अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२ फ़ेब्रुवारी ते ८ फ़ेब्रुवारी २०२०) 

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, तृतिय स्थानात राहू, अष्टमस्थानात मंगळ, भाग्यात गुरु, केतू व प्लुटो, दशमात रवि, शनि आणि लाभात बुध, शुक्र व नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला शुक्र मीन राशित प्रवेश करेल. ३ तारखेला चंद्राचा शुक्राशी व शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. ६ तारखेला चंद्राचा बुधाशी त्रिकोण तर गुरुशी प्रतियोग होईल आणि ७ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल.
रविवारी जोखिमीची कामे टाळावीत. आरोग्याच्या काही समस्या जाणवतील. उष्णतेचे काही त्रास संभवतात. त्यानंतरचे दोन दिवस आपला एखादा स्नेही/ नातेवाईक किंवा आवडती व्यक्ती भेटल्याने मन आनंदी असेल. एखादा छानसा धनलाभ होण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यात कुटुंबीयांबरोबर छान सुर जमलेला असेल. लाभदायक ग्रहमान आहे. लेखक, ब्लॉगर्स व गायकांना हा कालावधी उत्तम आहे. मौज मजेचे प्रसंग घडतील. प्रवासासाठीही अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या शेवटी घरात छान पार्टीचं आयोजन करायला हरकत नाही. प्रॉपर्टीच्या कामांसाठी चांगला काळ आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला व्दितिय स्थानात राहू, सप्तमात मंगळ, अष्टमात गुरु, केतू व प्लुटो, भाग्यात रवि व शनि, दशमात बुध, शुक्र, नेपचून आणि व्ययस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला शुक्र मीन राशित प्रवेश करेल. ३ तारखेला चंद्राचा शुक्राशी व शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. ६ तारखेला चंद्राचा बुधाशी त्रिकोण तर गुरुशी प्रतियोग होईल आणि ७ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला काही आर्थिक अडचणी किंवा अचानक उद्भवलेल्या खर्चामुळे काळजीत असाल. नंतर मात्र प्रश्न हळूहळू सुटतांना दिसतील. आपल्या कार्यक्षेत्रात छान काम होणार आहे. वरीष्ठ आपल्या कामावर खुष असतील. सप्ताहाच्या मध्यात काहींना धनलाभाचे योग येतील. मन प्रसन्न असेल. आपला आत्मविश्वास वाढलेला असेल. नविन व्यवसाय सुरु करायचा असेल तर त्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे. गायक, वक्ते, आहारतज्ञ व फ़िजिकल फ़िटनेसच्या क्षेत्रामध्ये काम करणार्‍यांना चांगला काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी भावंडांशी संवाद साधाल. काहींना प्रवासाचे योग संभवतात.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानात राहू, षष्ठात मंगळ, सप्तमात गुरु, केतू व प्लुटो, अष्टमात रवि व शनि भाग्यात बुध, शुक्र, नेपचून आणि लाभस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला शुक्र मीन राशित प्रवेश करेल. ३ तारखेला चंद्राचा शुक्राशी व शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. ६ तारखेला चंद्राचा बुधाशी त्रिकोण तर गुरुशी प्रतियोग होईल आणि ७ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला एखादा छानसा धनलाभ मन प्रसन्न करेल. केलेल्या कामाचे चीज होइल. वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. मित्रांबरोबर भेटीचे योग येतील. मात्र एखाद्या मित्राशी वादाचे किंवा भांडणाचे योग आहे. काळजी घ्यावी. सप्ताहाचा मध्य भाग्यवर्धक घटनांचा असेल. मनासारखी खरेदी होईल. आत्मविश्वास वाढलेला असेल. नृत्यकलेशी संबंध असणार्‍या लोकांना चांगला काळ आहे. प्रवासाचे योग आहेत. परदेशगमनासाठी अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यानंतर धार्मिक गोष्टींसाठी वेळ काढाल. सप्ताहाच्या शेवटी आपल्या कुटुंबासमवेत वेळ चांगला जाईल. मन प्रसन्न असेल.
उपासना: गणपतीची उपासना करणे या काळात श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला पंचमात मंगळ, षष्ठात गुरु, केतू व प्लुटो, सप्तमात रवि व शनि अष्टमात बुध, शुक्र, नेपचून, दशमात हर्षल आणि व्ययस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला शुक्र मीन राशित प्रवेश करेल. ३ तारखेला चंद्राचा शुक्राशी व शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. ६ तारखेला चंद्राचा बुधाशी त्रिकोण तर गुरुशी प्रतियोग होईल आणि ७ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल.
सप्ताह संमिश्र असणार आहे. सप्ताहाची सुरुवात चांगली होणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. काहींना वरीष्ठांकडून न मागता सहकार्य मिळेल. सप्ताह मध्यात काही धनलाभ होता होता राहून जातील किंवा त्यात अडथळे येतील. मित्रांच्या विचित्र वागण्याचा त्रास संभवतो. सप्ताह मध्यानंतर मनासारखी खरेदी होईल. काही अनपेक्षित खर्चही करावे लागू शकतात. एखाद्या गोष्टीची उगीचच काळजी किंवा हूरहूर लागेल. इतिहास, मानसशास्त्र, परामानसशास्र, ज्योतिषशास्त्र अशा गूढ विषयांचा अभ्यास करण्यास अनुकूल काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी मन प्रसन्न असेल.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास  
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थात मंगळ, पंचमात गुरु, केतू व प्लुटो, षष्ठात रवि व शनि सप्तमात बुध, शुक्र, नेपचून, भाग्यात हर्षल आणि लाभस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला शुक्र मीन राशित प्रवेश करेल. ३ तारखेला चंद्राचा शुक्राशी व शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. ६ तारखेला चंद्राचा बुधाशी त्रिकोण तर गुरुशी प्रतियोग होईल आणि ७ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल.
सप्ताह चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला काहींना प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. सप्ताह मध्यात मनासारखे काम होईल. व्यावसायिकांना अनुकूल ग्रहमान आहे. जोडीदाबरोबर छान वेळ व्यतित करु शकाल. भागीदारीत व्यवसाय सुरु करायचा असेल तर आता ही वेळ योग्य आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर आपल्या आवडत्या लोकांच्या भेटीचे योग येतील. एखाद्या समारंभात किंवा पार्टीत सहभागी व्हाल. अचानक झालेल्या धनलाभाने चकीत व्हाल. सप्ताहाच्या शेवटी मनासारखी खरेदी होईल. अध्यात्मिक उन्नतीसाठी चांगला काळ आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियस्थानात मंगळ, चतुर्थात गुरु, केतू व प्लुटो, पंचमात रवि व शनि षष्ठात बुध, शुक्र, नेपचून, अष्टमात हर्षल, दशमस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला शुक्र मीन राशित प्रवेश करेल. ३ तारखेला चंद्राचा शुक्राशी व शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. ६ तारखेला चंद्राचा बुधाशी त्रिकोण तर गुरुशी प्रतियोग होईल आणि ७ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल.
सप्ताहाची सुरुवात कंटाळवाणी व अडथळ्याची जरी झाली तरी नंतर पूर्ण सप्ताह छान जाणार आहे. वाहने जपून चालवावीत. लेखक/ ब्लॉगर्स यांनी वादग्रस्त लिखाण टाळावे. सप्ताहाचा मध्य उपासना करण्याऱ्यांना चांगला आहे. मात्र आपली धार्मिक मते दुसर्‍यांवर लादू नका. लांबच्या प्रवासाच्या योजना मनात घोळू लागतील. सप्ताह मध्यानंतर वरीष्ठांशी वाद होणार नाही याची दक्षता घ्या. आपल्या कार्यक्षेत्रातील हितशत्रूंवर लक्ष ठेवा. तब्येतीचे काही त्रासही या काळात जाणवू शकतील. मात्र हा योग नोकरीबदल किंवा बदलीसाठी अनुकूलता देत आहे. सप्ताहाचा शेवट उत्तम असणार आहे. काही लाभ होतील. आवडत्या व्यक्ती भेटतील. मन आनंदी असेल.
उपासना: गणपतीची उपासना करणे या काळात श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी मंगळ, तृतिय स्थानात गुरु, केतू व प्लुटो, चतुर्थात रवि व शनि पंचमात बुध, शुक्र, नेपचून, सप्तमात हर्षल आणि भाग्यस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला शुक्र मीन राशित प्रवेश करेल. ३ तारखेला चंद्राचा शुक्राशी व शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. ६ तारखेला चंद्राचा बुधाशी त्रिकोण तर गुरुशी प्रतियोग होईल आणि ७ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करण्यार्‍यांना चांगले ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात एखादा धनलाभ शक्य आहे. मात्र या काळात प्रवास करणार असाल तर पुरेशी काळजी घ्या. वाहने जपून चालवा. गूढ विषयांचा अभ्यास करण्यासाठी अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यानंतर भाग्यवर्धक घटना घडू शकतील. प्रवास लाभदायक व आनंदाचे ठरतील. धार्मिक कार्यांसाठी चांगला काळ आहे. सप्ताहाचा शेवट चांगला आहे. आपल्या क्षेत्रात चांगलं काम होणार आहे. आपला आत्मविश्वास वाढलेला असेल.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी मंगळ धनस्थानी गुरु, केतू व प्लुटो, तृतिय स्थानात रवि व शनि चतुर्थात बुध, शुक्र, नेपचून, षष्ठस्थानात हर्षल आणि अष्टमात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला शुक्र मीन राशित प्रवेश करेल. ३ तारखेला चंद्राचा शुक्राशी व शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. ६ तारखेला चंद्राचा बुधाशी त्रिकोण तर गुरुशी प्रतियोग होईल आणि ७ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला नविन नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना चांगला आहे. मात्र तब्येतीच्या तक्रारी डोके वर काढतील. गुप्तशत्रूंच्या कारवाया वाढतील. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना कालावधी चांगला आहे. घरात छान पार्टीचे वातावरण असेल. जवळच्या व्यक्तींच्या भेटीचे योग संभवतात. सप्ताह मध्यानंतर जोखिम किंवा धोका असलेली कामे करू नये. वाहने जपून चालवा. काहींना सूचक स्वप्न पडतील. सप्ताहाच्या शेवटी काही भाग्यवर्धक घटना चकित करतील. प्रवासासाठी व धार्मिक गोष्टींसाठी अनुकूल ग्रहमान आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास  
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी गुरु, केतू व प्लुटो, धनस्थानी रवि व शनि तृतियस्थानात बुध, शुक्र, नेपचून, पंचमस्थानात हर्षल, सप्तमस्थानी राहू, आणि व्ययस्थानी मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला शुक्र मीन राशित प्रवेश करेल. ३ तारखेला चंद्राचा शुक्राशी व शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. ६ तारखेला चंद्राचा बुधाशी त्रिकोण तर गुरुशी प्रतियोग होईल आणि ७ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला मुलांसाठी खरेदी कराल. परदेशगमनासाठी छान कालावधी आहे. सप्ताह मध्य वैद्यकीय व्यवसाय करणारे, केमिस्ट, वकील, जीम ट्रेनर, न्युट्रीशियन यांना अनुकूल आहे. नोकरी बदल किंवा नविन नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांनाही हा काळ चांगला आहे. तब्येतीच्या कुरबुरी मात्र या काळात जाणवतील. सप्ताह मध्यानंतर जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. जोडीदाराचा उत्कर्ष किंवा जोडीदाराबद्दल एखादी चांगली घटना घडण्याची शक्यता आहे. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना चांगला कालावधी आहे. सप्ताहाच्या शेवट प्रतिकूल घटनांचा असू शकेल.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी रवि व शनि धनस्थानी बुध, शुक्र, नेपचून, चतुर्थस्थानी हर्षल, षष्ठात राहू, लाभस्थानी मंगळ, आणि व्ययस्थानी गुरु, केतू व प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला शुक्र मीन राशित प्रवेश करेल. ३ तारखेला चंद्राचा शुक्राशी व शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. ६ तारखेला चंद्राचा बुधाशी त्रिकोण तर गुरुशी प्रतियोग होईल आणि ७ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल.
सप्ताहातील सुरुवातीला आराम तसेच मौज मजा करण्याकडे कल असेल. एखाद्या समारंभात किंवा कार्यक्रमात सहभागी होण्याचे योग संभवतात. घरागुती कामांसाठी वेळ काढावा लागेल. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना अनुकूल आहे. केलेल्या कष्टाचे चीज होईल. मोठ्यांनी केलेलं कौतुक किंवा अचानक मिळालेल्या बक्षिसामुळे खुश व्हाल. काही धनलाभ होण्याची शक्यता आहे. प्रेमी युगुलांसाठी विशेष चांगला काळ आहे. सप्ताह मध्यानंतर वैद्यकीय व्यवसायातील लोक, केमिस्ट यांना अनुकूल ग्रहमान आहे. कोर्टकचेरीमधील कामांसाठीही अनुकूल काळ आहे. वादविवादात तुमचा विजय होईल. नोकरीमध्ये प्रमोशन किंवा पगारवाढीसाठी जरुर प्रयत्न करा. या काळात घशाच्या संसर्गापासून जपा. एकदम थंड पदार्थ खाणे किंवा पिणे टाळा. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी बुध, शुक्र, नेपचून, तृतियस्थानात हर्षल, पंचमात राहू, दशमस्थानी मंगळ, लाभस्थानी गुरु, केतू व प्लुटो आणि व्ययस्थानी रवि व शनि अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला शुक्र मीन राशित प्रवेश करेल. ३ तारखेला चंद्राचा शुक्राशी व शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. ६ तारखेला चंद्राचा बुधाशी त्रिकोण तर गुरुशी प्रतियोग होईल आणि ७ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला छोट्या प्रवासाचे योग संभवतात. लेखकांसाठी चांगला काळ आहे. काहींना बदली किंवा बढतीची चाहूल लागेल. सप्ताहाच्या मध्यात घरात प्रसन्न वातावरण असेल. एखादी छानशी पार्टी ठेवायला हरकत नाही. सप्ताह मध्यानंतर संततीच्या प्रगतीमूळे खुश व्हाल. कलाकार, खेळाडू यांना ग्रहमान अनुकूल आहे. विद्यार्थ्यांना कमी श्रमात जास्त यश मिळेल. विवाहोच्छूक व्यकींना विवाह ठरविण्यासही अनुकूल ग्रहमान आहे. नविन गुंतवणुक फ़ायदेशीर ठरेल. मात्र जोखिम टाळा. अचानक धनलाभाचे योग येऊ शकतील. सप्ताहाच्या शेवटी आरोग्याच्या काही समस्या जाणवतील. जास्त दगदग किंवा श्रम टाळा.
उपासना: गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात हर्षल, चतुर्थस्थानी राहू, भाग्यस्थानी मंगळ, दशमस्थानी गुरु, केतू व प्लुटो, लाभस्थानी रवि व शनि आणि व्ययस्थानी बुध, शुक्र, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला शुक्र मीन राशित प्रवेश करेल. ३ तारखेला चंद्राचा शुक्राशी व शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. ५ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. ६ तारखेला चंद्राचा बुधाशी त्रिकोण तर गुरुशी प्रतियोग होईल आणि ७ तारखेला चंद्राचा शनिशी प्रतियोग होईल.
सप्ताहाची सुरूवात प्रिय घटनांनी होईल. वॆळ छान जाईल. प्रिय व्यक्तींच्या भेटीचे योग येतील. लेखक, वक्ते, कवी यांच्यासाठी चांगला कालावधी आहे. प्रवासात काळजी घ्यावी. सप्ताह मध्यात वादग्रस्त लिखाण टाळावे. भावंडांशी वाद होऊ नये याचीही काळजी घ्यावी. सप्ताह मध्यानंतर मनासारखी कामे झाल्यामुळे मन प्रसन्न असेल. परदेशगमनासाठी प्रयत्न करणार्‍यांना अनुकूल काळ आहे. प्रॉपर्टीच्या कामांसाठी मात्र प्रतिकूल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या शेवटी विद्यार्थ्यांना व कलाकारांना अनुकूल ग्रहमान आहे. एखाद्या नविन विषयाच्या अभ्यासाची सुरुवात करायची असेल तर ग्रहस्थिती अनुकूल आहे.
उपासना: गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

#राशिभविष्य#ज्योतिषशास्त्र#अ‍ॅस्ट्रोशोध#भविष्य#ज्योतिषी