अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२४ मार्च ते ३० मार्च २०२४)

(Astroshodh- bestastrologerinpune, famousastrologerinpune, topastrologerinpune, bestastrologerinindia, famousastrologerinindia, topastrologerinindia)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु, हर्षल, षष्ठस्थानात केतू, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात मंगळ, शुक्र, शनि आणि व्ययस्थानात सूर्य, बुध, राहू, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २४ तारखेला शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल. २५ तारखेला चंद्राची सूर्याशी प्रतियुती होईल. २६ तारखेला बुध मेष राशित प्रवेश करेल आणि तिथे्च त्याची चंद्राशी प्रतियुती होईल. २८ तारखेला चंद्राची गुरुशी प्रतियुती होईल. ३० तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला संमिश्र ग्रहमान आहे. कर्जप्रकरणे प्रलंबित असतील तर ती आता मंजूर होऊ शकतील. नोकरीबदल, बदली किंवा बढतीच्या प्रयत्नात असाल तर काही अनुकूल घटना अपेक्षित आहेत. वरीष्ठांशी जमवून घेतल्यास तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. मात्र तब्येतीच्या काही तक्रारी जाणवू शकतील. सप्ताहाच्या मध्यात लाभदायक ग्रहमान आहे. जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांसाठी चांगला कालावधी आहे. व्यापार्‍यांना फायदेशीर ठरु शकतील अशा नवीन संधी प्राप्त होतील. आवडत्या व्यक्तीच्या भेटीचाही योग आहे. सप्ताहाच्या शेवटी गूढ विषय तुम्हाला आकर्षित करतील. अचानक धनलाभाचे योग काहींना शक्य. जोखीम असलेली कामे मात्र टाळा.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला पंचमस्थानात केतू, भाग्यस्थानात मंगळ, प्लूटो, दशमस्थानात मंगळ, शुक्र, शनि, लाभस्थानात सूर्य, बुध, राहू, नेपचून आणि व्ययस्थानात गुरु, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २४ तारखेला शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल. २५ तारखेला चंद्राची सूर्याशी प्रतियुती होईल. २६ तारखेला बुध मेष राशित प्रवेश करेल आणि तिथे्च त्याची चंद्राशी प्रतियुती होईल. २८ तारखेला चंद्राची गुरुशी प्रतियुती होईल. ३० तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला मौज-मजा करण्याकडे कल असेल. काहींना अचानक लाभ किंवा एखादी मिळालेली शाबासकीची थाप सुखावून टाकेल. प्रॉपर्टी खरेदी/ विक्रीसाठी अनुकूल काळ आहे. विद्यार्थ्यांना व कलाकारांना अनुकूल काळ आहे. कमी श्रमात जास्त यश मिळेल. प्रेमिकांसाठीही चांगला कालावधी आहे. सप्ताहाच्या मध्यात कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती असेल. व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील. शारीरिक सौख्यासाठी नियमित व्यायाम करायला हवा याची जाणीव होईल. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. घरात आनंदाचे वातावरण असेल. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल. व्यावसयिकांना लाभदायक ग्रहमान आहे. कामे मार्गी लागतील.
या सप्ताहासाठी उपासना: विठ्ठल नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात केतू, अष्टमस्थानात मंगळ, प्लूटो, भाग्यस्थानात मंगळ, शुक्र, शनि, दशमस्थानात सूर्य, बुध, राहू, नेपचून आणि लाभस्थानात गुरु, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २४ तारखेला शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल. २५ तारखेला चंद्राची सूर्याशी प्रतियुती होईल. २६ तारखेला बुध मेष राशित प्रवेश करेल आणि तिथे्च त्याची चंद्राशी प्रतियुती होईल. २८ तारखेला चंद्राची गुरुशी प्रतियुती होईल. ३० तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
फलादेश- रविवारी भावंडे, नातेवाईक किंवा शेजारी यांच्यासाठी वेळ काढावा लागेल. छोट्या प्रवासाचे योग संभवतात. कवी, कलाकार व लेखकांसाठी चांगला काळ आहे. सोमवार, मंगळवार घरात छान वातावरण असेल. आपल्या आवडत्या लोकांबरोबर वेळ घालवाल. प्रॉपर्टीचे व्यवहार करण्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर लाभदायक ग्रहमान आहे. विद्यार्थ्यांना व कलाकारांना चांगले यश मिळेल. संततीच्या प्रगतीमुळे सुखावून जाल. सप्ताहाच्या शेवटी तब्येतीच्या तक्रारी जाणवत रहातील. अ‍ॅसिडिटी, पोटाचे, उष्णतेचे काही त्रास असतील तर त्यांनी या काळात काळजी घ्यावी. तुमच्या बोलण्यामुळे वरीष्ठ दुखावले जाण्याची शक्यता आहे. शब्द जपून वाप्रावेत.
या सप्ताहासाठी उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी केतू, सप्तमस्थानात मंगळ, प्लूटो, अष्टमस्थानात मंगळ, शुक्र, शनि, भाग्यस्थानात सूर्य, बुध, राहू, नेपचून आणि दशमस्थानात गुरु, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २४ तारखेला शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल. २५ तारखेला चंद्राची सूर्याशी प्रतियुती होईल. २६ तारखेला बुध मेष राशित प्रवेश करेल आणि तिथे्च त्याची चंद्राशी प्रतियुती होईल. २८ तारखेला चंद्राची गुरुशी प्रतियुती होईल. ३० तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस चांगला आहे. काही भग्यवर्धक घटना शक्य आहेत. तुमच्या संभाषणकौशल्यामुळे एखादे काम मार्गी लागण्याणी शक्यता आहे. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. नंतरचे दोन दिवस प्रवासाचे योग येऊ शकतात. हाती घेतलेल्या कामात सुयश मिळेल. आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. भावंडांशी संपर्क होईल. सप्ताह मध्यानंतर प्रॉपर्टीच्या कामांसाठी काळ अनुकूल नाही. प्रॉपर्टीच्या संबंधीत महत्वाची कामे या सप्ताहापुरती पुढे ढकललेली बरी. सप्ताह अखेरीस संमिश्र ग्रहमान आहे. विद्यार्थ्यांनी अती आत्मविश्वास टाळावा. अभ्यासाकडे दुर्लक्ष नको. संततीशी वाद टाळावेत. शेअर मार्केट सारख्या जोखीम असलेल्या ठिकाणी गुंतवणूक सध्यातरी नको.
या सप्ताहासाठी उपासना: गायत्री मंत्राचा जप करणे या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी केतू, षष्ठस्थानात मंगळ, प्लूटो, सप्तमस्थानात मंगळ, शुक्र, शनि, अष्टमस्थानात सूर्य, बुध, राहू, नेपचून आणि भाग्यस्थानात गुरु, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २४ तारखेला शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल. २५ तारखेला चंद्राची सूर्याशी प्रतियुती होईल. २६ तारखेला बुध मेष राशित प्रवेश करेल आणि तिथे्च त्याची चंद्राशी प्रतियुती होईल. २८ तारखेला चंद्राची गुरुशी प्रतियुती होईल. ३० तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात फारशी चांगली नाही. जोखीम असलेली कामे करु नका. महत्त्वाची कामे पुढे ढकला. वाहने सावकाश चालवा. याचबरोबर तुमच्या बोलण्यामुळे या दरम्यान लोक दुखावले जाऊ शकतील. बोलण्यावर संयम ठेवा. सप्ताह मध्यात मनोबल उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. सोशल मिडियावर केलेली एखादी पोस्ट प्रसिध्दी मिळवून देऊ शकेल. तुमच्यातल्या कौशल्याला वाव मिळेल. विवाहोत्सुक व्यक्तींना विवाह ठरविण्यास ग्रहमान अनुकूल आहे. एखादं चांगलं स्थळ चालून येऊ शकेल. सप्ताह अखेरीस प्रॉपर्टीच्या कामांसाठी अनुकूल ग्रहमान आहे. घरात छान वातावरण असेल.
या सप्ताहासाठी उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात केतू, पंचमस्थानात मंगळ, प्लूटो, षष्ठस्थानी मंगळ, शुक्र, शनि, सप्तमस्थानात सूर्य, बुध, राहू, नेपचून आणि अष्टमस्थानात गुरु, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २४ तारखेला शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल. २५ तारखेला चंद्राची सूर्याशी प्रतियुती होईल. २६ तारखेला बुध मेष राशित प्रवेश करेल आणि तिथे्च त्याची चंद्राशी प्रतियुती होईल. २८ तारखेला चंद्राची गुरुशी प्रतियुती होईल. ३० तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस खरेदीसाठी चांगला आहे. तुमच्या आवडत्या व्यक्तींबरोबर मस्त खरेदीला जायला हरकत नाही. सोमवार, मंगळवार चांगले आहेत. दैनंदिन कामे मार्गी लागतील. इतरांवर तुमचा चांगला प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील. सप्ताह मध्यात काहींना धनलाभाचे योग येतील. आर्थिक सुयश लाभेल. मात्र आरोग्याच्या काही तक्रारी जाणवतील. काळजी घ्या. सप्ताहाच्या शेवटी संमिश्र ग्रहमान आहे. प्रवासयोग शक्य आहेत मात्र योग्य ती काळजी प्रवासात घ्यावी. या काळात सोशल मिडियावर काही शेअर करत असाल तर ते वादग्रस्त होणार नाही याची काळजी घ्या.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात गणपतीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात मंगळ, प्लूटो, पंचमस्थानात मंगळ, शुक्र, शनि, षष्ठस्थानी सूर्य, बुध, राहू, नेपचून, सप्तमस्थानात गुरु, हर्षल आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २४ तारखेला शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल. २५ तारखेला चंद्राची सूर्याशी प्रतियुती होईल. २६ तारखेला बुध मेष राशित प्रवेश करेल आणि तिथे्च त्याची चंद्राशी प्रतियुती होईल. २८ तारखेला चंद्राची गुरुशी प्रतियुती होईल. ३० तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस मित्रांच्या किंवा आवडत्या व्यक्तींच्या भेटीचा असेल. काही लाभ होण्याचेही योग आहेत. नंतरचे दोन दिवस प्रतिकूल आहेत. आरोग्य सांभाळा तसेच अती दगदग या काळात टाळा. कर्मचार्‍यांचे सहकार्य मिळणार नाही. हितशत्रूंवर लक्ष ठेवा. तुमच्या चीजवस्तू सांभाळा. बेकायदा कामात गुंतू नका, कलाकारांना विशेषत: नृत्यकलेशी संबंधितांना मात्र अतिशय चांगला काळ आहे. सप्ताह मध्यानंतर काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. संततीसौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मानसन्मानाचे योग आहेत. सप्ताह अखेरीस उत्तम ग्रहमान आहे. आर्थिक सुयश लाभेल. घरात छान वातावरण असेल. मन प्रसन्न असेल.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी मंगळ, प्लूटो, चतुर्थस्थानात मंगळ, शुक्र, शनि, पंचमस्थानात सूर्य, बुध, राहू, नेपचून, षष्ठस्थानी गुरु, हर्षल आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २४ तारखेला शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल. २५ तारखेला चंद्राची सूर्याशी प्रतियुती होईल. २६ तारखेला बुध मेष राशित प्रवेश करेल आणि तिथे्च त्याची चंद्राशी प्रतियुती होईल. २८ तारखेला चंद्राची गुरुशी प्रतियुती होईल. ३० तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला कार्यक्षेत्रात छान काम होणार आहे. वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. व्यवसायातील लोकांना केलेल्या कामाचा मोबदला व्यवस्थित मिळाल्याने मन प्रसन्न राहील. लाभ होतील. अपेक्षित गाठीभेटी होतील. आर्थिक सुयश लाभेल. सप्ताह मध्यात संमिश्र ग्रहमान आहे. खर्च वाढतील. कामाचा ताण जाणवेल. उपासनेत मन रमवल्यास मनातील नकारात्मक विचार दूर करायला मदत होईल. मात्र पूर्वीच्या एखाद्या गुंतवणुकीतून या काळात फायदा होऊ शकेल. तसेच अध्यात्मिक क्षेत्रातील लोकांना चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे. सप्ताह अखेरीस प्रॉपर्टीची कामे पार पडतील. कौटुंबीक सौख्य लाभेल. मन प्रसन्न असेल.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात मंगळ, प्लूटो, तृतीयस्थानी मंगळ, शुक्र, शनि, चतुर्थस्थानात सूर्य, बुध, राहू, नेपचून, पंचमस्थानात गुरु, हर्षल आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २४ तारखेला शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल. २५ तारखेला चंद्राची सूर्याशी प्रतियुती होईल. २६ तारखेला बुध मेष राशित प्रवेश करेल आणि तिथे्च त्याची चंद्राशी प्रतियुती होईल. २८ तारखेला चंद्राची गुरुशी प्रतियुती होईल. ३० तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस भाग्यवर्धक घटनांचा ठरु शकेल. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. सोमवार, मंगळवार आपल्या कामात आत्मविश्वास वाढेल. वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. त्यांच्याकडून एखादी मागणी मान्य करुन घेण्यासाठी अनुकूल काळ आहे. कौटुंबीक जीवनात चांगल्या घटना शक्य. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील. सप्ताह मध्यानंतर मित्रमैत्रिणिंच्या भेटीचे योग संभवतात. काहींना धनलाभ शक्य आहेत. सप्ताह अखेरीस धार्मिक कार्यात सहभाग असेल. खरेदीसाठी काळ अनुकूल आहे. जुन्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. पारमार्थिक उन्नतीसाठी अनुकूल आहे.
या सप्ताहासाठी उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, प्लूटो, धनस्थानात मंगळ, शुक्र, शनि, तृतीयस्थानी सूर्य, बुध, राहू, नेपचून, चतुर्थस्थानात गुरु, हर्षल आणि नवमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २४ तारखेला शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल. २५ तारखेला चंद्राची सूर्याशी प्रतियुती होईल. २६ तारखेला बुध मेष राशित प्रवेश करेल आणि तिथे्च त्याची चंद्राशी प्रतियुती होईल. २८ तारखेला चंद्राची गुरुशी प्रतियुती होईल. ३० तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला अनुकूल काळ आहे. भाग्यकारक ग्रहमान आहे. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. प्रवास लाभदायक ठरु शकतील. न्यायाधीश व शिक्षणक्षेत्रातील लोकांना काळ चांगला आहे. सप्ताह मध्यात उत्तम ग्रहमान आहे. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. वरीष्ठांची मर्जी राहील. आर्थिक लाभ शक्य. वरीष्ठांकडून एखादी मागणी मान्य करुन घेण्यासाठी हा कालावधी अनुकूल ठरु शकेल. व्यावसायिकांनाही फायदेशीर काळ आहे. सप्ताह अखेरीस लाभदायक ग्रहमान आहे. मित्रांच्या/ आप्तांच्या भेटीचे योग संभवतात. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
या सप्ताहासाठी उपासना: विठ्ठल नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, शुक्र, शनि, धनस्थानात सूर्य, बुध, राहू, नेपचून, तृतीयस्थानी गुरु, हर्षल, अष्टमस्थानात केतू आणि व्ययस्थानात मंगळ, प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. २४ तारखेला शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल. २५ तारखेला चंद्राची सूर्याशी प्रतियुती होईल. २६ तारखेला बुध मेष राशित प्रवेश करेल आणि तिथे्च त्याची चंद्राशी प्रतियुती होईल. २८ तारखेला चंद्राची गुरुशी प्रतियुती होईल. ३० तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस जोडीदाराबरोबर मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांनाही दिवस चांगला आहे. नंतरचे दोन दिवस विमा क्षेत्रातील लोकांना अनुकूल आहेत. गूढ विषय तुम्हाला आकर्षित करतील. काहींना अचानक धनलाभाचे योग या काळात शक्य आहेत. मात्र धोका असलेले कुठलेही काम या दरम्यान करु नका. सप्ताह मध्यानंतर धार्मिक गोष्टींसाठी चांगला काळ आहे. ज्यांनी अध्यात्मिक उन्नतीसाठी गुरु केला आहे त्यांना या काळात चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे. कलाकारांनाही हा कालावधी छान आहे. काहींना प्रवासाचे योग येतील. सप्ताहाच्या शेवटी नोकरीत समाधानकारक स्थिती असेल. व्यावसायिकांचे निर्णय मार्गी लागतील. व्यवसायात नवीन तंत्र अमलात आणाल. शासकीय कामे मार्गी लागतील.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, बुध, राहू, नेपचून, धनस्थानात गुरु, हर्षल, सप्तमस्थानी केतू, लाभस्थानात मंगळ, प्लूटो आणि व्ययस्थानात मंगळ, शुक्र, शनि अशी ग्रहस्थिती असेल. २४ तारखेला शुक्राचा गुरुशी लाभयोग होईल. २५ तारखेला चंद्राची सूर्याशी प्रतियुती होईल. २६ तारखेला बुध मेष राशित प्रवेश करेल आणि तिथे्च त्याची चंद्राशी प्रतियुती होईल. २८ तारखेला चंद्राची गुरुशी प्रतियुती होईल. ३० तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
फलादेश- रविवार संमिश्र आहे. तब्येतीची काळजी घ्या. हितशत्रूंवर लक्ष ठेवा. नंतरचे दोन दिवस जोडीदाराबरोबर छान जातील. वैहाहिक सौख्य मिळेल. मन आनंदी व उत्साही राहील. सप्ताहाच्या मध्यानंतर वाहने जपून चालवा व वाहतुकीचे नियम पाळावेत. ज्योतिष, अध्यात्म, मानसशास्त्र, योगशास्त्र या विषयाच्या अभ्यासकांना अनुकूल ग्रहमान आहे. काहींना सूचक स्वप्ने पडतील. सप्ताहाच्या शेवटी काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. महत्त्वाची कामे पुढे ढकला. बेकायदा कामात गुंतू नका, तुमच्या महत्वाच्या वस्तू गहाळ होणार नाहीत याचीही दक्षता घ्या. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील.
या सप्ताहासाठी उपासना: ’ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: ’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)