
दिवाळीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१२ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर २०२३)
(Astroshodh- astrology, vastu, numerology, astrologerinpune, bestastrologerinpune, famousastrologerinpune, astrologerinkothrud, vastucosultantinpune)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु(व), राहू, हर्षल, षष्ठस्थानात शुक्र, सप्तमस्थानात सूर्य, मंगळ, केतू, अष्टमस्थानात बुध, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात शनि आणि व्ययस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. १३ तारखेला चंद्राची सूर्य व मंगळाशी युती होईल. १४ तारखेला चंद्राची बुधाशी युती व शुक्राशी लाभयोग होईल. १५ तारखेला बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा सूर्याशी व मंगळाशी लाभयोग आणि सूर्याची मंगळाशी युती होईल.
फ़लादेश- सोमवार रात्रीपर्यंतचा काळ लाभदायक आहे. जोडीदाराबरोबर वेळ मजेत घालवाल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांना फ़ायदेशीर कालावधी आहे. त्यानंतरचे दोन दिवस संमिश्र आहेत. वाहने जपून चालवावीत. कोणतेही जोखीम सध्या नको. विमा प्रतिनिधी, ज्योतिषी, मानसोपचारतज्ञ यांच्यासाठी मात्र हा काळ चांगला असेल. काहींना अचानक धनलाभ शक्य. सप्ताह मध्यानंतर धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. काहींना प्रवासाचे योग येतील. वरीष्ठांची मर्जी राहिल. सप्ताहाच्या शेवटी उत्तम ग्रहमान आहे. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. आर्थिक लाभ शक्य.
या सप्ताहासाठी उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला पंचमस्थानात शुक्र, षष्ठस्थानात सूर्य, मंगळ, केतू, सप्तमस्थानात बुध, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात शनि, लाभस्थानात नेपचून आणि व्ययस्थानात गुरु(व), राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. १३ तारखेला चंद्राची सूर्य व मंगळाशी युती होईल. १४ तारखेला चंद्राची बुधाशी युती व शुक्राशी लाभयोग होईल. १५ तारखेला बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा सूर्याशी व मंगळाशी लाभयोग आणि सूर्याची मंगळाशी युती होईल.
फ़लादेश- सोमवार रात्रीपर्यंत आरोग्याच्या काही समस्या जाणवत रहातील. गुप्तशत्रूंवर नजर ठेवावी. शारीरिक सौख्यासाठी नियमित व्यायाम करायला हवा याची जाणीव होईल. त्यानंतरचे दोन दिवस जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील. व्यवसायातील निर्णय योग्य ठरतील. कामे मार्गी लागतील. सप्ताहाच्या मध्यानंतर संमिश्र ग्रहमान आहे. धोका असलेली कामे करू नये. वाहने जपून चालवावीत. मात्र हा कालावधी काहींना अचानक धनलाभ देऊ शकेल तर काहींना सूचक स्वप्ने पडतील. सप्ताहाचा शेवट धार्मिक गॊष्टींसाठी चांगला असेल. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. लाभदायक ग्रहमान आहे.
या सप्ताहासाठी उपासना: या कालावधीत हनुमान चालिसा किंवा मारुती स्तोत्र रोज संध्याकाळी मोठ्या आवाजात म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात शुक्र, पंचमस्थानात सूर्य, मंगळ, केतू, षष्ठस्थानात बुध, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात शनि, दशमस्थानात नेपचून आणि गुरु(व), राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. १३ तारखेला चंद्राची सूर्य व मंगळाशी युती होईल. १४ तारखेला चंद्राची बुधाशी युती व शुक्राशी लाभयोग होईल. १५ तारखेला बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा सूर्याशी व मंगळाशी लाभयोग आणि सूर्याची मंगळाशी युती होईल.
फ़लादेश- सोमवार रात्रीपर्यंत विद्यार्थ्यांना, लेखकांना व कलाकारांना ग्रहमान अनुकूल आहे. थोड्या श्रमात भरपूर यश मिळण्याची शक्यता आहे. काहींना धनलाभ/ एखादं बक्षिस मिळणे असे योग संभवतात. प्रेमिकांसाठीही अनुकूल काळ आहे. त्यानंतरचे दोन दिवस नोकरीच्या शोधात असणार्यांना अनुकूल आहेत. मात्र अॅसिडिटी/ पोटासंबंधी ज्यांना काही त्रास असतील त्यांनी आरोग्याची काळजी घ्यावी. आहारावर नियंत्रण ठेवावे. सप्ताह मध्यानंतर आपल्या आवडत्या माणसांबरोबर वेळ मजेत जाईल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. काही लाभही होतील. सप्ताहाच्या शेवटी गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल.
या सप्ताहासाठी उपासना: श्रीसूक्ताचे नियमित पठण या कालावधीत केलेले चांगले.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी शुक्र, चतुर्थस्थानात सूर्य, मंगळ, केतू, पंचमस्थानात बुध, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात शनि, भाग्यस्थानात नेपचून आणि दशमस्थानात गुरु(व), राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. १३ तारखेला चंद्राची सूर्य व मंगळाशी युती होईल. १४ तारखेला चंद्राची बुधाशी युती व शुक्राशी लाभयोग होईल. १५ तारखेला बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा सूर्याशी व मंगळाशी लाभयोग आणि सूर्याची मंगळाशी युती होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला कौटुंबीक सौख्याचा काळ आहे. मन प्रसन्न असेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. एखाद्या समारंभात किंवा कार्यक्रमात भाग घ्याल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना व व्यावसायिकांना अनुकूल आहे. कमी श्रमात जास्त यश मिळेल. अचानक एखादं बक्षिस किंवा धनलाभ सुखावून टाकेल. प्रेमिकांसाठीही चांगला काळ आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर तब्येतीच्या तक्रारी जाणवतील. वैद्यकीय व्यवसायातील व्यक्तींना मात्र अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या शेवटी मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात गणपती अथर्वशीर्षाचे नित्य पठण करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी शुक्र, तृतीयस्थानी सूर्य, मंगळ, केतू, चतुर्थस्थानात बुध, षष्ठस्थानात प्लूटो, सप्तमस्थानात शनि, अष्टमस्थानात नेपचून आणि भाग्यस्थानात गुरु(व), राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. १३ तारखेला चंद्राची सूर्य व मंगळाशी युती होईल. १४ तारखेला चंद्राची बुधाशी युती व शुक्राशी लाभयोग होईल. १५ तारखेला बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा सूर्याशी व मंगळाशी लाभयोग आणि सूर्याची मंगळाशी युती होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला उत्तम ग्रहमान आहे. भावंडांशी वार्तालाप होईल. तुमच्या कार्यक्षेत्रात मान व प्रतिष्ठा लाभेल. नवीन परिचय होतील. कलाकौशल्याला वाव मिळेल. विवाह ठरविण्यासही ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताहाच्या मध्यात कौटुंबिक सौख्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. सप्ताहाच्या शेवटी कर्मचार्यांचे सहकार्य मिळणार नाही. हितशत्रूंवर लक्ष ठेवा. तब्येतीची काळजी घ्या आणि जोडीदाराबरोबर वाद टाळा.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात शुक्र, धनस्थानात सूर्य, मंगळ, केतू, तृतीयस्थानी बुध, पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी शनि, सप्तमस्थानात नेपचून आणि अष्टमस्थानात गुरु(व), राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. १३ तारखेला चंद्राची सूर्य व मंगळाशी युती होईल. १४ तारखेला चंद्राची बुधाशी युती व शुक्राशी लाभयोग होईल. १५ तारखेला बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा सूर्याशी व मंगळाशी लाभयोग आणि सूर्याची मंगळाशी युती होईल.
फ़लादेश- सप्ताहाची सुरूवात चांगल्या घटनांनी होईल. काहींना लाभ होऊ शकतील. कौटुंबीक सौख्य मिळेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या मध्यात नोकरीनिमित्त प्रवासयोग शक्य. सोशल मिडियावर शेअर केलेल्या एखाद्या पोस्टमुळे प्रसिध्दी किंवा काही लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. भावंडांशी संपर्क होईल. सप्ताह अखेर संमिश्र असेल. घरात वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. प्रॉपर्टीची कामे शक्यतो पुढे ढकला. घरातील वडीलधारी व्यक्तींच्या तब्येतीची काळजी घ्या.
या सप्ताहासाठी उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, मंगळ, केतू, धनस्थानी बुध, चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात शनि, षष्ठस्थानी नेपचून, सप्तमस्थानात गुरु(व), राहू, हर्षल आणि व्ययस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. १३ तारखेला चंद्राची सूर्य व मंगळाशी युती होईल. १४ तारखेला चंद्राची बुधाशी युती व शुक्राशी लाभयोग होईल. १५ तारखेला बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा सूर्याशी व मंगळाशी लाभयोग आणि सूर्याची मंगळाशी युती होईल.
फ़लादेश- सप्ताहाची सुरुवात चांगली होणार आहे. काही खरेदी मनाला आनंद देईल. मनोरंजनाकडे मनाचा कल राहील. ज्यांना परदेशगमन करायचं आहे त्यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात कुटुंबीयांबरोबर छान सुर जमलेला असेल. मन आनंदी असेल. मौजमजेचे प्रसंग घडतील. आवडत्या पदार्थांचा मस्त आस्वाद घ्याल. एखाद्या खाऊगल्लीला जरूर भेट द्या. तुमच्या कार्यक्षेत्रातही चांगलं काम झाल्याने खुश असाल. कलाकारांना, वक्त्यांना चांगला काळ आहे. सप्ताहाच्या अखेरीस आत्मविश्वास वाढविणार्या घटना घडतील. भावंडांच्या भेटी होतील. प्रवासासाठीही अनुकूल कालावधी आहे. विवाहोत्सुकांसाठी विवाह ठरविण्यास ग्रहमान अनुकूल आहे.
या सप्ताहासाठी उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी बुध, तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात शनि, पंचमस्थानात नेपचून, षष्ठस्थानी गुरु(व), राहू, हर्षल, लाभस्थानात शुक्र आणि व्ययस्थानात सूर्य, मंगळ, केतू अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. १३ तारखेला चंद्राची सूर्य व मंगळाशी युती होईल. १४ तारखेला चंद्राची बुधाशी युती व शुक्राशी लाभयोग होईल. १५ तारखेला बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा सूर्याशी व मंगळाशी लाभयोग आणि सूर्याची मंगळाशी युती होईल.
फ़लादेश- सप्ताहाची सुरुवात खरेदीसाठी चांगली आहे. मात्र खर्चही या काळात वाढणार आहेत. घराच्या सुशोभीकरणासाठी किंवा दुरुस्तीसाठी एखादा खर्च करावा लागू शकेल. धार्मिक गोष्टींसाठी चांगलं ग्रहमान आहे. गुरु किंवा गुरुतुल्य व्यक्तीच्या भेटीचे योग संभवतात. पूर्वी केलेल्या एखाद्या गुंतवणुकीतून चांगला लाभ होईल. नृत्यकलेशी संबंधीत असणार्यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या मध्यात व नंतर तुमच्या बोलण्यामुळे किंवा वागण्यामुळे कोणीतरी दुखावले जाण्याची शक्यता आहे. काळजी घ्या. अॅसिडिटी किंवा पोटाचे काही आजार असतील तर तब्येतीला जपा. नोकरीच्या शोधात असणार्यांना काही संधी ओळखीतून चालूण येतील.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात रोज मारुतीचे दर्शन घेणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी शनि, चतुर्थस्थानात नेपचून, पंचमस्थानात गुरु(व), राहू, हर्षल, दशमस्थानात शुक्र, लाभस्थानात सूर्य, मंगळ, केतू आणि व्ययस्थानात बुध अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. १३ तारखेला चंद्राची सूर्य व मंगळाशी युती होईल. १४ तारखेला चंद्राची बुधाशी युती व शुक्राशी लाभयोग होईल. १५ तारखेला बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा सूर्याशी व मंगळाशी लाभयोग आणि सूर्याची मंगळाशी युती होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला लाभदायक ग्रहमान आहे. मित्रांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. गूढ गोष्टींकडे कल राहील. काहींना धनलाभाचे योग शक्य आहेत. लेखक, प्रकाशक, वादक व खेळाडू यांना चांगले यश मिळेल. सप्ताह मध्यात संततीसाठी वेळ काढावा लागेल. खरेदीचे योग आहेत. अध्यात्म मार्गातील लोकांसाठी ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह मध्यानंतर आत्मविश्वास वाढविणार्या घटना शक्य आहेत. प्रॉपर्टीची कामे करण्यास अनुकूलता आहे. सप्ताहाच्या शेवटी डोळे किंवा दात यांच्या काही समस्या जाणवू शकतील. डोळ्यांवर खूप ताण पडेल अशा गोष्टी टाळाव्यात.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात रोज महालक्ष्मीअष्टक म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात शनि, तृतीयस्थानी नेपचून, चतुर्थस्थानात गुरु(व), राहू, हर्षल, नवमस्थानात शुक्र आणि दशमस्थानात सूर्य, मंगळ, केतू आणि लाभस्थानात बुध अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. १३ तारखेला चंद्राची सूर्य व मंगळाशी युती होईल. १४ तारखेला चंद्राची बुधाशी युती व शुक्राशी लाभयोग होईल. १५ तारखेला बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा सूर्याशी व मंगळाशी लाभयोग आणि सूर्याची मंगळाशी युती होईल.
फ़लादेश- सप्ताह एकूणच छान जाणार आहे. वरीष्ठ खुश असतील. एखादी मागणी असेल तर आता वरीष्ठांकडे शब्द टाकायला हरकत नाही. व्यवसायातील लोकांना केलेल्या कामाचा मोबदला व्यवस्थित मिळाल्याने मन प्रसन्न राहील. भागीदारीत व्यवसाय सुरु करायचा असेल तर कालावधी अनुकूल आहे. सप्ताह मध्यात धनलाभ होण्याचे योग आहेत. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. सप्ताह मध्यानंतर उधारी वसूल होईल. महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील. जुन्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. खरेदीसाठी काळ चांगला आहे. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढलेला असेल. सप्ताहाच्या अखेरीस काही लाभ होतील.
या सप्ताहासाठी महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि, धनस्थानात नेपचून, तृतीयस्थानी गुरु(व), राहू, हर्षल, अष्टमस्थानात शुक्र, भाग्यस्थानात सूर्य, मंगळ, केतू, दशमस्थानात बुध आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. १३ तारखेला चंद्राची सूर्य व मंगळाशी युती होईल. १४ तारखेला चंद्राची बुधाशी युती व शुक्राशी लाभयोग होईल. १५ तारखेला बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा सूर्याशी व मंगळाशी लाभयोग आणि सूर्याची मंगळाशी युती होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला भाग्यवृध्दी करणारे ग्रहमान आहे. वरीष्ठांची मर्जी राहील. प्रवासयोग या काळात शक्य. लाभदायक ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात कार्यक्षेत्रात भरपूर व चांगले काम होईल. त्यामुळे खुशीत असाल. लांबच्या प्रवासाचे बेत मनात घोळत रहातील. सप्ताहाच्या मध्यानंतर अचानक धनलाभ होण्याची शक्याता आहे. मित्रांशी/ नातेवाईकांशी संपर्क साधाल. एखाद्या मित्रामुळे किंवा परीचित व्यक्तीने केलेल्या मदतीमुळे एखादं अडलेलं काम मार्गी लागेल. सप्ताह अखेरीस अचानक काही खर्च करावे लागतील. जुनी येणी वसूल होतील. मनाजोगती खरेदी होऊ शकेल.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात दत्तबावन्नी रोज म्हणावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी नेपचून, धनस्थानात गुरु(व), राहू, हर्षल, सप्तमस्थानी शुक्र, अष्टमस्थानात सूर्य, मंगळ, केतू, भाग्यस्थानात बुध, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात शनि अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. १३ तारखेला चंद्राची सूर्य व मंगळाशी युती होईल. १४ तारखेला चंद्राची बुधाशी युती व शुक्राशी लाभयोग होईल. १५ तारखेला बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण व शनिशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा सूर्याशी व मंगळाशी लाभयोग आणि सूर्याची मंगळाशी युती होईल.
फ़लादेश- सप्ताहाची सुरुवात कंटाळवाणी व अडथळ्याची जरी झाली तरी नंतर पूर्ण सप्ताह छान जाणार आहे. सप्ताहात सुरुवातीला गूढ गोष्टींकडे मनाचा कल राहील. जोखीम असलेली कामे या काळात करु नका. महत्त्वाची कामे पुढे ढकला. वाहने सावकाश चालवा. सप्ताहाचा मध्य उपासना करण्यार्यांना चांगला आहे. काही भाग्यवर्धक घटना घडू शकतात. धनलाभ अपेक्षित असतील तर त्यासाठी २/३ दिवस थांबावे लागेल. सप्ताहाच्या मध्यानंतर तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम झाल्याने मन प्रसन्न असेल. सहकार्यांचे चांगले सहकार्य मिळेल. केलेल्या कष्टाचे चीज होईल.
या सप्ताहासाठी उपासना: रामरक्षेचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
