Online Order Link: https://forms.gle/qyt4UxdpWvvqMoup9
Referral Code: FBC1003 for (10% Discount)
Website: https://astroshodh.com/corona-virus-books/#Corona_Virus_English_Book
अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१८ एप्रिल ते २४ एप्रिल २०२१) Astroshodh- astrologerinpune, vastuconsultantinpune, pune)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, बुध, शुक्र, हर्षल, धनस्थानात राहू, तृतीयस्थानात मंगळ, अष्टमस्थानात केतू, दशमस्थानात शनि, प्लूटो आणि आणि लाभस्थानात गुरु, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. १९ तारखेला सूर्याची बुधाशी युती व चंद्राचा प्लूटोशी प्रतियोग होईल. २१ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व गुरुशी प्रतियोग होईल. २३ तारखेला चंद्राचा अनुक्रमे बुधाशी व शुक्राशी त्रिकोणयोग होईल आणि २४ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व बुधाची हर्षलशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला आपली कल्पनाशक्ती आपल्याला चांगली साथ देणार आहे. लेखक, ब्लॉगर्स, कवी यांनी सोशल मिडियावर लिहितांना लोकांच्या भावना दुखवल्या जाणार नाहीत याची काळजी घेतल्यास अनुकूल ग्रहमान आहे. भावंडांशी संपर्क साधाल. सप्ताह मध्यात घरातील वातावरण चांगले रहाणार आहे. सप्ताह अखेरीस काहींना अचानक धनलाभ संभवतात. आपलं कौतुक या काळात होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी, कलाकार, खेळाडू यांना अनुकूल कालावधी आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, धनस्थानात मंगळ, सप्तमस्थानात केतू, भाग्यस्थानात शनि, प्लूटो, दशमस्थानात गुरु, नेपचून, आणि व्ययस्थानात सूर्य, बुध, शुक्र, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. १९ तारखेला सूर्याची बुधाशी युती व चंद्राचा प्लूटोशी प्रतियोग होईल. २१ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व गुरुशी प्रतियोग होईल. २३ तारखेला चंद्राचा अनुक्रमे बुधाशी व शुक्राशी त्रिकोणयोग होईल आणि २४ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व बुधाची हर्षलशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला आरोग्याच्या काही समस्या जाणवण्याची शक्यता आहे. खाण्यापिण्यावर संयम या काळात आवश्याक आहे. काही खर्च अचानकपणे करावे लागू शकतील. आपल्या बोलण्यामुळे या काळात कोणी दुखावले जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. सप्ताह मध्यात भावंडांबद्दल चांगली बातमी कळेल. लेखक, प्रकाशक, वक्ते यांना ग्रहमान अनुकूल आहे. आत्मविश्वास वाढलेला असेल. सप्ताह अखेर संमिश्र घटनांची असणार आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, षष्ठस्थानात केतू, अष्टमस्थानात शनि, प्लूटो, भाग्यस्थानात गुरु, नेपचून, लाभस्थानात सूर्य, बुध, शुक्र, हर्षल आणि व्ययस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. १९ तारखेला सूर्याची बुधाशी युती व चंद्राचा प्लूटोशी प्रतियोग होईल. २१ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व गुरुशी प्रतियोग होईल. २३ तारखेला चंद्राचा अनुक्रमे बुधाशी व शुक्राशी त्रिकोणयोग होईल आणि २४ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व बुधाची हर्षलशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. आवडत्या व्यक्तींशी संपर्क होईल. काही लाभही या काळात होण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यात घरात छान वातावरण असेल. आपल्या आवडीच्या पदार्थांची घरात रेलचेल असेल. सप्ताह अखेर छान असणार आहे. आपल्या आत्मविश्वासाची व पराक्रमाची वृध्दी होईल. भावंडांबद्दल चांगली बातमी कळेल. शेजार्यांचा चांगला अनुभव येईल. कलाकार, लेखक व कवी यांना अनुकूल ग्रहमान आहे. संपूर्ण सप्ताह अनुकूल आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला पंचमस्थानात केतू, सप्तमस्थानात शनि, प्लूटो, अष्टमस्थानात गुरु, नेपचून, दशमस्थानात सूर्य, बुध, शुक्र, हर्षल, लाभस्थानात राहू आणि व्ययस्थानात मंगळ, अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. १९ तारखेला सूर्याची बुधाशी युती व चंद्राचा प्लूटोशी प्रतियोग होईल. २१ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व गुरुशी प्रतियोग होईल. २३ तारखेला चंद्राचा अनुक्रमे बुधाशी व शुक्राशी त्रिकोणयोग होईल आणि २४ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व बुधाची हर्षलशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात संमिश्र असणार आहे. काही खरेदी किंवा खर्च आपलं महिन्याचं बजेट बिघडवू शकेल. पारमार्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्या लोकांना हाच कालावधी विशेष अनुकूल आहे. सप्ताह मध्यात मन प्रसन्न असेल. आपली काही आवड किंवा छंद असतील तर त्यासाठी अवश्य वेळ द्या. सप्ताहाच्या शेवटी आपल्या कार्यक्षेत्रात चांगले काम घडणार आहे. काहींना धनलाभ शक्य आहे. लेखक व वक्त्यांना अनुकूल ग्रहमान आहे.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला चतुर्थस्थानात केतू, षष्ठस्थानात शनि, प्लूटो, सप्तमस्थानात गुरु, नेपचून, भाग्यस्थानात सूर्य, बुध, शुक्र, हर्षल, दशमस्थानात राहू आणि लाभस्थानात मंगळ, अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. १९ तारखेला सूर्याची बुधाशी युती व चंद्राचा प्लूटोशी प्रतियोग होईल. २१ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व गुरुशी प्रतियोग होईल. २३ तारखेला चंद्राचा अनुक्रमे बुधाशी व शुक्राशी त्रिकोणयोग होईल आणि २४ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व बुधाची हर्षलशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होईल. मित्रमैत्रिणींशी किंवा आप्तेष्टांशी संपर्क होईल. काहींना धनलाभाचे योग आहेत. गुरु किंवा गुरुतुल्य व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्य थोडासा प्रतिकूल असेल. काही अनपेक्षित खर्चही करावे लागतील. मनाचा तोल जाणार नाही याची या काळात काळजी घ्यावी. मेडीटेशन/ धार्मिक गोष्टींमध्ये मन रमवलेले चांगले ठरेल. सप्ताहाच्या शेवटी काही प्रसन्न करणार्या घटना शक्य आहेत.
उपासना: या सप्ताहात सूर्योपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीय स्थानात केतू, पंचमस्थानात शनि, प्लूटो, षष्ठस्थानात गुरु, नेपचून, अष्टमस्थानात सूर्य, बुध, शुक्र, हर्षल, भाग्यस्थानात राहू आणि दशमस्थानात मंगळ, अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. १९ तारखेला सूर्याची बुधाशी युती व चंद्राचा प्लूटोशी प्रतियोग होईल. २१ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व गुरुशी प्रतियोग होईल. २३ तारखेला चंद्राचा अनुक्रमे बुधाशी व शुक्राशी त्रिकोणयोग होईल आणि २४ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व बुधाची हर्षलशी युती होईल.
फलादेश- सप्ताह थोडासा प्रतिकूल ठरण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला आपल्या कार्यक्षेत्रात अती आत्मविश्वास बाळगू नका. वरीष्ठ नाराज होतील असे वर्तन या काळात टाळलेले बरे राहील. कोणतीही जोखीम या काळात नको. सप्ताह मध्यात चांगला धनलाभ होईल. अचानक एखाद्या जुन्या मित्राशी संपर्क होईल. मित्राच्या मदतीने एखादे अडलेले काम मार्गी लागू शकेल. सप्ताहाच्या शेवटी काही खर्च करावे लागतील. या काळात नियम मोडून कोणतीही गोष्ट करु नका.
उपासना: रोज किमान ११ वेळा महालक्ष्मीअष्टक या काळात जरुर म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात केतू, चतुर्थस्थानात शनि, प्लूटो, पंचमस्थानात गुरु, नेपचून, सप्तमस्थानात सूर्य, बुध, शुक्र, हर्षल, अष्टमस्थानात राहू आणि भाग्यस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. १९ तारखेला सूर्याची बुधाशी युती व चंद्राचा प्लूटोशी प्रतियोग होईल. २१ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व गुरुशी प्रतियोग होईल. २३ तारखेला चंद्राचा अनुक्रमे बुधाशी व शुक्राशी त्रिकोणयोग होईल आणि २४ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व बुधाची हर्षलशी युती होईल.
फलादेश- सप्ताह अतिशय छान आहे. सप्ताहाच्या सुरूवातीलाच काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. गुरु किंवा वरीष्ठांचे सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. उपासना करणार्यांसाठीही काळ चांगला आहे. सप्ताह मध्यात नोकरीत किंवा व्यवसायात चांगले काम झाल्याने खुश असाल. सप्ताह मध्यानंतर काहींना धनलाभ शक्य आहेत. मित्र किंवा नातेवाईकांबरोबर छान वेळ जाईल. सप्ताह अखेरीस जोडीदाराबरोबर वाद टाळावा. अचानक एखादा खर्च या काळात करावा लागू शकतो.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
–अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, तृतीयस्थानी शनि, प्लूटो, चतुर्थस्थानात गुरु, नेपचून, षष्ठस्थानात सूर्य, बुध, शुक्र, हर्षल, सप्तमस्थानात राहू आणि अष्टमस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. १९ तारखेला सूर्याची बुधाशी युती व चंद्राचा प्लूटोशी प्रतियोग होईल. २१ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व गुरुशी प्रतियोग होईल. २३ तारखेला चंद्राचा अनुक्रमे बुधाशी व शुक्राशी त्रिकोणयोग होईल आणि २४ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व बुधाची हर्षलशी युती होईल.
फलादेश- सप्ताह थोडासा प्रतिकूल ठरण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला अती दगदग मात्र टाळावी. जीवनशक्तीची कमतरता किंवा थकवा जाणवत राहू शकेल. काही आजार असतील तर अंगावर काढू नका. वाहने जपून चालवा. सप्ताह मध्यात काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. वक्ते, पुरोहीत, शिक्षक यांना अनुकूल काळ आहे. सप्ताह अखेरीस नोकरीत किंवा व्यवसायात कामाच्या तुलनेत मोबदला कमी मिळेल. आपल्या हितशत्रूंवर लक्ष ठेवावे.
उपासना: गुरुउपासना किंवा स्वामी समर्थांच्या तारक मंत्राचा जप करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात शनि, प्लूटो, तृतीयस्थानी गुरु, नेपचून, पंचमस्थानात सूर्य, बुध, शुक्र, हर्षल, षष्ठस्थानात राहू, सप्तमस्थानात मंगळ, आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. १९ तारखेला सूर्याची बुधाशी युती व चंद्राचा प्लूटोशी प्रतियोग होईल. २१ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व गुरुशी प्रतियोग होईल. २३ तारखेला चंद्राचा अनुक्रमे बुधाशी व शुक्राशी त्रिकोणयोग होईल आणि २४ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व बुधाची हर्षलशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. संततीबाबत चांगल्या घटना घडतील. भागीदारीत व्यवसाय करणार्यांना ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह मध्यात अचानक आलेल्या अडचणींनी त्रस्त व्हाल. मन शांत ठेवावे. सप्ताहाच्या शेवटी ग्रहस्थिती पुन्हा अनुकूल होत आहे. आपल्या कार्यक्षेत्रात चांगलं काम घडेल. मन प्रसन्न करणार्या घटना घडण्याची शक्यता आहे. काही धनलाभही होतील.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी शनि, प्लूटो, धनस्थानात गुरु, नेपचून, चतुर्थस्थानात सूर्य, बुध, शुक्र, हर्षल, पंचमस्थानात राहू, षष्ठस्थानात मंगळ आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. १९ तारखेला सूर्याची बुधाशी युती व चंद्राचा प्लूटोशी प्रतियोग होईल. २१ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व गुरुशी प्रतियोग होईल. २३ तारखेला चंद्राचा अनुक्रमे बुधाशी व शुक्राशी त्रिकोणयोग होईल आणि २४ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व बुधाची हर्षलशी युती होईल.
फलादेश- सप्ताहात सुरुवातीला आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. अती दगदग टाळा. मात्र वैद्यकीय क्षेत्रातील लोक तसेच वकीलांना हा काळ चांगला ठरेल. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून काहींना फ़ायदा मिळू शकेल. सप्ताह मध्य चांगला आहे. आवडत्या लोकांबरोबर वेळ छान जाईल. भागीदारीतील व्यावसायिकांनाही अनुकूल कालावधी आहे. सप्ताह अखेर संमिश्र असणार आहे. रागावर नियंत्रण ठेवावे. विमा/ वैद्यकीय क्षेत्रात काम करणार्यांना अनुकूल कालावधी आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु, नेपचून, तृतीयस्थानी सूर्य, बुध, शुक्र, हर्षल, चतुर्थस्थानात राहू, पंचमस्थानात मंगळ, दशमस्थानात केतू आणि व्ययस्थानात शनि, प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. १९ तारखेला सूर्याची बुधाशी युती व चंद्राचा प्लूटोशी प्रतियोग होईल. २१ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व गुरुशी प्रतियोग होईल. २३ तारखेला चंद्राचा अनुक्रमे बुधाशी व शुक्राशी त्रिकोणयोग होईल आणि २४ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व बुधाची हर्षलशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात संमिश्र असणार आहे. काहींना छोटसं बक्षिस, भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थी व कलाकारांना कमी श्रमात जास्त यश देणारा कालावधी आहे. गुंतवणूक करतांना मात्र सावध रहाणे गरजेचे आहे. शेअर मार्केट सारख्या किंवा ज्या-ज्या क्षेत्रात जोखीम आहे अशा क्षेत्रात सध्या गुंतवणूक न केलेलीच बरी. सप्ताह मध्यात काहींना नविन नोकरीच्या संधी चालून येतील. मात्र तब्येतीच्या काही समस्या या काळात जाणवू शकतील. काळजी घ्यावी. सप्ताह अखेर आपल्या जिवलग माणसांसोबत वेळ छान जाणार आहे.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात सूर्य, बुध, शुक्र, हर्षल, तृतीयस्थानी राहू, चतुर्थस्थानात मंगळ, भाग्यस्थानात केतू, लाभस्थानात शनि, प्लूटो आणि व्ययस्थानात गुरु, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. १९ तारखेला सूर्याची बुधाशी युती व चंद्राचा प्लूटोशी प्रतियोग होईल. २१ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व गुरुशी प्रतियोग होईल. २३ तारखेला चंद्राचा अनुक्रमे बुधाशी व शुक्राशी त्रिकोणयोग होईल आणि २४ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व बुधाची हर्षलशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला घरातील वातावरण चांगले राहील. मन प्रसन्न असेल. प्रॉपर्टीची खरेदी विक्री करणार्या लोकांना अनुकूल काळ आहे. भावंडांशी संपर्क होईल. आपल्याकडून चांगलं लेखन या काळात होऊ शकेल. आवडत्या पदार्थांचा मस्त आस्वाद घ्याल. सप्ताह मध्य प्रेमिकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी चांगला जाईल. नविन विषयाच्या अभ्यासाला सुरुवात करायची असेल तर हा काळ चागला आहे. सप्ताहाच्या शेवटी तब्येत सांभाळावी. अती दगदग टाळावी.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)