अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२८ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर २०२२)

(Astroshodh- astrology, vastu, numerology, astrologerinpune, bestastrologerinpune, famousastrologerinpune, astrologerinkothrud, vastucosultantinpune)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, हर्षल, धनस्थानात मंगळ, चतुर्थस्थानात शुक्र, पंचमस्थानात सूर्य, षष्ठस्थानात बुध, सप्तमस्थानात केतू, दशमस्थानात शनि(व), प्लूटो आणि व्ययस्थानात गुरु(व), नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला शुक्र-शनि प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्र-बुध युती व चंद्र-गुरु प्रतियोग होईल. ३१ तारखेला चंद्र-शुक्र लाभयोग होईल आणि शुक्र सिंह राशित प्रवेश करेल. १ तारखेला सूर्य-चंद्र व मंगळ-गुरु लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्र-बुध लाभयोग तर चंद्र-मंगळ व बुध-गुरु प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला म्हणजे रविवारी मुलांबरोबर वेळ छान जाईल. एखाद्या मेजवानी किंवा समारंभात भाग घ्याल. विद्यार्थी व कलाकारांना अनुकूल कालावधी आहे. प्रेमिकांना हा काळ विशेष चांगला आहे. विवाहोत्सूक व्यक्तींना ग्रहमान अनुकूल आहे. सोमवार, मंगळवार नोकरदारांसाठी चांगले आहे. नोकरीबदल, बदली किंवा बढतीच्या प्रयत्नात असणार्‍यांना काही अनुकूल घटना अपेक्षित आहेत. मात्र तब्येतीच्या काही तक्रारी जाणवू शकतील. सप्ताहाचा मध्यानंतर जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांसाठी चांगला कालावधी आहे. सप्ताहाच्या शेवटी गूढ विषय तुम्हाला आकर्षित करतील. अचानक धनलाभाचे योग काहींना शक्य.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, तृतीयस्थानी शुक्र, चतुर्थस्थानात सूर्य, पंचमस्थानात बुध, षष्ठस्थानात केतू, भाग्यस्थानात शनि(व), प्लूटो, लाभस्थानात गुरु(व), नेपचून आणि व्ययस्थानात राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला शुक्र-शनि प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्र-बुध युती व चंद्र-गुरु प्रतियोग होईल. ३१ तारखेला चंद्र-शुक्र लाभयोग होईल आणि शुक्र सिंह राशित प्रवेश करेल. १ तारखेला सूर्य-चंद्र व मंगळ-गुरु लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्र-बुध लाभयोग तर चंद्र-मंगळ व बुध-गुरु प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला मौज मजा करण्याकडे कल असेल. काहींना अचानक लाभ किंवा एखादी मिळालेली शाबासकीची थाप सुखावून टाकेल. प्रॉपर्टी खरेदी/ विक्रीसाठी अनुकूल काळ आहे. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना व कलाकारांना अनुकूल आहे. कमी श्रमात जास्त यश मिळेल. अचानक धनलाभ सुखावून टाकेल. प्रेमिकांसाठीही चांगला काळ आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर काहींना नवीन नोकरीच्या संधी चालून येतील. मात्र आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवत रहातील तिकडे दुर्लक्ष करु नका. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्या. जोडीदाराच्या तब्येतीलाही जपावे.
उपासना: विठ्ठल नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी शुक्र, तृतीयस्थानी सूर्य, चतुर्थस्थानात बुध, पंचमस्थानात केतू, अष्टमस्थानात शनि(व), प्लूटो, दशमस्थानात गुरु(व), नेपचून, लाभस्थानात राहू, हर्षल आणि व्ययस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला शुक्र-शनि प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्र-बुध युती व चंद्र-गुरु प्रतियोग होईल. ३१ तारखेला चंद्र-शुक्र लाभयोग होईल आणि शुक्र सिंह राशित प्रवेश करेल. १ तारखेला सूर्य-चंद्र व मंगळ-गुरु लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्र-बुध लाभयोग तर चंद्र-मंगळ व बुध-गुरु प्रतियोग होईल.
फलादेश- रविवारी भावंडे, नातेवाईक किंवा शेजारी यांच्यासाठी वेळ काढावा लागेल. छोट्या प्रवासाचे योग संभवतात. कवी, कलाकार व लेखकांसाठी चांगला काळ आहे. सोमवार, मंगळवार घरात छान वातावरण असेल. आपल्या आवडत्या लोकांबरोबर वेळ घालवाल. प्रॉपर्टीचे व्यवहार करण्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर लाभदायक ग्रहमान आहे. विद्यार्थ्यांना व कलाकारांना चांगले ग्रहमान आहे. संततीच्या प्रगतीमुळे सुखावून जाल. सप्ताहाच्या शेवटी तब्येतीच्या तक्रारी जाणवत रहातील. अ‍ॅसिडिटी, पोटाचे, उष्णतेचे काही त्रास असतील तर त्यांनी या काळात काळजी घ्यावी. आपल्या बोलण्याने कोणी दुखावले जाण्याची शक्यता आहे. काळजी घ्यावी.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शुक्र, धनस्थानात सूर्य, तृतीयस्थानी बुध, चतुर्थस्थानात केतू, सप्तमस्थानात शनि(व), प्लूटो, भाग्यस्थानात गुरु(व), नेपचून, दशमस्थानात राहू, हर्षल आणि लाभस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला शुक्र-शनि प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्र-बुध युती व चंद्र-गुरु प्रतियोग होईल. ३१ तारखेला चंद्र-शुक्र लाभयोग होईल आणि शुक्र सिंह राशित प्रवेश करेल. १ तारखेला सूर्य-चंद्र व मंगळ-गुरु लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्र-बुध लाभयोग तर चंद्र-मंगळ व बुध-गुरु प्रतियोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस संमिश्र आहे. बोलण्यावर संयम ठेवावा. तब्येतीची काळजी घ्या. प्रिय
व्यक्तींच्या भेटीचा योग शक्य. नंतरचे दोन दिवस प्रवासाचे योग येऊ शकतात. हाती घेतलेल्या कामात सुयश मिळेल. आत्मविश्वास वाढविणारी घटना घडेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. भावंडांशी संपर्क होईल. सप्ताह मध्यानंतर प्रॉपर्टीच्या कामांसाठी अनुकूल काळ आहे. सप्ताह अखेरीस विद्यार्थी, कलाकार, खेळाडू यांना अनुकूल ग्रहमान आहे. शेअर मार्केट सारख्या जोखीम असलेल्या ठिकाणी गुंतवणूक करतांना योग्य ती काळजी घ्यावी. पैशांची कामे लांबू शकतील. एखाद्या मित्राचा विचित्र अनुभव येण्याची शक्यता आहे.
उपासना: गायत्री मंत्राचा जप करणे या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, धनस्थानात बुध तृतीयस्थानी केतू, षष्ठस्थानात शनि(व), प्लूटो, अष्टमस्थानात गुरु(व), नेपचून, भाग्यस्थानात राहू, हर्षल, दशमस्थानात मंगळ आणि व्ययस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला शुक्र-शनि प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्र-बुध युती व चंद्र-गुरु प्रतियोग होईल. ३१ तारखेला चंद्र-शुक्र लाभयोग होईल आणि शुक्र सिंह राशित प्रवेश करेल. १ तारखेला सूर्य-चंद्र व मंगळ-गुरु लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्र-बुध लाभयोग तर चंद्र-मंगळ व बुध-गुरु प्रतियोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. नंतरचे दोन दिवस घरातील लोकांबरोबर छान जातील. व्यावसायिकांना अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यात आपल्या लेखनामुळे किंवा बोलण्यामुळे कोणी दुखावले जाणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे. प्रवास करणार असाल तर शक्यती सर्व काळजी घेतलेली बरी. सप्ताहाच्या मध्यानंतर काही भाग्यवर्धक घटना घडण्याची शक्यता आहे. सप्ताह अखेरीस प्रॉपर्टीच्या कामांसाठी अनुकूल ग्रहमान आहे.
उपासना: ’ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: ’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी बुध, धनस्थानात केतू, पंचमस्थानात शनि(व), प्लूटो, सप्तमस्थानात गुरु(व), नेपचून, अष्टमस्थानात राहू, हर्षल, भाग्यस्थानात मंगळ, लाभस्थानात शुक्र आणि व्ययस्थानात सूर्य अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला शुक्र-शनि प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्र-बुध युती व चंद्र-गुरु प्रतियोग होईल. ३१ तारखेला चंद्र-शुक्र लाभयोग होईल आणि शुक्र सिंह राशित प्रवेश करेल. १ तारखेला सूर्य-चंद्र व मंगळ-गुरु लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्र-बुध लाभयोग तर चंद्र-मंगळ व बुध-गुरु प्रतियोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस खरेदीसाठी चांगला आहे. आपल्या आवडत्या व्यक्तींबरोबर मस्त खरेदीला जायला हरकत नाही. सोमवार, मंगळवार चांअगले आहेत. दैनंदिन कामे मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील. सप्ताह मध्यात काहींना धनलाभाचे योग येतील. आर्थिक सुयश लाभेल. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचा योग शक्य आहे. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या शेवटी उत्तम ग्रहमान आहे. तुमच्यातल्या कलाकौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. भाग्यवृध्दीकारक योग आहे्त. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. प्रवासयोग शक्य.
उपासना: या काळात महालक्ष्मीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, चतुर्थस्थानात शनि(व), प्लूटो, षष्ठस्थानी गुरु(व), नेपचून, सप्तमस्थानात राहू, हर्षल, अष्टमस्थानात मंगळ, दशमस्थानात शुक्र, लाभस्थानात सूर्य आणि व्ययस्थानात बुध अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला शुक्र-शनि प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्र-बुध युती व चंद्र-गुरु प्रतियोग होईल. ३१ तारखेला चंद्र-शुक्र लाभयोग होईल आणि शुक्र सिंह राशित प्रवेश करेल. १ तारखेला सूर्य-चंद्र व मंगळ-गुरु लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्र-बुध लाभयोग तर चंद्र-मंगळ व बुध-गुरु प्रतियोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस मित्रांच्या किंवा आवडत्या व्यक्तींच्या भेटीचा असेल. घरात एखादी पार्टी किंवा समारंभाचे आयोजन करायला हरकत नाही. धनलाभ होण्याचेही योग आहेत. नंतरचे दोन दिवसांत पूर्वी केलेल्या एखद्या गुंतवणूकीतून फ़ायदा होऊ शकेल. कलाकारांना विशेषत: नृत्यकलेशी संबंधितांना अतिशय चांगला काळ आहे. अती दगदग मात्र या काळात टाळावी. सप्ताह मध्यानंतर काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. व्यावसयिकांना फायदा देणार्‍या नवीन संधी चालून येतील. काहींना धनलाभ शक्य आहे. सप्ताह अखेरीस जोखीम असलेली कामे करु नका. महत्त्वाची कामे पुढे ढकला. शनिवारी वाहने सावकाश चालवा.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी शनि(व), प्लूटो, पंचमस्थानात गुरु(व), नेपचून, षष्ठस्थानी राहू, हर्षल, सप्तमस्थानात मंगळ, भाग्यस्थानात शुक्र, दशमस्थानात सूर्य, लाभस्थानात बुध आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला शुक्र-शनि प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्र-बुध युती व चंद्र-गुरु प्रतियोग होईल. ३१ तारखेला चंद्र-शुक्र लाभयोग होईल आणि शुक्र सिंह राशित प्रवेश करेल. १ तारखेला सूर्य-चंद्र व मंगळ-गुरु लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्र-बुध लाभयोग तर चंद्र-मंगळ व बुध-गुरु प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला कार्यक्षेत्रात छान काम होणार आहे. वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. व्यवसायातील लोकांना केलेल्या कामाचा मोबदला व्यवस्थित मिळाल्याने मन प्रसन्न राहील. सप्ताह मध्यात प्रवासाचे योग येऊ शकतील. आवडत्या लोकांच्या भेटी होतील. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. सप्ताह मध्यानंतर मनाविरुध्द काही अनपेक्षित खर्च करावे लागू शकतात. जोखीम असलेली कामे करु नका. सप्ताह अखेरीस आपल्या कामात हलगर्जीपणा करु नका आणि आपली मते दुसर्‍यांवर लादू नका.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात शनि(व), प्लूटो, चतुर्थस्थानात गुरु(व), नेपचून, पंचमस्थानात राहू, हर्षल, षष्ठस्थानात मंगळ, अष्टमस्थानात शुक्र, भाग्यस्थानात सूर्य, दशमस्थानात बुध आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला शुक्र-शनि प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्र-बुध युती व चंद्र-गुरु प्रतियोग होईल. ३१ तारखेला चंद्र-शुक्र लाभयोग होईल आणि शुक्र सिंह राशित प्रवेश करेल. १ तारखेला सूर्य-चंद्र व मंगळ-गुरु लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्र-बुध लाभयोग तर चंद्र-मंगळ व बुध-गुरु प्रतियोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस भाग्यवर्धक घटनांचा ठरु शकेल. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. सोमवार, मंगळवार आपल्या कामात आत्मविश्वास वाढेल. वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. त्यांच्याकडून एखादी मागणी मान्य करुन घेण्यासाठी अनुकूल काळ आहे. कौटुंबीक जीवनात चांगल्या घटना शक्य. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील. सप्ताह मध्यानंतर मित्रमैत्रिणिंच्या भेटीचे योग संभवतात. काहींना धनलाभ शक्य आहेत. सप्ताह अखेर पारमार्थिक उन्नतीसाठी अनुकूल आहे.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि(व), प्लूटो, तृतीयस्थानी गुरु(व), नेपचून, चतुर्थस्थानात राहू, हर्षल, पंचमस्थानात मंगळ, सप्तमस्थानात शुक्र, अष्टमस्थानात सूर्य, भाग्यस्थानात बुध आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला शुक्र-शनि प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्र-बुध युती व चंद्र-गुरु प्रतियोग होईल. ३१ तारखेला चंद्र-शुक्र लाभयोग होईल आणि शुक्र सिंह राशित प्रवेश करेल. १ तारखेला सूर्य-चंद्र व मंगळ-गुरु लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्र-बुध लाभयोग तर चंद्र-मंगळ व बुध-गुरु प्रतियोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस संमिश्र घटनांना असू शकेल. वडीलधारी मंडळींचा सहवास लाभेल. कलाकारांना अनुकूल ग्रहमान आहे. मात्र अती दगदग या कालावधीत टाळावी. सोमवार, मंगळवार भाग्यकारक घटनांचे ठरु शकतील. काहींना धनलाभ होतील. शिक्षणक्षेत्रातील लोकांना हा काळ चांगला आहे. सप्ताह मध्यानंतर तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. व्यावसायिकांना फायदेशीर काळ आहे. सप्ताह अखेरीस मित्रांच्या/ आप्तांच्या भेटीचे योग संभवतात. लाभदायक ग्रहमान आहे.
उपासना: विठ्ठल नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात गुरु(व), नेपचून, तृतीयस्थानी राहू, हर्षल, चतुर्थस्थानात मंगळ, षष्ठस्थानी शुक्र, सप्तमस्थानात सूर्य, अष्टमस्थानात बुध, भाग्यस्थानात केतू आणि व्ययस्थानात शनि(व), प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला शुक्र-शनि प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्र-बुध युती व चंद्र-गुरु प्रतियोग होईल. ३१ तारखेला चंद्र-शुक्र लाभयोग होईल आणि शुक्र सिंह राशित प्रवेश करेल. १ तारखेला सूर्य-चंद्र व मंगळ-गुरु लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्र-बुध लाभयोग तर चंद्र-मंगळ व बुध-गुरु प्रतियोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस जोडीदाराबरोबर मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांनाही दिवस चांगला आहे. नंतरचे दोन दिवस तब्येतीची काळजी घ्यावी. धोका असलेले कुठलेही काम करु नये. विमा क्षेत्रातील लोकांना काळ अनुकूल आहे. गूढ विषय आज तुम्हाला आकर्षित करतील. काहींना अचानक धनलाभाचे योग शक्य. सप्ताह मध्यानंतर धार्मिक गोष्टींसाठी चांगला काळ आहे. काहींना प्रवासाचे योग येतील. परदेशगमनासाठी अनुकूल ग्रहमान आहे. कलाकारांना हा कालावधी छान आहे. तब्येतीची मात्र काळजी घ्या. सप्ताहाच्या शेवटी आपला आत्मविश्वास वाढलेला असेल.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु(व), नेपचून, धनस्थानात राहू, हर्षल, तृतीयस्थानी मंगळ, पंचमस्थानात शुक्र, षष्ठस्थानात सूर्य, सप्तमस्थानात बुध, अष्टमस्थानात केतू आणि लाभस्थानात शनि(व), प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला शुक्र-शनि प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्र-बुध युती व चंद्र-गुरु प्रतियोग होईल. ३१ तारखेला चंद्र-शुक्र लाभयोग होईल आणि शुक्र सिंह राशित प्रवेश करेल. १ तारखेला सूर्य-चंद्र व मंगळ-गुरु लाभयोग होईल. ३ तारखेला चंद्र-बुध लाभयोग तर चंद्र-मंगळ व बुध-गुरु प्रतियोग होईल.
फलादेश- रविवार संमिश्र आहे. तब्येतीची काळजी घ्या. हितशत्रूंवर लक्ष ठेवा. नंतरचे दोन दिवस जोडीदाराबरोबर लाभदायक ग्रहमान आहे. वैहाहिक सौख्य मिळेल. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील. सप्ताहाच्या मध्यानंतर वाहने जपून चालवा व वाहतुकीचे नियम पाळावेत. ज्योतिष, अध्यात्म, मानसशास्त्र, योगशास्त्र या विषयाच्या अभ्यासकांना अनुकूल ग्रहमान आहे. काहींना सूचक स्वप्ने पडतील. सप्ताहाच्या शेवटी लाभदायक ग्रहमान आहे.
उपासना: ’ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: ’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)