
अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६)
Astroshodh, bestastrologerinpune, famousastrologerinpune, topastrologerinpune, bestastrologerinindia, famousastrologerinindia, topastrologerinindia
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, शुक्र, धनस्थानी हर्षल, तृतीयस्थानी गुरु, पंचमस्थानात केतू, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात राहू आणि व्ययस्थानात मंगळ, बुध, शनि, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला चंद्राची शुक्राशी तर मंगळाची शनिशी युती होईल तसेच शुक्र वृषभ राशित प्रवेश करेल. २० तारखेला चंद्राचा मंगळ, बुध व शनिशी लाभयोग होईल आणि बुधाची मंगळ व शनिशी युती होईल. २१ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. २३ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला शनि-मंगळ युतीचा व्हायरस तुमच्या व्यय स्थानात होणार आहे. या काळात मोठे व्यवहार करणे, बेकायदा व्यवहार करणे जोखीमेचे ठरु शकेल. अचानक एखादा खर्चही करायला लगू शकेल. काळजी घ्या. सप्ताह मध्यात कुटुंबियांसोबत वॆळ मजेत जाईल. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील. आवडीच्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. धनलाभाचे योग आहेत. व्यावसयिकांना फायदा देणार्या नवीन संधी चालून येतील. सप्ताह मध्यानंतर संमिश्र ग्रहमान आहे. तुमच्यातील जिद्द व चिकाटी वाढेल. कामात सुयश लाभेल. मात्र या दरम्यान वाहने सावकाश चालवा तसेच वादग्रस्त होईल असं लेखन सोशल मिडियावर करु नका. सप्ताहाच्या शेवटी घरात आनंदी वातावरण असेल. आपल्या छंदासाठी जरुर वेळ द्या. प्रॉपर्टीच्या कामांसाठीही अनुकूल कालावधी आहे.
उपासना: या काळात रोज महालक्ष्मीअष्टक म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी हर्षल, धनस्थानी गुरु, चतुर्थस्थानात केतू, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात राहू, लाभस्थानात मंगळ, बुध, शनि, नेपचून आणि व्ययस्थानात सूर्य, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला चंद्राची शुक्राशी तर मंगळाची शनिशी युती होईल तसेच शुक्र वृषभ राशित प्रवेश करेल. २० तारखेला चंद्राचा मंगळ, बुध व शनिशी लाभयोग होईल आणि बुधाची मंगळ व शनिशी युती होईल. २१ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. २३ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला आत्मविश्वास वाढलेला असेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. नोकरीत समाधानकारक स्थिती असेल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. सप्ताह मध्य लाभदायक घटनांचा आहे. आर्थिक सुयश लाभेल. घरात आनंदी वातावरण असेल. तुमच्या संभाषणकौशल्यामुळे काही कामे मार्गी लागण्याणी शक्यता आहे. तुमच्या जिवलगांबरोबर एखाद्या खाऊगल्लीला फेरफटका मारायला हरकत नाही. सप्ताहाच्या शेवटी भाग्यवर्धक काळ आहे. भावंडांशी वार्तालाप होईल. लेखक व प्रकाशकांना चांगले ग्रहमान आहे. सोशल मिडियावर केलेली एखादी पोस्ट प्रसिध्दी मिळवून देऊ शकेल. प्रवासयोग शक्य.
उपासना: या काळात गणपती अथर्वशीर्षाचे नित्य पठण करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु, तृतीयस्थानी केतू, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात राहू, दशमस्थानात मंगळ, बुध, शनि, नेपचून, लाभस्थानात सूर्य, शुक्र आणि व्ययस्थानात हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला चंद्राची शुक्राशी तर मंगळाची शनिशी युती होईल तसेच शुक्र वृषभ राशित प्रवेश करेल. २० तारखेला चंद्राचा मंगळ, बुध व शनिशी लाभयोग होईल आणि बुधाची मंगळ व शनिशी युती होईल. २१ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. २३ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला ग्रहमान संमिश्र आहे. मुलांसाठी काही खरेदी कराल. गुंतवणूकीसाठीही ग्रहमान साथ देईल. मात्र कोणतीही गुंतवणूक करतांना तज्ञ व्यक्तीचा जरुर घ्या. काही खर्च अचानकपणे सामोरे येऊ शकतील. सप्ताहाच्या मध्यात कौटुंबीक सौख्याचा काळ आहे. मन प्रसन्न असेल. आर्थिक सुयश लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल. सप्ताहाच्या अखेरीस घरात छान वातावरण असेल. आर्थिक सुयश लाभेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल.
उपासना: ’ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: ’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी केतू, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात राहू, भाग्यस्थानात मंगळ, बुध, शनि, नेपचून, दशमस्थानात सूर्य, शुक्र, लाभस्थानात हर्षल आणि व्ययस्थानात गुरु अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला चंद्राची शुक्राशी तर मंगळाची शनिशी युती होईल तसेच शुक्र वृषभ राशित प्रवेश करेल. २० तारखेला चंद्राचा मंगळ, बुध व शनिशी लाभयोग होईल आणि बुधाची मंगळ व शनिशी युती होईल. २१ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. २३ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात छान होईल. काही लाभ होऊ शकतात. मित्रांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. घरातही छान वातावरण असेल. एखाद्या समारंभ किंवा पार्टीत सामिल होण्याचे योग आहेत. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. सप्ताह मध्यात संमिश्र ग्रहमान आहे. जुनी येणी वसूल होतील. पूर्वीच्या एखाद्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. मात्र काही अनपेक्षित खर्चही करावे लागतील तसेच या दरम्यान बेकायदा गोष्टी टाळाव्या. सप्ताहाचा शेवट अनुकूल आहे. मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. काही लाभदायक घटना शक्य आहेत.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात केतू, षष्ठस्थानी प्लूटो, सप्तमस्थानात राहू, अष्टमस्थानात मंगळ, बुध, शनि, नेपचून, भाग्यस्थानात सूर्य, शुक्र, दशमस्थानात हर्षल आणि लाभस्थानात गुरु अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला चंद्राची शुक्राशी तर मंगळाची शनिशी युती होईल तसेच शुक्र वृषभ राशित प्रवेश करेल. २० तारखेला चंद्राचा मंगळ, बुध व शनिशी लाभयोग होईल आणि बुधाची मंगळ व शनिशी युती होईल. २१ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. २३ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- हा संपूण सप्ताह थोडासा परीक्षा बघणारा असेल. सप्ताहाच्या सुरुवातीला दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. जोखीम असलेली कामे या दरम्यान करु नका. या काळात प्रवास टाळा. या काळात झालेले वाद विकोपाला जाऊ शकतात. त्यामुळे वाद टाळा. सप्ताह मध्यात आर्थिक सुयश लाभेल. मात्र एखाद्या मित्राचा विचित्र अनुभव येण्याची शक्यता आहे. अती महत्वाकांक्षा या काळात नुकसानीची ठरु शकेल. सप्ताहाच्या शेवटी बेकायदा गोष्टी करणे टाळा. परदेशाशी संबंधीत काही कामे असतील तर त्यांना गती देऊ शकाल. धार्मिक कार्यात सहभाग असेल. अध्यात्मिक क्षेत्रात चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे.
उपासना: श्रीसूक्ताचे नियमित पठण या कालावधीत केलेले चांगले.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी राहू, सप्तमस्थानात मंगळ, बुध, शनि, नेपचून, अष्टमस्थानात सूर्य, शुक्र, भाग्यस्थानात हर्षल, दशमस्थानात गुरु आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला चंद्राची शुक्राशी तर मंगळाची शनिशी युती होईल तसेच शुक्र वृषभ राशित प्रवेश करेल. २० तारखेला चंद्राचा मंगळ, बुध व शनिशी लाभयोग होईल आणि बुधाची मंगळ व शनिशी युती होईल. २१ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. २३ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला ग्रहमान प्रतिकूल आहे. जोखीम असलेली कामे आज करु नका. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. वाहने सावकाश चालवा. प्रवासात सर्व प्रकारची काळजी आवश्यक आहे. या काळात वरीष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल. सप्ताह मध्यात व त्यानंतर लाभदायक काळ आहे. आर्थिक स्थिती चांगली असेल. वरीष्ठांची मर्जी राहील. मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग संभवतात. अचानक धनलाभही शक्य आहे. मन प्रसन्न असेल. अडकलेले एखादे काम मित्रामुळे किंवा ऒळखीमुळे पटकन होऊन जाईल.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात राहू, षष्ठस्थानी मंगळ, बुध, शनि, नेपचून, सप्तमस्थानात सूर्य, शुक्र, अष्टमस्थानात हर्षल, भाग्यस्थानात गुरु आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला चंद्राची शुक्राशी तर मंगळाची शनिशी युती होईल तसेच शुक्र वृषभ राशित प्रवेश करेल. २० तारखेला चंद्राचा मंगळ, बुध व शनिशी लाभयोग होईल आणि बुधाची मंगळ व शनिशी युती होईल. २१ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. २३ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला तब्येतीसंबंधी काही कुरबुरी जाणवतील. मनाविरुद्ध घटनाही शक्य. ्या काळात कोणाशीही मतभेद होणार नाही याची काळजी घ्या. प्रवासात अडथळे येणे, वाहनांसाठी अचानक खर्च उद्भवणे अशा घटना संभवू शकतात. ईन्शुरन्सचे काम करणार्यांना मात्र चांगला कालावधी आहे. ज्योतिष, मानसशास्त्र हे ज्यांचे कामाचे स्वरुप आहे त्यांनाही हा काळ चांगला आहे. सप्ताहाचा मध्य उपासना करण्यास चांगला आहे. सप्ताहाच्या शेवटी व्यवसायात नवीन तंत्र अमलात आणाल. शासकीय कामे मार्गी लागतील. केलेल्या कामाचं, मेहनतीचं चीज़ होईल. काही लाभही होऊ शकतील.
उपासना: ’विठ्ठल’ नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात राहू, पंचमस्थानात मंगळ, बुध, शुक्र, शनि, नेपचून, षष्ठस्थानी सूर्य, शुक्र, सप्तमस्थानात हर्षल, अष्टमस्थानात गुरु आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला चंद्राची शुक्राशी तर मंगळाची शनिशी युती होईल तसेच शुक्र वृषभ राशित प्रवेश करेल. २० तारखेला चंद्राचा मंगळ, बुध व शनिशी लाभयोग होईल आणि बुधाची मंगळ व शनिशी युती होईल. २१ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. २३ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय असेल तर या काळात फ़ायद्याचे प्रमाण वाढेल. भागीदाराकडून उत्तम सहकार्य मिळेल. सप्ताह मध्य संमिश्र घटनांचा असू शकेल. काही मनाविरुध्द घटना घडतील. वाहने हळू चालवा. अपघातभय आहे. याउलट काहींना अचानक बक्षिसाचा किंवा लाभाचा संभव आहे. सप्ताह मध्यानंतर भाग्यवर्धक गोष्टी घडू शकतात. सप्ताहाच्या शेवटी तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. वरीष्ठ तुमच्या कामावर खुश असतील. काही धनलाभही या काळात अपेक्षित आहेत.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी राहू, चतुर्थस्थानात मंगळ, बुध, शनि, नेपचून, पंचमस्थानात सूर्य, शुक्र, षष्ठस्थानी हर्षल, सप्तमस्थानात गुरु आणि नवमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला चंद्राची शुक्राशी तर मंगळाची शनिशी युती होईल तसेच शुक्र वृषभ राशित प्रवेश करेल. २० तारखेला चंद्राचा मंगळ, बुध व शनिशी लाभयोग होईल आणि बुधाची मंगळ व शनिशी युती होईल. २१ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. २३ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- रविवारी संध्याकाळपर्यंत लाभदायक ग्रहमान आहे. आवडत्या व्यक्तीच्या भेटीचा योग आहे. आर्थिक सुयश लाभेल. त्यानंतर मंगळवार रात्रीपर्यंत तब्येतीची काळजी घेणे उचित ठरेल. वैद्यकीय क्षेत्रात व कायदेविषयी काम करणार्यांसाठी मात्र फ़ायदेशीर ग्रहमान आहे. सप्ताह मध्य भागीदारीत व्यवसाय करणार्यांसाठी चांगला जाईल. पती/ पत्नीविषयक चांगली बातमी कळेल. सप्ताहाच्या मध्यानंतर जोखीम किंवा धोका असलेली कामे करू नका. वाहने हळू चालवा. सप्ताह अखेर धार्मिक कार्यासाठी चांगला कालावधी आहे. ज्योतिष, वास्तू, रेकी अशा गूढ विषयांच्या अभ्यासासाठी अनुकूल कालावधी आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात राहू, तृतीयस्थानी मंगळ, बुध, शनि, नेपचून, चतुर्थस्थानात सूर्य, शुक्र, पंचमस्थानात हर्षल, षष्ठस्थानी गुरु आणि अष्टमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला चंद्राची शुक्राशी तर मंगळाची शनिशी युती होईल तसेच शुक्र वृषभ राशित प्रवेश करेल. २० तारखेला चंद्राचा मंगळ, बुध व शनिशी लाभयोग होईल आणि बुधाची मंगळ व शनिशी युती होईल. २१ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. २३ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. विद्यार्थ्यांना व कलाकारांना लाभदायक काळ आहे. मित्रमैत्रिणींच्या भेटी होतील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. काहींना धनलाभाचे योग आहेत. या काळात तुमच्या मुलांशी संवाद साधा. त्यांचे काही प्रश्न असतील तर त्यासाठी वेळ द्या. सप्ताह मध्य आरोग्याच्या काही तक्रारी निर्मांण करु शकतो. नोकरदार व्यक्तींनी वरीष्ठ नाराज होणार नाहीत याची काळजी घ्यावी. तुमच्या हितशत्रूंवर या काळात लक्ष ठेवा. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांसाठी चांगला कालावधी आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, धनस्थानात मंगळ, बुध, शनि, नेपचून, तृतीयस्थानी सूर्य, शुक्र, चतुर्थस्थानात हर्षल, पंचमस्थानात गुरु, सप्तमस्थानी केतू आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला चंद्राची शुक्राशी तर मंगळाची शनिशी युती होईल तसेच शुक्र वृषभ राशित प्रवेश करेल. २० तारखेला चंद्राचा मंगळ, बुध व शनिशी लाभयोग होईल आणि बुधाची मंगळ व शनिशी युती होईल. २१ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. २३ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला भाग्यकारक ग्रहमान आहे. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. घरात प्रसन्नता असेल. प्रॉपर्टीची कांमे करणार्यांना अनुकूल कालावधी आहे. एखाद्या समारंभ किंवा पार्टीत सामिल होण्याचे योग आहेत. सप्ताहाचा मध्य संमिश्र आहे. विद्यार्थ्यांनी अती आत्मविश्वास टाळावा. अभ्यासाकडे दुर्लक्ष नको. सप्ताह मध्यानंतर संततीबद्दल चांगली बातमी कळेल. प्रेमिकांना लग्न ठरविण्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे. विद्यार्थ्यांना व खेळाडूंना कमी कष्टात जास्त यश मिळण्याची शक्यता आहे. धनलाभाचेही योग आहेत. सप्ताहाच्या शेवटी तब्येतीची काळजी घ्या. वरीष्ठांशी जमवून घेतल्यास तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल.
उपासना: श्रीसूक्ताचे नियमित पठण या कालावधीत केलेले चांगले.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, बुध, शनि, नेपचून, धनस्थानी सूर्य, शुक्र, तृतीयस्थानी हर्षल, चतुर्थस्थानात गुरु, षष्ठस्थानात केतू, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १९ तारखेला चंद्राची शुक्राशी तर मंगळाची शनिशी युती होईल तसेच शुक्र वृषभ राशित प्रवेश करेल. २० तारखेला चंद्राचा मंगळ, बुध व शनिशी लाभयोग होईल आणि बुधाची मंगळ व शनिशी युती होईल. २१ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्राची गुरुशी युती होईल. २३ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- रविवारी संध्याकाळपर्यंत गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. अचानक धनलाभाचे योग शक्य. त्यानंतर मंगळवार रात्रीपर्यंत प्रवासाचे योग संभवतात. मात्र प्रवासात सर्व प्रकारची काळजी घेणं आवश्यक आहे. वादग्रस्त होईल असं लेखन या दरम्यान तुम्ही सोशल मिडियावर करु नका. सप्ताह मध्य आनंदात जाणार आहे. घरात छान वातावरण असेल आणि तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. प्रेमिकांना लग्न ठरविण्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे. प्रॉपर्टी खरेदी-विक्रीसाठी चांगला काळ आहे. बांधकाम व्यावसायिकांनाही या दरम्यान चांगला फायदा होऊ शकेल. सप्ताहाच्या शेवटी उत्तम ग्रहमान आहे. तुमच्यातील कलाकौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. विद्यार्थ्यांना व कलाकारांना कमी श्रमात जास्त यश मिळेल.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)