Weekly horoscope ( 23- 29 September 2018)
(Astrologer in Pune-Astroshodh- Atul H. Kulkarni-9422088979)

अ‍ॅस्ट्रोशोध आठवड्याचे राशिभविष्य (२३ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर)

                                                              मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, चतुर्थात राहू, षष्ठस्थानात रवि, बुध, सप्तमात गुरु, शुक्र, भाग्यात शनी व प्लुटो, दशमात मंगळ,  केतू व लाभात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल.  २३ तारखेला बुधाचा शनीशी केंद्रयोग होईल. २५ तारखेला रविचा शनीशी केंद्रयोग होईल आणि २७ तारखेला रविचा मंगळाशी त्रिकोण होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला मित्रांबरोबर गाठीभेटीचे योग येतील. एखादा छानसा धनलाभ मन
प्रसन्न करेल. केलेल्या कामाचे चीज होईल. वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. काही भाग्यवर्धक घटना शक्य. सप्ताह मध्यात जोडीदाराला खुश करण्यासाठी काही खरेदी कराल. सप्ताहाच्या मध्यानंतर जोडीदाराबरोबर एखादा छानसा कार्यक्रम साजरा होऊ शकेल. भागीदारीत व्यवसाय सुरु करण्यासाठी अनुकुल काळ आहे. सप्ताहाच्या अखेरीस आपल्या कार्यक्षेत्रात छान काम झाल्याने खुश असाल.
(by Astroshodh- Atul H. Kulkarni- 9422088979- Astrologer in Pune )

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियेत राहू, पंचमात रवि , बुध, षष्ठात शुक्र, गुरु, अष्टमात शनी व प्लुटो, भाग्यात मंगळ व केतू, दशमात नेपचून आणि व्ययस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला बुधाचा शनीशी केंद्रयोग होईल. २५ तारखेला रविचा शनीशी केंद्रयोग होईल आणि २७ तारखेला रविचा मंगळाशी त्रिकोण होईल.
सप्ताह एकूणच छान जाणार आहे. काहींना वरीष्ठांकडून न मागता सहकार्य मिळेल. नोकरी,
व्यवसायातील लोक भरपूर आणि मनाजोगते काम झाल्याने खूष असतील. मुख्य म्हणजे
केलेल्या कामाचा मोबदलाही व्यवस्थित मिळाल्याने मन प्रसन्न राहील. मित्रांच्या भेटीचे योग
येतील. मात्र एखाद्या मित्राच्या विचित्र वागण्याचा त्रास होऊ शकतो. सप्ताहाच्या शेवटी मनासारखी खरेदी होईल. काहींना लांबचे प्रवास किंवा परदेशगमन शक्य. मात्र संपूर्ण सप्ताहात आपल्याकडून कामात चुक होणार नाही याची काळजी घ्यावी.
(by Astroshodh- Atul H. Kulkarni- 9422088979- Astrologer in Pune )

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी राहू, चतुर्थात रवि, बुध, पंचमात गुरु, शुक्र, सप्तमात शनी, प्लुटो, अष्टमात मंगळ, केतू, भाग्यात नेपचून आणि लाभस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला बुधाचा शनीशी केंद्रयोग होईल. २५ तारखेला रविचा शनीशी केंद्रयोग होईल आणि २७ तारखेला रविचा मंगळाशी त्रिकोण होईल.
सप्ताह चांगला जाणार आहे. काहींना प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. जोडीदाराचे छान सहकार्य मिळेल. सप्ताह मध्यात मनासारखे काम होईल. मात्र रागावर निय़ंत्रण ठेवावे. सप्ताहाच्या मध्यानंतर एखादी कौतुकाची थाप/ एखादं बक्षिस किंवा एखादा धनलाभ शक्य. कलाकार व खेळाडूंना चांगला काळ आहे. प्रेमिकांसाठी वैवाहीक जीवनात पदार्पण करण्यास अनुकुल काळ आहे. मित्रांशी किंवा आप्तेष्टांशी वाद होण्याची शक्यता आहे.
(by Astroshodh- Atul H. Kulkarni- 9422088979- Astrologer in Pune )

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी राहू, तृतियेत रवि, बुध, चतुर्थात गुरु, शुक्र, षष्ठात शनी व प्लुटो, सप्तमात मंगळ, केतू,  अष्टमात नेपचून आणि दशमात हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला बुधाचा शनीशी केंद्रयोग होईल. २५ तारखेला रविचा शनीशी केंद्रयोग होईल आणि २७ तारखेला रविचा मंगळाशी त्रिकोण होईल.
सप्ताहाची सुरुवात कंटाळवाणी व अडथळ्याची जरी झाली तरी नंतर सप्ताह बरा जाणार आहे.
काही आनंद देणार्‍या घटना घडू शकतात. संततीकडून चांगली बातमी कळेल. सप्ताह मध्यात
घरगुती प्रश्नांसाठी वेळ काढावा लागेल. प्रॉपर्टीच्या कामासाठी अनुकुल काळ आहे. सप्ताह
मध्यानंतर मनासारखे काम झाल्याने मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या शेवटी काही नोकरदार
मंडळींना कार्यालयीन कामासाठी प्रवासाचे योग येऊ शकतात.
(by Astroshodh- Atul H. Kulkarni- 9422088979- Astrologer in Pune )

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी रवि, बुध, तृतियेत गुरु,  शुक्र, पंचमात शनी, प्लुटो, षष्ठात मंगळ,  केतू, सप्तमात नेपचून, भाग्यात हर्षल आणि व्ययस्थानी राहू  अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला बुधाचा शनीशी केंद्रयोग होईल. २५ तारखेला रविचा शनीशी केंद्रयोग होईल आणि २७ तारखेला रविचा मंगळाशी त्रिकोण होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना चांगला कालावधी आहे. सप्ताह मध्यात एखादा आजार डोके वर काढू शकेल. आजार अंगावर काढू नका. काहींना सूचक स्वप्ने पडू शकतात. धार्मिक स्थळांना भेटी देण्याचे योगही येऊ शकतात. इतिहासकार, पुराण वस्तु संशोधअक, मानसशास्त्राचा अभ्यास करणार्‍यांना हा कालावधी अनुकुल आहे. सप्ताहाचा शेवट भाग्यवर्धक आहे.
(by Astroshodh- Atul H. Kulkarni- 9422088979- Astrologer in Pune )

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी गुरु,  शुक्र, चतुर्थात शनी, प्लुटो, पंचमात मंगळ, केतू,  षष्ठात नेपचून, अष्टमात हर्षल लाभस्थानी राहू आणि लग्नस्थानी रवि, बुध, अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला बुधाचा शनीशी केंद्रयोग होईल. २५ तारखेला रविचा शनीशी केंद्रयोग होईल आणि २७ तारखेला रविचा मंगळाशी त्रिकोण होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला नविन नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांसाठी चांगला. तब्बेतीच्या तक्रारी डोके वर काढणार नाहीत याची काळजी घ्या. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल.
भागीदारीतील व्यवसायात फ़ायदा संभवतो. सप्ताह मध्यानंतर एखाद्या जुन्या गुंतवणूकीतून फ़ायदा संभवतो. ईंशुरन्स संबंधी कामे करणार्‍यांना अनुकुल काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी भाग्यवर्धक गोष्टी शक्य आहेत.
(by Astroshodh- Atul H. Kulkarni- 9422088979- Astrologer in Pune )

तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी गुरु,  शुक्र तृतियेत शनी, प्लुटो, चतुर्थात मंगळ, केतू, पंचमात नेपचून, सप्तमात हर्षल, दशमस्थानी राहू आणि व्ययस्थानी रवि, बुध अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला बुधाचा शनीशी केंद्रयोग होईल. २५ तारखेला रविचा शनीशी केंद्रयोग होईल आणि २७ तारखेला रविचा मंगळाशी त्रिकोण होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला मुलांकडून सुवार्ता कळतील. विद्यार्थ्यांना, लेखकांना व कलाकारांना छान कालावधी आहे. प्रवासातचेही योग संभवतात. मात्र खिसे-पाकिट सांभाळावे. सप्ताह मध्य नोकरदार लोकांसाठी चांगला मात्र तब्बेतीच्या तक्रारी काहींना जाणवतील. वैद्यकीय व्यवसाय करणार्‍यांस अनुकुल काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांसाठी अनुकुल कालावधी आहे.
(by Astroshodh- Atul H. Kulkarni- 9422088979- Astrologer in Pune )

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी शनी, प्लुटो, तृतियेत मंगळ,  केतू, चतुर्थात नेपचून आणि षष्ठस्थानात हर्षल, भाग्यस्थानी राहू, लाभस्थानी रवि, बुध आणि
व्ययस्थानी गुरु,  शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला बुधाचा शनीशी केंद्रयोग होईल.
२५ तारखेला रविचा शनीशी केंद्रयोग होईल आणि २७ तारखेला रविचा मंगळाशी त्रिकोण होईल.
सप्ताहाची सुरुवात उत्सव, समारंभ, चैन, मौजमजा यांनी भरलेली असेल. मन प्रसन्न असेल.
घरकामासाठी मात्र वेळ काढावा लागेल. प्रॉपर्टीच्या कामातून फ़ायदा संभवतो. सप्ताहाचा मध्य
विद्यार्थ्यांना अनुकूल आहे. केलेल्या कष्टाचे चीज होईल. शिक्षणासठी परदेशात जाण्याचा प्रयत्न
करणार्‍यांसाठी अनुकुल काळ आहे. कलाकारांनाही चांगला काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी तब्बेतीची काळजी घ्यावी. वैद्यकीय व्यवसाय करणार्‍यांसाठी अनुकुल काळ आहे.
(by Astroshodh- Atul H. Kulkarni- 9422088979- Astrologer in Pune )

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शनी, प्लुटो,  धनस्थानी मंगळ, केतू, तृतिय स्थानात नेपचून, पंचमस्थानात हर्षल, अष्टमस्थानी राहू, दशमस्थानी रवि, बुध आणि लाभस्थानी गुरु, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला बुधाचा शनीशी केंद्रयोग होईल. २५ तारखेला रविचा शनीशी केंद्रयोग होईल आणि २७ तारखेला रविचा मंगळाशी त्रिकोण होईल. सप्ताहाच्या सुरूवातीला छान प्रवासाचे योग संभवतात. काही भाऊक क्षण अनुभवायला मिळतील. एखाद्या सण/ समारंभात भाग घ्याल. लेखकांना व कलाकारांना चांगला काळ आहे. चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. काहींना बदली किंवा बढतीची चाहूल लागेल. सप्ताहाच्या मध्यात संततीच्या प्रगतीमूळे खुश व्हाल. सप्ताहाच्या शेवटी गुंतवणुक करत असाल तर सावधतेने व्यवहार करावेत. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांसाठी हा कालावधी चांगला आहे.
(by Astroshodh- Atul H. Kulkarni- 9422088979- Astrologer in Pune )

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी मंगळ, केतू,  धनस्थानी नेपचून, चतुर्थस्थानी हर्षल, सप्तमस्थानी  राहू,  भाग्यस्थानी रवि, बुध,  दशमस्थानी गुरु, शुक्र आणि व्ययस्थानी शनी, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला बुधाचा शनीशी केंद्रयोग होईल. २५ तारखेला रविचा शनीशी केंद्रयोग होईल आणि २७ तारखेला रविचा मंगळाशी त्रिकोण होईल.
सप्ताहाची सुरूवात प्रिय घटनांनी होईल. वॆळ छान जाईल. खाण्यापिण्याची चंगळ होईल. प्रिय व्यक्तींच्या गाठीभेटीचे योग येतील. प्रवासयोग येतील. सप्ताह मध्य लेखक, वक्ते व कवी
यांच्यासाठी चांगला असेल. सप्ताह मध्यानंतर मनासारखी कामे झाल्यामुळे मन प्रसन्न असेल.
छान खरेदीचे योग येऊ शकतात. विद्यार्थांना व कलाकारांसाठी चांगला कालावधी आहे.
सप्ताहाच्या शेवटी गुंतवणूक करतांना काळजी घ्यावी.
(by Astroshodh- Atul H. Kulkarni- 9422088979- Astrologer in Pune )

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी नेपचून, तृतिय स्थानात हर्षल,
षष्ठस्थानी राहू,  अष्टमस्थानी रवि, बुध,  भाग्यस्थानी गुरु, शुक्र,  लाभस्थानी शनी, प्लुटो आणि
व्ययस्थानी मंगळ,  केतू अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला बुधाचा शनीशी केंद्रयोग होईल.
२५ तारखेला रविचा शनीशी केंद्रयोग होईल आणि २७ तारखेला रविचा मंगळाशी त्रिकोण
होईल.
संपूर्ण सप्ताह मस्त जांणार आहे. मन आनंदी असेल. कुटुंबीयांबरोबर छान सुर जमलेला असेल. मौज मजेचे प्रसंग घडतील. संततीचे काही प्रश्न असतील तर ते सोडवाल. मनासारखी खरेदी होईल. तब्बेत छान राहील. लोकांकडून कौतुकाचे शब्द ऎकायला मिळतील. आपल्या छंदांना जरूर वेळ द्यावा. काही भाग्यवर्धक घटना किंवा धनलाभही होऊ शकतात. एकंदरीतच संपूर्ण सप्ताह उत्तम असणार आहे.
(by Astroshodh- Atul H. Kulkarni- 9422088979- Astrologer in Pune )

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात हर्षल, पंचमस्थानी राहू,  सप्तमस्थानी रवि,  बुध, अष्टम स्थानी गुरु,  शुक्र,  दशमस्थानी शनी, प्लुटो, लाभ स्थानी मंगळ, केतू  आणि व्ययस्थानी नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला बुधाचा शनीशी केंद्रयोग होईल. २५ तारखेला रविचा शनीशी केंद्रयोग होईल आणि २७ तारखेला रविचा मंगळाशी त्रिकोण होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीस मनासारखी खरेदी होईल. अचानक उद्भवलेल्या एखादा खर्चही करावा
लागू शकतो. सप्ताहाच्या मध्यात रागावर नियंत्रण ठेवावे. निरर्थक गोष्टींमध्ये वेळ खर्च करु
नका. सप्ताहाच्या मध्यानंतर काहींना धनलाभाचे योग येतील. भावंडांच्या गाठीभेटीचे योग
येतील. कुटुंबीयांसमवेत वॆळ छान व्यतीत होईल. प्रवासाचे योग येतील. मात्र प्रवासात काळजी
घ्यावी.
(by Astroshodh- Atul H. Kulkarni- 9422088979- Astrologer in Pune )

#weekly-horoscope
#horoscope
#astroshodh
#astrology
#rashi
#bhavishya