अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (८ जानेवारी ते १४ जानेवारी २०२३)
(Astroshodh- astrology, vastu, numerology, astrologerinpune, bestastrologerinpune, famousastrologerinpune, astrologerinkothrud, vastucosultantinpune)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, हर्षल, धनस्थानात मंगळ(व), सप्तमस्थानात केतू, भाग्यस्थानात सूर्य, बुध(व), दशमस्थानात शुक्र, शनि, प्लूटो, लाभस्थानात नेपचून आणि व्ययस्थानात गुरु अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग, गुरुशी त्रिकोण व शुक्राशी प्रतियोग होईल. १० तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. ११ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. १३ तारखेला वक्री असलेला मंगळ मार्गी होईल व चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल आणि १४ तारखेला सूर्याचा मकर राशित प्रवेश होईल.
फलादेश- सप्ताहातील सुरुवातीला आवडत्या व्यक्तींबरोबर वेळ घालवाल. घरात छान वातावरण असेल. एखाद्या पार्टी किंवा गेट-टुगेदरमध्ये भाग घ्याल. मन प्रसन्न असेल. प्रॉपर्टी खरेदीसाठी किंवा विकण्यासाठीही ग्रहमान चांगले आहे. सप्ताहाचा मध्यात लाभदायक ग्रहमान आहे. मानसन्मानाचे योग आहेत. विद्यार्थ्यांना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल. तुमच्या कल्पनाशक्तीला वाव मिळेल. लेखक, साहित्यिक, प्रकाशक व खेळाडूंनाही अनुकूल ग्रहमान आहे. मात्र त्यासाठी जास्त मेहनतीची तयारी ठेवावी लागेल. सप्ताहाच्या शेवटी नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. नोकरीच्या शोधात असणार्यांना काही नवीन संधी मिळू शकतील. मात्र या काळात तुमच्या तब्येतीची काळजी घेणे आवश्यक आहे.
उपासना: या काळात सूर्योपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ(व), षष्ठस्थानात केतू, अष्टमस्थानात सूर्य, बुध(व), भाग्यस्थानात शुक्र, शनि, प्लूटो, दशमस्थानात नेपचून, लाभस्थानात गुरु आणि व्ययस्थानात राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग, गुरुशी त्रिकोण व शुक्राशी प्रतियोग होईल. १० तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. ११ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. १३ तारखेला वक्री असलेला मंगळ मार्गी होईल व चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल आणि १४ तारखेला सूर्याचा मकर राशित प्रवेश होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला भावंडांसंदर्भात चांगली बातमी कळेल. लेखक, ब्लॉगर्स व साहित्यिकांना अनुकूल ग्रहमान आहेत. काहीतरी छान काम होईल. या काळात केलेले प्रवास फायदेशीर ठरतील. सप्ताह मध्यात व नंतर संमिश्र ग्रहमान आहे. ज्योतिषशास्त्र, रेकी, अंकशास्त्र किंवा इतर गूढ विषयांचा अभ्यास करणार्यांना चांगला कालावधी आहे मात्र प्रॉपर्टीचे व्यवहार सध्या काही दिवस न केलेलेच बरे. प्रवास करणार असाल तर योग्य ती काळजी घ्यावी. वाहनांची योग्य ती देखभाल योग्य व्यक्तीकडून करून घ्यावी. विद्यार्थ्यांनी अती आत्मविश्वास टाळावा. अभ्यासाकडे दुर्लक्ष नको. संततीशी वाद टाळा. याचबरोबर या काळात वरीष्ठांशी वाद होतील असे वर्तन होऊ देवू नका. आपले काम बरे आणि आपण बरे हे धोरण ठेवावे.
उपासना: या काळात दत्तबावनी रोज म्हणावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला पंचमस्थानात केतू, सप्तमस्थानात सूर्य, बुध(व), अष्टमस्थानात शुक्र, शनि, प्लूटो, भाग्यस्थानात नेपचून, दशमस्थानात गुरु, लाभस्थानात राहू, हर्षल आणि व्ययस्थानात मंगळ(व) अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग, गुरुशी त्रिकोण व शुक्राशी प्रतियोग होईल. १० तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. ११ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. १३ तारखेला वक्री असलेला मंगळ मार्गी होईल व चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल आणि १४ तारखेला सूर्याचा मकर राशित प्रवेश होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला कुटुंबीयांसोबत वेळ छान जाईल. धनलाभ संभवतो. संभाषण कौशल्याच्या जोरावर एखाद्या कामात यश मिळेल. सप्ताह मध्यात मनासारखं काम होईल. त्यामुळे खुषीत असाल. तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल. वरीष्ठांचे व वडीलधारी मंडळींचे चांगले सहकार्य मिळणार आहे. लेखकांना चांगला काळ आहे. सप्ताह अखेरीस भावंडांबद्दल चांगली बातमी कळेल. साहित्यिक/ लेखकांचं कौतुक होण्याची शक्यता आहे. संततीची प्रगती मनाला आनंद देणारी ठरेल. कलाकारांना व विद्यार्थ्यांना हा कालावधी उत्तम आहे. एखादा धनलाभ प्रलंबित असेल तर त्यासाठीही ग्रहमान अनुकूल आहे. हा पूर्ण सप्ताह विवाहोत्सुक मंडळींना विवाह ठरविण्यासाठी चांगला आहे.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात केतू, षष्ठस्थानात सूर्य, बुध(व), सप्तमस्थानात शुक्र, शनि, प्लूटो, अष्टमस्थानात नेपचून, भाग्यस्थानात गुरु, दशमस्थानात राहू, हर्षल आणि लाभस्थानात मंगळ(व) अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग, गुरुशी त्रिकोण व शुक्राशी प्रतियोग होईल. १० तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. ११ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. १३ तारखेला वक्री असलेला मंगळ मार्गी होईल व चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल आणि १४ तारखेला सूर्याचा मकर राशित प्रवेश होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीस मन प्रसन्न असेल. कुटुंबीयांसोबत वॆळ छान जाईल. आत्मविश्वास वाढविणार्या घटना घडतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. लोकांचे अपेक्षित सहकार्य लाभेल. सप्ताह मध्यात आपल्या आवडीच्या पदार्थांवर मस्त ताव माराल. मात्र खाण्यापिण्यावर थोडा संयम या काळात बाळगायला हवा तसेच डोळ्यांची काळजी या काळात घ्यावी. तुमच्या बोलण्यामुळे लोक दुखावले जाऊ शकतील. बोलण्यावर संयम ठेवा. सप्ताह मध्यानंतर विद्यार्थी, लेखक, साहित्यिक, ब्लॉगर्स यांना ग्रहमान अनुकूल आहे. एखादा धनलाभ किंवा एखादं बक्षिस मिळण्याचे योग आहे. सप्ताह अखेरीस तब्येतीसंबंधी काही कुरबुरी जाणवतील. वादग्रस्त लेखन सोशल मिडियावर यादरम्यान करु नका.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी केतू, पंचमस्थानात सूर्य, बुध(व), षष्ठस्थानात शुक्र, शनि, प्लूटो, सप्तमस्थानात नेपचून, अष्टमस्थानात गुरु, भाग्यस्थानात राहू, हर्षल आणि दशमस्थानात मंगळ(व) अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग, गुरुशी त्रिकोण व शुक्राशी प्रतियोग होईल. १० तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. ११ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. १३ तारखेला वक्री असलेला मंगळ मार्गी होईल व चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल आणि १४ तारखेला सूर्याचा मकर राशित प्रवेश होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात काही खर्च घेऊन येणार आहे. मनात विनाकारण कोणत्यातरी चिंता येत रहातील. पारमार्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्यांना मात्र उत्तम ग्रहमान आहे. सप्ताहाच्या मध्यात चांगलं काम होईल. त्यापासून काही लाभही होतील. त्यामुळे खुषीत असाल. घरातही प्रसन्न वातावरण असेल. मित्र किंवा आवडत्या व्यक्तींच्या भेटी मनाला आनंद देतील. विद्यार्थ्यांना व कलाकारांना चांगले ग्रहमान आहे. सप्ताहाच्या मध्यात लागलेला शुभ ग्रहांचा सूर सप्ताहाच्या शेवटीसुध्दा कायम रहाणार आहे. काहींना धनलाभ होतील. कुटुंबीयांबरोबर वेळ मजेत जाईल.
उपासना: ’ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: ’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात केतू, चतुर्थस्थानात सूर्य, बुध(व), पंचमस्थानात शुक्र, शनि, प्लूटो, षष्ठस्थानी नेपचून, सप्तमस्थानात गुरु, अष्टमस्थानात राहू, हर्षल आणि भाग्यस्थानात मंगळ(व) अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग, गुरुशी त्रिकोण व शुक्राशी प्रतियोग होईल. १० तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. ११ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. १३ तारखेला वक्री असलेला मंगळ मार्गी होईल व चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल आणि १४ तारखेला सूर्याचा मकर राशित प्रवेश होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात छान होईल. ग्रहमान अनुकूल आहे. काही लाभ होऊ शकतात. मित्रांच्या किंवा आप्तांच्या भेटीचे योग येतील. मन प्रसन्न असेल. तुमची एखादी महत्वाकांक्षा या काळात पूर्ण होऊ शकेल. सप्ताहाच्या मध्यात काही खर्च अचानक सामोरे येतील. प्रॉपर्टीची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. परदेशाशी ज्यांचे व्यावसायिक संबंध आहेत त्यांना मात्र हा काळ अनुकूल आहे. धार्मिक गोष्टींसाठीही काळ चांगला आहे. सप्ताहाचा शेवट छान जाणार आहे. धनलाभ होतील. कुटुंबात आनंदी वातावरण असेल. कलाकारांसाठी विशेषत: गायकांना हा काळ अतिशय चांगला आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, तृतीयस्थानी सूर्य, बुध(व), चतुर्थस्थानात शुक्र, शनि, प्लूटो, पंचमस्थानात नेपचून, षष्ठस्थानी गुरु, सप्तमस्थानात राहू, हर्षल आणि अष्टमस्थानात मंगळ(व) अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग, गुरुशी त्रिकोण व शुक्राशी प्रतियोग होईल. १० तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. ११ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. १३ तारखेला वक्री असलेला मंगळ मार्गी होईल व चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल आणि १४ तारखेला सूर्याचा मकर राशित प्रवेश होईल.
फलादेश- सप्ताहात सुरुवातीला आपल्या कार्यक्षेत्रात चांगले काम झाल्याने वरीष्ठ खूष असतील. काहींना वरीष्ठांकडून न मागता सहकार्य मिळेल. व्यावसायिकांना केलेल्या कामाचा चांगला मोबदला मिळाल्याने खूष असतील. सप्ताह मध्यात ग्रहांची अनुकूलता अजूनच वाढणार आहे. काहींचा मित्रांबरोबर/ आप्तेष्टांबरोबर वेळ मजेत जाणार आहे. काही लाभदायक घटना घडतील. तुमच्यातल्या कौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. सप्ताहाच्या शेवटी पारमार्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्यांना उत्तम ग्रहमान असणार आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून फ़ायदा मिळण्याची शक्यता आहे.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
–अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात सूर्य, बुध(व), तृतीयस्थानी शुक्र, शनि, प्लूटो, चतुर्थस्थानात नेपचून, पंचमस्थानात गुरु, षष्ठस्थानी राहू, हर्षल, सप्तमस्थानात मंगळ(व) आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग, गुरुशी त्रिकोण व शुक्राशी प्रतियोग होईल. १० तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. ११ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. १३ तारखेला वक्री असलेला मंगळ मार्गी होईल व चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल आणि १४ तारखेला सूर्याचा मकर राशित प्रवेश होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. सप्ताह मध्यात तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. कौटुंबीक सौख्य मिळेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. धनलाभ होईल. व्यावसयिकांना फायदा देणार्या नवीन संधी चालून येतील. सप्ताहाच्या शेवटी संमिश्र ग्रहमान आहे. काहींना धनलाभ शक्य आहे. मित्रांच्या भेटीचे योग संभवतात. मात्र एखाद्या मित्राच्या विचित्र वागण्य़ाने त्रास होण्याची शक्यता आहे. काळजी घ्यावी. विमा व्यावसायिक, मानसोपचारतज्ञ, थेरपिस्ट यांना या काळात चांगला फायदा मिळेल.
उपासना: ’ विठ्ठल ’ नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, बुध(व), धनस्थानात शुक्र, शनि, प्लूटो, तृतीयस्थानी नेपचून, चतुर्थस्थानात गुरु, पंचमस्थानात राहू, हर्षल, षष्ठस्थानी मंगळ(व) आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग, गुरुशी त्रिकोण व शुक्राशी प्रतियोग होईल. १० तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. ११ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. १३ तारखेला वक्री असलेला मंगळ मार्गी होईल व चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल आणि १४ तारखेला सूर्याचा मकर राशित प्रवेश होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला संमिश्र घटनांचा काळ आहे. मनाचा तोल जाऊ देऊ नये. ज्योतिषशास्त्र, मानसशास्त्र, परामानसशास्त्र अशा गूढ विषयांचा अभ्यास करणार्यांना अनुकूल काळ आहे. सप्ताहाचा मध्य उपासना करण्यास चांगला आहे. काहींच्या बाबतीत भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. काहींना प्रवासाचे योग संभवतात. सप्ताहाच्या शेवटी तुमचा आत्मविश्वास चांगलाच वाढलेला असेल. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगलं काम घडॆल. त्याचा मोबदलाही चांगला मिळाल्याने खुशीत असाल. लाभदायक काळ आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शुक्र, शनि, प्लूटो, धनस्थानात नेपचून, तृतीयस्थानी गुरु, चतुर्थस्थानात राहू, हर्षल, पंचमस्थानात मंगळ(व), दशमस्थानात केतू आणि व्ययस्थानात सूर्य, बुध(व) अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग, गुरुशी त्रिकोण व शुक्राशी प्रतियोग होईल. १० तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. ११ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. १३ तारखेला वक्री असलेला मंगळ मार्गी होईल व चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल आणि १४ तारखेला सूर्याचा मकर राशित प्रवेश होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराबरोबर वेळ छान व्यतीत करू शकाल. जोडीदाराबद्दल एखादी चांगली बातमी कळू शकेल. मस्त पार्टीचा मूड असेल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांना चांगले ग्रहमान आहे. सप्ताह मध्य संमिश्र घटनांचा ठरु शकेल. महत्वाचे निर्णय शक्यतो या दरम्यान घेऊ नका. जोखीम असलेली कोणतेही काम यादरम्यान करु नका. दैनंदिन कामातही अडचणी जाणवतील. नृत्यकलेशी संबंधितांना, विमा व्यावसायिकांना मात्र हाच काळ अनुकूल ठरणार आहे. मानसोपचातज्ञ, पुराणवस्तू संशोधक, इतिहासकार, ज्योतिषी इ. लोकांनाही हा काळ चांगला आहे. सप्ताहाच्या शेवटी काही भाग्यवर्धक गोष्टी घडू शकतील. धार्मिक गोष्टीत मन रमेल. काहींना प्रवासाचे योग संभवतात.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी नेपचून, धनस्थानात गुरु, तृतीयस्थानी राहू, हर्षल, चतुर्थस्थानात मंगळ(व), भाग्यस्थानात केतू, लाभस्थानात सूर्य, बुध(व) आणि व्ययस्थानात शुक्र, शनि, प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग, गुरुशी त्रिकोण व शुक्राशी प्रतियोग होईल. १० तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. ११ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. १३ तारखेला वक्री असलेला मंगळ मार्गी होईल व चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल आणि १४ तारखेला सूर्याचा मकर राशित प्रवेश होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला तब्येतीची काळजी घ्यावी. शत्रूंच्या कारवाया वाढतील. नवीन नोकरीसाठी प्रयत्न करणारे, वकील तसेच केमिस्ट यांना मात्र हा कालावधी चांगला जाईल. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वेळ छान व्यतीत होईल. चांगले धनलाभ होण्याची शक्यता आहे. भागीदरीत व्यवसाय करणार्यांसाठीही चांगला काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी जोखीम असलेले कोणतेही काम करु नका. विद्यार्थ्यांनी अती आत्मविश्वास टाळावा. अभ्यासाकडे दुर्लक्ष नको. प्रेमिकांनी एकमेकांबद्द्ल गैरसमज निर्माण होईल असे वर्तन टाळावे.
उपासना: या काळात सुर्योपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु, धनस्थानात राहू, हर्षल, तृतीयस्थानी मंगळ(व), अष्टमस्थानात केतू, दशमस्थानात सूर्य, बुध(व) लाभस्थानात शुक्र, शनि, प्लूटो आणि व्ययस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग, गुरुशी त्रिकोण व शुक्राशी प्रतियोग होईल. १० तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. ११ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. १३ तारखेला वक्री असलेला मंगळ मार्गी होईल व चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल आणि १४ तारखेला सूर्याचा मकर राशित प्रवेश होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला मुलांकडून सुवार्ता कळतील. विद्यार्थी व कलाकार यांना चांगला काळ आहे. काही भाग्यवर्धक घटना शक्य. प्रेमी जीवांनाही हा कालावधी चांगला आहे. सप्ताह मध्य तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे याची जाणीव करुन देणारा आहे. व्यायाम किंवा योगासने करत नसाल तर आता त्याची सुरुवात जरुर कारावी. वकील, फार्मासिस्ट आणि वैद्यकीय व्यावसायिकांसाठी हा काळ अनुकूल आहे. नोकरीत वरीष्ठांचे सहकार्य चांगले मिळेल. सप्ताहाच्या शेवटी भाग्यवर्धक घटनांचा काळ असेल. जोडीदाराबरोबर वेळ छान व्यतीत होईल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांना अनुकूल काळ आहे.
उपासना: रामरक्षेचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)