अ‍ॅस्ट्रोशोध आठवड्याचे राशिभविष्य (५ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट)   by- Atul H. Kulkarni Astrologers in Pune. Contact no- 9422088979)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, चतुर्थात रवि, बुध, राहू, षष्टात शुक्र, सप्तमात गुरु, भाग्यात शनी व प्लुटो, दशमात मंगळ, केतू व लाभात नेपचून अशी
ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला रविचा गुरुशी केंद्रयोग होईल. ७ तारखेला शुक्राचा मंगळाशी त्रिकोण होईल. ९ तारखेला रविची बुधाशी युती होईल. १० तारखेला शुक्राचा शनीशी आणि ११ तारखेला बुधाचा गुरुशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला चांगलं काम घडल्यामुळे खुश असाल मात्र अती दगदग टाळावी. आपल्या बोलण्यामुळे कोणी दुखावले जाणार नाहीत याची काळाजी घ्यावी. नवीन नोकरीसाठी किंवा नोकरी बदलाचा प्रयत्न करणार्‍यांना अनु्कुल काळ आहे. कफ़विकार असणार्‍यांनी काळजी घ्यावी. सप्ताह मध्यात कुटुंबीयांबरोबर छान सुर जमलेला असेल. ब्लॉगर्स, वक्ते यांना हा काळ चांगला आहे. भावंडांच्या भेटीचे योग येतील. सप्ताहाच्या अखेरीस पटकन कामे उरकुन आराम करण्याकडे कल असेल. प्रॉपर्टीची कामे सध्या नकोत.
(Astroshodh- Astrologers in Pune, contact: Atul H. Kulkarni 94220889797)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियेत रवि, बुध, राहू, पंचमात शुक्र, षष्ठात गुरु, अष्टमात शनी व प्लुटो, भाग्यात मंगळ व केतू, दशमात नेपचून आणि व्ययस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला रविचा गुरुशी केंद्रयोग होईल. ७ तारखेला शुक्राचा मंगळाशी त्रिकोण होईल. ९ तारखेला रविची बुधाशी युती होईल. १० तारखेला शुक्राचा शनीशी आणि ११ तारखेला बुधाचा गुरुशी केंद्रयोग होईल.
रविवारचा दिवस धार्मिक गोष्टींसाठी व प्रवासासाठी चांगला आहे. त्यानंतरचे दोन दिवस खुप
छान असतील. काहींना एखादी भेटवस्तु/ बक्षिस/ अचानक धनलाभ संभवतात. कलाकारांना,
विद्यार्थ्यांना, प्रेमिकांना हा काळ खुपच चांगला आहे. संततीबाबत काही चांगल्या घटना घडू
शकतील. सप्ताहाच्या मध्यात भावंडांच्या गाठीभेटीचे योग येतील. काहींना धनलाभाचे योग
येतील. घरातील वातावरण छान असेल. सप्ताहाचा शेवट परदेशगमन व पारमार्थिक उन्नतीसाठी चांगला आहे.
(Astroshodh- Astrologers in Pune, contact: Atul H. Kulkarni 94220889797)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी रवि , बुध, राहू, चतुर्थात शुक्र,
पंचमात गुरु, सप्तमात शनी, प्लुटो, अष्टमात मंगळ, केतू, भाग्यात नेपचून आणि लाभस्थानी
हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला रविचा गुरुशी केंद्रयोग होईल. ७ तारखेला शुक्राचा
मंगळाशी त्रिकोण होईल. ९ तारखेला रविची बुधाशी युती होईल. १० तारखेला शुक्राचा शनीशी
आणि ११ तारखेला बुधाचा गुरुशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला मित्रांच्या/ आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. छान खरेदीचे योग आहेत.
मस्त भटकंती व शॉपिंगला जायला हरकत नाही. घरासाठीही काही खरेदी कराल. जप- जाप्य,
ध्यानधारणा, अध्यात्म अशा मार्गातील लोकांसाठीही हा काळ चांगला आहे. सप्ताह मध्यानंतर
सप्ताह अखेरपर्यंत एखादा धनलाभ होऊ शकेल. घरात पार्टीचा मुड असेल. प्रॉपर्टीची कामे
प्रलंबित असतील तर आता त्यामधे प्रगती होतांना दिसेल.
(Astroshodh- Astrologers in Pune, contact: Atul H. Kulkarni 94220889797)

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी रवि, बुध, राहू, तृतियेत शुक्र, चतुर्थात गुरु, षष्ठात शनी व प्लुटो, सप्तमात मंगळ, केतू, अष्टमात नेपचून आणि दशमात हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला रविचा गुरुशी केंद्रयोग होईल. ७ तारखेला शुक्राचा मंगळाशी त्रिकोण होईल. ९ तारखेला रविची बुधाशी युती होईल. १० तारखेला शुक्राचा शनीशी आणि ११ तारखेला बुधाचा गुरुशी केंद्रयोग होईल.
सप्ताह एकूणच छान जाणार आहे. वरीष्ठ खुश असतील. एखादी मागणी असेल तर आता
वरीष्ठांकडे शब्द टाकायला हरकत नाही. व्यवसायातील लोकांना केलेल्या कामाचा मोबदला
व्यवस्थित मिळाल्याने मन प्रसन्न राहील. छान प्रवासाचे योग संभवतात. सप्ताहाच्या शेवटी
मनासारखी खरेदी होईल. काही अनपेक्षित खर्चही करावे लागू शकतात. एखाद्या गोष्टीची उगीचच काळजी किंवा हूरहूर लागेल.
(Astroshodh- Astrologers in Pune, contact: Atul H. Kulkarni 94220889797)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी शुक्र, तृतियेत गुरु, पंचमात शनी, प्लुटो, षष्ठात मंगळ, केतू, सप्तमात नेपचून, भाग्यात हर्षल आणि व्ययस्थानी रवि, बुध, राहू अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला रविचा गुरुशी केंद्रयोग होईल. ७ तारखेला शुक्राचा मंगळाशी त्रिकोण होईल. ९ तारखेला रविची बुधाशी युती होईल. १० तारखेला शुक्राचा शनीशी आणि ११ तारखेला बुधाचा गुरुशी केंद्रयोग होईल.
रविवारचा दिवस अ‍ॅसिडीटी/ पोटदुखीचा असु शकतो. वाद टाळावेत. त्यानंतरचे दोन दिवस चांगले आहेत. छान काम होईल. धनलाभाचे योग संभवतात. वरीष्ठांची बहाल मर्जी असेल. न मागता काही गोष्टी मिळू शकतील. व्यावसायिकांना अनुकुल काळ आहे. सप्ताहाचा मध्यात मात्र पैशांच्या कामात अडथळे संभवतात. परदेशगमनासाठी हा काळ चांगला आहे. सप्ताहाच्या शेवटी काही खर्च करावे लागतील. तळपाय/ घोटा याची काळजी घ्यावी.
(Astroshodh- Astrologers in Pune, contact: Atul H. Kulkarni 94220889797)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शुक्र धनस्थानी गुरु, चतुर्थात शनी, प्लुटो, पंचमात मंगळ, केतू, षष्ठात नेपचून, अष्टमात हर्षल आणि लाभस्थानी रवि, बुध, राहू, अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला रविचा गुरुशी केंद्रयोग होईल. ७ तारखेला शुक्राचा मंगळाशी त्रिकोण होईल. ९ तारखेला रविची बुधाशी युती होईल. १० तारखेला शुक्राचा शनीशी आणि ११ तारखेला बुधाचा गुरुशी केंद्रयोग होईल.
रविवारचा दिवशी काही मनाविरुध्द घटना घडू शकतील. वाहने हळू चालवावीत. नंतरचे दोन
दिवस भाग्यवर्धक घटनांचे ठरु शकतात. उपासना करण्यार्‍यांना हा काळ चांगला आहे. प्रवासयोग संभवतात. लांबच्या प्रवासाच्या योजना मनात घोळू लागतील. सप्ताहाचा मध्यात मनासारखे काम झाल्याने मन प्रसन्न असेल. काही लाभही संभवतात. सप्ताहाचा शेवटी नातेवाईक/ मित्रांच्या भेटीये योग आहेत. पैशांच्या कामात दिरंगाई होऊ शकते.
(Astroshodh- Astrologers in Pune, contact: Atul H. Kulkarni 94220889797)

तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी गुरु, तृतियेत शनी, प्लुटो, चतुर्थात
मंगळ, केतू, पंचमात नेपचून, सप्तमात हर्षल, दशमस्थानी रवि, बुध, राहू आणि व्ययस्थानी शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला रविचा गुरुशी केंद्रयोग होईल. ७ तारखेला शुक्राचा मंगळाशी त्रिकोण होईल. ९ तारखेला रविची बुधाशी युती होईल. १० तारखेला शुक्राचा शनीशी आणि ११ तारखेला बुधाचा गुरुशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना
चांगला कालावधी. सप्ताह मध्य विमा प्रतिनिधी, ज्योतिषी, मानसोचारतज्ञ यांना चांगला. वाहने मात्र हळू चालवावीत. वाद टाळावेत. सप्ताह मध्यानंतर धार्मिक गोष्टींसाठी चांगला काळ आहे. काहींना प्रवासाचे योग येतील. जोडीदाराबद्दल चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.
सप्ताहाच्या शेवटी आपल्या कार्यक्षेत्रात चांगले काम झाल्याने मन प्रसन्न असेल.
(Astroshodh- Astrologers in Pune, contact: Atul H. Kulkarni 94220889797)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी शनी, प्लुटो, तृतियेत मंगळ, केतू,
चतुर्थात नेपचून आणि षष्ठस्थानात हर्षल, भाग्यस्थानी रवि, बुध, राहू, लाभस्थानी शुक्र व
व्ययस्थानी गुरु अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला रविचा गुरुशी केंद्रयोग होईल. ७ तारखेला
शुक्राचा मंगळाशी त्रिकोण होईल. ९ तारखेला रविची बुधाशी युती होईल. १० तारखेला शुक्राचा
शनीशी आणि ११ तारखेला बुधाचा गुरुशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाची सुरूवात नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांसाठी चांगली. तब्बेत मात्र सांभाळावी. पती/
पत्नीला भाग्योदयाच्या संधी अपेक्षित आहेत. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांसाठी कालावधी
चांगला आहे. सप्ताहाच्या मध्यात जोखीम किंवा धोका असलेली कामे करू नये. कुठलेही आजार अंगावर काढू नका. वाहने जपून चालवा. सप्ताहाच्या शेवटी काही भाग्यवर्धक घटना घडू
शकतील. धार्मिक गोष्टींसाठीही काळ अनुकुल आहे.
(Astroshodh- Astrologers in Pune, contact: Atul H. Kulkarni 94220889797)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शनी, प्लुटो, धनस्थानी मंगळ, केतू, तृतिय स्थानात नेपचून, पंचमस्थानात हर्षल, अष्टमस्थानी रवि, बुध, राहू, दशमस्थानी शुक्र आणि लाभस्थानी गुरु अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला रविचा गुरुशी केंद्रयोग होईल. ७ तारखेला शुक्राचा मंगळाशी त्रिकोण होईल. ९ तारखेला रविची बुधाशी युती होईल. १० तारखेला शुक्राचा शनीशी आणि ११ तारखेला बुधाचा गुरुशी केंद्रयोग होईल.
रविवारी मुलांबरोबर वेळ मजेत जाईल. कलाकारांना अतिशय विशेषत: गायकांना छान कालावधी आहे. त्यानंतरचे दोन दिवस नोकरदार मंडळींना अनुकुल आहेत. नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांना अनुकुल कालावधी आहे. फ़िजिकल फ़िटनेस/ न्युट्रीशियन्स/ वैद्यकीय व्यवसाय करणारे यांना हा काळ फ़ायदेशीर आहे. तब्बेत सप्ताह मध्यात जोडीदाराच्या तब्बेतीला जपावे. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना प्रतिकुल काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी जोखीम किंवा धोका असलेली कामे करू नका.
(Astroshodh- Astrologers in Pune, contact: Atul H. Kulkarni 94220889797)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी मंगळ, केतू, धनस्थानी नेपचून,
चतुर्थस्थानी हर्षल, सप्तमस्थानी रवि, बुध, राहू, भाग्यस्थानी शुक्र, दशमस्थानी गुरु आणि
व्ययस्थानी शनी, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला रविचा गुरुशी केंद्रयोग होईल. ७
तारखेला शुक्राचा मंगळाशी त्रिकोण होईल. ९ तारखेला रविची बुधाशी युती होईल. १० तारखेला
शुक्राचा शनीशी आणि ११ तारखेला बुधाचा गुरुशी केंद्रयोग होईल.
रविवारच्या दिवशी मजा करण्याकडे कल असेल. प्रॉपर्टी खरेदी/ विक्री साठी अनुकुल काळ.
नंतरचे दोन दिवस अतिशय छान आहेत. भाग्यकारक घटना शक्य. विद्यार्थ्यांना व कलाकारांना
अनुकूल काळ आहे. कमी श्रमात जास्त यश मिळेल. अचानक एखादं बक्षिस किंवा धनलाभ
सुखावून टाकेल. प्रेमिकांसाठी चांगला काळ आहे. सप्ताहाच्या मध्यात तब्बेतीच्या किरकोळ तक्रारी जाणवत रहातील. विशेषत: सायनस किंवा सर्दीचा त्रास जाणवू शकतो. सप्ताहाच्या शेवटी संमिश्र ग्रहमान आहे.
(Astroshodh- Astrologers in Pune, contact: Atul H. Kulkarni 94220889797)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी नेपचून, तृतिय स्थानात हर्षल,
षष्ठस्थानी रवि, बुध, राहू, अष्टमस्थानी शुक्र, भाग्यस्थानी गुरु, लाभस्थानी शनी, प्लुटो आणि
व्ययस्थानी मंगळ, केतू अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला रविचा गुरुशी केंद्रयोग होईल. ७
तारखेला शुक्राचा मंगळाशी त्रिकोण होईल. ९ तारखेला रविची बुधाशी युती होईल. १० तारखेला
शुक्राचा शनीशी आणि ११ तारखेला बुधाचा गुरुशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाच्या सुरूवातीला छोट्या प्रवासाचे योग संभवतात. घरातील व्यकींबरोबर वाद होण्याची
शक्यता आहे. प्रॉपर्टीच्या कामात व्यत्यय येऊ शकतात. सप्ताहाच्या मध्यात मुलांचे काही प्रश्न
असतील तर ते सोडवा. विद्यार्थ्यांना कष्टाच्या मानाने फ़ळ कमी असे ग्रहमान आहे. शेअर्स/
कमोडिटी अशा जोखिम असलेल्या ठिकाणी पैसे सध्या तरी गुंतवू नका. सप्ताहाच्या शेवटी
तब्बेतीची काळजी घ्या. सप्ताहाच्या शेवटी वकिल व जीम ट्रेनर्स यांना अनुकूल काळ आहे.
(Astroshodh- Astrologers in Pune, contact: Atul H. Kulkarni 94220889797)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात हर्षल, पंचमस्थानी रवि, बुध, राहू,
सप्तमस्थानी शुक्र, अष्टम स्थानी गुरु, दशमस्थानी शनी, प्लुटो, लाभ स्थानी मंगळ, केतू आणि
व्ययस्थानी नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला रविचा गुरुशी केंद्रयोग होईल. ७ तारखेला शुक्राचा मंगळाशी त्रिकोण होईल. ९ तारखेला रविची बुधाशी युती होईल. १० तारखेला शुक्राचा शनीशी आणि ११ तारखेला बुधाचा गुरुशी केंद्रयोग होईल.
सप्ताहाची सुरूवात प्रिय घटनांनी होईल. काहींना धनलाभ होऊ शकतील. सप्ताह मध्य प्रवासाचे
योग आणू शकतो. प्रिय व्यक्तींच्या भेटीचे योग येतील. लेखक, वक्ते यांच्यासाठी चांगला
कालावधी. सप्ताह मध्यानंतर मनासारखी कामे होतील. मन प्रसन्न असेल. प्रॉपर्टीच्या कामात
यश संभवते. विद्यार्थांना चांगला कालावधी आहे. आपल्या छंदांना वेळ द्यायला हरकत नाही.
प्रेमिकांना विवाह ठरविण्यास हा काळ चांगला आहे. भागीदारीत व्यवसायासही हा काळ अनुकुल
आहे.
(Astroshodh- Astrologers in Pune, contact: Atul H. Kulkarni 94220889797)

#weekly-horoscope
#horoscope
#astroshodh
#astrology
#rashi
#bhavishya