

अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (८ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट २०२१)
(Astroshodh- astrologerinpune, vastuconsultantinpune, pune)
मेष रास
सप्ताहाच्या सुरुवातीला वडीलधारी मंडळींचा सहवास लाभेल. अतीश्रम किंवा दगदग या काळात टाळावी. सप्ताह मध्यात अनुकूल ग्रहमान आहे. काहींना धनलाभ होतील. संततीबाबत चांगली बातमी कळेल. विद्यार्थी व खेळाडूंना चांगला कालावधी आहे. सप्ताह मध्यानंतर नोकरदार लोकांना कर्मचार्यांचे चांगले सहकार्य मिळेल. नोकरीबदलासाठीही अनुकूल ग्रहमान आहे. वैद्यकीय व्यावसायिकांना लाभदायक कालावधी आहे. सप्ताहाच्या शेवटी आवडत्या व्यक्तींबरोबर वेळ मजेत जाईल. विवाह ठरविण्यास हा काळ चांगला आहे.
उपासना: गायत्री मंत्राचा जप करणे या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
रविवारी नातेवाईकांच्या भेटीचे योग येऊ शकतील. लेखक/ साहित्यिकांना चांगला काळ आहे. मनासारखे काम झाल्याने खूष असाल. प्रवासाचे योगही संभवतात. सोमवार, मंगळवार घरासाठी वेळ काढावा लागेल. घरासंबंधी काही दुरुस्ती, काही भरायची राहीलेली बिले प्रलंबित असल्यास त्या कामास प्राधान्य द्या. प्रॉपर्टीच्या कामासाठीही अनुकूल काळ आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर विद्यार्थ्यांना व खेळाडूंना अतिशय उत्तम काळ आहे. केलेल्या कष्टाचे चीज होईल. मन प्रसन्न असेल. कोर्टकचेरीच्या कामात यश मिळेल.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहाची सुरूवात प्रियजनांच्या सहवासात छान होईल. काहींना धनलाभ शक्य आहे. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. सप्ताह मध्यात आप्तेष्टांच्या भेटी होतील. प्रवासाचे योग संभवतात. लेखक, प्रकाशक यांना हा काळ चांगला आहे. सप्ताह मध्यानंतर घरातील वातावरण छान राहील. प्रॉपर्टीच्या कामातून लाभ संभवतात. सप्ताहाच्या अखेरीस मन प्रसन्न करणाऱ्या घटना घडतील. एखादा धनलाभ सुखावेल. आपल्या एखाद्या छंदासाठी जरुर वेळ द्या. कलाकारांना, लेखकांना अनुकूल काळ आहे. विद्यार्थ्यांनाही यशदायक काळ आहे.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
संपूर्ण सप्ताह चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला मन प्रसन्न असेल. आत्मविश्वास वाढविणार्या घटना घडतील. कुटुंबीयांबरोबर छान सुर जमलेला असेल. काही लाभही संभवतात. आपल्या कार्यक्षेत्रात छान यश मिळणार आहे. वरीष्ठ/ वडीलधारी व्यक्तींचं सहकार्य चांगलं मिळेल. सप्ताह मध्यात प्रवासयोग संभवतात. धार्मिक गोष्टींसाठी अनुकूल काळ आहे. काही भाग्यवृध्दीकारक घटना घडतील. सप्ताह अखेरीस घरात छान वातावरण असेल. छान पार्टीचा मूड असेल. कलाकारांना व प्रेमिकांना हा काळ चांगला आहे.
उपासना: विठ्ठल नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहाच्या सुरुवातीला अचानक काही खर्च करावे लागतील. धार्मिक कृत्यांसाठी अनुकूल काळ आहे. मनाला एखाद्या गोष्टीची काळजी किंवा हुरहुर लागून राहू शकेल. सप्ताह मध्यात आपल्या बोलण्यामुळे कोणी दुखावले जाणार नाहीत याची काळजी घ्या. खाण्यावरसुध्दा संयम ठेवणं गरजेचे आहे. डोळ्याच्या किंवा दाताच्या काही समस्या असतील तर वेळीच वैद्यकीय सल्ला घ्यावा. सप्ताहाच्या शेवटी लेखक, कलाकार, ब्लॉगर्स यांना अनुकूल काळ आहे. भावंडांच्या भेटीचे योग शक्य आहेत.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
रविवारी मित्रांच्या व प्रियजनांच्या भेटीचे योग येतील. काही लाभही मन प्रसन्न करु शकतील. त्यानंतरचे दोन दिवस संमिश्र आहेत. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून काही लाभ होऊ शकतील. मात्र बेकायदा कोणतीही गोष्ट करु नका. सप्ताह मध्यात चांगली खरेदी होईल. मित्रांच्या भेटी शक्य आहेत. काहींना या काळात धनलाभ होतील. कार्यक्षेत्रात चांगलं काम होईल वरीष्ठ खुश असतील. सप्ताह अखेरीस काही भाग्यवृध्दीकारक घटना घडण्याची शक्यता आहे. प्रवासयोग येतील. भावंडांबद्दल चांगली बातमी कळेल. मन प्रसन्न असेल. मौज-मजा करण्याकडे कल असेल.
उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
संपूर्ण सप्ताह चांगला जाणार आहे. सप्ताहाची सुरुवात चांगली होणार आहे. काहींना वरीष्ठांकडून सहकार्य मिळेल. नोकरी, व्यवसायातील लोक भरपूर आणि मनाजोगते काम झाल्याने खूष असतील. मुख्य म्हणजे केलेल्या कामाचा मोबदलाही व्यवस्थित मिळाल्याने मन प्रसन्न राहील. सप्ताह मध्यात काही बाबतीत भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. मित्रांच्या भेटी होतील. काही अडकलेली कामे मित्रांच्या किंवा परीचितांच्या मदतीने पूर्ण करु शकाल. एखाद्या कामातून चांगली कमाई होऊ शकेल.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
–अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहाच्या सुरुवातीला काहींना प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. सप्ताह मध्यात आपल्या कामामध्ये चूक होणार नाही याची काळजी घ्यावी. वरीष्ठांचे मन दुखावले जाणार नाही याचीही दक्षता घ्या. आपल्या हितशत्रूंवर नजर ठेवा. नोकरीबदल किंवा नविन नोकरीसाठी प्रयत्न करण्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर अचानक धनलाभ संभवतो. आप्तेष्टांच्या किंवा मित्रांच्या भेटीचे योग संभवतात. सप्ताह अखेरीस छान खरेदीचे योग आहेत.
उपासना: महालक्ष्मीची उपासना करावी.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
रविवारी काही चिंता मनाला जाणवत असतील. काहींना गूढ गोष्टींचं आकर्षण वाटत राहील. त्यानंतरचे दोन दिवस धार्मिक गोष्टींसाठी व प्रवासासाठी अनुकूल आहेत. काहींच्या बाबतीत भाग्यवर्धक घटना घडतील. प्रवास लाभदायक ठरतील. सप्ताहाच्या मध्यानंतर मनासारखे काम होईल. तुमच्या कार्यक्षेत्रातील सहकाऱ्यांचे चांगले सहकार्य मिळेल. केलेल्या कामाचं चीज़ होईल. काही लाभही होऊ शकतात. त्यामुळे खुश असाल. घरात छान वातावरण असेल. सप्ताहाच्या शेवटी आवडत्या माणसांच्या भेटी शक्य आहेत.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
रविवारी घरच्यांबरोबर वेळ छान व्यतीत करू शकाल. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना चांगला काळ आहे. नंतरचे दोन दिवस जोडीदाराबरोबर वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. जोखीम असलेली कामे या काळात टाळलेलीच बरी. सप्ताह मध्यात काही भाग्यवर्धक घटना घडतील. काहींना प्रवासाचे योग येऊ शकतात. धार्मिक गोष्टींसाठी अनुकूल काळ आहे. सप्ताहाचा शेवट संमिश्र आहे. वरीष्ठांशी जमवून घेतल्यास तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहाच्या सुरूवातीला तब्येतीची काळजी घेणे उचित ठरेल. कोणत्याही वादात पडू नका. आपल्या कार्यक्षेत्रातील लोक आपल्याला वादात अडकवून आपली कोंडी तर करत नाही ना याकडे लक्ष ठेवावे. वैद्यकीय क्षेत्रात व कायदाविषयी कामे करणार्यांनी आपल्या कामात चूक होणार नाही याची दक्षता घ्यावी. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वेळ मजेत घालवायला मिळेल. प्रेमिकांनाही चांगला काळ आहे. सप्ताह अखेर धार्मिक कार्यासाठी चांगला कालावधी आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहाच्या सुरूवातीला काहींना सुवार्ता कळतील. विद्यार्थ्यांना चांगले ग्रहमान आहे. कलाकारांसाठीही चांगला काळ आहे. काहींना धनलाभही शक्य. सप्ताह मध्य नोकरदार मंडळींसाठी अनुकूल मात्र तब्येतीच्या काही तक्रारी जाणवू शकतील. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांसाठी अनुकूल कालावधी आहे. काहींना नोकरीच्या संधी प्राप्त होतील. सप्ताहाच्या मध्यानंतर जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. काहींना अचानक धनलाभाचे योग संभवतात. प्रेमिकांनाही हा कालावधी अनुकूल आहे.
उपासना: गुरुची उपासना करावी.
उपासना: मारुतीची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)