्रवेश करेल व चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. १८ तारखेला मंगळ कन्या राशित प्रवेश करेल व चंद्राची बुधाशी युती होईल. १९ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला घरच्यांबरोबर वेळ छान व्यतीत करू शकाल. सासरकडच्या नातेवाईकांचे सहकार्य मिळेल. प्रवास लाभदायक ठरतील. सोमवार व मंगळवार हे दिवस संमिश्र आहेत. कामाचा ताण व दगदग जाणवेल. मात्र गूढ विषयांचा अभ्यास किंवा पारमार्थिक उन्नती ज्यांना करायची असेल त्यांना हा काळ अनुकूलच ठरणार आहे. सप्ताह मध्यात व नंतर काही भाग्यवर्धक घटना घडतील. प्रवासयोग या काळात शक्य. आर्थिक लाभही होऊ शकेल. सप्ताहाचा शेवट कामे मार्गी लागतील. उपासनेत मन लागेल. वरीष्ठांचे सहकार्य मिळेल.
या सप्ताहासाठी उपासना: रामरक्षेचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात शनि(व), तृतीयस्थानी नेपचून, चतुर्थस्थानात गुरु, राहू, हर्षल, सप्तमस्थानी सूर्य, शुक्र(व), अष्टमस्थानात मंगळ, बुध आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला सूर्याची शुक्राशी युती होईल व चंद्राचा अनुक्रमे गुरु, बुध व मंगळाशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल. १६ तारखेला सूर्याची चंद्राशी युती होईल. १७ तारखेला सूर्य सिंह राशित प्रवेश करेल व चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. १८ तारखेला मंगळ कन्या राशित प्रवेश करेल व चंद्राची बुधाशी युती होईल. १९ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला तब्येतीची काळजी घेणे उचित ठरेल. वैद्यकीय क्षेत्रात व कायदेविषयक कामे करणार्यांना फ़ायदेशीर ग्रहमान आहे. नोकरीच्या शोधात असणार्यांना काही संधी चालून येतील. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वेळ मजेत घालवायला मिळेल. जोडीदाराबरोबर मस्त शॉपिंगला जायला हरकत नाही. भागीदारीत व्यवसाय करणार्यांनाही अनुकूल काळ आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर जोखीम किंवा धोका असलेली कामे करू नका. सप्ताह अखेर धार्मिक कार्यासाठी चांगला कालावधी आहे. लाभदायक ग्रहमान आहे.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात महालक्ष्मीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि(व), धनस्थानात नेपचून, तृतीयस्थानी गुरु, राहू, हर्षल, षष्ठस्थानात सूर्य, शुक्र(व), सप्तमस्थानी मंगळ, बुध, भाग्यस्थानात केतू आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला सूर्याची शुक्राशी युती होईल व चंद्राचा अनुक्रमे गुरु, बुध व मंगळाशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल. १६ तारखेला सूर्याची चंद्राशी युती होईल. १७ तारखेला सूर्य सिंह राशित प्रवेश करेल व चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. १८ तारखेला मंगळ कन्या राशित प्रवेश करेल व चंद्राची बुधाशी युती होईल. १९ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला मुलांकडून सुवार्ता कळतील. विद्यार्थ्यांना चांगले ग्रहमान आहे. एखादं बक्षिस किंवा शाबासकीची थाप मिळेल. कलाकारांना व खेळाडूंना अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्य तब्येतीच्या तक्रारींचा ठरु शकेल. सप्ताहाच्या मध्यानंतर जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांना चांगला कालावधी आहे. काहींना अचानक धनलाभाचे योग संभवतात. सप्ताहाच्या शेवटी वाहने जपून चालवावीत. प्रवासात अडथळे येतील. गुरुजनांशी वाद टाळावेत.
या सप्ताहासाठी उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी नेपचून, धनस्थानात गुरु, राहू, हर्षल, पंचमस्थानात सूर्य, शुक्र(व), षष्ठस्थानात मंगळ, बुध, अष्टमस्थानात केतू, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात शनि(व) अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला सूर्याची शुक्राशी युती होईल व चंद्राचा अनुक्रमे गुरु, बुध व मंगळाशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल. १६ तारखेला सूर्याची चंद्राशी युती होईल. १७ तारखेला सूर्य सिंह राशित प्रवेश करेल व चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. १८ तारखेला मंगळ कन्या राशित प्रवेश करेल व चंद्राची बुधाशी युती होईल. १९ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रॉपर्टीच्या कामासाठी चांगला काळ आहे. प्रियजनांच्या भेटीचे योग येतील. एखाद्या छानशा समारंभ, पार्टी किंवा धार्मिक उत्सवामधे सहभागी व्हाल. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना, खेळाडूंना व कलाकारांना अनुकूल आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर नोकरीसाठी प्रयत्न करणार्यांना अनुकूल कालावधी आहे. तब्येतीची मात्र काळजी घ्यावी. पूर्वी केलेल्या एखद्या गुंतवणूकीतून फ़ायदा संभवतो. सप्ताहाच्या मध्यानंतर आरोग्याच्या काही समस्या जाणवतील. काळजी घ्यावी. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर वाद टाळावेत.
या सप्ताहासाठी उपासना: श्रीस्वामी समर्थांचा तारक मंत्र या काळात रोज म्हणावा किंवा ऐकावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)