
अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१४ सप्टेंबर ते २० सप्टेंबर २०२५)
Astroshodh, bestastrologerinpune, famousastrologerinpune, topastrologerinpune, bestastrologerinindia, famousastrologerinindia, topastrologerinindia
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी हर्षल, तृतीयस्थानी गुरु, चतुर्थस्थानात शुक्र, पंचमस्थानात सूर्य, बुध, केतू, सप्तमस्थानात मंगळ, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात राहू आणि व्ययस्थानात शनि(व), नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग व शनिशी केंद्रयोग होईल. १५ तारखेला शुक्र सिंह राशित आणि बुध कन्या राशित प्रवेश करेल. १६ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाशी लाभयोग व गुरुशी युती होईल. १७ तारखेला सूर्य कन्या राशित प्रवेश करेल आणि बुधाचा शनिशी प्रतियोग होईल. १९ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात प्रिय घटनांनी होईल. रविवारी आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल. नंतरचे दोन दिवससुध्दा लाभदायक आहेत. भावंडांबद्दल चांगली बातमी कळेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. प्रवास फ़ायदेशीर ठरतील. ब्लॉगर्स, लेखक, कवी व चित्रकार यांना उत्तम ग्रहमान आहे. सप्ताह मध्य अनुकूल आहे. घरात छान वातावरण असेल. एखाद्या कार्यक्रम किंवा समारंभात सामील होण्याचे योग येऊ शकतात. राहत्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे काही प्रश्न असतील तर ते मार्गी लावू शकाल. सप्ताह अखेरीस मन प्रसन्न असेल. कलाकार, खेळाडू व विद्यार्थ्यांना कालावधी खूप चांगला आहे. संततीबद्दल चांगली बातमी कळेल. काही लाभही होण्याची यादरम्यान शक्यता आहे.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी हर्षल, धनस्थानी गुरु, तृतीयस्थानी शुक्र, चतुर्थस्थानात सूर्य, बुध, केतू, षष्ठस्थानी मंगळ, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात राहू आणि लाभस्थानात शनि(व), नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग व शनिशी केंद्रयोग होईल. १५ तारखेला शुक्र सिंह राशित आणि बुध कन्या राशित प्रवेश करेल. १६ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाशी लाभयोग व गुरुशी युती होईल. १७ तारखेला सूर्य कन्या राशित प्रवेश करेल आणि बुधाचा शनिशी प्रतियोग होईल. १९ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला भाग्याची साथ मिळेल. मन आनंदी असेल. कुटुंबीयांबरोबर छान सूर जमलेला असेल. आवडत्या लोकांच्या भेटी होतील. लेखक, प्रकाशक यांना विशेष अनुकूल कालावधी आहे. एखादी चांगली बातमी ऎकायला मिळेल. सप्ताह मध्यात गायक, कलाकार व वक्त्यांना चांगला काळ आहे. तुमच्या छंदासाठी जरुर वेळ द्या. प्रवासाचे योग संभवतात. सप्ताहाच्या शेवटी प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. घरातील कामांसाठी वेळ काढावा लागेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. कौटुंबीक सौख्याचा दिवस आहे. मन प्रसन्न असेल.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात गणपतीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु, धनस्थानी शुक्र, तृतीयस्थानी सूर्य, बुध, केतू, पंचमस्थानात मंगळ, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात राहू, दशमस्थानात शनि(व), नेपचून आणि व्ययस्थानात हर्षल, अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग व शनिशी केंद्रयोग होईल. १५ तारखेला शुक्र सिंह राशित आणि बुध कन्या राशित प्रवेश करेल. १६ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाशी लाभयोग व गुरुशी युती होईल. १७ तारखेला सूर्य कन्या राशित प्रवेश करेल आणि बुधाचा शनिशी प्रतियोग होईल. १९ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला बोलण्यावर संयम ठेवावा. खर्च वाढतील. आरोग्याच्या काही समस्याही जाणवतील. जोखीम असलेल्या कामांपासून लांब रहा. कोणालाही विनाकारण दिलेला सल्ला या काळात त्रासदायक ठरु शकेल. मात्र नृत्यकलेशी संबंधितांना हा कालावधी छान जाईल. पूर्वी केलेला एखादा खर्च आता अचानक लाभ देऊन जाईल. सप्ताह मध्यात मिष्टान्न खायला मिळतील. मन प्रसन्न असेल. कुटुंबामधील वातावरण चांगले असेल. काही लाभही होतील. सप्ताहाच्या शेवटी शेजारी तसेच नातेवाईकांचा चांगला अनुभव येईल. या काळात केलेले प्रवास आनंद देणारे ठरतील.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात रोज गणपती स्तोत्र म्हणणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शुक्र, धनस्थानी सूर्य, बुध, केतू, चतुर्थस्थानात मंगळ, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात राहू, भाग्यस्थानात शनि(व), नेपचून, लाभस्थानात हर्षल आणि व्ययस्थानात गुरु अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग व शनिशी केंद्रयोग होईल. १५ तारखेला शुक्र सिंह राशित आणि बुध कन्या राशित प्रवेश करेल. १६ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाशी लाभयोग व गुरुशी युती होईल. १७ तारखेला सूर्य कन्या राशित प्रवेश करेल आणि बुधाचा शनिशी प्रतियोग होईल. १९ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला मनाला आनंद देणार्या घटना घडण्याची शक्यता आहे. मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग शक्य आहेत. काही लाभही होतील. चांगली खरेदी कराल. अती दगदग मात्र टाळावी. परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांना लाभदायक ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात जुनी येणी वसूल होतील. पूर्वीच्या एखाद्या गुंतवणुकीतून चांगला फायदा होऊ शकेल. अध्यात्मिक उन्नतीसाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांनाही चांगला कालावधी आहे. घरातील वातावरण आनंदी असेल. सप्ताह अखेरीस काहींना धनलाभ शक्य आहे. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. गृहसौख्य लाभेल.
या सप्ताहासाठी उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात सूर्य, बुध, केतू, तृतीयस्थानी मंगळ, षष्ठस्थानी प्लूटो, सप्तमस्थानात राहू, अष्टमस्थानात शनि(व), नेपचून, दशमस्थानात हर्षल, लाभस्थानात गुरु आणि व्ययस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग व शनिशी केंद्रयोग होईल. १५ तारखेला शुक्र सिंह राशित आणि बुध कन्या राशित प्रवेश करेल. १६ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाशी लाभयोग व गुरुशी युती होईल. १७ तारखेला सूर्य कन्या राशित प्रवेश करेल आणि बुधाचा शनिशी प्रतियोग होईल. १९ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहात सुरुवातीला वरीष्ठांशी जमवून घेतल्यास तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. परदेशासंबंधी ज्यांचा व्यवसाय आहे अशा लोकांना केलेल्या कामाचा मोबदला व्यवस्थित मिळाल्याने मन प्रसन्न राहील. सप्ताहाचा मध्य उत्तम आहे. आर्थिक सुयश लाभेल. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचा योग शक्य आहे. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. सप्ताहाच्या शेवटी मनासारखी खरेदी होईल. काही अनपेक्षित खर्चही करावे लागू शकतात. एखाद्या गोष्टीची उगीचच काळजी किंवा हूरहूर लागून राहील.
या सप्ताहासाठी उपासना: ’विठ्ठल’ नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी मंगळ, पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी राहू, सप्तमस्थानात शनि(व), नेपचून, भाग्यस्थानात हर्षल, दशमस्थानात गुरु, लाभस्थानात शुक्र आणि व्ययस्थानात सूर्य, बुध, केतू, अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग व शनिशी केंद्रयोग होईल. १५ तारखेला शुक्र सिंह राशित आणि बुध कन्या राशित प्रवेश करेल. १६ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाशी लाभयोग व गुरुशी युती होईल. १७ तारखेला सूर्य कन्या राशित प्रवेश करेल आणि बुधाचा शनिशी प्रतियोग होईल. १९ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शुक्राशी युती होईल.
फलादेश- रविवारी भाग्याची साथ मिळेल. तुमचे अंदाज व निर्णय अचूक ठरतील. कामे मार्गी लागतील. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. काहींना प्रवासाचे योग संभवतात. नंतरचे दोन दिवस अनुकूल आहेत. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होणार आहे. काहींना वरीष्ठांकडून कौतुकाचे शब्द ऐकायला मिळू शकतात. सप्ताह मध्यात कलेच्या संबंधीत ज्यांचे कार्यक्षेत्र आहे त्यांना हा काळ विशेष चांगला आहे. काहींना धनलाभ संभवतात. मित्रांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग संभवतात. मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या शेवटी आयात-निर्यात करणार्या व्यापार्यांना अनुकूल काळ आहे. मात्र या दरम्यान बेकायदा गोष्टींपासून लांब रहावे.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात मंगळ, चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात राहू, षष्ठस्थानी शनि(व), नेपचून, अष्टमस्थानात हर्षल, भाग्यस्थानात गुरु, दशमस्थानात शुक्र आणि लाभस्थानात सूर्य, बुध, केतू अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग व शनिशी केंद्रयोग होईल. १५ तारखेला शुक्र सिंह राशित आणि बुध कन्या राशित प्रवेश करेल. १६ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाशी लाभयोग व गुरुशी युती होईल. १७ तारखेला सूर्य कन्या राशित प्रवेश करेल आणि बुधाचा शनिशी प्रतियोग होईल. १९ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात कंटाळवाणी व अडथळ्याची जरी झाली तरी नंतर पूर्ण सप्ताह छान जाणार आहे. रविवार संमिश्र असेल. आपले आरोग्य सांभाळा. मात्र एखाद्या गोष्टीतील बदल किंवा परीवर्तन फायदेशीर ठरु शकेल. सोमवार व मंगळवारी मनासारखे काम झाल्याने खुश असाल. कौटुंबिक सौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. धनलाभ होण्याचेही योग आहेत. सप्ताहाचा मध्य उपासना करणार्यांना चांगला आहे. काही भाग्यवर्धक घडतील. बढती किंवा पगार वाढीसाठी अनुकूल काळ आहे. लांबच्या प्रवासाच्या योग येऊ शकतील. सप्ताहाच्या शेवटी जुने मित्र भेटण्याची शक्याता आहे. नृत्यकलाकारांना तसेच शिक्षणक्षेत्राशी संबंधितांना अनुकूल ग्रहमान आहे. काही लाभ मनाला आनंद देतील.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात राहू, पंचमस्थानात शनि(व), नेपचून, सप्तमस्थानात हर्षल, अष्टमस्थानात गुरु, भाग्यस्थानात शुक्र, दशमस्थानात सूर्य, बुध, केतू आणि व्ययस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग व शनिशी केंद्रयोग होईल. १५ तारखेला शुक्र सिंह राशित आणि बुध कन्या राशित प्रवेश करेल. १६ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाशी लाभयोग व गुरुशी युती होईल. १७ तारखेला सूर्य कन्या राशित प्रवेश करेल आणि बुधाचा शनिशी प्रतियोग होईल. १९ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शुक्राशी युती होईल.
फलादेश- रविवारी जोडीदाराबरोबर मस्त शॉपिंगला जायला हरकत नाही. वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्यां चांगला कालावधी आहे. त्यानंतरचे दोन दिवस विमाप्रतिनिधी, मानसोपचारतज्ञ, ज्योतिषी यांना अनुकूल आहेत. काहींना अचानक लाभाचे योग संभवतात. मात्र या दरम्यान दुसर्यांच्या चुका दाखविण्याची तसेच स्पष्ट बोलण्याची सवय त्रासदायक ठरु शकेल. सप्ताह मध्यानंतर धार्मिक गोष्टींसाठी चांगला काळ आहे. प्रवासाचे बेत ठरतील. सासरकडच्या लोकांबाबत चांगली बातमी कळेल. सप्ताहाच्या शेवटी तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम झाल्याने खुश असाल. वरीष्ठांची बहाल मर्जी असेल. मन प्रसन्न असेल.
या सप्ताहासाठी उपासना: रविवारी नवग्रह मंदिरात जाऊन सूर्यनारायणाचे दर्शन जरुर घ्यावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी राहू, चतुर्थस्थानात शनि(व), नेपचून, षष्ठस्थानी हर्षल, सप्तमस्थानात गुरु, अष्टमस्थानात शुक्र, नवमस्थानात सूर्य, बुध, केतू आणि लाभस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग व शनिशी केंद्रयोग होईल. १५ तारखेला शुक्र सिंह राशित आणि बुध कन्या राशित प्रवेश करेल. १६ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाशी लाभयोग व गुरुशी युती होईल. १७ तारखेला सूर्य कन्या राशित प्रवेश करेल आणि बुधाचा शनिशी प्रतियोग होईल. १९ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला नोकरीसाठी प्रयत्न करणार्यांना अनुकूल ग्रहमान आहे. धनलाभ होतील. तब्येत मात्र यादरम्यान जपायला हवी. सप्ताहाचा मध्य उत्तम आहे. घरात आनंदी वातावरण असेल. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल. तुमच्या कार्यक्षेत्रात समाधानकारक स्थिती असेल. प्रलंबीत असलेली कामे मार्गी लावू शकाल. एखादी महत्वाची जबाबदारी तुमच्यावर सोपावली जाऊ शकेल. व्यापार्यांना फायदेशीर ग्रहमान आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर जोखीम असलेली कामे करु नका. महत्त्वाची कामे पुढे ढकला. वाहने सावकाश चालवा. ज्योतिषशात्र, रेकी, कुंडलिनी जागृती अशा विषयांकडे मनाचा ओढा असेल. सप्ताहाच्या शेवटी तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
या सप्ताहासाठी उपासना: रामरक्षेचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात राहू, तृतीयस्थानी शनि(व), नेपचून, पंचमस्थानात हर्षल, षष्ठस्थानी गुरु, सप्तमस्थानात शुक्र, अष्टमस्थानात सूर्य, बुध, केतू आणि दशमस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग व शनिशी केंद्रयोग होईल. १५ तारखेला शुक्र सिंह राशित आणि बुध कन्या राशित प्रवेश करेल. १६ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाशी लाभयोग व गुरुशी युती होईल. १७ तारखेला सूर्य कन्या राशित प्रवेश करेल आणि बुधाचा शनिशी प्रतियोग होईल. १९ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शुक्राशी युती होईल.
फलादेश- रविवारचा दिवस चांगला आहे. आवडत्या माणसांबरोबर वेळ मजेत जाईल. कलाकारांना दिवस अनुकूल आहे. सोमवार, मंगळवार नोकरदार लोकांसाठी चांगले आहेत. वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. मात्र तब्येतीच्या तक्रारी काहींना जाणवतील. सर्दी/ सायनसचा त्रास असेल तर काळजी घ्यावी. सप्ताहाच्या मध्यात जोडीदाराबरोबर वेळ चांगला जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांना फायदेशीर कालावधी आहे. सप्ताहाच्या शेवटी अचानक धनलाभाचे योग संभवतात. गूढ विषयांमध्ये मन रमेल. एखाद्या गोष्टीतील बदल किंवा परीवर्तन फायदेशीर ठरु शकेल.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसा रोज म्हणणे उचित ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, धनस्थानात शनि(व), नेपचून, चतुर्थस्थानात हर्षल, पंचमस्थानात गुरु, षष्ठस्थानी शुक्र, सप्तमस्थानी सूर्य, बुध, केतू, नवमस्थानात मंगळ आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग व शनिशी केंद्रयोग होईल. १५ तारखेला शुक्र सिंह राशित आणि बुध कन्या राशित प्रवेश करेल. १६ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाशी लाभयोग व गुरुशी युती होईल. १७ तारखेला सूर्य कन्या राशित प्रवेश करेल आणि बुधाचा शनिशी प्रतियोग होईल. १९ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला मौज-मजा करण्याकडे कल असेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मुलांच्या प्रगतीबाबत समाधनी असाल. घरातील कामांसाठी वेळ काढावा लागेल. मन प्रसन्न असेल. सप्ताह मध्यात संमिश्र ग्रहमान आहे. विद्यार्थ्यांनी अती आत्मविश्वास टाळावा. अभ्यासाकडे दुर्लक्ष नको. तुमच्या मुलांना तुमची काही मदत हवी आहे आणि ते तुम्हाला सांगायला टाळत तर नाही ना याचा अंदाज घ्या. ज्योतिषशास्त्र, रेकी किंवा तत्सम गूढ गोष्टींच्या अभ्यासासाठी मात्र अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर काहींना नवीन नोकरीच्या संधी चालून येतील. मात्र तब्येतीच्या काही तक्रारी जाणवतील. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर वेळ आनंदात जाईल. व्यापार्यांना फायदेशीर ग्रहमान आहे.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसा रोज म्हणणे उचित ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि(व), नेपचून, तृतीयस्थानी हर्षल, चतुर्थस्थानात गुरु, पंचमस्थानात शुक्र, षष्ठस्थानात सूर्य, बुध, केतू, अष्टमस्थानात मंगळ, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग व शनिशी केंद्रयोग होईल. १५ तारखेला शुक्र सिंह राशित आणि बुध कन्या राशित प्रवेश करेल. १६ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाशी लाभयोग व गुरुशी युती होईल. १७ तारखेला सूर्य कन्या राशित प्रवेश करेल आणि बुधाचा शनिशी प्रतियोग होईल. १९ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शुक्राशी युती होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताह चांगला आहे. रविवारी प्रियजनांचा सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. काही लाभ होतील. त्यानंतरचे दोन दिवस मनोबल उत्तम राहील. प्रवास लाभदायी ठरतील. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. गुरु किंवा गुरुतुल्य व्यक्तीच्या भेटीचे योग शक्य. प्रॉपर्टी किंवा वाहन खरेदीसाठी चांगले आहेत. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मन प्रसन्न असेल. सप्ताह मध्यात संततीच्या प्रगतीमूळे खुश व्हाल. स्पर्धा परिक्षेत चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. एखादी शाबासकी किंवा कौतुकाची मिळालेली थाप, बक्षिस सुखावून टाकेल. धनलाभही या काळात होण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या शेवटी आरोग्याच्या काही समस्या जाणवू शकतील. ज्यांची कर्जप्रकरणे प्रलंबीत आहेत त्यांना मात्र अनुकूल ग्रहमान आहे.
या सप्ताहासाठी उपासना: ’ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: ’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)