Weekly horoscope ( 26 Aug to 1 Sep 2018)
(by Astroshodh- Astrologer in Pune -Atul H. Kulkarni 9422088979)

अ‍ॅस्ट्रोशोध आठवड्याचे राशिभविष्य (२६ ऑगस्ट ते १ सप्टेंबर)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, चतुर्थात बुध, राहू, पंचमात रवि, षष्टात शुक्र, सप्तमात गुरु,  भाग्यात शनी व प्लुटो, दशमात मंगळ,  केतू व लाभात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल.  २६ तारखेला शुक्राचा प्लुटोशी केंद्रयोग होईल.  गेले दोन महिने वक्री असलेला मंगळ २७ तारखेला मार्गी होत आहे. २८ तारखेला बुधाचा गुरुशी केंद्रयोग होईल आणि १ तारखेच्या रात्री शुक्र राशीबदल करुन तुळ राशीत प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरूवातीला मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग येतील. काहींना धनलाभ
होतील. काही भाग्यवर्धक घटनाही शक्य. प्रवासयोगही येऊ शकतात. धार्मिक गोष्टींमधे मन रमु
शकेल. सप्ताह मध्यात काही अनेपेक्षित खर्च करावे लागतील. जोडीदाराबरोबर मस्त शॉपिंगला
जायला हरकत नाही. सप्ताहाच्या शेवटी आत्मविश्वास वाढविणार्‍या घटना घडतील. आपल्या
कार्यक्षेत्रात चांगले काम घडेल.
(by Astroshodh- Astrologer in Pune, contact: Atul H. Kulkarni 9422088979)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियेत बुध, राहू, चतुर्थात रवि , पंचमात शुक्र, षष्ठात गुरु, अष्टमात शनी व प्लुटो, भाग्यात मंगळ व केतू, दशमात नेपचून आणि व्ययस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला शुक्राचा प्लुटोशी केंद्रयोग होईल. गेले दोन महिने वक्री असलेला मंगळ २७ तारखेला मार्गी होत आहे. २८ तारखेला बुधाचा गुरुशी केंद्रयोग होईल आणि १ तारखेच्या रात्री शुक्र राशीबदल करुन तुळ राशीत प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरुवातीला वरीष्ठांना न दुखवता आपले काम करुन घ्यावे. काही मनाविरुध्द घटना शक्य. तब्बेतीच्या तक्रारी जाणवू शकतील. व्यवसायातील लोकांनी सध्या जोखिम असलेली कामे टाळावीत. सप्ताह मध्यात काही लाभदायक घटना घडू शकतील. एखाद्या मित्राच्या किंवा नातेवाईकाच्या विचित्र वागण्याचा त्रास होऊ शकतो. तब्बेतीच्या तक्रारी अजुनही जाणवत असतील तर वैद्यकिय सल्ला जरुर घ्यावा. सप्ताह अखेर अध्यात्मिक उन्नतीसाठी चांगला आहे. आयात- निर्यातीचा व्यवसाय करणार्‍यांना चांगले ग्रहमान आहे.
(by Astroshodh- Astrologer in Pune, contact: Atul H. Kulkarni 9422088979)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी बुध, राहू, तृतियेत रवि , चतुर्थात शुक्र, पंचमात गुरु, सप्तमात शनी, प्लुटो, अष्टमात मंगळ, केतू, भाग्यात नेपचून आणि लाभस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला शुक्राचा प्लुटोशी केंद्रयोग होईल. गेले दोन महिने वक्री असलेला मंगळ २७ तारखेला मार्गी होत आहे. २८ तारखेला बुधाचा गुरुशी केंद्रयोग होईल आणि १ तारखेच्या रात्री शुक्र राशीबदल करुन तुळ राशीत प्रवेश करेल.
सप्ताह चांगला जाणार आहे. काहींना प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. वरीष्ठांशी जुळवुन घेतल्यास तुमची एखादी मागणी त्यांच्याकडून पूर्ण करून घेता येईल. घरात वडीलधारी असतील तर त्यांची काळजी घ्यावी. सप्ताह मध्यात आपली कामे छान पार पडल्यामुळे खुश असाल. नविन विषयाचा अभ्यास सुरु करायचा असेल तर छान काळ आहे. प्रेमिकांना चांगले ग्रहमान आहे. काहींना लाभ होतील. सप्ताहाचा शेवट तितकासा चांगला नाही. आप्तेष्टांच्या/ शेजार्‍यांच्या विचित्र वागण्याचा त्रास होऊ शकेल.
(by Astroshodh- Astrologer in Pune, contact: Atul H. Kulkarni 9422088979)

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी बुध, राहू, धनस्थानी रवि, तृतियेत शुक्र, चतुर्थात गुरु, षष्ठात शनी व प्लुटो, सप्तमात मंगळ, केतू,  अष्टमात नेपचून आणि दशमात हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला शुक्राचा प्लुटोशी केंद्रयोग होईल. गेले दोन महिने वक्री असलेला मंगळ २७ तारखेला मार्गी होत आहे. २८ तारखेला बुधाचा गुरुशी
केंद्रयोग होईल आणि १ तारखेच्या रात्री शुक्र राशीबदल करुन तुळ राशीत प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरुवातीला प्रवासात अडथळे, वाहनांसाठी खर्च संभवू शकतो. तब्बेतीची काळजी घ्यावी. घरात एखादा समारंभ/ पार्टी असेल तर ती व्यवस्थित पार पडेल. सप्ताहाच्या मध्यात उपासना करण्यास चांगला आहे. लांबच्या प्रवासाच्या योजना मनात घोळू शकतात. काहींच्या बाबतीत भाग्यवर्धक घटना शक्य. सप्ताहाच्या शेवटी मनासारखे काम झाल्याने मन प्रसन्न असेल. मात्र जोडीदाराशी वाद टाळावेत. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांनी जोडीदाराचा गैरसमज होतील अशा गोष्टी टाळाव्यात.
(by Astroshodh- Astrologer in Pune, contact: Atul H. Kulkarni 9422088979)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी रवि, धनस्थानी शुक्र, तृतियेत गुरु,  पंचमात शनी, प्लुटो, षष्ठात मंगळ,  केतू, सप्तमात नेपचून, भाग्यात हर्षल आणि व्ययस्थानी बुध, राहू  अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला शुक्राचा प्लुटोशी केंद्रयोग होईल. गेले दोन महिने वक्री असलेला मंगळ २७ तारखेला मार्गी होत आहे. २८ तारखेला बुधाचा गुरुशी केंद्रयोग होईल आणि १ तारखेच्या रात्री शुक्र राशीबदल करुन तुळ राशीत प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराबरोबर वेळ छान व्यतीत करू शकाल. छान पार्टीचा मूड असेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. सहजगत्या केलेल्या थट्टा मस्करीतून किंवा रागाने बोलण्यामुळे काही लोक दुखावले जाण्याचीशक्यता आहे. सप्ताहाच्या मध्यात ज्योतिषी/ इंशूरन्सचे काम करणारे/ मानसोपचार तज्ञ यांना अनुकुल काळ आहे. काहींना सूचक स्वप्ने पडतील. सप्ताहाच्या शेवटी प्रवासात काळजी घ्यावी. अ‍ॅसिडीटी/ पोटाच्या किरकोळ तक्रारी जाणवत रहातील. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवावे.
(by Astroshodh- Astrologer in Pune, contact: Atul H. Kulkarni 9422088979)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शुक्र धनस्थानी गुरु,  चतुर्थात शनी, प्लुटो, पंचमात मंगळ, केतू,  षष्ठात नेपचून, अष्टमात हर्षल लाभस्थानी बुध, राहू आणि व्ययस्थानी रवि, अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला शुक्राचा प्लुटोशी केंद्रयोग होईल. गेले दोन महिने वक्री असलेला मंगळ २७ तारखेला मार्गी होत आहे. २८ तारखेला बुधाचा गुरुशी केंद्रयोग होईल आणि १ तारखेच्या रात्री शुक्र राशीबदल करुन तुळ राशीत प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरूवातीला रागावर निय़ंत्रण ठेवणे उचित ठरेल. तब्बेतीच्या तक्रारी डोके वर काढतील. वकिल, फ़िजिकल फ़िटनेस या क्षेत्रात काम करणार्‍यांना मात्र हा कालावधी चांगला आहे. शत्रूंच्या कारवाया वाढतील. सप्ताह मध्य चांगला आहे. जोडीदाराबद्दल एखादी चांगली बातमी कळू शकेल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांसाठी ग्रहमान अनुकुल आहे. सप्ताहाच्या शेवटी जोखीम किंवा धोका असलेली कामे करू नये. विद्यार्थ्यांनी अती आत्मविश्वास टाळावा.
(by Astroshodh- Astrologer in Pune, contact: Atul H. Kulkarni 9422088979)

तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी गुरु,  तृतियेत शनी, प्लुटो, चतुर्थात मंगळ, केतू, पंचमात नेपचून, सप्तमात हर्षल, दशमस्थानी बुध, राहू लाभस्थानी रवि, आणि व्ययस्थानी शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला शुक्राचा प्लुटोशी केंद्रयोग होईल. गेले दोन महिने वक्री असलेला मंगळ २७ तारखेला मार्गी होत आहे. २८ तारखेला बुधाचा गुरुशी केंद्रयोग होईल आणि १ तारखेच्या रात्री शुक्र राशीबदल करुन तुळ राशीत प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरूवातीला चांगल्या घटना घडू शकतील. काही लाभ/ बक्षिस अचानक मिळू शकेल. मुलांशी संवाद साधावा. विद्यार्थ्यांना चांगले ग्रहमाम आहे. प्रेमी युगुलांसाठीही चांगला काळ आहे. सप्ताह मध्य तब्बेतीच्या काही तक्रारी निर्मांण करु शकतो. वैद्यकिय क्षेत्रात काम करणार्‍यांसाठी ग्रहमान अनुकुल आहे. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना चांगला कालावधी आहे.
(by Astroshodh- Astrologer in Pune, contact: Atul H. Kulkarni 9422088979)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी शनी, प्लुटो, तृतियेत मंगळ,  केतू, चतुर्थात नेपचून आणि षष्ठस्थानात हर्षल, भाग्यस्थानी बुध, राहू, दशमस्थानी रवि, लाभस्थानी शुक्र व व्ययस्थानी गुरु  अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला शुक्राचा प्लुटोशी केंद्रयोग होईल. गेले दोन महिने वक्री असलेला मंगळ २७ तारखेला मार्गी होत आहे. २८ तारखेला बुधाचा गुरुशी केंद्रयोग होईल आणि १ तारखेच्या रात्री शुक्र राशीबदल करुन तुळ राशीत
प्रवेश करेल.
सप्ताहातील सुरुवातीला नविन वास्तू खरेदी/ विक्री किंवा गृहसजावटीसाठी लागणार्‍या वस्तु खरेदीसाठी अनुकुल काळ आहे. लेखकांसाठीही चांगला काळ आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला छोट्या प्रवासाचे योग संभवतात. भावंडाशी संवाद साधाल. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना प्रतिकूल आहे. परदेशात शिकायला जाणार्‍यांना मात्र अनुकुल काळ आहे. गुंतवणूक करतांना पुरेसी काळजी घ्यावी. सप्ताहाचा शेवट तब्बेतीसाठी चांगला नाही. मात्र वैद्यकीय व्यवसाय
करणार्‍यांना अनुकुल ग्रहमान आहे. नव्याने व्यायामाची सुरुवात करायची असेल तर ग्रहमान अनुकुल आहे.
(by Astroshodh- Astrologer in Pune, contact: Atul H. Kulkarni 9422088979)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शनी, प्लुटो,  धनस्थानी मंगळ, केतू, तृतिय स्थानात नेपचून, पंचमस्थानात हर्षल, अष्टमस्थानी बुध, राहू, भाग्यस्थानी रवि, दशमस्थानी शुक्र आणि लाभस्थानी गुरु अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला शुक्राचा प्लुटोशी केंद्रयोग होईल. गेले दोन महिने वक्री असलेला मंगळ २७ तारखेला मार्गी होत आहे. २८ तारखेला बुधाचा गुरुशी केंद्रयोग होईल आणि १ तारखेच्या रात्री शुक्र राशीबदल करुन तुळ राशीत प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरूवातीला प्रवासाचे किंवा सहलीचे योग संभवतात. भावंडांची भॆट संभवते. साहित्तीकांसाठी व कलाकारांसाठी चांगला काळ. मनासारखे काम झाल्याने खूष असाल. सप्ताहाच्या मध्यात प्रॉपर्टीची काही कामे प्रलंबीत असतील तर आता ती मार्गी लागू शकतील. घरातील वातावरण छान असेल. मस्त पार्टीचा मूड असेल. सप्ताहाच्या शेवटी एखादा धनलाभ, एखादी शाबासकीची मिळालेली थाप याने सुखावल्यासारखे होऊ शकेल. विद्यार्थ्यांना काळ उत्तम आहे.
(by Astroshodh- Astrologer in Pune, contact: Atul H. Kulkarni 9422088979)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी मंगळ, केतू,  धनस्थानी नेपचून, चतुर्थस्थानी हर्षल, सप्तमस्थानी  बुध, राहू,  अष्टमस्थानी रवि, भाग्यस्थानी शुक्र,  दशमस्थानी गुरु आणि व्ययस्थानी शनी, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला शुक्राचा प्लुटोशी केंद्रयोग होईल. गेले दोन महिने वक्री असलेला मंगळ २७ तारखेला मार्गी होत आहे. २८ तारखेला बुधाचा गुरुशी केंद्रयोग होईल आणि १ तारखेच्या रात्री शुक्र राशीबदल करुन तुळ राशीत प्रवेश करेल.
सप्ताहाच्या सुरूवातीस कुटुंबियांसोबत वॆळ छान जाईल. आप्तेष्टांच्या गाठीभेटीचे योग येतील. आवडीच्या पदार्थांच्या आस्वादाचे योग येतील. आपल्या चीजवस्तू सांभाळा. डोळ्यांवर अती ताण येणार नाही असे बघा. सप्ताह मध्यानंतर मनासारखं काम होईल. कार्यक्षेत्रातील सहकार्यांची मदत मिळेल. लेखक, ब्लॉगर्स यांना काळ खुप चांगला आहे. प्रवासयोगही येऊ शकतील. घरातील आवराआवरी तसेच डागडुजी या कामांसाठी सप्ताहाच्या अखेरीस वेळ काढावा लागेल.
(by Astroshodh- Astrologer in Pune, contact: Atul H. Kulkarni 9422088979)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी नेपचून, तृतिय स्थानात हर्षल, षष्ठस्थानी बुध,  राहू,  सप्तमस्थानी रवि, अष्टमस्थानी शुक्र,  भाग्यस्थानी गुरु, लाभस्थानी शनी, प्लुटो आणि व्ययस्थानी मंगळ,  केतू अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला शुक्राचा प्लुटोशी केंद्रयोग होईल. गेले दोन महिने वक्री असलेला मंगळ २७ तारखेला मार्गी होत आहे. २८ तारखेला बुधाचा गुरुशी केंद्रयोग होईल आणि १ तारखेच्या रात्री शुक्र राशीबदल करुन तुळ राशीत प्रवेश करेल.
एकंदरीतच सप्ताह चांगला आहे. सप्ताहाची सुरुवात चांगली आणि लाभदायक होण्याची शक्यता आहे. आवडत्या माणसांच्या सहवासात रहायला मिळेल. सप्ताह मध्यात धनलाभाचे काही योग येऊ शकतील. काहींच्या बाबतीत भाग्यवर्धक घटना शक्य. धार्मिक गोष्टींमधे मन रमेल. काहींना प्रवासयोग संभवतो. घरातील वातावरण चांगले राहील. सप्ताहाच्या शेवटी धार्मिक ठिकाणी भेटीचे योग संभवतात. पारमार्थिक उन्नतीसाठी चांगला काळ आहे.
लेखक/ ब्लॉगर्स यांना हा काळ प्रतिकुल आहे.
(by Astroshodh- Astrologer in Pune, contact: Atul H. Kulkarni 9422088979)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात हर्षल, पंचमस्थानी बुध, राहू,  षष्ठस्थानात रवि,  सप्तमस्थानी शुक्र,  अष्टम स्थानी गुरु,  दशमस्थानी शनी, प्लुटो, लाभ स्थानी मंगळ, केतू  आणि व्ययस्थानी नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २६ तारखेला शुक्राचा प्लुटोशी केंद्रयोग होईल. गेले दोन महिने वक्री असलेला मंगळ २७ तारखेला मार्गी होत आहे. २८ तारखेला बुधाचा गुरुशी केंद्रयोग होईल आणि १ तारखेच्या रात्री शुक्र राशीबदल करुन तुळ राशीत प्रवेश करेल.
सप्ताह मिश्र फ़ळे देणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला छानशी खरेदी कराल. एखादा अनावश्यक किंवा अचानक खर्चही उदभवू शकतो. आता केलेला खर्च किंवा देऊ केलेला वेळ भविष्यात नक्की फ़ायदा घेऊन येऊ शकेल. सप्ताहाच्या मध्यामधे गूढ विषयांकडे ऒढा निर्माण होऊ शकेल. ज्योतिष/ अध्यात्म अशा विषयांचा अभ्यास करायचा असेल तर ग्रहमान अनुकुल आहे. सप्ताहाचा शेवट अनुकुल आहे. आवक चांगली राहील. मन प्रसन्न असेल.
(by Astroshodh- Astrologer in Pune, contact: Atul H. Kulkarni 9422088979)

#weekly-horoscope
#astrologer in pune
#astroshodh
#astrology
#rashi
#bhavishya