अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१४ मे ते २० मे २०२३)

(Astroshodh- astrology, vastu, numerology, astrologerinpune, bestastrologerinpune, famousastrologerinpune, astrologerinkothrud, vastucosultantinpune)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, बुध(व), गुरु, राहू, हर्षल, तृतीयस्थानी शुक्र, चतुर्थस्थानात मंगळ, सप्तमस्थानात केतू, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात शनि आणि व्ययस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला सुर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १५ तारखेला सूर्य वृषभ राशित प्रवेश करेल आणि चंद्राची नेपचूनबरोबर युती होईल. १७ तारखेला चंद्राची अनुक्रमे गुरु व बुधाशी युती आणि शनिशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राची सूर्याशी युती आणि मंगळ व शनिशी लाभयोग होईल. २० तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस मस्त मजा करण्याचा आहे. काही जुन्या मित्रांच्या संपर्कात याल. काही लाभही होऊ शकतील. सोमवार, मंगळवार खरेदीसाठी चांगले आहेत. परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांना अनुकूल काळ आहे. आयात-निर्यातीच्या व्यवसायात फ़ायदा होईल. पूर्वीच्या एखाद्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. सप्ताह मध्यही खरेदीसाठी चांगला आहे. विशेषत: नृत्यकलेशी संबंधित असणार्‍यांना अतिशय चांगला काळ आहे. सप्ताह मध्यानंतर संमिश्र काळ आहे. दैनंदिन कामे रेंगाळतील. घरातील कामांसाठी वेळ काढावा लागेल. हातातली कामे पटकन उरकून आराम करण्याकडे आज कल असेल. सप्ताह अखेरीस आर्थिक स्थिती चांगली असेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. मन प्रसन्न असेल.
उपासना: या काळात रोज महालक्ष्मीअष्टक जरुर म्हणावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी शुक्र, तृतीयस्थानी मंगळ, षष्ठस्थानात केतू, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात शनि, लाभस्थानात नेपचून आणि व्ययस्थानात सूर्य, बुध(व), गुरु, राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला सुर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १५ तारखेला सूर्य वृषभ राशित प्रवेश करेल आणि चंद्राची नेपचूनबरोबर युती होईल. १७ तारखेला चंद्राची अनुक्रमे गुरु व बुधाशी युती आणि शनिशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राची सूर्याशी युती आणि मंगळ व शनिशी लाभयोग होईल. २० तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस अनुकूल आहे. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. तुमच्या कार्यक्षेत्रातही छान काम होईल त्यामुळे प्रसन्न असाल. व्यवसायातील लोकांना केलेल्या कामाचा मोबदला व्यवस्थित मिळेल. त्यानंतरचे दोन दिवस लाभदायक आहेत. मित्रांची भॆट शक्य आहे. काहींना धनलाभही होतील. सप्ताह मध्य व त्यानंतरचा काळ तुम्हाला फारसा अनुकूल नाही. बेकायदा गोष्टींपासून लांब रहा. सप्ताह अखेरीस कौटुंबीक सौख्य मिळेल. काहींना धनलाभ शक्य आहे. तुमच्या संभाषणकौशल्यामुळे काही कामे मार्गी लागण्याणी शक्यता आहे.
उपासना: या काळात मारुतीची उपासना करणे, मारुतीचे दर्शन घेणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात शुक्र, धनस्थानी मंगळ, पंचमस्थानात केतू, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात शनि, दशमस्थानात नेपचून आणि लाभस्थानात सूर्य, बुध(व), गुरु, राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला सुर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १५ तारखेला सूर्य वृषभ राशित प्रवेश करेल आणि चंद्राची नेपचूनबरोबर युती होईल. १७ तारखेला चंद्राची अनुक्रमे गुरु व बुधाशी युती आणि शनिशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राची सूर्याशी युती आणि मंगळ व शनिशी लाभयोग होईल. २० तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रवास शक्यतो या काळात टाळावेत. मानसोपचार तज्ञ, इतिहासकार व विमा व्यावसायिकांना मात्र हा काळ फायदेशीर ठरू शकेल. सप्ताह मध्यात उत्तम ग्रहमान आहे. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. व्यावसायिकांना लाभदायक संधी चालून येतील. काही अनपेक्षित लाभ शक्य. सप्ताह मध्यानंतर तुमच्या कामात कसूर होणार नाही याची काळजी घ्यावी. वरीष्ठांचे सहकार्य या काळात मिळणार नाही. एखाद्या मित्राच्या/ आप्ताच्या विचित्र वागण्याने त्रास होऊ शकेल. काही लाभ होता होता थांबू शकतील. सप्ताहाच्या अखेरीस पूर्वीच्या एखाद्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. छान खरेदी करु शकाल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
उपासना: श्रीस्वामी समर्थांचा तारक मंत्र या काळात रोज म्हणावा किंवा ऐकावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात मंगळ, चतुर्थस्थानात केतू, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात शनि, भाग्यस्थानात नेपचून, दशमस्थानात सूर्य, बुध(व), गुरु, राहू, हर्षल, आणि व्ययस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला सुर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १५ तारखेला सूर्य वृषभ राशित प्रवेश करेल आणि चंद्राची नेपचूनबरोबर युती होईल. १७ तारखेला चंद्राची अनुक्रमे गुरु व बुधाशी युती आणि शनिशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राची सूर्याशी युती आणि मंगळ व शनिशी लाभयोग होईल. २० तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस कंटाळवाणा व अडथळ्याचा असू शकेल. तुमची व जोडीदाराच्या तब्येतीची काळाजी घ्यावी. वातविकार व हाडांसंबंधी काही आजार असतील तर योग्य ती काळजी व पथ्यपाणी सांभाळावे. सोमवार, मंगळवार चांगले जातील. भाग्यवर्धक घटना या दरम्यान शक्य. उपासनेसाठी चांगला काळ आहे. शिक्षण क्षेत्रातील लोकांना विशेष अनुकूल काळ आहे. अध्यात्मिक क्षेत्रातील लोकांना गुरु भेटणे किंवा काही अध्यात्मिक अनुभव या काळात शक्य आहेत. सप्ताह मध्यानंतर घरात छान वातावरण असेल. व्यावसयिकांना लाभदायक ग्रहमान आहे. कामे मार्गी लागतील. सप्ताहाचा शेवट खरेदीसाठी चांगला आहे. मनोरंजनाकडे कल राहील.
उपासना: ’ श्री गुरुदेव दत्त ’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी केतू, षष्ठस्थानात प्लूटो, सप्तमस्थानात शनि, अष्टमस्थानात नेपचून, भाग्यस्थानात सूर्य, बुध(व), गुरु, राहू, हर्षल, लाभस्थानात शुक्र, आणि व्ययस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला सुर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १५ तारखेला सूर्य वृषभ राशित प्रवेश करेल आणि चंद्राची नेपचूनबरोबर युती होईल. १७ तारखेला चंद्राची अनुक्रमे गुरु व बुधाशी युती आणि शनिशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राची सूर्याशी युती आणि मंगळ व शनिशी लाभयोग होईल. २० तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराबरोबर वाद टाळावेत. तुमचे व जॊडीदाराचे काही आरोग्यविषयक प्रश्न असतील तर तिकडे लक्ष द्यावे लागेल. सप्ताह मध्य संमिश्र असेल. गूढ विषय तुम्हाला आकर्षित करतील. अचानक धनलाभाचेही योग शक्य. प्रवासाचे योग शक्य. मात्र दैनंदिन कामात अडचणी जाणवू शकतील. सप्ताह मध्यानंतर धार्मिक गोष्टींकडे मनाचा कल असेल. तुमची धार्मिक मते मात्र दुसर्‍यांवर लादू नका. गुरुची किंवा वरीष्ठांची अवज्ञा करु नका. सप्ताहाचा शेवट कार्यपूर्तीचा असू शकेल. लाभ होतील. आवडती माणसे भेटतील. चांगला कालावधी आहे.
उपासना: श्रीसूक्ताचे नियमित पठण या कालावधीत केलेले चांगले.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात केतू, पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी शनि, सप्तमस्थानात नेपचून, अष्टमस्थानात सूर्य, बुध(व), गुरु, राहू, हर्षल, दशमस्थानात शुक्र आणि लाभस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला सुर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १५ तारखेला सूर्य वृषभ राशित प्रवेश करेल आणि चंद्राची नेपचूनबरोबर युती होईल. १७ तारखेला चंद्राची अनुक्रमे गुरु व बुधाशी युती आणि शनिशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राची सूर्याशी युती आणि मंगळ व शनिशी लाभयोग होईल. २० तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांना व वकिलांना चांगला आहे. तब्येतीच्या कुरबुरी मात्र जाणवत रहातील. विद्यार्थ्यांनी अती आत्मविश्वास टाळावा. अभ्यासाकडे दुर्लक्ष नको. त्यानंतरचे दोन दिवस संमिश्र आहेत. जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. जोखीम असलेली कामे मात्र या दरम्यान करु नका. सप्ताह मध्यानंतर अचानक धनलाभाचे योग शक्य आहेत मात्र वाहन चलवितांना योग्य ती काळजी घ्यावी. मूळव्याध किंवा उष्णतेच्या विकारांचा ज्यांना त्रास आहे त्यांनी या काळात योग्य ते पथ्यपाणी सांभाळावे. सप्ताहाच्या शेवटी काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात शनि, षष्ठस्थानी नेपचून, सप्तमस्थानात सूर्य, बुध(व), गुरु, राहू, हर्षल, नवमस्थानात शुक्र आणि दशमस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला सुर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १५ तारखेला सूर्य वृषभ राशित प्रवेश करेल आणि चंद्राची नेपचूनबरोबर युती होईल. १७ तारखेला चंद्राची अनुक्रमे गुरु व बुधाशी युती आणि शनिशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राची सूर्याशी युती आणि मंगळ व शनिशी लाभयोग होईल. २० तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
फलादेश- रविवारी मुलांबरोबर वेळ मजेत जाईल. नवीन काही शिकण्यासाठी चांगला दिवस आहे. भावंडे किंवा आप्तेष्ट यांच्या भेटी होतील. सोमवार, मंगळवार तब्येतीच्या तक्रारी काहींना जाणवतील. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना तसेच वकील व आहारतज्ञ यांना मात्र अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यात घरात आनंदी वातावरण असेल. व्यावसायिक भेटी यशस्वी होतील. व्यवसायात नवीन तंत्र अमलात आणाल. शासकीय कामे मार्गी लागतील. सप्ताह मध्यानंतर लाभदायक ग्रहमान आहे. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. वरीष्ठांची मर्जी राहील. सप्ताह अखेरीस गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. अचानक धनलाभाचे योगही शक्य आहेत.
उपासना: मारुतीची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात शनि, पंचमस्थानात नेपचून, षष्ठस्थानी सूर्य, बुध(व), गुरु, राहू, हर्षल, अष्टमस्थानात शुक्र, नवमस्थानात मंगळ, आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला सुर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १५ तारखेला सूर्य वृषभ राशित प्रवेश करेल आणि चंद्राची नेपचूनबरोबर युती होईल. १७ तारखेला चंद्राची अनुक्रमे गुरु व बुधाशी युती आणि शनिशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राची सूर्याशी युती आणि मंगळ व शनिशी लाभयोग होईल. २० तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहातील सुरुवातीला मौज मजा करण्याकडे कल असेल. घरात छान पार्टी करायला हरकत नाही. प्रॉपर्टी खरेदी/ विक्री साठी अनुकुल काळ आहे. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना व कलाकारांना अनुकूल आहे. कमी श्रमात जास्त यश मिळेल. अचानक एखादं बक्षिस किंवा धनलाभ सुखावून टाकेल. प्रेमिकांसाठी चांगला काळ आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर तब्येतीच्या तक्रारी जाणवत रहातील. हितशत्रूंचा त्रास वाढेल. या काळात कोणाशीही वाद होणार नाही याची दक्षता घ्या. सप्ताहाच्या शेवटी जोखीम असलेली कामे करु नका. वाहने सावकाश चालवा.
उपासना: मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसेचा नित्य पाठ या काळात करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी शनि, चतुर्थस्थानात नेपचून, पंचमस्थानात सूर्य, बुध(व), गुरु, राहू, हर्षल, सप्तमस्थानी शुक्र, अष्टमस्थानात मंगळ, आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला सुर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १५ तारखेला सूर्य वृषभ राशित प्रवेश करेल आणि चंद्राची नेपचूनबरोबर युती होईल. १७ तारखेला चंद्राची अनुक्रमे गुरु व बुधाशी युती आणि शनिशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राची सूर्याशी युती आणि मंगळ व शनिशी लाभयोग होईल. २० तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रवासाचे योग संभवतात. लेखकांसाठी चांगला काळ आहे. भावंडाशी संवाद साधाल. धनलाभाचेही योग काहींना आहेत. सप्ताहाच्या मध्यात कौटुंबिक सौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. प्रॉपटींची कामे मार्गी लागतील. घरात मित्र किंवा आप्तेष्टांबरोबर एखादी छानशी पार्टी किंवा गेट टुगेदर आयोजित करायला हरकत नाही. सप्ताह मध्यानंतर विद्यार्थ्यांना प्रतिकूल ग्रहमान आहे. मुलांच्या काही समस्या असतील तर त्याकडे लक्ष द्यावे. सप्ताहाच्या शेवटी तब्येतीची काळजी घ्या. आणि जोडीदाराबरोबर वाद टाळा.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात शनि, तृतीयस्थानी नेपचून, चतुर्थस्थानात सूर्य, बुध(व), गुरु, राहू, हर्षल, षष्ठस्थानात शुक्र, सप्तमस्थानी मंगळ, आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला सुर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १५ तारखेला सूर्य वृषभ राशित प्रवेश करेल आणि चंद्राची नेपचूनबरोबर युती होईल. १७ तारखेला चंद्राची अनुक्रमे गुरु व बुधाशी युती आणि शनिशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राची सूर्याशी युती आणि मंगळ व शनिशी लाभयोग होईल. २० तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात प्रिय घटनांनी होईल. प्रिय व्यक्तींच्या भेटी शक्य. धनलाभाचे योग आहेत. लेखक, वक्ते, ब्लॉगर्स व कलाकार यांच्यासाठी चांगला कालावधी आहे. सप्ताह मध्यात प्रवासयोग आहेत. तुमच्या चांगल्या नियोजनामुळे कामे मार्गी लागतील. तुमच्या कार्याची प्रशंसा लोक करतील. भावंडांसंदर्भात चांगली बातमी कळेल. सप्ताह मध्यानंतर कौटुंबिक सौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. प्रॉपटींची कामे मार्गी लागतील. सप्ताह अखेरीस विद्यार्थ्यांनी अती आत्मविश्वास टाळावा. अभ्यासाकडे दुर्लक्ष नको. आहार तज्ञ व कलाकारांना मात्र चांगला काळ आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि, धनस्थानात नेपचून, तृतीयस्थानी सूर्य, बुध(व), गुरु, राहू, हर्षल, पंचमस्थानात शुक्र, षष्ठस्थानात मंगळ, भाग्यस्थानात केतू आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला सुर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १५ तारखेला सूर्य वृषभ राशित प्रवेश करेल आणि चंद्राची नेपचूनबरोबर युती होईल. १७ तारखेला चंद्राची अनुक्रमे गुरु व बुधाशी युती आणि शनिशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राची सूर्याशी युती आणि मंगळ व शनिशी लाभयोग होईल. २० तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला काही खरेदी कराल किंवा काही खर्च अचानकपणे पुढे येतील. दैनंदिन कामात काही अडचणी जाणवतील. सप्ताह मध्य उत्तम आहे. कौटुंबीक सौख्य लाभेल. धनलाभाचे योग आहेत. संभाषणकौशल्याच्या जोरावर कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. मन प्रसन्न असेल. सप्ताह मध्यानंतर शक्यतो प्रवास टाळावेत. सोशल मिडियावर वादग्रस्त होईल असे काहीही या कालावधीत प्रसिध्द करू नका. सप्ताह अखेरीस भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. काहींना धनलाभाचे योग आहेत. प्रॉपर्टीच्या कामांमधून लाभ संभवतो.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी नेपचून, धनस्थानात सूर्य, बुध(व), गुरु, राहू, हर्षल, चतुर्थस्थानात शुक्र, पंचमस्थानात मंगळ, अष्टमस्थानात केतू, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात शनि अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला सुर्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १५ तारखेला सूर्य वृषभ राशित प्रवेश करेल आणि चंद्राची नेपचूनबरोबर युती होईल. १७ तारखेला चंद्राची अनुक्रमे गुरु व बुधाशी युती आणि शनिशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राची सूर्याशी युती आणि मंगळ व शनिशी लाभयोग होईल. २० तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस खरेदीसाठी चांगला आहे. आयात- निर्यातीचा ज्यांचा व्यवसाय आहे त्यांना फायदेशीर ग्रहमान आहे. सोमवार, मंगळवार भाग्यवर्धक घटनांचे ठरु शकतील. मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. सप्ताह मध्य चांगला आहे. कौटुंबीक सौख्य मिळेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. या दरम्यान धनलाभ शक्य आहे. सप्ताह मध्यानंतर बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. कळत नकळतपणे लोक दुखावले जाण्याची शक्यता आहे. सप्ताह अखेरीस मनाला आनंद देणार्‍या काही घटना शक्य आहेत.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)