
अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१० सप्टेंबर ते १६ सप्टेंबर २०२३)
(Astroshodh- astrology, vastu, numerology, astrologerinpune, bestastrologerinpune, famousastrologerinpune, astrologerinkothrud, vastucosultantinpune)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु(व), राहू, हर्षल, चतुर्थस्थानात शुक्र, पंचमस्थानात सूर्य, बुध(व), षष्ठस्थानात मंगळ, सप्तमस्थानात केतू, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात शनि(व) आणि व्ययस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला चंद्राचा हर्षलशी लाभयोग व प्लूटोशी प्रतियोग होईल. ११ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शुक्राशी युती होईल. १३ तारखेला चंद्राची बुधाशी युती व शनिशी प्रतियोग होईल. १४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १५ तारखेला चंद्राची सूर्याशी युती व नेपचूनशी प्रतियोग होईल. १६ चंद्राची मंगळाशी युती व शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला घरात छान वातावरण असेल. आवडत्या व्यक्तींबरोबर वेळ घालवाल. मन प्रसन्न असेल. ज्यांना प्रॉपर्टी खरेदी करायची किंवा विकायची असेल त्यांना ग्रहमान चांगले आहे. सौदा फायदेशीर होऊ शकेल. घराची सजावट किंवा नूतनीकरण करायचं मनात असेल तर आता त्यासाठी जरुर वेळ द्या. सप्ताहाचा मध्य छान आहे. काहींना चांगले लाभ होतील. एखादं बक्षिस, प्रमोशन किंवा पगारवाढ मिळू शकेल. विद्यार्थ्यांना व खेळाडूंना अनुकूल आहे. प्रेमिकांना लग्न ठरविण्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताहाच्या शेवटी नोकरी करणार्यांनी आपल्या कामात हयगय करु नये. तब्येतीचीही काळजी या काळात घेणे आवश्यक आहे. नविन गुंतवणूक करत असाल तर या काळात जपून व्यवहार करावेत.
या सप्ताहासाठी उपासना: ’विठ्ठल’ नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी शुक्र, चतुर्थस्थानात सूर्य, बुध(व), पंचमस्थानात मंगळ, षष्ठस्थानात केतू, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात शनि(व), लाभस्थानात नेपचून आणि व्ययस्थानात गुरु(व), राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला चंद्राचा हर्षलशी लाभयोग व प्लूटोशी प्रतियोग होईल. ११ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शुक्राशी युती होईल. १३ तारखेला चंद्राची बुधाशी युती व शनिशी प्रतियोग होईल. १४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १५ तारखेला चंद्राची सूर्याशी युती व नेपचूनशी प्रतियोग होईल. १६ चंद्राची मंगळाशी युती व शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला भावंडांसंदर्भात चांगली बातमी कळेल. कलाकार, कवी, लेखक, ब्लॉगर्स तसेच साहित्यिकांना अनुकूल ग्रहमान आहेत. याकाळात काहीतरी छान काम होण्याची शक्यता आहे. प्रवासाचेही योग काहींना संभवतात. सप्ताह मध्य बांधकाम व्यावसायिकांना अनुकूल आहे. घरातील वातावरण चांगले असेल. सप्ताहाच्या शेवटी एखादा धनलाभ संभवतो. विद्यार्थी व कलाकारांना अनुकूल कालावधी आहे. आपल्या कार्यक्षेत्रात छान काम होईल. त्यामुळे आनंदी असाल. संततीसंदर्भातील एखादी छान घटना घडेल.
उपासना: या सप्ताहासाठी विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी शुक्र, तृतीयस्थानी सूर्य, बुध(व), चतुर्थस्थानात मंगळ, पंचमस्थानात केतू, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात शनि(व), दशमस्थानात नेपचून आणि गुरु(व), राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला चंद्राचा हर्षलशी लाभयोग व प्लूटोशी प्रतियोग होईल. ११ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शुक्राशी युती होईल. १३ तारखेला चंद्राची बुधाशी युती व शनिशी प्रतियोग होईल. १४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १५ तारखेला चंद्राची सूर्याशी युती व नेपचूनशी प्रतियोग होईल. १६ चंद्राची मंगळाशी युती व शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीस कुटुंबियांसोबत वॆळ छान जाईल. एखादा धनलाभ होऊ शकतो. गायकांना व वक्त्यांना ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह मध्यात मनासारखं काम होईल. त्यामुळे खुषीत असाल. तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल. वरीष्ठांचे व वडिलधारी मंडळींचे चांगले सहकार्य मिळणार आहे. लेखकांना चांगला काळ आहे. सप्ताह अखेरीस घरातील वातावरण आनंदी असेल. हातातील कामे लवकर उरकून आराम करण्याकडे कल असेल. एखाद्या छंदासाठी जरुर वेळ द्यावा.
या सप्ताहासाठी उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात शुक्र, धनस्थानी सूर्य, बुध(व), तृतीयस्थानी मंगळ, चतुर्थस्थानात केतू, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात शनि(व), भाग्यस्थानात नेपचून आणि दशमस्थानात गुरु(व), राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला चंद्राचा हर्षलशी लाभयोग व प्लूटोशी प्रतियोग होईल. ११ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शुक्राशी युती होईल. १३ तारखेला चंद्राची बुधाशी युती व शनिशी प्रतियोग होईल. १४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १५ तारखेला चंद्राची सूर्याशी युती व नेपचूनशी प्रतियोग होईल. १६ चंद्राची मंगळाशी युती व शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीस मन प्रसन्न असेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. कुटुंबियांसोबत वॆळ छान जाईल. सप्ताह मध्यात तुमच्या संभाषणकौशल्यामुळे काही कामे मार्गी लागण्याणी शक्यता आहे. आर्थिक स्थिती चांगली असेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. धनलाभाचे योग या काळात शक्य आहे्त. सप्ताह अखेरीस लेखक, साहित्यिक, ब्लॉगर्स यांना ग्रहमान अनुकूल आहे. तसेच टूर्स आणि ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करणार्यांना विशेष फायदेशीर ग्रहमान आहे.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात सूर्य, बुध(व), धनस्थानी मंगळ, तृतीयस्थानी केतू, षष्ठस्थानात प्लूटो, सप्तमस्थानात शनि(व), अष्टमस्थानात नेपचून, भाग्यस्थानात गुरु(व), राहू, हर्षल आणि व्ययस्थानात शुक्र, अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला चंद्राचा हर्षलशी लाभयोग व प्लूटोशी प्रतियोग होईल. ११ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शुक्राशी युती होईल. १३ तारखेला चंद्राची बुधाशी युती व शनिशी प्रतियोग होईल. १४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १५ तारखेला चंद्राची सूर्याशी युती व नेपचूनशी प्रतियोग होईल. १६ चंद्राची मंगळाशी युती व शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात काही खर्च घेऊन येणार आहे. एखादी छानशी खरेदी सुध्दा होईल. नृत्यकलाकारांसाठी उत्तम ग्रहमान आहे. मनोरंजनाकडे कल राहील. देवी उपासकांना पारमार्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्यांना उत्तम ग्रहमान आहे. सप्ताहाच्या मध्यात मनासारखं काम होईल त्यामुळे खुशीत असाल. नविन काही शिकायचं असेल तर त्याला अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह अखेर भाग्यवर्धक घटनांचा असू शकेल. काहींना धनलाभ होतील. कुटुंबीयांबरोबर वेळ मजेत जाईल. मित्रांशी संवाद साधाल. आवडत्या पदार्थांवर ताव माराल. एखादा पदार्थ स्वत:ही बनवून बघायला हरकत नाही.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात सुर्योपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात मंगळ, धनस्थानात केतू, पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी शनि(व), सप्तमस्थानात नेपचून, अष्टमस्थानात गुरु(व), राहू, हर्षल, लाभस्थानात शुक्र, आणि व्ययस्थानात सूर्य, बुध(व) अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला चंद्राचा हर्षलशी लाभयोग व प्लूटोशी प्रतियोग होईल. ११ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शुक्राशी युती होईल. १३ तारखेला चंद्राची बुधाशी युती व शनिशी प्रतियोग होईल. १४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १५ तारखेला चंद्राची सूर्याशी युती व नेपचूनशी प्रतियोग होईल. १६ चंद्राची मंगळाशी युती व शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात छान होईल. काही लाभ होऊ शकतात. मित्रांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. मन प्रसन्न असेल. वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताहाच्या मध्यात धार्मिक गोष्टींसाठी काळ चांगला आहे. चैनीच्या वस्तु खरेदी कराल. अचानक काही खर्चही उद्भवू शकतात. बेकायदा गोष्टींपासून मात्र या काळात लांब रहा. कायद्याचं पालन करा. सप्ताहाच्या शेवटी वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. नवीन गुंतवणुकीसाठी ग्रहस्थिती योग्य नाही.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात रोज महालक्ष्मीअष्टक म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात शनि(व), षष्ठस्थानी नेपचून, सप्तमस्थानात गुरु(व), राहू, हर्षल, दशमस्थानात शुक्र, लाभस्थानात सूर्य, बुध(व) आणि व्ययस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला चंद्राचा हर्षलशी लाभयोग व प्लूटोशी प्रतियोग होईल. ११ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शुक्राशी युती होईल. १३ तारखेला चंद्राची बुधाशी युती व शनिशी प्रतियोग होईल. १४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १५ तारखेला चंद्राची सूर्याशी युती व नेपचूनशी प्रतियोग होईल. १६ चंद्राची मंगळाशी युती व शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला आपल्या कार्यक्षेत्रात चांगले काम झाल्याने वरीष्ठ खूष असतील. काहींना वरीष्ठांकडून न मागता सहकार्य मिळेल. व्यावसायिक केलेल्या कामाचा चांगला मोबदला मिळाल्याने खूष असतील. सप्ताह मध्यात मित्रांबरोबर/ आप्तेष्टांबरोबर वेळ मजेत जाणार आहे. काही लाभदायक घटना घडतील. सप्ताहाच्या शेवटी पारमार्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्यांना उत्तम ग्रहमान असणार आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून फ़ायदा मिळण्याची शक्यता आहे.
या सप्ताहासाठी उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात शनि(व), पंचमस्थानात नेपचून, षष्ठस्थानी गुरु(व), राहू, हर्षल, नवमस्थानात शुक्र, दशमस्थानात सूर्य, बुध(व), लाभस्थानात मंगळ आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला चंद्राचा हर्षलशी लाभयोग व प्लूटोशी प्रतियोग होईल. ११ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शुक्राशी युती होईल. १३ तारखेला चंद्राची बुधाशी युती व शनिशी प्रतियोग होईल. १४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १५ तारखेला चंद्राची सूर्याशी युती व नेपचूनशी प्रतियोग होईल. १६ चंद्राची मंगळाशी युती व शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताह खूप चांगला जाणार आहे. सुरुवातीलाच काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. सप्ताह मध्यात वरीष्ठांकडून तुमची एखादी मागणी पूर्ण करून घेता येईल. मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या शेवटी धनलाभ शक्य आहे. मित्रांच्या भेटीचे योग संभवतात. मजेत वेळ व्यतीत करु शकाल. मित्रांच्या मदतीने काही कामे सहजगत्या होऊ शकतील.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी शनि(व), चतुर्थस्थानात नेपचून, पंचमस्थानात गुरु(व), राहू, हर्षल, अष्टमस्थानात शुक्र, नवमस्थानात सूर्य, बुध(व), दशमस्थानात मंगळ, आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला चंद्राचा हर्षलशी लाभयोग व प्लूटोशी प्रतियोग होईल. ११ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शुक्राशी युती होईल. १३ तारखेला चंद्राची बुधाशी युती व शनिशी प्रतियोग होईल. १४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १५ तारखेला चंद्राची सूर्याशी युती व नेपचूनशी प्रतियोग होईल. १६ चंद्राची मंगळाशी युती व शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला मनाविरुद्ध घटना घडू शकतात. मनाचा तोल जाऊ देऊ नये. मात्र संशोधन, ज्योतिषशास्त्र, मानसशास्त्र, परामानसशास्त्र अशा गूढ विषयांशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे अशा लोकांना उत्तम काळ आहे. सप्ताहाचा मध्य उपासना करण्यास चांगला आहे. काही भाग्यवर्धक गोष्टी घडतील. न्यायसंस्था तसेच शिक्षणसंस्थेच्या संबंधीत लोकांना लाभदायक काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी तुमच्या कार्यक्षेत्रात खुप चांगले काम कराल. वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. वडीलधारी मंडळींचे सहकार्य मिळेल. व्यावसायिकांना एखादे फ़ायदेशीर काम दृष्टीपथात येईल.
या सप्ताहासाठी उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात शनि(व), तृतीयस्थानी नेपचून, चतुर्थस्थानात गुरु(व), राहू, हर्षल, सप्तमस्थानी शुक्र, अष्टमस्थानात सूर्य, बुध(व), नवमस्थानात मंगळ आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला चंद्राचा हर्षलशी लाभयोग व प्लूटोशी प्रतियोग होईल. ११ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शुक्राशी युती होईल. १३ तारखेला चंद्राची बुधाशी युती व शनिशी प्रतियोग होईल. १४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १५ तारखेला चंद्राची सूर्याशी युती व नेपचूनशी प्रतियोग होईल. १६ चंद्राची मंगळाशी युती व शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराबरोबर वेळ छान व्यतीत करू शकाल. जोडीदाराबद्दल एखादी चांगली बातमी कळू शकेल. छान पार्टीचा मूड असेल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांनासुध्दा चांगले ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. अचानक धनलाभाचे योग शक्य. मानसोपचातज्ञ, पुराणवस्तू संशोधक, इतिहासकार, ज्योतिषी इ. लोकांना हा काळ चांगला आहे. मात्र या काळात जोखीम असलेली कामे अजिबात करु नका. वाहने जपून चालवा. सप्ताहाच्या शेवटी दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. वादविवाद टाळा.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि(व), धनस्थानात नेपचून, तृतीयस्थानी गुरु(व), राहू, हर्षल, षष्ठस्थानात शुक्र, सप्तमस्थानी सूर्य, बुध(व), अष्टमस्थानात मंगळ, भाग्यस्थानात केतू आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला चंद्राचा हर्षलशी लाभयोग व प्लूटोशी प्रतियोग होईल. ११ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शुक्राशी युती होईल. १३ तारखेला चंद्राची बुधाशी युती व शनिशी प्रतियोग होईल. १४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १५ तारखेला चंद्राची सूर्याशी युती व नेपचूनशी प्रतियोग होईल. १६ चंद्राची मंगळाशी युती व शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला तब्येतीची काळजी घ्यावी. शत्रूंच्या कारवाया वाढतील. नविन नोकरीसाठी प्रयत्न करणारे, वकील तसेच केमिस्ट यांना मात्र हा कालावधी चांगला जाईल. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वेळ छान व्यतीत होईल. जोडीदाराला धनलाभ होण्याची शक्यता आहे. भागीदरीत व्यवसाय करणार्यांसाठीही चांगला काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी जोखीम असलेले कुठलेही काम करु नका. काहींना सूचक स्वप्ने पडू शकतील. विद्यार्थ्यांना प्रतिकूल काळ आहे.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात सुर्योपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी नेपचून, धनस्थानात गुरु(व), राहू, हर्षल, पंचमस्थानात शुक्र, षष्ठस्थानात सूर्य, बुध(व), सप्तमस्थानी मंगळ, अष्टमस्थानात केतू, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात शनि(व) अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला चंद्राचा हर्षलशी लाभयोग व प्लूटोशी प्रतियोग होईल. ११ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग व शुक्राशी युती होईल. १३ तारखेला चंद्राची बुधाशी युती व शनिशी प्रतियोग होईल. १४ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १५ तारखेला चंद्राची सूर्याशी युती व नेपचूनशी प्रतियोग होईल. १६ चंद्राची मंगळाशी युती व शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला मुलांकडून सुवार्ता कळतील. विद्यार्थी, कलाकार यांना चांगला काळ आहे. काही भाग्यवर्धक घटना शक्य. प्रेमी जीवांनाही हा कालावधी चांगला आहे. सप्ताह मध्य तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे याची जाणीव करुन देणारा आहे. वैद्यकीय व्यावसायिकांसाठी मात्र हा काळ अनुकूल आहे. नोकरीत वरीष्ठांचे सहकार्य चांगले मिळेल. सप्ताहाच्या शेवटी संमिश्र ग्रहमान आहे. व्यापार्यांना अनुकूल काळ आहे. मात्र जोडीदाराबरोबर वाद टाळावेत.
या सप्ताहासाठी उपासना: रामरक्षेचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)