अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (३ मे ते ९ मे २०२६)

Astroshodh, bestastrologerinpune, famousastrologerinpune, topastrologerinpune, bestastrologerinindia, famousastrologerinindia, topastrologerinindia

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, बुध, धनस्थानी शुक्र, हर्षल, तृतीयस्थानी गुरु, पंचमस्थानात केतू, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात राहू आणि व्ययस्थानात मंगळ, शनि, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. ६ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. ९ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला अचानक धनलाभाचे योग शक्य आहेत. ज्योतिषशास्त्र, रेकी, अध्यात्म अशा गूढ शास्त्रांचं आकर्षण वाटेल. मात्र या दरम्यान आरोग्याची काळजी घ्यावी तसेच वाहने जपून चालवावीत. सप्ताह मध्यात एखादी भाग्यवर्धक घटना घडू शकेल. धार्मिक कार्यक्रमात भाग घ्याल. अध्यात्मिक उन्नतीसाठी गुरु केलेल्यांना चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे. खरेदीसाठीही काळ अनुकूल आहे. या दरम्यान केलेली गुंतवणूक दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरेल. सप्ताह मध्यानंतर तुमच्या कार्यक्षेत्रात सर्व कामे व्यवस्थीत होतील याची काळजी घ्या. कामातील दिरंगाई महागात पडू शकेल. परदेशाशी संबंधीत कामांसाठी मात्र ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताहाच्या अखेरीस मित्रांच्या भेटीचे योग येतील. काहींना धनलाभ संभवतात.
उपासना: श्रीस्वामी समर्थांचा तारक मंत्र या काळात रोज म्हणावा किंवा ऐकावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शुक्र, हर्षल, धनस्थानी गुरु, चतुर्थस्थानात केतू, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात राहू, लाभस्थानात मंगळ, शनि, नेपचून आणि व्ययस्थानात सूर्य, बुध अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. ६ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. ९ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला आत्मविश्वास वाढेल. सोशल मिडियावर केलेली एखादी पोस्ट प्रसिध्दी मिळवून देऊ शकेल. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. अपेक्षित लाभ होतील. व्यावसयिकांना फायदा देणार्‍या नवीन संधी चालून येतील. मन आनंदी व उत्साही राहील. सप्ताह मध्यात अचानक धनलाभाचे योग शक्य. ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध मानसशास्त्र, ज्योतिषशास्त्र, इतिहास, संशोधन, Data Analysis इ. गोष्टींशी आहे त्यांना उत्तम ग्रहमान आहे. सप्ताह मध्यानंतर भाग्यकारक ग्रहमान आहे. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. जुने मित्र अचानक भेटतील. वेळ मजेत जाईल. मित्रांच्या मदतीने एखादे काम मार्गी लावू शकाल. सप्ताहाचा शेवट चांगला जाईल. वरिष्ठांकडून एखादी मागणी मान्य करुन घेता येईल.
उपासना: मारुतीची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु, तृतीयस्थानी केतू, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात राहू, दशमस्थानात मंगळ, शनि, नेपचून, लाभस्थानात सूर्य, बुध आणि व्ययस्थानात शुक्र, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. ६ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. ९ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात आरोग्याच्या तक्रारीची असू शकते. तुमच्या बोलण्यामुळे कोणी नाराज होणार नाहीत याची काळजी घ्यावी. नोकरीच्या शोधात असणार्‍यांना मात्र काही संधी दृष्टीक्षेपात येतील. तुमचे मित्रमैत्रिणी/ तुमच्या ओळखीचे लोक यासाठी उपयोगी पडू शकतील. सप्ताह मध्यात उत्तम ग्रहमान आहे. घरात आनंदी वातावरण असेल. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल. व्यावसायिकांना फायदा देणार्‍या नवीन संधी चालून येतील. सप्ताह अखेरीस अचानक आलेल्या अडचणींनी त्रस्त व्हाल. चिडचीड वाढेल. वाहने जपून चालवावीत. जोखीम असलेले कोणतेही काम या काळात करु नका. वरीष्ठ किंवा वडीलधारी मंडळींशी या काळात वाद होण्याची शक्यता आहे. मन शांत ठेवावे. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमवा.
उपासना: रविवारी नवग्रह मंदिरात जाऊन सूर्यनारायणाचे दर्शन जरुर घ्यावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी केतू, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात राहू, भाग्यस्थानात मंगळ, शनि, नेपचून, दशमस्थानात सूर्य, बुध, लाभस्थानात शुक्र, हर्षल आणि व्ययस्थानात गुरु अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. ६ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. ९ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला उत्तम ग्रहमान आहे. तुमच्या कलाकौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. काही लाभ होतील. संततीबद्दल चांगली बातमी कळू शकेल. विद्यार्थ्यांना व कलाकारांना यशदायक ग्रहमान आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. प्रसिध्दी मिळेल. सप्ताह मध्यात नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. नोकरीच्या शोधात असणार्‍यांना काही संधी दृष्टीक्षेपात येतील. सामाजिक कामात सहभागी व्हाल. वकील, न्यायाधीश तसेच वैद्यकीय व्यवसाय करणार्‍यांना कालावधी चांगला आहे. मात्र अती दगदग यादरम्यान टाळा. सप्ताह मध्यानंतर जोडीदाराची काळजी घ्या. जोडीदाराबरोबर वाद टाळा. सप्ताहाचा शेवट पुराण, अध्यात्म, ज्योतिष किंवा अन्य गूढ गोष्टींच्या अभ्यासास चांगला आहे. मधूमेह असणार्‍यांनी मात्र या काळात योग्य ते पथ्यपाणी सांभाळावे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात केतू, षष्ठस्थानी प्लूटो, सप्तमस्थानात राहू, अष्टमस्थानात मंगळ, शनि, नेपचून, भाग्यस्थानात सूर्य, बुध, दशमस्थानात शुक्र, हर्षल आणि लाभस्थानात गुरु अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. ६ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. ९ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला रागावर नियंत्रण ठेवा. वाहने जपून चालवा. गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. ज्यांना ज्योतिषसास्त्र, अंकशास्त्र, वास्तूशास्त्र, रेकी अशा विषयांचा अभ्यास करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी उत्तम ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात लाभदायक ग्रहमान आहे. संततीसौख्य लाभेल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. विद्यार्थ्यांना व कलाकारांना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल. मानसन्मान मिळेल. खेळाडूंना तसेच कलाकारांना हा काळ विशेष यशाचा असेल. नवीन परिचय होतील. सप्ताह मध्यानंअतर तब्येतीची काळजी घ्या. अती दगदग टाळा. जोडीदाराबरोबर वाद टाळा. जोखीम असलेली कामे य दरम्यान करु नका. महत्त्वाची कामे पुढे ढकला.
उपासना: ’ श्री गुरुदेव दत्त ’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी राहू, सप्तमस्थानात मंगळ, शनि, नेपचून, अष्टमस्थानात सूर्य, बुध, भाग्यस्थानात शुक्र, हर्षल, दशमस्थानात गुरु आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. ६ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. ९ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला उत्तम ग्रहमान आहे. मनोबल उत्तम राहील. तुमच्या कलाकौशल्याला वाव मिळेल. साहित्यिकांसाठी चांगला काळ आहे. मानसन्मान मिळेल. प्रवासाचे योग संभवतात. भावंडांच्या भेटीचे योग शक्य. सप्ताह मध्यात कौटुंबीक सौख्य लाभेल. घरातील कामांसाठी वेळ काढावा लागेल. मन प्रसन्न असेल. प्रॉपर्टीच्या कामांसाठी अनुकूल दिवस आहे. सप्ताह अखेरीस संततीसौख्य लाभेल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. वकील व वैद्यकीय क्षेत्रात काम करणार्‍यांना फायदेशीर काळ आहे. प्रेमिकांना लग्न ठरविण्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे.
उपासना: श्रीस्वामी समर्थांचा तारक मंत्र या काळात रोज म्हणावा किंवा ऐकावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात राहू, षष्ठस्थानी मंगळ, शनि, नेपचून, सप्तमस्थानात सूर्य, बुध, अष्टमस्थानात शुक्र, हर्षल, भाग्यस्थानात गुरु आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. ६ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. ९ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला संमिश्र ग्रहमान आहे. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. सामाजिक कामात सहभागी व्हाल. मात्र अती दगदग टाळा. आपले आरोग्य सांभाळा. या काळात तुमच्या बोलण्याने किंवा वागण्याने लोक दुखावले जाणार नाहीत याची काळजी घ्या. सप्ताह मध्यात नोकरीनिमित्त प्रवासयोग शक्य. मात्र लोकांशी व्यवहार करतांना तसेच सोशल मिडियावर काही शेअर करतांना ते वादग्रस्त होणार नाही याची काळजी घ्या. या दरम्यान एखादी महत्वाची जबाबदारी तुमच्यावर सोपावली जाऊ शकेल. परीवर्तनाला तुम्ही तयार असलात तर हीच भविष्यातील लाभदायक संधी ठरु शकेल. सप्ताह अखेर संमिश्र घटना घडतील. विद्यार्थांना चांगला कालावधी आहे. तब्येतीची काळजी घेणं मात्र आवश्यक आहे.
उपासना: या काळात दत्तबावनी रोज म्हणावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात राहू, पंचमस्थानात मंगळ, शनि, नेपचून, नेपचून, षष्ठस्थानी सूर्य, बुध, सप्तमस्थानात शुक्र, हर्षल, अष्टमस्थानात गुरु आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. ६ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. ९ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला भाग्यकारक ग्रहमान आहे. मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. सप्ताह मध्यात संमिश्र ग्रहमान आहे. धनलाभ होण्याचे योग आहेत. मात्र मात्र तुमच्या बोलण्यामुळे या दरम्यान लोक दुखावले जाणार नाहीत याची दक्षता घ्या. तसेच या काळात खाण्यापिण्यावर देखील नियंत्रण हवे. सप्ताह मध्यानंतर भावंडांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग संभवतात. लेखक, ब्लॉगर्स यांना हा काळ खूप चांगला आहे. काहींना जवळपासच्या सहलीचे योग येऊ शकतात. प्रॉपर्टीच्या कामांमधून लाभ संभवतात. मात्र कागदपत्रे योग्य व्यक्तीकडून तपासून घेऊनच व्यवहार करावेत.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जप या काळात करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी राहू, चतुर्थस्थानात मंगळ, शनि, नेपचून, पंचमस्थानात सूर्य, बुध, षष्ठस्थानी शुक्र, हर्षल, सप्तमस्थानात गुरु आणि नवमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. ६ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. ९ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला ग्रहमान संमिश्र आहे. जोखीम असलेली कामे करु नका. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. बेकायदा गोष्टींपासून लांब रहा. अती दगदग टाळा. नकारात्मक विचारांना मनात थारा देऊ नका. मात्र हाच कालावधी परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांना अनुकूल आहे. सप्ताह मध्यात चांगले ग्रहमान आहे. आत्मविश्वास वाढेल. घरात आनंदी वातावरण असेल. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल. व्यावसयिकांना फायदा देणार्‍या नवीन संधी चालून येतील. सप्ताह अखेर आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. भावंडांची खुशाली कळेल. कलाकौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. साहित्यिक, लेखक, कलाकार यांना हा कालावधी विशेष चांगला आहे. राहत्या जागेचे व व्यवसायाच्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात राहू, तृतीयस्थानी मंगळ, शनि, नेपचून, चतुर्थस्थानात सूर्य, बुध, पंचमस्थानात शुक्र, हर्षल, षष्ठस्थानी गुरु आणि अष्टमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. ६ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. ९ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला लाभदायक ग्रहमान आहे. मित्रमैत्रिणींच्या भेटीचे योग संभवतात. काही लाभही या काळात होण्याची शक्यता आहे. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. विवाहोत्सुकांना लग्न ठरविण्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह मध्यात खिशात पैसे खुळखुळत असल्याने चैन करावीशी वाटेल. छान खरेदी कराल. काही अचानक उद्भवलेले खर्चही करावे लागतील. परदेश प्रवासासाठी अनुकूल काळ आहे. कलेच्या क्षेत्रात चांगले काम होईल. सप्ताह अखेरीस आर्थिक स्थिती चांगली असेल. घरात आनंदी वातावरण असेल. सोशल मिडियावर केलेली एखादी पोस्ट प्रसिध्दी मिळवून देऊ शकेल.
उपासना: या काळात मारुतीची उपासना करणे, मारुतीचे दर्शन घेणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, धनस्थानात मंगळ, शनि, नेपचून, तृतीयस्थानी सूर्य, बुध, चतुर्थस्थानात शुक्र, हर्षल, पंचमस्थानात गुरु, सप्तमस्थानी केतू आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. ६ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. ९ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहात सुरुवातीला काहींना वरीष्ठांकडून सहकार्य मिळेल. नोकरी तसेच व्यवसायातील लोक भरपूर आणि मनाजोगते काम झाल्याने खूष असतील. मुख्य म्हणजे केलेल्या कामाचा मोबदलाही व्यवस्थित मिळाल्याने मन प्रसन्न राहील. सप्ताह मध्यात आर्थिक स्थिती चांगली असेल. आप्तेष्टांच्या किंवा मित्रमंडळींच्या भेटीची शक्यता आहे. एखादी महत्वाकांक्षाही पूर्ण होऊ शकेल. सप्ताह मध्यानंतर जुनी येणी वसूल होतील. पूर्वीच्या एखाद्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. नृत्य कलाकारांना उत्तम ग्रहमान आहे. परदेशाशी संबंधीत कामांमधूनही लाभ या दरम्यान शक्य. सप्ताहाच्या शेवटी तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. तुमच्या संभाषणकौशल्यामुळे एखादं काम मार्गी लागण्याणी शक्यता आहे.
उपासना: श्रीसूक्ताचे नियमित पठण या कालावधीत केलेले चांगले.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, शनि, नेपचून, धनस्थानी सूर्य, बुध, तृतीयस्थानी शुक्र, हर्षल, चतुर्थस्थानात गुरु, षष्ठस्थानात केतू, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. ६ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. ९ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल.
फलादेश- छान आठवडा आहे. सप्ताहात सुरुवातीला भाग्याची चांगली साथ मिळणार आहे. अध्यात्मिक उन्नतीसाठी गुरु केलेल्यांना चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे. वरीष्ठ तुमच्या कामावर खुश असतील. प्रवासाचे बेत मनात घोळत राहतील. सप्ताह मध्यात कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. व्यवसायात नवीन तंत्र अमलात आणाल. शासकीय कामे मार्गी लागतील. प्रसिध्दी मिळेल. लाभदायक ग्रहमान आहे. मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या शेवटी संमिश्र ग्रहमान आहे. मित्रमैत्रिणींच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग संभवतात. काही लाभ या काळात होण्याची शक्यता आहे. खरेदीसाठी काळ अनुकूल आहे. मात्र खर्चही या काळात वाढणार आहेत.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)