अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२४ जुलै ते ३० जुलै २०२२)
(Astroshodh- astrology, vastu, numerology, astrologerinpune, bestastrologerinpune, famousastrologerinpune, astrologerinkothrud, vastucosultantinpune)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, राहू, हर्षल तृतीयस्थानी शुक्र, चतुर्थस्थानात सूर्य, बुध, सप्तमस्थानात केतू, दशमस्थानात शनि(व), प्लूटो, आणि व्ययस्थानात गुरु, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग, गुरुशी केंद्रयोग व शनिशी युती होईल याचबरोबर बुधाचा मंगळाशी केंद्रयोगही होईल. २८ तारखेला चंद्राची सूर्याशी युती व गुरुशी त्रिकोण होईल. २९ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व बुधाशी युती होईल. ३० तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात प्रिय घटनांनी होईल. प्रिय व्यक्तींच्या भेटीचे योग येतील. धनलाभाची शक्यता आहे. मन प्रसन्न असेल. काहींना प्रवासयोग येतील. व्यावसायिकांना फायदेशीर काळ आहे. तुमच्या चांगल्या नियोजनामुळे कामे मार्गी लागतील. सप्ताह मध्यात लेखक, वक्ते यांना अनुकूल ग्रहमान आहे. प्रॉपर्टीची खरेदी-विक्रीची कामे चांगले यश देऊ शकतील. इस्टेट एजंट, बिल्डर यांना ग्रहमान चांगले आहे. गृहसजावटीसाठी व घरासंबंधीत काही गोष्टी प्रलंबित असतील तर त्यासाठी वेळ द्याल. सप्ताहाच्या अखेरीस कलाकार व विद्यार्थ्यांना चांगला काळ आहे. मन प्रसन्न असेल.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी शुक्र, तृतीयस्थानी सूर्य, बुध, षष्ठस्थानात केतू, भाग्यस्थानात शनि(व), प्लूटो, लाभस्थानात गुरु, नेपचून आणि व्ययस्थानात मंगळ, राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग, गुरुशी केंद्रयोग व शनिशी युती होईल याचबरोबर बुधाचा मंगळाशी केंद्रयोगही होईल. २८ तारखेला चंद्राची सूर्याशी युती व गुरुशी त्रिकोण होईल. २९ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व बुधाशी युती होईल. ३० तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताह अनुकूल आहे. रविवारचा दिवस अनुकूल आहे. आत्मविश्वास वाढेल. मन प्रसन्न असेल. त्यानंतरचे दोन दिवस भाग्यवृध्दी करणारे ठरु शकतील. तुमच्यातल्या कलाकौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. धनलाभ होण्याचीही शक्यता आहे. सप्ताह मध्यात प्रवासयोग शक्य आहेत. लेखक, कलाकार, ब्लॉगर्स यांना हा काळ अनुकूल आहे. सप्ताह अखेरीस कौटुंबिक सौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. प्रॉपटींची कामे मार्गी लागतील.
उपासना: या काळात महालक्ष्मीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शुक्र, धनस्थानी सूर्य, बुध, पंचमस्थानात केतू, अष्टमस्थानात शनि(व), प्लूटो, दशमस्थानात गुरु, नेपचून आणि लाभस्थानात मंगळ, राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग, गुरुशी केंद्रयोग व शनिशी युती होईल याचबरोबर बुधाचा मंगळाशी केंद्रयोगही होईल. २८ तारखेला चंद्राची सूर्याशी युती व गुरुशी त्रिकोण होईल. २९ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व बुधाशी युती होईल. ३० तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- रविवार खरेदीसाठी अनुकूल असेल. आपल्या आवडत्या व्यक्तींसाठी छान खरेदी होईल. ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध परदेशाशी आहे त्यांना फायदेशीर दिवस आहे. त्यानंतरचे दोन दिवस कौटुंबिक सौख्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. धनाभाचे योग आहेत. सप्ताह मध्यातही आर्थिक सुयश लाभेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. सप्ताह अखेरीस कवी, लेखक यांना ग्रहमान चांगले आहे. भावंडांशी संपर्क होईल. एकंदरीतच सप्ताह चांगला जाणार आहे.
उपासना: या काळात रोज गणपती स्तोत्र म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, बुध, चतुर्थस्थानात केतू, सप्तमस्थानात शनि(व), प्लूटो, भाग्यस्थानात गुरु, नेपचून, दशमस्थानात मंगळ, राहू, हर्षल आणि व्ययस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग, गुरुशी केंद्रयोग व शनिशी युती होईल याचबरोबर बुधाचा मंगळाशी केंद्रयोगही होईल. २८ तारखेला चंद्राची सूर्याशी युती व गुरुशी त्रिकोण होईल. २९ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व बुधाशी युती होईल. ३० तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला मित्रांच्या किंवा प्रियजनांच्या भेटीचे योग येतील. लाभ होतील. खिशात भरपूर पैसा खुळखुळत असल्याने खर्च करण्यास काही वाटणार नाही. धार्मिक गोष्टींसाठी खर्च होईल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून फायदा मिळू शकेल. सप्ताह मध्यानंतर आत्मविश्वास वाढविणार्या घटना घडतील. मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या शेवटी कुटुंबीयांसाठी वेळ काढावा लागेल. संभाषण कौशल्याच्या जोरावर कामे पार पडतील.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी केतू, षष्ठस्थानात शनि(व), प्लूटो, अष्टमस्थानात गुरु, नेपचून, भाग्यस्थानात मंगळ, राहू, हर्षल, लाभस्थानात शुक्र आणि व्ययस्थानात सूर्य, बुध अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग, गुरुशी केंद्रयोग व शनिशी युती होईल याचबरोबर बुधाचा मंगळाशी केंद्रयोगही होईल. २८ तारखेला चंद्राची सूर्याशी युती व गुरुशी त्रिकोण होईल. २९ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व बुधाशी युती होईल. ३० तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला आपल्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. काही लाभ होतील. व्यापार्यांना एखाद्या कामातून चांगली कमाई होऊ शकेल. व्यवसायात नवीन तंत्र अमलात आणू शकाल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. सप्ताह मध्यात चांगली खरेदी होईल. अध्यात्मिक उन्नतीसाठीही ग्रहमान चांगले आहे. आयात-निर्यातीचा ज्यांचा व्यवसाय आहे त्यांना फायदेशीर ग्रहमान आहे.
सप्ताहाच्या शेवटी वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात केतू, पंचमस्थानात शनि(व), प्लूटो, सप्तमस्थानात गुरु, नेपचून, अष्टमस्थानात मंगळ, राहू, हर्षल, दशमस्थानात शुक्र आणि लाभस्थानात सूर्य, बुध अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग, गुरुशी केंद्रयोग व शनिशी युती होईल याचबरोबर बुधाचा मंगळाशी केंद्रयोगही होईल. २८ तारखेला चंद्राची सूर्याशी युती व गुरुशी त्रिकोण होईल. २९ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व बुधाशी युती होईल. ३० तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताह अतिशय चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला काहींना प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. घरातील वातावरण छान असेल. आपल्या कार्यक्षेत्रामध्येही छान काम होईल. केलेल्या कामाचं वरीष्ठांकडून कौतुक होण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या मध्यात अचानक धनलाभाचे योग आहेत. मित्रांच्या भेटीचे योग संभवतात. आत्मविश्वास वाढेल. सप्ताहाच्या शेवटी उधारी वसूल होईल. महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील. पूर्वीच्या गुंतवणूकीतून लाभ शक्य आहेत. खरेदीसाठीही अनुकूल काळ आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, चतुर्थस्थानात शनि(व), प्लूटो, षष्ठस्थानी गुरु, नेपचून, सप्तमस्थानात मंगळ, राहू, हर्षल, भाग्यस्थानात शुक्र आणि दशमस्थानात सूर्य, बुध अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग, गुरुशी केंद्रयोग व शनिशी युती होईल याचबरोबर बुधाचा मंगळाशी केंद्रयोगही होईल. २८ तारखेला चंद्राची सूर्याशी युती व गुरुशी त्रिकोण होईल. २९ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व बुधाशी युती होईल. ३० तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रवासात अडथळे किंवा वाहनांसाठी खर्च संभवू शकतो. ज्योतिष, मानसशास्त्र व ईन्शूरन्स हे ज्यांचे कामाचे स्वरुप आहे त्यांना मात्र हा काळ चांगला आहे. गूढ गोष्टींचे आकर्षण वाटत राहील. सप्ताहाच्या मध्यात भाग्यवर्धक घटना घडण्याची शक्यता आहे. कार्यालयीन कामानिमित्त प्रवासयोग शक्य आहे. आयात-निर्यात करणार्या व्यापारांना लाभदायक काळ आहे. धार्मिक गोष्टींसाठीही अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर मनासारखे काम झाल्याने प्रसन्न असाल. केलेल्या कष्टाचं चीज होईल. काही लाभही होऊ शकतील. सप्ताहाच्या शेवटी मित्रमंडळींच्या भेटी शक्य आहेत. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवा.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी शनि(व), प्लूटो, पंचमस्थानात गुरु, नेपचून, षष्ठस्थानी मंगळ, राहू, हर्षल, अष्टमस्थानात शुक्र, भाग्यस्थानात सूर्य, बुध आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग, गुरुशी केंद्रयोग व शनिशी युती होईल याचबरोबर बुधाचा मंगळाशी केंद्रयोगही होईल. २८ तारखेला चंद्राची सूर्याशी युती व गुरुशी त्रिकोण होईल. २९ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व बुधाशी युती होईल. ३० तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील. सप्ताह मध्य संमिश्र घटनांचा असू शकेल. काहींच्या बाबतीत मनाविरुध्द घटना घडतील तर काहींना अचानक बक्षिसाचा किंवा लाभाचा संभव आहे. धार्मिक गोष्टींसाठी हा चांगला कालावधी आहे. काहींना प्रवासयोग शक्य आहेत. सप्ताह मध्यानंतर आपल्या कार्यक्षेत्रात छान काम होणार आहे. वरीष्ठांकडून कामे करुन घेण्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे. त्याचा फायदा करुन घ्या. सप्ताहाचा शेवट कार्यालयीन कामांसाठी चांगला आहे. लाभदायक ग्रहमान आहे. प्रवासयोगही शक्य.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात शनि(व), प्लूटो, चतुर्थस्थानात गुरु, नेपचून, पंचमस्थानात मंगळ, राहू, हर्षल, सप्तमस्थानात शुक्र, अष्टमस्थानात सूर्य, बुध आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग, गुरुशी केंद्रयोग व शनिशी युती होईल याचबरोबर बुधाचा मंगळाशी केंद्रयोगही होईल. २८ तारखेला चंद्राची सूर्याशी युती व गुरुशी त्रिकोण होईल. २९ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व बुधाशी युती होईल. ३० तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- हा सप्ताह फारसा अनुकूल नाही. सप्ताहाच्या सुरुवातीला तब्येतीची काळजी घेणे उचित ठरेल. वैद्यकीय क्षेत्रात व कायदाविषयी कामे करणार्यांसाठी मात्र ग्रहमान चांगले आहे. सप्ताह मध्य संमिश्र आहे. या दरम्यान जोडीदाराबरोबर वाद टाळावेत. व्यवसायातील आर्थिक निर्णय शक्यतो विचारपूर्वक घ्यावेत. अती दगदग या काळात त्रासदायक ठरु शकेल. सप्ताहाच्या मध्यानंतर जोखीम किंवा धोका असलेली कामे करू नका. सप्ताह अखेर वरीष्ठांचे सहकार्य मिळणार नाही. मात्र धार्मिक कार्यासाठी चांगला कालावधी आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि(व), प्लूटो, तृतीयस्थानी गुरु, नेपचून, चतुर्थस्थानात मंगळ, राहू, हर्षल, षष्ठस्थानी शुक्र, सप्तमस्थानात सूर्य, बुध आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग, गुरुशी केंद्रयोग व शनिशी युती होईल याचबरोबर बुधाचा मंगळाशी केंद्रयोगही होईल. २८ तारखेला चंद्राची सूर्याशी युती व गुरुशी त्रिकोण होईल. २९ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व बुधाशी युती होईल. ३० तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांना चांगले ग्रहमान आहे. कलाकारांसाठीही चांगला काळ आहे. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मन आनंदी राहील. अधिकारप्राप्तीचे योग आहेत. सप्ताह मध्यात आरोग्याची काळजी घावी. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांसाठी तसेच नोकरीच्या शोधात असाल तर त्यासाठी अनुकूल कालावधी आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांना चांगला कालावधी आहे. सप्ताह अखेर प्रवास टाळावा. जोखीम असलेली कामे करु नका. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.
उपासना: महालक्ष्मीअष्टक या काळात जरुर म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात गुरु, नेपचून, तृतीयस्थानी मंगळ, राहू, हर्षल, पंचमस्थानात शुक्र, षष्ठस्थानी सूर्य, बुध, भाग्यस्थानात केतू आणि व्ययस्थानात शनि(व), प्लूटो, अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग, गुरुशी केंद्रयोग व शनिशी युती होईल याचबरोबर बुधाचा मंगळाशी केंद्रयोगही होईल. २८ तारखेला चंद्राची सूर्याशी युती व गुरुशी त्रिकोण होईल. २९ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व बुधाशी युती होईल. ३० तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- रविवारी घरात छान वातावरण असेल. घरात मस्त पार्टी करायला हरकत नाही. मित्रांच्या भेटी शक्य आहेत. धनलाभाचेही योग आहेत. नंतरचे दोन दिवस विद्यार्थ्यांना, कष्टाला पर्याय नाही याची आठवण करुन देणारे असतील. ज्योतिषी, इतिहासकार व मानसोपचार तज्ञ यांना मात्र अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात तब्येतीची काळजी घ्यावी. तब्येतीबाबत काही किरकोळ समस्या जाणवू शकतील. सप्ताहाच्या शेवटी कौटुंबिक जीवनात एखादी चिंता लागून राहील. भागीदारीतील निर्णय पुढे ढकला.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु, नेपचून, धनस्थानात मंगळ, राहू, हर्षल चतुर्थस्थानात शुक्र, पंचमस्थानात सूर्य, बुध, अष्टमस्थानात केतू आणि लाभस्थानात शनि(व), प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग, गुरुशी केंद्रयोग व शनिशी युती होईल याचबरोबर बुधाचा मंगळाशी केंद्रयोगही होईल. २८ तारखेला चंद्राची सूर्याशी युती व गुरुशी त्रिकोण होईल. २९ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व बुधाशी युती होईल. ३० तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताह छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला एखाद्या समारंभात सहभागी होण्याचे योग येतील. नातेवाईकांच्या भेटीचे योग येतील. प्रवासयोग शक्य. विद्यार्थी, खेळाडू, साहित्यिक व कलाकारांसाठी चांगला काळ आहे. स्पर्धा परिक्षेत या काळात चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. मनासारखे काम झाल्याने खूष असाल. सप्ताहाच्या मध्यात आत्मविश्वास वाढेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. काही लाभदायक घटना शक्य. घरातील वातावरण प्रसन्न राहील. सप्ताहाच्या शेवटी नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. मात्र आरोग्याची काळजी या काळात घ्यावी.
उपासना: विठ्ठल नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)