Weekly horoscope ( 12 Aug to 18 Aug 2018)
      (by Astroshodh- Astrologer in Pune -Atul H. Kulkarni 9422088979)

अ‍ॅस्ट्रोशोध आठवड्याचे राशिभविष्य (१२ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, चतुर्थात रवि, बुध, राहू, षष्टात शुक्र, सप्तमात गुरु,  भाग्यात शनी व प्लुटो, दशमात मंगळ,  केतू व लाभात नेपचून अशी
ग्रहस्थिती असेल.  १७ तारखेला रवि राशांतर करुन सिंह राशीत प्रवेश करेल. १८ तारखेला बु्धाचा शुक्राशी लाभयोग होईल.
सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. काहींना छोटसं बक्षिस, भेटवस्तू, प्रमोशन, पगारवाढ
मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना व प्रेमिकांसाठी चांगला कालावधी आहे. संततीबाबत चांगली बातमी कळू शकेल. सप्ताह मध्यात तब्बेतीची काळजी घावी. वकील व वैद्यकीय व्यवसाय करणार्‍यांना हा काळ चांगला आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीपासून फ़ायदा संभवतो. सप्ताह अखेर आपल्या जिवलग माणसांसोबत वाद होणार नाही याची काळजी घ्यावी. जोडीदाराच्या तब्बेतीला जपावे.
(by Astroshodh- Astrologer in Pune, contact: Atul H. Kulkarni 9422088979)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियेत रवि, बुध, राहू, पंचमात शुक्र, षष्ठात गुरु, अष्टमात शनी व प्लुटो, भाग्यात मंगळ व केतू, दशमात नेपचून आणि व्ययस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला रवि राशांतर करुन सिंह राशीत प्रवेश करेल. १८ तारखेला बु्धाचा शुक्राशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला घरातील वातावरण चांगले राहील. उत्सव/ समारंभ साजरे होऊ शकतात. मन प्रसन्न असेल. प्रॉपर्टीची खरेदी विक्री करणार्‍या लोकांना अनुकुल काळ.  सप्ताह मध्य विद्यार्थ्यांसाठी व प्रेमिकांसाठी चांगला जाईल. विवाह ठरविण्यासही हा काळ चांगला आहे. नविन विषयांच्या अभ्यासाला सुरुवात करायची असेल तर हा काळ चांगला आहे. जवळपासचा प्रवास शक्य. सप्ताहाच्या शेवटी तब्बेत सांभाळावी. वैद्यकीय व्यवसाय करणारे, थेरपिस्ट, न्युट्रिशियन्स यांना अनुकुल ग्रहमान आहे.
(by Astroshodh- Astrologer in Pune, contact: Atul H. Kulkarni 9422088979)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी रवि , बुध, राहू, चतुर्थात शुक्र, पंचमात गुरु, सप्तमात शनी, प्लुटो, अष्टमात मंगळ, केतू, भाग्यात नेपचून आणि लाभस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला रवि राशांतर करुन सिंह राशीत प्रवेश करेल. १८ तारखेला बु्धाचा शुक्राशी लाभयोग होईल.
ग्रहमानाची चांगली साथ लाभली आहे. एकूणच आठवडा चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या
सुरुवातीला काहींना प्रवासयोग शक्य.  प्रवास लाभदायक होण्याची शक्यता आहे.  भावंडांच्या
किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग आहेत. सप्ताह मध्यात घरातील वातावरण छान असेल. एखादी
पार्टी/ समारंभाचं आयोजन करायला हरकत नाही. प्रॉपर्टीच्या कामांमधे फ़ायदा संभवतो. सप्ताह
अखेरीस काहींना अचानक धनलाभ संभवतात. कलाकार, खेळाडू, विद्यार्थ्यांना ग्रहमान अनुकुल
आहे.  प्रेमिकांसाठीसुध्दा अनुकूल काळ आहे.
(by Astroshodh- Astrologer in Pune, contact: Atul H. Kulkarni 9422088979)

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी रवि, बुध, राहू, तृतियेत शुक्र, चतुर्थात गुरु, षष्ठात शनी व प्लुटो, सप्तमात मंगळ, केतू,  अष्टमात नेपचून आणि दशमात हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला रवि राशांतर करुन सिंह राशीत प्रवेश करेल. १८ तारखेला बु्धाचा शुक्राशी लाभयोग होईल.
सप्ताह छान जाणार आहे. सप्ताहाची सुरूवात लाभदायक आहे. अचानक एखादा धनलाभ होऊ
शकतो. आपल्या संभाषण कौशल्यामुळे लोकप्रियता मिळेल. सप्ताह मध्यात भावंडांची खबरबात
कळेल. प्रवासयोग येतील. लेखक/ ब्लॉगर्स/ कवी यांना चांगला कालावधी आहे. काहींना
भावंडांकडून लाभ संभवतात. सप्ताह अखेर घरगुती उत्सव समांरंभाची. प्रॉपर्टीच्या कामासाठी
अनुकूल कालावधी आहे. मन प्रसन्न करणार्‍या घटना शक्य.
(by Astroshodh- Astrologer in Pune, contact: Atul H. Kulkarni 9422088979)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी शुक्र, तृतियेत गुरु,  पंचमात शनी, प्लुटो, षष्ठात मंगळ,  केतू, सप्तमात नेपचून, भाग्यात हर्षल आणि व्ययस्थानी रवि, बुध, राहू  अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला रवि राशांतर करुन सिंह राशीत प्रवेश करेल. १८ तारखेला बु्धाचा शुक्राशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवात मनाविरुध्द घटनांची ठरु शकेल. काही खर्च करावे लागतील. परदेशगमानासाठी अनुकुल काल आहे. सप्ताह मध्यात काही भाग्यवर्धक घटना शक्य. घरात उत्सव/ समारंभाचे वातावरण असेल. धार्मिक कार्यक्रमांसाठी अनुकुल काळ आहे. आपल्या कार्यक्षेत्रामधे चांगले काम झाल्याने खुश असाल. खाण्यापिण्यावर मात्र संयम ठेवा. सप्ताहाच्या मध्यानंतर कहींना प्रवासाचे योग संभवतात. लेखक/ कवि यांना अनुकुल कालावधी आहे. भावंडांची ख्यालीखुशाली कळेल.
(by Astroshodh- Astrologer in Pune, contact: Atul H. Kulkarni 9422088979)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शुक्र धनस्थानी गुरु,  चतुर्थात शनी, प्लुटो, पंचमात मंगळ, केतू,  षष्ठात नेपचून, अष्टमात हर्षल आणि लाभस्थानी रवि, बुध, राहू, अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला रवि राशांतर करुन सिंह राशीत प्रवेश करेल. १८ तारखेला बु्धाचा शुक्राशी लाभयोग होईल.
सप्ताहाची सुरुवात छान खरेदीची. प्रवासासाठी व परदेश प्रवास करण्यासाठी अनुकुल कालावधी. पारमार्थिक उन्नतीचे प्रयत्न करणार्‍यांसाठी हा काळ विशेष चांगला. सप्ताह मध्यात काही अनपेक्षित लाभ होऊ शकतील. मित्रमैत्रिणींच्या भेटीचे योग आहेत. मित्रमैत्रिणींचं छानसं
गेट-टुगेदर करायला हरकत नाही. सप्ताहाच्या शेवटी घरात छान वातावरण असेल. गायक/
कलाकार यांना चांगला काळ आहे.
(by Astroshodh- Astrologer in Pune, contact: Atul H. Kulkarni 9422088979)

तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी गुरु,  तृतियेत शनी, प्लुटो, चतुर्थात मंगळ, केतू, पंचमात नेपचून, सप्तमात हर्षल, दशमस्थानी रवि, बुध, राहू आणि व्ययस्थानी शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला रवि राशांतर करुन सिंह राशीत प्रवेश करेल. १८ तारखेला बु्धाचा शुक्राशी लाभयोग होईल.
सप्ताहाची सुरुवात छान होईल. काहींना प्रवासयोग शक्य. मित्रमैत्रिणिंच्या किंवा आप्तेष्टांच्या
भेटीचे योग येतील. कार्यक्षेत्रात छान काम होईल. काहींना धनलाभ संभवतो. सप्ताह मध्यात
छान खरेदीचा मूड असेल. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीपासून फ़ायदा संभवतो. परदेशाशी संबंधीत
ज्यांचे कार्यक्षेत्र आहे त्यांना फ़ायदेशीर काळ आहे. अध्यात्मिक उन्नतीसाठी चांगला काळ आहे.
सप्ताहाच्या शेवटी चैन करावीशी वाटेल. आपले पैसे/ चीजवस्तू सांभाळा.
(by Astroshodh- Astrologer in Pune, contact: Atul H. Kulkarni 9422088979)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी शनी, प्लुटो, तृतियेत मंगळ,  केतू, चतुर्थात नेपचून आणि षष्ठस्थानात हर्षल, भाग्यस्थानी रवि, बुध, राहू, लाभस्थानी शुक्र व
व्ययस्थानी गुरु  अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला रवि राशांतर करुन सिंह राशीत प्रवेश करेल. १८ तारखेला बु्धाचा शुक्राशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला आपल्या कार्यक्षेत्रात चांगले काम झाल्याने  वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल. मन प्रसन्न असेल. धार्मिक गोष्टींसाठी अनुकुल काळ आहे. काहींना कामानिमित्त प्रवासयोग येऊ शकतात. सप्ताह मध्यात चांगला धनलाभ होईल. आप्तेष्टांच्या/ मित्रांच्या भेटीचे योग संभवतात. कमिशन एजंट/ विमा प्रतिनिधी, ट्रेडर्स यांना हा काळ विशेष चांगला आहे. सप्ताह अखेर मस्त खरेदीसाठी अनुकूल काळ आहे. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांनाअ हा काळा चांगला आहे. इंटरनॅशनल टूर्स आयोजित करणार्‍यांना तसेच कलाक्षेत्रातील लोकांना ग्रहमान अनुकुल आहे.
(by Astroshodh- Astrologer in Pune, contact: Atul H. Kulkarni 9422088979)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शनी, प्लुटो,  धनस्थानी मंगळ, केतू, तृतिय स्थानात नेपचून, पंचमस्थानात हर्षल, अष्टमस्थानी रवि, बुध, राहू, दशमस्थानी शुक्र आणि लाभस्थानी गुरु  अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला रवि राशांतर करुन सिंह राशीत प्रवेश करेल. १८ तारखेला बु्धाचा शुक्राशी लाभयोग होईल.
सप्ताह अतिशय छान आहे. सप्ताहाच्या सुरूवातीसच काही भाग्यवर्धक घटना शक्य. ज्योतिषी, मानसोपचारतज्ञ तसेच उपासना करणार्‍यांसाठी हा काळ चांगला आहे. काहींना प्रवास योग येऊ शकतात मात्र प्रवासात काळजी घ्यावी. सप्ताह मध्यात नोकरीत किंवा व्यवसायात कामात चुका होणार नाहीत याकडे लक्ष द्यावे. सप्ताह अखेरीस काहींना धनलाभाचे योग शक्य आहेत. मित्रांबरोबर किंवा नातेवाईबरोबर छान वेळ जाईल.
(by Astroshodh- Astrologer in Pune, contact: Atul H. Kulkarni 9422088979)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी मंगळ, केतू,  धनस्थानी नेपचून, चतुर्थस्थानी हर्षल, सप्तमस्थानी  रवि, बुध, राहू,  भाग्यस्थानी शुक्र,  दशमस्थानी गुरु आणि व्ययस्थानी शनी, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला रवि राशांतर करुन सिंह राशीत प्रवेश करेल. १८ तारखेला बु्धाचा शुक्राशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला अती दगदग टाळावी. जीवनशक्तीची कमतरता किंवा थकवा जाणवत राहू शकेल. वाहने जपून चालवावीत. गणपतीची उपासना करणे चांगले. सप्ताह मध्यात काही भाग्यवर्धक घटना शक्य. काहींना अचानक धनलाभ सुखावतील. प्रवासाचे योगही येऊ शकतात. वक्ते, पुरोहीत, शिक्षक यांना हा काळ अनुकूल आहे. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळू शकेल. सप्ताह अखेरीस नोकरीत किंवा व्यवसायात चांगले काम झाल्याने खुश असाल. वरिष्ठांकडून एखादी मागणी मान्य करुन घेण्यास अनुकुल काळ आहे. थोडक्यात हा भाग्यवर्धक काळ आहे. त्याचा चांगला वापर करुन घ्यावा.
(by Astroshodh- Astrologer in Pune, contact: Atul H. Kulkarni 9422088979)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी नेपचून, तृतिय स्थानात हर्षल, षष्ठस्थानी रवि, बुध,  राहू, अष्टमस्थानी शुक्र,  भाग्यस्थानी गुरु, लाभस्थानी शनी, प्लुटो आणि व्ययस्थानी मंगळ,  केतू अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला रवि राशांतर करुन सिंह राशीत प्रवेश करेल. १८ तारखेला बु्धाचा शुक्राशी लाभयोग होईल.
सप्ताहाची सुरुवात चांगली होईल. आपल्या जिवाभावाच्या लोकांबरोबर वेळ मजेत जाईल.
आपल्या तब्बेतीची काळजी घेणं गरजेचे आहे. सप्ताह मध्यात मात्र अचानक आलेल्या
अडचणींनी त्रस्त व्हाल. मन शांत ठेवावे. गुरु उपासना करावी. इंशूरन्सचे काम करणार्‍यांना
मात्र हा कालावधी चांगला आहे. सप्ताहाच्या शेवटी पुन्हा ग्रहस्थिती अनुकुल होत आहे.
भाग्यवर्धक घटना संभवतात. धार्मिक स्थळांना भेट द्याल. मन प्रसन्न करणार्‍या घटना
घडण्याची शक्यता आहे.
(by Astroshodh- Astrologer in Pune, contact: Atul H. Kulkarni 9422088979)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती-  सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात हर्षल, पंचमस्थानी रवि,  बुध,
राहू,  सप्तमस्थानी शुक्र,  अष्टम स्थानी गुरु,  दशमस्थानी शनी, प्लुटो, लाभ स्थानी मंगळ, केतू
आणि व्ययस्थानी नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला रवि राशांतर करुन सिंह
राशीत प्रवेश करेल. १८ तारखेला बु्धाचा शुक्राशी लाभयोग होईल.
सप्ताहाची सुरुवात नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांना अनुकुल आहे.  वैद्यकिय व्यवसाय
करणार्‍यांनाही हा काळ चांगला आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून फ़ायदा मिळू शकतो.
तब्बेतीची मात्र काळजी घ्यावी. सप्ताह मध्य भाग्यवर्धक घटनांचा असेल. जोडीदाराबरोबर वेळ छान जाईल. धार्मिक गोष्टींसाठीही अनुकूल काळ आहे. सप्ताह अखेर कटकटीचा असू शकेल. रागावर नियंत्रण ठेवावे. विमा, मानसोपचारतज्ञ, ज्योतिष या क्षेत्रात काम करणार्‍यांसाठी मात्र का काळ अनुकुल कालावधी आहे.
(by Astroshodh- Astrologer in Pune, contact: Atul H. Kulkarni 9422088979)

#weekly-horoscope
#astrologerinpune
#astroshodh
#astrology
#rashibhavishya