अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (३० ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर २०२२)

(Astroshodh- astrology, vastu, numerology, astrologerinpune, bestastrologerinpune, famousastrologerinpune, astrologerinkothrud, vastucosultantinpune)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, हर्षल, तृतीयस्थानी मंगळ, सप्तमस्थानात सूर्य, बुध, शुक्र, केतू, दशमस्थानात शनि(व), प्लूटो, लाभस्थानात नेपचून आणि व्ययस्थानात गुरु(व) अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ३१ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल. ४ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व गुरुशी युती होईल. आणि ५ तारखेला शुक्राचा हर्षलशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीलाच काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. शिक्षण क्षेत्र तसेच न्यायव्यवस्थेशी संबंधित असलेल्यांना चांगले ग्रहमान आहेत. धार्मिक कृत्ये व उपासना करणार्‍यासही हा कालावधी चांगला आहे. काहींना प्रवासयोग येतील. खर्च मात्र या काळात वाढणार आहेत. सप्ताह मध्यात नोकरीत किंवा व्यवसायात चांगले काम झाल्याने वरीष्ठ खुश असतील. काहींना बढतीचे योग शक्य आहेत. घरातील वातावरण छान असेल. सप्ताह अखेरीस काहींना धनलाभ सुखावून टाकेल. मित्रांबरोबर किंवा नातेवाईकांबरोबर छान वेळ जाईल.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या काळात जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात मंगळ, षष्ठस्थानात सूर्य, बुध, शुक्र, केतू, भाग्यस्थानात शनि(व), प्लूटो, दशमस्थानात नेपचून, लाभस्थानात गुरु(व) आणि व्ययस्थानात राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ३१ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल. ४ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व गुरुशी युती होईल. आणि ५ तारखेला शुक्राचा हर्षलशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात काहींसाठी शारिरीक कुरबुरीची असू शकेल. जीवनशक्तीची कमतरता किंवा थकवा जाणवत राहू शकेल. जोखीम असलेली कामे या दरम्यान करु नका. महत्त्वाची कामे पुढे ढकला. या काळात गूढ विषय तुम्हाला आकर्षित करतील. अचानक धनलाभाचे योग काहींना या काळात शक्य. सप्ताह मध्यात काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. वक्ते, लेखक, पुरोहीत, शिक्षक यांना अनुकूल काळ आहे. प्रवास लाभदायक ठरतील. सप्ताह अखेरीस कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. वरीष्ठांची मर्जी राहील. आर्थिक स्थिती चांगली असेल. मन प्रसन्न असेल.
उपासना: श्रीसूक्ताचे नियमित पठण या कालावधीत केलेले चांगले.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, पंचमस्थानात सूर्य, बुध, शुक्र, केतू, अष्टमस्थानात शनि(व), प्लूटो, भाग्यस्थानात नेपचून, दशमस्थानात गुरु(व), लाभस्थानात राहू, हर्षल आणि अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ३१ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल. ४ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व गुरुशी युती होईल. आणि ५ तारखेला शुक्राचा हर्षलशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात चांगली होईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांसाठी चांगला काळ आहे. जोडीदारासंबंधी एखादी चांगली घटना शक्य आहे. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. व्यावसयिकांना फायदा देणार्‍या नवीन संधी चालून येतील. सप्ताह मध्यात मात्र अचानक आलेल्या अडचणींनी त्रस्त व्हाल. प्रवासात खिसे/ पाकिट सांभाळा. जोखीम असलेली कामे आज करु नका. महत्त्वाची कामे पुढे ढकला. वाहने सावकाश चालवा. सप्ताह अखेरीस संमिश्र ग्रहमान आहे. वरीष्ठांशी जमवून घेतल्यास तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात सूर्य, बुध, शुक्र, केतू, सप्तमस्थानात शनि(व), प्लूटो, अष्टमस्थानात नेपचून, भाग्यस्थानात गुरु(व), दशमस्थानात राहू, हर्षल आणि व्ययस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ३१ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल. ४ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व गुरुशी युती होईल. आणि ५ तारखेला शुक्राचा हर्षलशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहात सुरुवातीला तब्येतीच्या तक्रारी जाणवत रहातील. कुठलीही गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक कशात करत आहात तसेच त्यात काही धोके तर नाही ना याची पूर्ण खातरजमा करून घ्यावी. आहारतज्ञ व वैद्यकीय व्यवसाय करणार्‍यांना मात्र हा काळ चांगला आहे. सप्ताह मध्यात एखाद्या समारंभात सहभागी होण्याचे योग येतील. मात्र जोडीदाराशी वाद विवाद टाळावेत. जोडीदाराचे काही प्रश्न असतील तर त्याकडे लक्ष द्यावे. सप्ताह अखेरीस रागावर नियंत्रण ठेवावे. विमा/ वैद्यकीय क्षेत्रात काम करणार्‍यांना अनुकूल कालावधी आहे.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ किंवा मृत्युंजय मंत्राचा जप जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी सूर्य, बुध, शुक्र, केतू, षष्ठस्थानात शनि(व), प्लूटो, सप्तमस्थानात नेपचून, अष्टमस्थानात गुरु(व), भाग्यस्थानात राहू, हर्षल आणि लाभस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ३१ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल. ४ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व गुरुशी युती होईल. आणि ५ तारखेला शुक्राचा हर्षलशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात संमिश्र होणार आहे. काहींना छोटसं बक्षिस, भेटवस्तू, प्रमोशन, पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. मात्र आपल्या मुलांच्या स्वभावाचे वेगळेच कंगोरे या काळात बघायला मिळण्याची शक्यता आहे. वाद टाळावेत. विद्यार्थी व प्रेमिकांना फ़ारसा चांगला कालावधी नाही. सप्ताह मध्यात व नंतर काहींना नोकरीच्या संधी चालून येतील. मात्र तब्येतीची काळजी घ्यावी. योग्य ते पथ्यपाणी सांभाळावे. अती दगदग टाळावी तसेच आपल्या जिवलग माणसांसोबत वाद होणार नाहीत याचीही काळजी घ्यावी.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात सूर्य, बुध, शुक्र, केतू, पंचमस्थानात शनि(व), प्लूटो, षष्ठस्थानी नेपचून, सप्तमस्थानात गुरु(व), अष्टमस्थानात राहू, हर्षल आणि दशमस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ३१ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल. ४ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व गुरुशी युती होईल. आणि ५ तारखेला शुक्राचा हर्षलशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला घरातील वातावरण चांगले राहील. उत्सव/ समारंभ साजरे होऊ शकतात. मन प्रसन्न असेल. प्रॉपर्टीची खरेदी विक्री करणार्‍यांना अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्य कलाकार, विद्यार्थी व प्रेमिकांना चांगला जाईल. काही लाभही होतील. नवीन विषयाच्या अभ्यासाला सुरुवात करायची असेल तर हा काळ चागला आहे. सप्ताहाच्या शेवटी तब्येत सांभाळावी. मात्र वैद्यकीय व्यवसाय करणारे तसेच वकील यांना ग्रहमान अनुकूल आहे. पूर्वी केलेल्या एखाद्या गुंतवणुकीतून फ़ायदा संभवतो.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, बुध, शुक्र, केतू, चतुर्थस्थानात शनि(व), प्लूटो, पंचमस्थानात नेपचून, षष्ठस्थानी गुरु(व), सप्तमस्थानात राहू, हर्षल आणि भाग्यस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ३१ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल. ४ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व गुरुशी युती होईल. आणि ५ तारखेला शुक्राचा हर्षलशी प्रतियोग होईल.
फलादेश- ग्रहमानाची चांगली साथ लाभली आहे. एकूणच आठवडा चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला काहींना प्रवासयोग शक्य आहेत. लेखक, ब्लॉगर्स यांना अनुकूल काळ आहे. भावंडांची खुशाली कळेल. सप्ताह मध्यात घरातील वातावरण चांगले रहाणार आहे. नवीन प्रॉपर्टी खरेदीसाठीही अनुकूल काळ आहे. सप्ताह अखेरीस काहींना अचानक धनलाभ संभवतात. खेळाडू व विद्यार्थ्यांना चांगले ग्रहमान आहे. ह्रदयविकाराचा त्रास असणार्‍यांनी मात्र योग्य ते पथ्यपाणी या कालावधीत सांभाळावे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी शनि(व), प्लूटो, चतुर्थस्थानात नेपचून, पंचमस्थानात गुरु(व), षष्ठस्थानी राहू, हर्षल, अष्टमस्थानात मंगळ आणि व्ययस्थानात सूर्य, बुध, शुक्र, केतू अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ३१ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल. ४ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व गुरुशी युती होईल. आणि ५ तारखेला शुक्राचा हर्षलशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला प्रिय व्यक्तींच्या भेटीचे योग येतील. चांगल्या घटना घडतील. काहींना धनलाभ होण्याचीही शक्यता आहे. छान मेजवानीचे योग येतील. सप्ताह मध्यात भावंडांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग संभवतात. एखादी अचानक मिळालेली भेटवस्तू सुखावून टाकेल. प्रवासयोग येतील. लेखक, ब्लॉगर्स यांना अनुकूल ग्रहमान आहे. घराच्या दुरुस्तीसाठी किंवा सजावटीसाठी काही खरेदी कराल. प्रॉपर्टी खरेदी-विक्री करणार्‍यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह अखेर घरगुती उत्सव समारंभाची. नशीबाची साथ मिळेल.
उपासना: या काळात दत्तबावन्नी रोज म्हणावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात शनि(व), प्लूटो, तृतीयस्थानी नेपचून, चतुर्थस्थानात गुरु(व), पंचमस्थानात राहू, हर्षल, सप्तमस्थानात मंगळ आणि लाभस्थानात सूर्य, बुध, शुक्र, केतू अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ३१ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल. ४ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व गुरुशी युती होईल. आणि ५ तारखेला शुक्राचा हर्षलशी प्रतियोग होईल.
फलादेश– सप्ताहाच्या सुरूवातीला घरात उत्सव/ समारंभाचे वातावरण असेल. एखादा धनलाभ होऊ शकेल. उपासनेसाठी/ धार्मिक कार्यक्रमांसाठी अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्य काहींना भाग्यवर्धक ठरेल. आत्मविश्वास वाढलेला असेल. तुमच्या मनातील कल्पनांना आता मूर्त रुप देऊ शकाल. सप्ताहाच्या मध्यानंतर काहींना प्रवासाचे योग संभवतात. लेखक/ कवी यांना अनुकूल कालावधी आहे. भावंडांची ख्यालीखुशाली कळेल. मन प्रसन्न असेल.
उपासना: रामरक्षेचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि(व), प्लूटो, धनस्थानात नेपचून, तृतीयस्थानी गुरु(व), चतुर्थस्थानात राहू, हर्षल, षष्ठस्थानात मंगळ आणि दशमस्थानात सूर्य, बुध, शुक्र, केतू अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ३१ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल. ४ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व गुरुशी युती होईल. आणि ५ तारखेला शुक्राचा हर्षलशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान खरेदीची असेल. काही अचानक खर्चही उद्भवू शकतात. नृत्यकलेशी संबंधीत व्यक्तींसाठी तसेच परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे अशा व्यक्तींना फायदेशीर काळ आहे. सप्ताह मध्यात ग्रहमान चांगले आहे. मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. काही लाभदायक घटना शक्य. सप्ताह अखेरीस ग्रहमान अनुकूल आहे. काही लाभ संभवू शकतात. घरातील वातावरण छान असेल. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचेही योग आहेत.
उपासना: मारुतीची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी नेपचून, धनस्थानात गुरु(व), तृतीयस्थानी राहू, हर्षल, पंचमस्थानात मंगळ, भाग्यस्थानात सूर्य, बुध, शुक्र, केतू आणि व्ययस्थानात शनि(व), प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ३१ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल. ४ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व गुरुशी युती होईल. आणि ५ तारखेला शुक्राचा हर्षलशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होईल. मित्रमैत्रिणींच्या भेटीचे योग येतील. भाग्यवर्धक घटना घडतील. धनलाभ संभवतो. वरीष्ठांचे छान सहकार्य मिळेल. सप्ताह मध्यात छान खरेदीचा मूड असेल. पारमार्थिक उन्नती/ मेडिटेशन यासाठी हा कालावधी चांगला आहे. आरोग्याच्या किरकोळ समस्या जाणवतील. सप्ताहाच्या शेवटी काही अनावश्यक खर्च डोके वर काढतील. आपल्या वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. परदेशासंबंधीत कामांसाठी मात्र हाच कालावधी चांगला असणार आहे.
उपासना: ’ श्री गुरुदेव दत्त ’ या मंत्राचा रोज जप करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु(व), धनस्थानात राहू, हर्षल, चतुर्थस्थानात मंगळ, अष्टमस्थानात सूर्य, बुध, शुक्र, केतू, लाभस्थानात शनि(व), प्लूटो आणि व्ययस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. ३१ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राची शनिशी युती होईल. ४ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व गुरुशी युती होईल. आणि ५ तारखेला शुक्राचा हर्षलशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला आपल्या कार्यक्षेत्रात चांगले काम झाल्याने खुश असाल. वरिष्ठांकडून आपल्याला अपेक्षित असलेलं सहकार्य मिळवता येईल. सप्ताह मध्यात चांगला धनलाभ होईल. मित्रांच्या किंवा परिचितांच्या भेटी होतील. काही अडकलेली कामे मित्रांच्या किंवा परिचितांमुळे सहजगत्या होतील. मन प्रसन्न करणार्‍या घटना घडतील. सप्ताह अखेरीस कायदा/ नियम मोडून कॊणतीही गॊष्ट करु नका. पूर्वी केलेल्या एखाद्या खर्चातून किंवा गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता आहे. परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांच्यासाठी अनुकूल घटनांचा हा कालावधी असेल.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)