अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१२ मार्च ते १८ मार्च २०२३)
(Astroshodh- astrology, vastu, numerology, astrologerinpune, bestastrologerinpune, famousastrologerinpune, astrologerinkothrud, vastucosultantinpune)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, हर्षल, धनस्थानात मंगळ, सप्तमस्थानात केतू, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात सूर्य, बुध, शनि आणि व्ययस्थानात गुरु, शुक्र, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला शुक्र मेष राशित प्रवेश करेल. १३ तारखेला चंद्र-शनि केंद्रयोग होईल व मंगळ मिथुन राशित प्रवेश करेल. १४ तारखेला चंद्र-बुध केंद्रयोग व चंद्र-गुरु त्रिकोण होईल. १५ तारखेला चंद्र-मंगळ प्रतियोग व चंद्र-शनि लाभयोग होईल. १६ तारखेला चंद्र-गुरु केंद्रयोग होईल व बुध मीन राशित प्रवेश करेल. १७ तारखेला सूर्य व बुधाची युती होईल आणि चंद्राचा सूर्याशी व बुधाशी तर शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्र-गुरु लाभयोग होईल.
फलादेश- रविवार रात्रीपर्यंत आपल्या आवडत्या व्यक्तींबरोबर वेळ छान जाईल. नंतरचे दोन दिवस तितकेसे चांगले नाहीत. आपल्या कार्यक्षेत्रात येणार्या अडचणींनी त्रस्त व्हाल. प्रवास करणार असाल तर सर्व प्रकारची काळजी घ्या. वाहने सावकाश चालवा. मात्र हाच कालावधी विमा व्यावसायिक व मानसोपचारतज्ञ यांना चांगला आहे. सप्ताह मध्य अनुकूल आहे. काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. छान खरेदी होईल. सप्ताह अखेर कार्यक्षेत्राच्या दृष्टीने महत्वाच्या घटनांची ठरु शकेल. वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. कामे मार्गी लागतील. धनलाभाचेही योग आहेत.
उपासना: रोज महालक्ष्मीअष्टक या काळात जरुर म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, षष्ठस्थानात केतू, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात सूर्य, बुध, शनि, लाभस्थानात गुरु, शुक्र, नेपचून आणि व्ययस्थानात राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला शुक्र मेष राशित प्रवेश करेल. १३ तारखेला चंद्र-शनि केंद्रयोग होईल व मंगळ मिथुन राशित प्रवेश करेल. १४ तारखेला चंद्र-बुध केंद्रयोग व चंद्र-गुरु त्रिकोण होईल. १५ तारखेला चंद्र-मंगळ प्रतियोग व चंद्र-शनि लाभयोग होईल. १६ तारखेला चंद्र-गुरु केंद्रयोग होईल व बुध मीन राशित प्रवेश करेल. १७ तारखेला सूर्य व बुधाची युती होईल आणि चंद्राचा सूर्याशी व बुधाशी तर शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्र-गुरु लाभयोग होईल.
फलादेश- रविवारी आरोग्याच्या काही समस्या जाणवू शकतील. नंतरचे दोन दिवस चांगले असतील. जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांना चांगला काळ आहे. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळू शकेल. सप्ताह मध्य संमिश्र आहे. काही विचित्र घटना त्रास देऊ शकतील. अध्यात्मिक क्षेत्रातील लोकांना मात्र हा काळ अनुभुतीचा ठरु शकेल. ज्योतिषी, सर्जन यांना याच काळात विशेष लाभ होतील. काहींना या काळात विम्याद्वारे किंवा वडीलोपार्जित धन मिळेल. सप्ताहाच्या शेवटी भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. प्रवासाचे योग येतील. शिक्षण क्षेत्रातील लोकांना ग्रहमान अनुकूल आहे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला पंचमस्थानात केतू, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात सूर्य, बुध, शनि, दशमस्थानात गुरु, शुक्र, नेपचून, लाभस्थानात राहू, हर्षल आणि व्ययस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला शुक्र मेष राशित प्रवेश करेल. १३ तारखेला चंद्र-शनि केंद्रयोग होईल व मंगळ मिथुन राशित प्रवेश करेल. १४ तारखेला चंद्र-बुध केंद्रयोग व चंद्र-गुरु त्रिकोण होईल. १५ तारखेला चंद्र-मंगळ प्रतियोग व चंद्र-शनि लाभयोग होईल. १६ तारखेला चंद्र-गुरु केंद्रयोग होईल व बुध मीन राशित प्रवेश करेल. १७ तारखेला सूर्य व बुधाची युती होईल आणि चंद्राचा सूर्याशी व बुधाशी तर शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्र-गुरु लाभयोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस लाभदायक आहे. आपल्या आवडत्या छंदांसाठी वेळ काढाल. प्रेमी युगुलांसाठी छान कालावधी आहे. नंतरचे दोन दिवस तब्येतीच्या तक्रारी जाणवत रहातील. अॅसिडीटी/ पोटाचे आजार असतील तर काळजी घ्या. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता आहे. दैनंदिन कामातही अडचणी जाणवतील. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना मात्र अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर आनंदात वेळ घालवाल. व्यावसयिकांना फायदा देणार्या नवीन संधी चालून येतील. सप्ताहाच्या शेवट थोडासा कंटाळवाणा व त्रासदायक ठरू शकतो. एखादी मनाविरुध्द घटना शक्य. वाहने जपून चालवावीत.
उपासना: रोज महालक्ष्मीअष्टक या काळात जरुर म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात केतू, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात सूर्य, बुध, शनि, भाग्यस्थानात गुरु, शुक्र, नेपचून, दशमस्थानात राहू, हर्षल आणि लाभस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला शुक्र मेष राशित प्रवेश करेल. १३ तारखेला चंद्र-शनि केंद्रयोग होईल व मंगळ मिथुन राशित प्रवेश करेल. १४ तारखेला चंद्र-बुध केंद्रयोग व चंद्र-गुरु त्रिकोण होईल. १५ तारखेला चंद्र-मंगळ प्रतियोग व चंद्र-शनि लाभयोग होईल. १६ तारखेला चंद्र-गुरु केंद्रयोग होईल व बुध मीन राशित प्रवेश करेल. १७ तारखेला सूर्य व बुधाची युती होईल आणि चंद्राचा सूर्याशी व बुधाशी तर शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्र-गुरु लाभयोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस गृहसौख्याचा असणार आहे. नंतरचे दोन दिवससुध्दा चांगले असतील. लाभदायक ग्रहमान आहे. अपेक्षित गाठीभेटी होतील. आर्थिक सुयश लाभेल. काहींना छोटसं बक्षिस, भेटवस्तू, पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनाही चांगला कालावधी आहे. खेळाडूंना कमी श्रमात जास्त यश मिळेल. सप्ताह मध्यात तब्येतीची काळजी घेणे गरजेचे आहे. पोटासंबंधी काही तक्रारी जाणवतील. मधुमेह किंवा यकृतासंबंधी आजार असणार्यांनी पथ्यपाण्याकडे दुर्लक्ष करु नये. सप्ताह अखेर कौटुंबिक जीवनात एखादी चिंता लागून राहील. भागीदारीतील महत्वाचे निर्णय पुढे ढकलावेत.
उपासना: श्रीसूक्ताचे नियमित पठण या कालावधीत केलेले चांगले.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी केतू, षष्ठस्थानात प्लूटो, सप्तमस्थानात सूर्य, बुध, शनि, अष्टमस्थानात गुरु, शुक्र, नेपचून, भाग्यस्थानात राहू, हर्षल आणि दशमस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला शुक्र मेष राशित प्रवेश करेल. १३ तारखेला चंद्र-शनि केंद्रयोग होईल व मंगळ मिथुन राशित प्रवेश करेल. १४ तारखेला चंद्र-बुध केंद्रयोग व चंद्र-गुरु त्रिकोण होईल. १५ तारखेला चंद्र-मंगळ प्रतियोग व चंद्र-शनि लाभयोग होईल. १६ तारखेला चंद्र-गुरु केंद्रयोग होईल व बुध मीन राशित प्रवेश करेल. १७ तारखेला सूर्य व बुधाची युती होईल आणि चंद्राचा सूर्याशी व बुधाशी तर शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्र-गुरु लाभयोग होईल.
फलादेश- रविवारी भावंडांशी वाद होणार नाही याची काळजी घ्या. वादग्रस्त लेखन सोशल मिडियावर शेअर करु नका. नंतरचे दोन दिवस कौटुंबीक सौख्याचे असतील. मन प्रसन्न असेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. राहत्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. आर्किटेक्ट, बिल्डर्स तसेच हॉटेल व्यावसायिक यांना यांना फायदेशीर ग्रहमान आहे. प्रॉपर्टीची खरेदी विक्री करणार्या लोकांनाही अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्य व त्यानंतरचा काळ थोडा प्रतिकूल आहे. आरोग्यासंबंधी काही तक्रारी जाणवतील. विद्यार्थ्यांनी अती आत्मविश्वास टाळावा. अभ्यासाकडे दुर्लक्ष नको. गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. संततीशी या काळात वाद होणार नाही म्हणून दक्षता घ्या.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात केतू, पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी सूर्य, बुध, शनि, सप्तमस्थानात गुरु, शुक्र, नेपचून, अष्टमस्थानात राहू, हर्षल आणि भाग्यस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला शुक्र मेष राशित प्रवेश करेल. १३ तारखेला चंद्र-शनि केंद्रयोग होईल व मंगळ मिथुन राशित प्रवेश करेल. १४ तारखेला चंद्र-बुध केंद्रयोग व चंद्र-गुरु त्रिकोण होईल. १५ तारखेला चंद्र-मंगळ प्रतियोग व चंद्र-शनि लाभयोग होईल. १६ तारखेला चंद्र-गुरु केंद्रयोग होईल व बुध मीन राशित प्रवेश करेल. १७ तारखेला सूर्य व बुधाची युती होईल आणि चंद्राचा सूर्याशी व बुधाशी तर शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्र-गुरु लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताह छान असणार आहे. सप्ताहाची सुरुवात लाभदायक होईल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. काहींना प्रवासयोग शक्य. भावंडांची खुशाली कळेल. नातेवाईकांच्या भेटीचे योग येतील. नवीन विषयाचा अभ्यास सुरु करायला चांगला काळ आहे. सप्ताह मध्यात कौटुंबिक सौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. प्रॉपटींची कामे मार्गी लागतील. वैहाहिक सौख्य मिळेल. प्रेमिकांनाही विवाह ठरविण्यासाठी दिवस अनुकूल आहे. सप्ताह अखेरीस आपले आरोग्य सांभाळा. विद्यार्थ्यांनी अती आत्मविश्वास टाळावा. अभ्यासाकडे दुर्लक्ष नको.
उपासना: या काळात गणपती अथर्वशीर्षाचे नित्य पठण करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात सूर्य, बुध, शनि, षष्ठस्थानी गुरु, शुक्र, नेपचून, सप्तमस्थानात राहू, हर्षल आणि अष्टमस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला शुक्र मेष राशित प्रवेश करेल. १३ तारखेला चंद्र-शनि केंद्रयोग होईल व मंगळ मिथुन राशित प्रवेश करेल. १४ तारखेला चंद्र-बुध केंद्रयोग व चंद्र-गुरु त्रिकोण होईल. १५ तारखेला चंद्र-मंगळ प्रतियोग व चंद्र-शनि लाभयोग होईल. १६ तारखेला चंद्र-गुरु केंद्रयोग होईल व बुध मीन राशित प्रवेश करेल. १७ तारखेला सूर्य व बुधाची युती होईल आणि चंद्राचा सूर्याशी व बुधाशी तर शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्र-गुरु लाभयोग होईल.
फलादेश- रविवारी दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. जास्त दगदग करु नका. लोकांशी वाद टाळावेत. त्यानंतरचे दोन दिवस लाभदायक ग्रहमान आहे. धनलाभाची शक्यता आहे. मेजवानीचे योग येतील. मात्र अती खाणेपिणे टाळावे. कलाकारांना अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यात भावंडांशी वाद होणार नाही याची दक्षता घ्या. या काळात प्रवास नकोत. सोशल मिडियावर काही शेअर करीत असाल तर ते वादग्रस्त होणार नाही याची काळजी घ्यावी. सप्ताह अखेरीस राहत्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. विद्यार्थ्यांना व कलाकारांना चांगले ग्रहमान आहे.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात सूर्य, बुध, शनि, पंचमस्थानात गुरु, शुक्र, नेपचून, षष्ठस्थानी राहू, हर्षल, सप्तमस्थानात मंगळ आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला शुक्र मेष राशित प्रवेश करेल. १३ तारखेला चंद्र-शनि केंद्रयोग होईल व मंगळ मिथुन राशित प्रवेश करेल. १४ तारखेला चंद्र-बुध केंद्रयोग व चंद्र-गुरु त्रिकोण होईल. १५ तारखेला चंद्र-मंगळ प्रतियोग व चंद्र-शनि लाभयोग होईल. १६ तारखेला चंद्र-गुरु केंद्रयोग होईल व बुध मीन राशित प्रवेश करेल. १७ तारखेला सूर्य व बुधाची युती होईल आणि चंद्राचा सूर्याशी व बुधाशी तर शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्र-गुरु लाभयोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस खरेदीसाठी उत्तम आहे. कामे लवकर आटोपून आराम करण्याकडे कल असेल. नंतरचे दोन दिवस जोखीम असलेली कामे करु नका. महत्त्वाची कामे पुढे ढकला. वाहने सावकाश चालवा. संशोधक, भूसर्वेक्षण करणारे, पोलिस, खाजगी गुप्तहेर तसेच सर्जन यांना मात्र हा कालावधी उत्तम असणार आहे. सप्ताह मध्यात घरात आनंदी वातावरण असेल. काहींना धनलाभ होतील. संततीसौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मानसन्मानाचे योग आहेत. सप्ताहाच्या शेवटी काहींना प्रवास योग आहेत. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. प्रॉपर्टीच्या कामांसाठी कालावधी अनुकूल आहे.
उपासना: श्रीस्वामी समर्थांचा तारक मंत्र या काळात रोज म्हणावा किंवा ऐकावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी सूर्य, बुध, शनि, चतुर्थस्थानात गुरु, शुक्र, नेपचून, पंचमस्थानात राहू, हर्षल, षष्ठस्थानी मंगळ आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला शुक्र मेष राशित प्रवेश करेल. १३ तारखेला चंद्र-शनि केंद्रयोग होईल व मंगळ मिथुन राशित प्रवेश करेल. १४ तारखेला चंद्र-बुध केंद्रयोग व चंद्र-गुरु त्रिकोण होईल. १५ तारखेला चंद्र-मंगळ प्रतियोग व चंद्र-शनि लाभयोग होईल. १६ तारखेला चंद्र-गुरु केंद्रयोग होईल व बुध मीन राशित प्रवेश करेल. १७ तारखेला सूर्य व बुधाची युती होईल आणि चंद्राचा सूर्याशी व बुधाशी तर शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्र-गुरु लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला आवडत्या व्यक्तींच्या भेटीचे योग संभवतात. छान खरेदी होईल. काही अचानक खर्चही करावे लागतील. पुर्वी केलेल्या गुंतवणूकीतून लाभ संभवतात. मात्र बेकायदा असलेली कोणतीही गोष्ट या काळात करु नका. सप्ताह मध्यात काही छान अनुभव येतील. आपला आत्मविश्वास वाढलेला असेल. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल, प्रॉपटींची कामे मार्गी लागतील. सप्ताह अखेरीस कुटुंबीयांबरोबर वेळ मजेत जाणार आहे. धनलाभही होण्याची शक्यता आहे. घरातील वातावरण चांगले असेल.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात सूर्य, बुध, शनि, तृतीयस्थानी गुरु, शुक्र, नेपचून, चतुर्थस्थानात राहू, हर्षल, पंचमस्थानात मंगळ आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला शुक्र मेष राशित प्रवेश करेल. १३ तारखेला चंद्र-शनि केंद्रयोग होईल व मंगळ मिथुन राशित प्रवेश करेल. १४ तारखेला चंद्र-बुध केंद्रयोग व चंद्र-गुरु त्रिकोण होईल. १५ तारखेला चंद्र-मंगळ प्रतियोग व चंद्र-शनि लाभयोग होईल. १६ तारखेला चंद्र-गुरु केंद्रयोग होईल व बुध मीन राशित प्रवेश करेल. १७ तारखेला सूर्य व बुधाची युती होईल आणि चंद्राचा सूर्याशी व बुधाशी तर शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्र-गुरु लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होईल. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होणार आहे. मित्रमंडळींच्या/ नातेवाईकांच्या भेटीचे योग संभवतात. काही लाभ होण्याचीही शक्यता आहे. नविन नोकरीच्या संधी चालून येतील. मित्रमंडळी किंवा ओळखीतून तुमची नोकरीसाठी शिफारस केली जाऊ शकेल. जिम व्यावसायिक, फार्मासिस्ट तसेच वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना चांगले ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात अचानक काही खर्चही उद्भवू शकतात. उपासना करण्यार्यांना चांगले अनुभव येतील. जोखीम असलेली कामे या काळात करु नका. पण ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध परदेशाशी आहे त्यांना हाच काळ खूप फायदेशीर ठरु शकेल. सप्ताह अखेरीस आर्थिक स्थिती चांगली असेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. काहींना धनलाभ शक्य आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, बुध, शनि, धनस्थानात गुरु, शुक्र, नेपचून, तृतीयस्थानी राहू, हर्षल, चतुर्थस्थानात मंगळ, भाग्यस्थानात केतू आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला शुक्र मेष राशित प्रवेश करेल. १३ तारखेला चंद्र-शनि केंद्रयोग होईल व मंगळ मिथुन राशित प्रवेश करेल. १४ तारखेला चंद्र-बुध केंद्रयोग व चंद्र-गुरु त्रिकोण होईल. १५ तारखेला चंद्र-मंगळ प्रतियोग व चंद्र-शनि लाभयोग होईल. १६ तारखेला चंद्र-गुरु केंद्रयोग होईल व बुध मीन राशित प्रवेश करेल. १७ तारखेला सूर्य व बुधाची युती होईल आणि चंद्राचा सूर्याशी व बुधाशी तर शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्र-गुरु लाभयोग होईल.
फलादेश- रविवारी भाग्यवृध्दीकारक ग्रहमान आहे. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. प्रवासयोग शक्य. भावंडांशी संपर्क होईल. नंतरचे दोन दिवस विद्यार्थी, खेळाडू व कलाकार यांना उत्तम आहे. कमी श्रमात जास्त यश मिळेल. सप्ताह मध्यात व्यवसायिकांना लाभदायक काळ आहे. नोकरी करणार्यांनी वरीष्ठांशी जमवून घेतल्यास कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. सप्ताह मध्यानंतर काही लाभ होतील. आवडत्या व्यक्तींची भेट या काळात मनाला आनंद देईल. सप्ताहाच्या शेवटी जुन्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. खरेदीसाठी काळ चांगला आहे. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु, शुक्र, नेपचून, धनस्थानात राहू, हर्षल, तृतीयस्थानी मंगळ, अष्टमस्थानात केतू, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात सूर्य, बुध, शनि अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला शुक्र मेष राशित प्रवेश करेल. १३ तारखेला चंद्र-शनि केंद्रयोग होईल व मंगळ मिथुन राशित प्रवेश करेल. १४ तारखेला चंद्र-बुध केंद्रयोग व चंद्र-गुरु त्रिकोण होईल. १५ तारखेला चंद्र-मंगळ प्रतियोग व चंद्र-शनि लाभयोग होईल. १६ तारखेला चंद्र-गुरु केंद्रयोग होईल व बुध मीन राशित प्रवेश करेल. १७ तारखेला सूर्य व बुधाची युती होईल आणि चंद्राचा सूर्याशी व बुधाशी तर शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्र-गुरु लाभयोग होईल.
फलादेश- रविवारी गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. अचानक धनलाभाचे योग शक्य. एखाद्या पौराणिक किंवा ऐतिहासिक वास्तूला भेट द्याल. नंतरच्या दोन दिवसात भाग्यवृध्दीकारक ग्रहमान आहे. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मन प्रसन्न असेल. सप्ताह मध्यात तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. अनुकूल काळ आहे. लोकांचे सहकार्य मिळेल. सप्ताहाच्या शेवटी वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. काही खर्च उद्भवतील. बेकायदा गोष्टींपासून लांब रहा. अती दगदग टाळा.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)