अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (११ जून ते १७ जून २०२३)

(Astroshodh- astrology, vastu, numerology, astrologerinpune, bestastrologerinpune, famousastrologerinpune, astrologerinkothrud, vastucosultantinpune)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु, राहू, हर्षल, धनस्थानी सूर्य, बुध, चतुर्थस्थानात मंगळ, शुक्र, सप्तमस्थानात केतू, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात शनि आणि व्ययस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राची गुरुशी युती व शनिशी लाभयोग होईल. १५ तारखेला सूर्य मिथुन राशित प्रवेश करेल. १६ तारखेला चंद्राची बुधाशी युती व शुक्राशी लाभयोग होईल. १७ तारखेला चंद्राचा मंगळाशी व बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला काही खर्च अचानकपणे करावे लागतील. बेकायदा गोष्टींपासून लांब रहावे. उपासनेत मन रमेल. पारमार्थिक उन्नती करणार्‍यांसाठी मात्र हा काळ उत्तम असणार आहे. तसेच आज केलेली गुंतवणूक दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरेल. सप्ताह मध्यात तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मन आनंदी असेल. आत्मविश्वास वाढेल. धनलाभाचेही योग आहेत. सप्ताह मध्यानंतर लाभदायक काळ आहे. आर्थिक स्थिती चांगली असेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. संततीबाबत चांगली बातमी कळेल. मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या शेवटी मनोबल उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. आर्थिक सुयश मिळेल.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, बुध, तृतीयस्थानी मंगळ, शुक्र, षष्ठस्थानात केतू, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात शनि, लाभस्थानात नेपचून आणि व्ययस्थानात गुरु, राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राची गुरुशी युती व शनिशी लाभयोग होईल. १५ तारखेला सूर्य मिथुन राशित प्रवेश करेल. १६ तारखेला चंद्राची बुधाशी युती व शुक्राशी लाभयोग होईल. १७ तारखेला चंद्राचा मंगळाशी व बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात छान होईल. वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. मित्रांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग संभवतात. काहींना धनलाभ होतील. योग्य ते प्रयत्न वरीष्ठांच्या सल्याने केल्यास काही महत्वाकांक्षा या काळात पूर्णत्वास जाऊ शकतील. सप्ताह मध्यात जुन्या गुंतवणुकीतून फायदा होईल. उधारी वसूल होईल. परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांना एखादी चांगली बातमी कळेल. खरेदीसाठीही काळ चांगला आहे. मात्र या दरम्यान बेकायदा गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात. खर्चही वाढणार आहेत. जमाखर्चाचा ताळमेळ ठेवावा लागेल. सप्ताहाच्या शेवटी आत्मविश्वास वाढविणार्‍या घटना घडतील. कौटुंबिक सौख्य लाभेल. प्रॉपटींची कामे मार्गी लागतील. संततीसौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मानसन्मानाचे योग आहेत.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी मंगळ, शुक्र, पंचमस्थानात केतू, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात शनि, दशमस्थानात नेपचून आणि लाभस्थानात गुरु, राहू, हर्षल आणि व्ययस्थानात सूर्य, बुध अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राची गुरुशी युती व शनिशी लाभयोग होईल. १५ तारखेला सूर्य मिथुन राशित प्रवेश करेल. १६ तारखेला चंद्राची बुधाशी युती व शुक्राशी लाभयोग होईल. १७ तारखेला चंद्राचा मंगळाशी व बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला नोकरीत किंवा व्यवसायात चांगले काम झाल्याने खुश असाल. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. काहींना अचानक प्रमोशन/ पगारवाढ/ एखादी शाबासकीची थाप मिळू शकते. प्रसिध्दीचेही योग आहेत. सप्ताह मध्य उत्तम आहे. धनलाभ होऊ शकतील. मन प्रसन्न करणार्‍या घटना शक्य. मित्रांच्या/ आप्तेष्टांच्या भेटीचे योग आहेत. त्यांच्या मदतीने एखादे काम मार्गी लागण्याची शक्यता आहे. सप्ताह अखेरीस जुन्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. जुनी येणी वसूल होतील. छान खरेदीचे योग आहेत. मनोरंजनाकडे कल राहील. परदेशासंबंधीत कामे मार्गी लागतील. धार्मिक गोष्टींसाठीही चांगला काळ आहे.
उपासना: मृत्युंजय मंत्राचा जप करणे या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात मंगळ, शुक्र, चतुर्थस्थानात केतू, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात शनि, भाग्यस्थानात नेपचून, दशमस्थानात गुरु, राहू, हर्षल आणि लाभस्थानात सूर्य, बुध अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राची गुरुशी युती व शनिशी लाभयोग होईल. १५ तारखेला सूर्य मिथुन राशित प्रवेश करेल. १६ तारखेला चंद्राची बुधाशी युती व शुक्राशी लाभयोग होईल. १७ तारखेला चंद्राचा मंगळाशी व बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीसच भाग्यवृध्दीकारक ग्रहमान आहे. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. सासरकडच्या नातेवाईकांचे सहकार्य मिळेल. प्रवास लाभदायक ठरतील. सप्ताह मध्यात अनुकूल ग्रहमान आहे. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. लाभदायक घटना शक्य. कामे मार्गी लागतील. व्यावसयिकांना फायदा देणार्‍या नवीन संधी चालून येतील. बुधवारी काही चिंता सतावतील. मात्र लगेच गुरुवार सकाळपासून ग्रहमानात अनुकूल बदल घडेल. त्यानंतर सप्ताह संपेपर्यंत चांगला काळ आहे. आवडत्या व्यक्तीच्या भेटीचा योग आहे. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. आर्थिक सुयश लाभेल.
आर्थिक सुयश लाभेल.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी केतू, षष्ठस्थानात प्लूटो, सप्तमस्थानात शनि, अष्टमस्थानात नेपचून, भाग्यस्थानात गुरु, राहू, हर्षल, दशमस्थानात सूर्य, बुध आणि व्ययस्थानात मंगळ, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राची गुरुशी युती व शनिशी लाभयोग होईल. १५ तारखेला सूर्य मिथुन राशित प्रवेश करेल. १६ तारखेला चंद्राची बुधाशी युती व शुक्राशी लाभयोग होईल. १७ तारखेला चंद्राचा मंगळाशी व बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला संमिश्र ग्रहमान आहे. गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. जोखीम असलेली कामे या दरम्यान करु नका. मात्र हाच काळ विमा सल्लागार, मानसोपचारतज्ञ, डेटा अ‍ॅनालिस्ट तसेच ज्योतिषी यांना फयदेशीर ठरु शकेल. सप्ताह मध्यात धार्मिक कार्यात सहभाग असेल. ज्यांनी अध्यात्मिक उन्नतीसाठी गुरु केले आहेत त्यांना या काळात चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे. प्रवासयोगही या काळात शक्य. मात्र प्रवासात योग्य ती काळजी घ्यावी. सप्ताहाच्या शेवटी संमिश्र ग्रहमान आहे. कार्यक्षेत्रात यश मिळविण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागतील. खर्च वाढतील. बेकायदा गोष्टींपासून या काळात लांब रहा. जोखीम असलेली कामे टाळा. परदेशाशी संबंधीत कामांसाठी मात्र चांगला काळ आहे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात केतू, पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी शनि, सप्तमस्थानात नेपचून, अष्टमस्थानात गुरु, राहू, हर्षल, भाग्यस्थानात सूर्य, बुध आणि लाभस्थानात मंगळ, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राची गुरुशी युती व शनिशी लाभयोग होईल. १५ तारखेला सूर्य मिथुन राशित प्रवेश करेल. १६ तारखेला चंद्राची बुधाशी युती व शुक्राशी लाभयोग होईल. १७ तारखेला चंद्राचा मंगळाशी व बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात चांगली होईल. जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांसाठी चांगला काळ आहे. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळू शकेल. विद्यार्थ्यांना चांगले ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. लाभदायक ग्रहमान आहे. अचानक धनलाभाचेही योग शक्य. अपेक्षित गाठीभेटी होतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. सप्ताहाच्या शेवटी मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. उपासनेत मन लागेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. काही लाभही होतील.
उपासना: या काळात रोज महालक्ष्मीअष्टक जरुर म्हणावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात शनि, षष्ठस्थानी नेपचून, सप्तमस्थानात गुरु, राहू, हर्षल, अष्टमस्थानात सूर्य, बुध आणि दशमस्थानात मंगळ, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राची गुरुशी युती व शनिशी लाभयोग होईल. १५ तारखेला सूर्य मिथुन राशित प्रवेश करेल. १६ तारखेला चंद्राची बुधाशी युती व शुक्राशी लाभयोग होईल. १७ तारखेला चंद्राचा मंगळाशी व बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला वैद्यकीय क्षेत्राशी संबंधीतांना व वकिलांना काळ चांगला आहे. मात्र या दरम्यान आपले आरोग्य सांभाळा. कर्मचार्‍यांचे सहकार्य मिळणार नाही. हितशत्रूंवर लक्ष ठेवा. शारीरिक सौख्यासाठी योग्य आहार व नियमित व्यायाम करायला हवा याची जाणीव होईल. सप्ताह मध्यात जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद जाणवेल. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. सप्ताह अखेरीस जोखीम असलेली कामे आज करु नका. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. महत्त्वाची कामे पुढे ढकला. मात्र ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध विमा, मानसशास्त्र, इतिहास, ज्योतिष, रेकी अशा विषयांशी संबंधीत आहे त्यांना लाभदायक परीस्थिती असेल.
उपासना: या काळात रोज गणपती स्तोत्र म्हणावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात शनि, पंचमस्थानात नेपचून, षष्ठस्थानी गुरु, राहू, हर्षल, सप्तमस्थानात सूर्य, बुध, नवमस्थानात मंगळ, शुक्र आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राची गुरुशी युती व शनिशी लाभयोग होईल. १५ तारखेला सूर्य मिथुन राशित प्रवेश करेल. १६ तारखेला चंद्राची बुधाशी युती व शुक्राशी लाभयोग होईल. १७ तारखेला चंद्राचा मंगळाशी व बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात संमिश्र असणार आहे. विद्यार्थ्यांनी अती आत्मविश्वास टाळावा. अभ्यासाकडे दुर्लक्ष नको. संततीशी वाद टाळा. मात्र तुमच्या कार्यक्षेत्राशी संबंधीत काही ट्रेनिंग किंवा काही कोर्सेस करायचे असतील काहीतरी नवीन शिकायचं असेल तर त्यासाठी मात्र उत्तम ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात तब्येतीसंबंधी काही कुरबुरी जाणवतील. तुमच्या बोलण्याने लोक दुखावले जाण्याची शक्यता आहे. काळजी घ्यावी. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना मात्र हा काळ अनुकूल आहे. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना चांगला कालावधी आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी शनि, चतुर्थस्थानात नेपचून, पंचमस्थानात गुरु, राहू, हर्षल, षष्ठस्थानात सूर्य, बुध, अष्टमस्थानात मंगळ, शुक्र आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राची गुरुशी युती व शनिशी लाभयोग होईल. १५ तारखेला सूर्य मिथुन राशित प्रवेश करेल. १६ तारखेला चंद्राची बुधाशी युती व शुक्राशी लाभयोग होईल. १७ तारखेला चंद्राचा मंगळाशी व बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला घरातील वातावरण चांगले राहील. उत्सव/ समारंभ साजरे होऊ शकतात. आप्तेष्ट/ मित्रांच्या भेटीचे योग संभवतात. प्रॉपर्टीची खरेदी विक्री करणार्‍यांना अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्य विद्यार्थी, खेळाडू व नृत्यकलेशी संबंधितांना अनुकूल आहे. सप्ताहाच्या शेवटी तुमचे आरोग्य सांभाळा. कर्मचार्‍यांचे सहकार्य मिळणार नाही. हितशत्रूंवर लक्ष ठेवा. वैद्यकीय व्यवसाय कराणारे व वकील यांना मात्र हा काळ चांगला आहे. तसेच अध्यात्मिक उन्नतीसाठी जे लोक प्रयत्नशील आहेत त्यांना या काळात चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे.
उपासना: श्रीसूक्ताचे नियमित पठण या कालावधीत केलेले चांगले.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात शनि, तृतीयस्थानी नेपचून, चतुर्थस्थानात गुरु, राहू, हर्षल, पंचमस्थानात सूर्य, बुध, सप्तमस्थानी मंगळ, शुक्र आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राची गुरुशी युती व शनिशी लाभयोग होईल. १५ तारखेला सूर्य मिथुन राशित प्रवेश करेल. १६ तारखेला चंद्राची बुधाशी युती व शुक्राशी लाभयोग होईल. १७ तारखेला चंद्राचा मंगळाशी व बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- ग्रहमानाची चांगली साथ लाभली आहे. एकूणच आठवडा चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला काहींना प्रवासयोग शक्य. भावंडांची खुशाली कळेल. नातेवाईकांच्या भेटीचे योग येतील. तुमच्या चांगल्या नियोजन कौशल्यामुळे कामे मार्गी लागतील. सप्ताह मध्यात घरातील वातावरण चांगले रहाणार आहे. हातातील कामे लवकर संपवून आराम करण्याकडॆ कल असेल. काहींना प्रॉपर्टीपासून लाभ संभवतात. जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील. सप्ताह मध्यानंतर कलाकारांना अनुकूल कालावधी आहे. काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. काही लाभ मनाला आनंद देतील. प्रेमिकांना लग्न ठरविण्यासाठी अनुकूल कालावधी आहे.
उपासना: श्रीस्वामी समर्थांचा तारक मंत्र या काळात रोज म्हणावा किंवा ऐकावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि, धनस्थानात नेपचून, तृतीयस्थानी गुरु, राहू, हर्षल, चतुर्थस्थानात सूर्य, बुध, षष्ठस्थानात मंगळ, शुक्र, भाग्यस्थानात केतू आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राची गुरुशी युती व शनिशी लाभयोग होईल. १५ तारखेला सूर्य मिथुन राशित प्रवेश करेल. १६ तारखेला चंद्राची बुधाशी युती व शुक्राशी लाभयोग होईल. १७ तारखेला चंद्राचा मंगळाशी व बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला काहींना धनलाभ शक्य. प्रिय व्यक्तिंच्या भेटीचे योग येतील. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. कुटुंबीय किंवा मित्रांसोबत एखाद्या खाऊगल्लीला जरुर भेट द्या. सप्ताह मध्य संमिश्र आहे. तुमच्यातील जिद्द व चिकाटी वाढेल. कार्यक्षेत्रात सुयश मिळेल. कौशल्याला वाव मिळेल. प्रवास योग शक्य. मात्र वादग्रस्त होईल असं लेखन या काळात सोशल मिडियावर करु नका. सप्ताहाच्या शेवटी घरात वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. प्रॉपर्टीची कामे शक्यतो पुढे ढकला. नोकरीच्या शोधात असणार्‍यांना काही चांगल्या संधी चालून येण्याची शक्यता आहे.
उपासना: ”श्री गुरुदेव दत्त” या मंत्राचा जप या काळात जास्तीत जास्त करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी नेपचून, धनस्थानात गुरु, राहू, हर्षल, तृतीयस्थानी सूर्य, बुध, पंचमस्थानात मंगळ, शुक्र, अष्टमस्थानात केतू, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात शनि अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला सूर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राची गुरुशी युती व शनिशी लाभयोग होईल. १५ तारखेला सूर्य मिथुन राशित प्रवेश करेल. १६ तारखेला चंद्राची बुधाशी युती व शुक्राशी लाभयोग होईल. १७ तारखेला चंद्राचा मंगळाशी व बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला उत्तम ग्रहमान आहे. मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. काही लाभदायक घटना शक्य. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. सप्ताह मध्यात आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. कलाकौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. प्रॉपर्टी किंवा वाहन खरेदीसाठी अनुकूल ग्रहमान आहे. मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या शेवटी घरात छान वातावरण असेल. जोडीदाराबरोबर दिवस आनंदात जाणार आहे. व्यावसयिकांना फायदा देणार्‍या नवीन संधी चालून येतील. प्रेमी जीवांना लग्नाच्या बंधनात अडकण्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे. कलाकार, साहित्यिक यांना श्रमसाफल्याचा आनंद मिळेल. विद्यार्थ्यांना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल.
उपासना: ’ श्री गुरुदेव दत्त ’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)