अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२२ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर २०२६)

astroshodh, bestastrologerinpune, famousastrologerinpune, topastrologerinpune, bestastrologerinindia, famousastrologerinindia, topastrologerinindia

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी हर्षल, पंचमस्थानात मंगळ, गुरु, केतू, षष्ठस्थानी शुक्र, सप्तमस्थानात बुध, अष्टमस्थानात सूर्य, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात राहू आणि व्ययस्थानात शनि(व), नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला शुक्र तूळ राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. २५ तारखेला राहू कुंभ तर केतू सिंह राशित प्रवेश करेल. २६ तारखेला चंद्राचा मंगळ व गुरुशी लाभयोग होईल. २८ तारखेला शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला लाभदायक ग्रहमान आहे. संततीसौख्य लाभेल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. मानसन्मान मिळेल. खेळाडूंना विशेष यशाचा काळ असेल. सप्ताह मध्यात धनलाभाची शक्यता आहे. कौटुंबीक सौख्य मिळेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. एखाद्या खाऊगल्लीला आपल्या जिवलगांबरोबर फेरफटका मारुन यायला हरकत नाही. या काळात गायकांना काही नवीन संधी मिळू शकतील. सप्ताह मध्यानंतर ब्लॉगर्स, लेखक, खेळाडू व कलाकारांना अनुकूल कालावधी आहे. प्रवासयोगही शक्य. सप्ताहाच्या शेवटी कौटुंबिक सौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. प्रॉपटीची कामे मार्गी लागतील.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी हर्षल, चतुर्थस्थानात मंगळ, गुरु, केतू, पंचमस्थानात शुक्र, षष्ठस्थानी बुध, सप्तमस्थानात सूर्य, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात राहू आणि लाभस्थानात शनि(व), नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला शुक्र तूळ राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. २५ तारखेला राहू कुंभ तर केतू सिंह राशित प्रवेश करेल. २६ तारखेला चंद्राचा मंगळ व गुरुशी लाभयोग होईल. २८ तारखेला शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला पूर्वी केलेल्या एखाद्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकेल. खरेदीसाठीही काळ चांगला आहे. धार्मिक कार्यात सहभाग असेल. अध्यात्मिक उन्नतीसाठी गुरु केलेल्यांना चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे. परदेशगमन किंवा लांबच्या प्रवासाचे बेत मनात असतील तर त्यासाठी हा काळ अनुकूल आहे. सप्ताह मध्यात नोकरीच्या शोधात असणार्‍यांना काही संधी दृष्टीक्षेपात येतील. वकील, फिजिकल फिटनेस तसेच वैद्यकीय क्षेत्रातील लोकांसाठी हा कालावधी यशाचा ठरु शकेल. मात्र तब्येतीच्या किरकोळ तक्रारी जाणवू शकतील. सप्ताह मध्यानंतर छान मेजवानीचे योग येतील. एखादा अचानक झालेला धनलाभ सुखावून टाकेल. सप्ताहाच्या शेवटी तब्येतीच्या तक्रारी जाणवत रहातील. तुमच्या बोलण्याने किंवा वागण्याने लोक दुखावले जाणार नाहीत याची काळजी घ्या.
उपासना: श्रीसूक्ताचे नियमित पठण या कालावधीत केलेले चांगले ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी मंगळ, गुरु, केतू, चतुर्थस्थानात शुक्र, पंचमस्थानात बुध, षष्ठस्थानी सूर्य, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात राहू, दशमस्थानात शनि(व), नेपचून आणि व्ययस्थानात हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला शुक्र तूळ राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. २५ तारखेला राहू कुंभ तर केतू सिंह राशित प्रवेश करेल. २६ तारखेला चंद्राचा मंगळ व गुरुशी लाभयोग होईल. २८ तारखेला शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला धनलाभाची शक्यता आहे. खिशात पैसे खुळखुळत असल्याने चैन करावीशी वाटेल. मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभण्याचीही शक्यता आहे. सप्ताह मध्यात मनासारखी खरेदी होईल. उच्चशिक्षणासाठी परदेशगमन ज्यांना करायचं आहे अशा विद्यार्थ्यांच्या दृष्टीक्षेपात काही संधी येतील. कलाकारांना विशेषत: नृत्यकलेशी संबंधीत असलेल्यांना हा कालावधी जास्त अनु्कूल आहे. जुन्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. मनोरंजनाकडे कल राहील. सप्ताहाच्या शेवटी खरेदीसाठी काळ अनुकूल आहे. उपासनेत मन रमेल. या काळात केलेली गुंतवणूक दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरेल.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी मंगळ, गुरु, केतू, तृतीयस्थानी शुक्र, चतुर्थस्थानात बुध, पंचमस्थानात सूर्य, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात राहू, भाग्यस्थानात शनि(व), नेपचून आणि लाभस्थानात हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला शुक्र तूळ राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. २५ तारखेला राहू कुंभ तर केतू सिंह राशित प्रवेश करेल. २६ तारखेला चंद्राचा मंगळ व गुरुशी लाभयोग होईल. २८ तारखेला शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल. कार्यक्षेत्रात चांगले काम झाल्याने वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल. काही लाभही होतील. सप्ताह मध्यात लाभदायक ग्रहमान आहे. अपेक्षित गाठीभेटी होतील. आर्थिक सुयश लाभेल. तुमची एखादी महत्वाकांक्षा या दरम्यान पूर्ण होऊ शकेल. सप्ताह मध्यानंतर राहत्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे काही प्रश्न असतील तर ते मार्गी लावू शकाल. सप्ताहाच्या शेवटी वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. अचानक काही खर्च उद्भवू शकतील.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात मंगळ, गुरु केतू, धनस्थानी शुक्र, तृतीयस्थानी बुध, चतुर्थस्थानात सूर्य, षष्ठस्थानी प्लूटो, सप्तमस्थानात राहू, अष्टमस्थानात शनि(व), नेपचून आणि दशमस्थानात हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला शुक्र तूळ राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. २५ तारखेला राहू कुंभ तर केतू सिंह राशित प्रवेश करेल. २६ तारखेला चंद्राचा मंगळ व गुरुशी लाभयोग होईल. २८ तारखेला शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला भाग्यकारक ग्रहमान आहे. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. ज्यांनी अध्यात्मिक उन्नतीसाठी गुरु केले आहेत त्यांना या काळात चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे. प्रवासयोगही शक्य आहेत. सप्ताह मध्यात तुमच्या कार्यक्षेत्रात भरपूर काम होणार आहे. वरीष्ठ खुश असतील. काहींना धनलाभाची शक्यता आहे. संगणक क्षेत्रातील लोकांना हा कालावधी विशेष चांगला आहे. मनोरंजनाकडे कल राहील. मन आनंदी व उत्साही राहील. सप्ताहाच्या अखेरीस लाभदायक योग आहेत. आर्थिक सुयश लाभेल. मित्रांशी संपर्क होईल. मन प्रसन्न असेल.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात शुक्र, धनस्थानी बुध, तृतीयस्थानी सूर्य, पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी राहू, सप्तमस्थानात शनि(व), नेपचून, भाग्यस्थानात हर्षल आणि व्ययस्थानात मंगळ, गुरु, केतू अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला शुक्र तूळ राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. २५ तारखेला राहू कुंभ तर केतू सिंह राशित प्रवेश करेल. २६ तारखेला चंद्राचा मंगळ व गुरुशी लाभयोग होईल. २८ तारखेला शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात जरी कंटाळवाणी किंवा त्रासाची झाली तरी नंतर जसजसा आठवडा पुढे जाईल तसतसा कामाचा उत्साह वाढता राहील. सप्ताहाचे पहिले दोन दिवस वाहने जपून चालवा. कोणत्याही गोष्टीची जोखीम या अवधीत टाळलेली बरी. सप्ताह मध्य भाग्यवर्धक ठरेल. काही लाभदायक घटना घडू शकतील. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. उपासनेसाठी हा काळ चांगला आहे. सप्ताहाच्या शेवटी उत्तम ग्रहमान आहे. आर्थिक सुयश लाभेल. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचा योग शक्य आहे. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. एखादी महत्वाकांक्षा या काळात पूर्ण होऊ शकेल.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात बुध, धनस्थानी सूर्य, चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात राहू, षष्ठस्थानी शनि(व), नेपचून, अष्टमस्थानात हर्षल आणि लाभस्थानात मंगळ गुरु, केतू व्ययस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला शुक्र तूळ राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. २५ तारखेला राहू कुंभ तर केतू सिंह राशित प्रवेश करेल. २६ तारखेला चंद्राचा मंगळ व गुरुशी लाभयोग होईल. २८ तारखेला शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात चांगली असेल. लाभदायक ग्रहमान आहे. मनोबल उत्तम राहील. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. घरात आनंदी वातावरण असेल. सप्ताह मध्यात गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. विम्यासंबंधीत काम करणार्‍यांना कालावधी चांगला आहे. अचानक धनलाभाचे योगही शक्य. मात्र जोखीम असलेली कामे या दरम्यान करु नका. तब्येतीची काळजी घ्या. अती दगदग टाळा. सप्ताहाचा शेवट अध्यात्मिक उन्नतीसाठी चांगला आहे. भाग्यकारक ग्रहमान आहे. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. धार्मिक स्थळांना भेटी देण्याचे योगही शक्य आहे.
उपासना: या काळात रोज गणपती स्तोत्र म्हणावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात सूर्य, तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात राहू, पंचमस्थानात शनि(व), नेपचून, सप्तमस्थानात हर्षल, भाग्यस्थानात दशमस्थानात मंगळ, गुरु, केतू लाभस्थानात शुक्र, आणि व्ययस्थानात बुध अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला शुक्र तूळ राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. २५ तारखेला राहू कुंभ तर केतू सिंह राशित प्रवेश करेल. २६ तारखेला चंद्राचा मंगळ व गुरुशी लाभयोग होईल. २८ तारखेला शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला तब्येतीच्या तक्रारी जाणवत रहातील. विशेषत: अ‍ॅसिडिटी किंवा पोटाचे त्रास संभवतात. आहारावर नियंत्रण ठेवावे. तुमच्या बोलण्याने किंवा वागण्यामुळे कोणी दुखावले जाण्याची शक्यता आहे. काळजी घ्यावी. सप्ताह मध्यात संमिश्र ग्रहमान आहे. व्यापार्‍यांना काळ चांगला आहे मात्र अती दगदग त्रासदायक ठरु शकेल. या दरम्यान जोडीदाराशी वाद संभवतात. काळजी घ्या. सप्ताहाचा शेवट सामान्य आहे. गूढ गोष्टी तुम्हाला आकर्षित करतील. मात्र हाच काळ विमा एजंट, मानसोपचारतज्ञ, इतिहासकार, डेटा अ‍ॅनालिस्ट, संशोधक, ज्योतिषी यांना चांगला ठरु शकेल.
उपासना: श्रीसूक्ताचे नियमित पठण या कालावधीत केलेले चांगले.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी राहू, चतुर्थस्थानात शनि(व), नेपचून, षष्ठस्थानी हर्षल, नवमस्थानात मंगळ, गुरु, केतू, दशमस्थानात शुक्र, लाभस्थानात बुध आणि व्ययस्थानात सूर्य अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला शुक्र तूळ राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. २५ तारखेला राहू कुंभ तर केतू सिंह राशित प्रवेश करेल. २६ तारखेला चंद्राचा मंगळ व गुरुशी लाभयोग होईल. २८ तारखेला शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला उत्तम ग्रहमान आहे. मानसन्मान मिळेल. संततीसौख्य लाभेल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. विद्यार्थ्यांना व कलाकारांना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल. काही लाभही या काळात होऊ शकतील. सप्ताह मध्यात तुमच्या आरोग्याची योग्य ती खबरदारी घ्यावी. फ़िजिकल फ़िटनेस तसेच वैद्यकीय क्षेत्रातील लोकांसाठी मात्र काळ अनुकूल आहे. नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍या किंवा नोकरीबदल ज्यांना करायची इच्छा असेल त्यांनाही काळ अनुकूल आहे. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात राहू, तृतीयस्थानी शनि(व,), नेपचून, पंचमस्थानात हर्षल, अष्टमस्थानात मंगळ, गुरु, केतू नवमस्थानात शुक्र, दशमस्थानात बुध आणि लाभस्थानात सूर्य अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला शुक्र तूळ राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. २५ तारखेला राहू कुंभ तर केतू सिंह राशित प्रवेश करेल. २६ तारखेला चंद्राचा मंगळ व गुरुशी लाभयोग होईल. २८ तारखेला शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला रागावर नियंत्रण ठेवा. वाहने जपून चालवा. प्रॉपर्टीची कामे शक्यतो पुढे ढकला. गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. सप्ताह मध्यात उत्तम ग्रहमान आहे. आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. तुमच्या कलाकौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. कलाकारांना हा कालावधी विशेष यशदायक आहे. सप्ताह अखेरीस नोकरीबदल किंवा नोकरीच्या शोधात असणार्‍यांना काही संधी चालून येतील. वैद्यकीय व्यवसाय करणारे व वकिल यांना ग्रहमान अनुकूल आहे. तब्येतीला मात्र या काळात जपावे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, धनस्थानात शनि(व), नेपचून, चतुर्थस्थानात हर्षल, षष्ठस्थानी सप्तमस्थानी मंगळ, गुरु, केतू, अष्टमस्थानात शुक्र, नवमस्थानात बुध, दशमस्थानात सूर्य, आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला शुक्र तूळ राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. २५ तारखेला राहू कुंभ तर केतू सिंह राशित प्रवेश करेल. २६ तारखेला चंद्राचा मंगळ व गुरुशी लाभयोग होईल. २८ तारखेला शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. तुमच्या कौशल्याला वाव मिळेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. सोशल मिडियावर केलेली एखादी पोस्ट प्रसिध्दी मिळवून देऊ शकेल. विवाहोत्सूकांना विवाह ठरविण्यास ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह मध्यात उत्तम ग्रहमान आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. प्रॉपटीची कामे मार्गी लागतील. घरात छान वातावरण असेल. एखाद्या समारंभ किंवा पार्टीत सामिल होण्याचे योग आहेत. सप्ताह अखेरीस तुमच्या कलाकौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. कलाकारांना हा कालावधी विशेष यशदायक आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि(व), नेपचून, तृतीयस्थानी हर्षल, षष्ठस्थानात मंगळ, गुरु, केतू, सप्तमस्थानी शुक्र, अष्टमस्थानात बुध, नवमस्थानात सूर्य, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला शुक्र तूळ राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. २४ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. २५ तारखेला राहू कुंभ तर केतू सिंह राशित प्रवेश करेल. २६ तारखेला चंद्राचा मंगळ व गुरुशी लाभयोग होईल. २८ तारखेला शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला संमिश्र ग्रहमान आहे. एखादा धनलाभ शक्य आहे. मात्र या दरम्यान बोलण्यावर संयम हवा. तुमच्या बोलण्यामुळे लोक दुखावले जाऊ शकतील. काळजी घ्या. सप्ताह मध्यात वादग्रस्त लेखन सोशल मिडियावर शेअर करु नका. लोकांचे विचित्र अनुभव या काळात शक्य आहेत. प्रवासातही काळ्जी घेणे आवश्यक आहे. सप्ताहाच्या शेवटी रागावर नियंत्रण ठेवावे. घरात वाद होणार नाहीत याची काळजी आज घ्या. प्रॉपर्टीची कामे शक्यतो पुढे ढकला. बेकायदा गोष्टींपासून लांब रहा. अती दगदग टाळा. उपासनेत मन रमवल्यास मनातील नकारात्मक विचार दूर करायला मदत होईल.
उपासना: या काळात रोज महालक्ष्मीअष्टक म्हणावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)