अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (४ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर २०२६) 

Astroshodh, bestastrologerinpune, famousastrologerinpune, topastrologerinpune, bestastrologerinindia, famousastrologerinindia, topastrologerinindia

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी हर्षल, चतुर्थस्थानात मंगळ, गुरु, पंचमस्थानात केतू, षष्ठस्थानी सूर्य, सप्तमस्थानात बुध, शुक्र(व), दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात राहू आणि व्ययस्थानात शनि(व), नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला सूर्याचा शनिशी प्रतियोग होईल. ५ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व मंगळाशी युती होईल. ६ तारखेला चंद्राची गुरुशी तर बुधाची शुक्राशी युती होईल. ७ तारखेला चंद्राचा बुध व शुक्राशी लाभयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताह छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला आवडत्या व्यक्तींच्या भेटीचे योग येऊ शकतील. प्रेमी जिवांना लग्न ठरविण्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे. खेळाडू, साहित्यिक व कलाकारांसाठीही उत्तम काळ आहे. मनासारखे काम झाल्याने खूष असाल. प्रवासाचे योग संभवतात. सप्ताहाच्या मध्यात घरासाठी वेळ काढावा लागेल. घरातील वातावरण छान असेल. तुमच्या कार्यक्षेत्राशी निगडीत नविन गोष्टी शिकायच्या असतील तर त्यासाठी हा काळ अनुकूल आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर शारीरिक सौख्यासाठी योग्य आहार व नियमित व्यायाम करायला हवा याची जाणीव होईल. सप्ताहाच्या अखेरीस नोकरीच्या शोधात असणार्‍यांसाठी काही नवीन संधी दृष्टोत्पत्तीस येऊ शकतील. वकील, आहारतज्ञ, जीम ट्रेनर यांना ग्रहमान अनुकूल आहे.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी हर्षल, तृतीयस्थानी मंगळ, गुरु, चतुर्थस्थानात केतू, पंचमस्थानात सूर्य, षष्ठस्थानी बुध, शुक्र(व), भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात राहू आणि लाभस्थानात शनि(व), नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला सूर्याचा शनिशी प्रतियोग होईल. ५ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व मंगळाशी युती होईल. ६ तारखेला चंद्राची गुरुशी तर बुधाची शुक्राशी युती होईल. ७ तारखेला चंद्राचा बुध व शुक्राशी लाभयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- उत्तम ग्रहमान आहे. आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. तुमच्या संभाषणकौशल्यामुळे काही कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यात आप्तेष्टांच्या भेटी होतील. काहींना सूचक स्वप्ने पडतील. प्रवासाचे योग संभवतात. लेखक, ब्लॉगर्स, कवी यांना अनुकूल काळ आहे. इस्टेट एजंट, बिल्डर्स यांना व्यावसायिक उत्कर्षाचा कालावधी आहे. सप्ताहाच्या अखेरीस कलाकारांना व विद्यार्थ्यांना अनुकूल काळ आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर त्यात चांगली प्रगती दिसेल.
उपासना: या काळात रोज गणपती स्तोत्र म्हणणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी मंगळ, गुरु, तृतीयस्थानी केतू, चतुर्थस्थानात सूर्य, पंचमस्थानात बुध, शुक्र(व), अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात राहू, दशमस्थानात शनि(व), नेपचून आणि व्ययस्थानात हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला सूर्याचा शनिशी प्रतियोग होईल. ५ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व मंगळाशी युती होईल. ६ तारखेला चंद्राची गुरुशी तर बुधाची शुक्राशी युती होईल. ७ तारखेला चंद्राचा बुध व शुक्राशी लाभयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताह चांगला आहे. घरात छान वातावरण असेल. कुटुंबीयांमध्ये छान वातावरण असेल. मन प्रसन्न असेल. विवाहेच्छूक लोकांना लग्न ठरवण्यासाठी अनुकूल काळ आहे. कलाकारांना, लेखकांना विशेषत: गायकांना अनुकूल काळ आहे. घराची दुरुस्ती, सजावट करायचं मनात घोळत असेल किंवा नवीन घर घ्यायचं असेल तर त्यासाठी आता अनुकूलता आहे. धनलाभाचे अचानक आलेले योग काहींना सुखावून टाकतील. नवीन परिचय होतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. संततीसौख्य लाभेल. विद्यार्थ्यांना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल.
उपासना: ’ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: ’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, गुरु, धनस्थानी केतू, तृतीयस्थानी सूर्य, चतुर्थस्थानात बुध, शुक्र(व), सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात राहू, भाग्यस्थानात शनि(व), नेपचून, लाभस्थानात हर्षल आणि अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला सूर्याचा शनिशी प्रतियोग होईल. ५ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व मंगळाशी युती होईल. ६ तारखेला चंद्राची गुरुशी तर बुधाची शुक्राशी युती होईल. ७ तारखेला चंद्राचा बुध व शुक्राशी लाभयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात छान खरेदीने होऊ शकेल. आपल्या आवडत्या व्यक्तींबरोबर मस्त शॉपिंगला जायला हरकत नाही. एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्य व त्यानंतरचा पूर्ण काळ छान आहे. आत्मविश्वास वाढेल. काहींच्या बाबतीत भाग्यवर्धक घटना घडतील, धनलाभ होतील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुयश मिळेल. कलाकौशल्याला वाव मिळेल. प्रवास योग शक्य. लेखक, कलाकार, ब्लॉगर्स यांना अत्यंत चांगला कालावधी आहे. भावंडांच्या भेटीचे योग संभवतात. प्रवास फ़ायदेशीर व आनंददायक ठरतील.
उपासना: रामरक्षेचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात केतू, धनस्थानी सूर्य, तृतीयस्थानी बुध, शुक्र(व), षष्ठस्थानी प्लूटो, सप्तमस्थानात राहू, अष्टमस्थानात शनि(व), नेपचून, दशमस्थानात हर्षल, आणि व्ययस्थानात मंगळ, गुरु अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला सूर्याचा शनिशी प्रतियोग होईल. ५ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व मंगळाशी युती होईल. ६ तारखेला चंद्राची गुरुशी तर बुधाची शुक्राशी युती होईल. ७ तारखेला चंद्राचा बुध व शुक्राशी लाभयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला मित्रांच्या व प्रियजनांच्या भेटीचे योग येतील. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. अपेक्षित लाभ होतील. धनलाभ होण्याचे योग आहेत. लोकांचे सहकार्य मिळेल. सप्ताह मध्यात छान खरेदीचा तसेच काही अनपेक्षित खर्चाचाही योग आहेत. या काळात रागावर नियंत्रण ठेवा. मनाचा गेलेला तोल तुमच्यासाठी त्रासदायक ठरु शकेल. सप्ताहाच्या अखेरीस लाभदायक ग्रहमान आहे. एखादा धनलाभ होण्याची शक्यता या काळात आहे. कौटुंबीक सौख्य मिळेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. मन प्रसन्न असेल.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात सूर्य, धनस्थानी बुध, शुक्र(व), पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी राहू, सप्तमस्थानात शनि(व), नेपचून, भाग्यस्थानात हर्षल, लाभस्थानात मंगळ, गुरु आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला सूर्याचा शनिशी प्रतियोग होईल. ५ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व मंगळाशी युती होईल. ६ तारखेला चंद्राची गुरुशी तर बुधाची शुक्राशी युती होईल. ७ तारखेला चंद्राचा बुध व शुक्राशी लाभयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये छान काम होईल. केलेल्या कामाचं कौतुक होण्याची शक्यता आहे. आर्थिक सुयश लाभेल. तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल. कामे मार्गी लागतील. घरात छान वातावरण असेल. व्यावसयिकांना लाभदायक ग्रहमान आहे. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. सप्ताह मध्यात एखाद्या उत्सव किंवा समारंभात सहभागी व्हाल. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचे योग आहेत. धनलाभ पुन्हा होतील. आवडत्या व्यक्तीच्या भेटीचा योग आहे. एखादी महत्वाकांक्षा या दरम्यान पूर्ण होऊ शकेल. सप्ताह मध्यानंतर अचानक काही खर्च करावे लागतील. सप्ताह अखेरीस जुनी येणी वसूल होतील. पूर्वीच्या एखाद्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. अध्यात्मिक क्षेत्रातील लोकांना चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे.
उपासना: या काळात रोज गणपती स्तोत्र म्हणणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात बुध शुक्र(व), चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात राहू, षष्ठस्थानी शनि(व), नेपचून, अष्टमस्थानात हर्षल, दशमस्थानात मंगळ, गुरु आणि लाभस्थानात केतू आणि व्ययस्थानात सूर्य अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला सूर्याचा शनिशी प्रतियोग होईल. ५ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व मंगळाशी युती होईल. ६ तारखेला चंद्राची गुरुशी तर बुधाची शुक्राशी युती होईल. ७ तारखेला चंद्राचा बुध व शुक्राशी लाभयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- चांगले ग्रहमान आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला काहींना प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. धनलाभाचे योग आहेत. काहींच्या बाबतीत भाग्यवर्धक घटना घडतील. सप्ताह मध्यात आपल्या कार्यक्षेत्रामध्ये छान काम होईल. वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. त्यांच्याकडून एखादी मागणी मान्य करुन घ्यायची असेल तर वरीष्ठांकडे आता शब्द टाकायला हरकत नाही. व्यावसायिकांनाही चांगला काळ आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर मित्रांच्या किंवा नातेवाईच्या भेटीची शक्यता आहे. वेळ मजेत जाईल. सप्ताहाच्या शेवटी बेकायदा गोष्टी करु नका.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात राहू, पंचमस्थानात शनि(व), नेपचून, सप्तमस्थानात हर्षल, भाग्यस्थानात मंगळ, गुरु, दशमस्थानात केतू लाभस्थानात सूर्य आणि व्ययस्थानात बुध, शुक्र(व), अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला सूर्याचा शनिशी प्रतियोग होईल. ५ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व मंगळाशी युती होईल. ६ तारखेला चंद्राची गुरुशी तर बुधाची शुक्राशी युती होईल. ७ तारखेला चंद्राचा बुध व शुक्राशी लाभयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात मनाविरुध्द घटनांची ठरु शकेल. मात्र हा कालावधी विमा क्षेत्रात काम करणारे, संशोधक, मनसोपचारतज्ञ तसेच ज्योतिषी यांना अनुकूल आहे. सप्ताहाचा मध्य उपासना करण्यास चांगला आहे. अध्यात्मिक उन्नतीसाठी गुरु केलेल्यांना चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे. प्रवासयोग शक्य. सप्ताहाच्या मध्यानंतर व्यवसायात नवीन तंत्र अमलात आणाल. शासकीय कामे मार्गी लागतील. सप्ताहाच्या शेवटी काही लाभ होऊ शकतात. मित्रमंडळींच्या भेटी शक्य आहेत.
उपासना: या काळात सूर्योपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी राहू, चतुर्थस्थानात शनि(व), नेपचून, षष्ठस्थानी हर्षल, अष्टमस्थानात मंगळ, गुरु, नवमस्थानात केतू, दशमस्थानात सूर्य आणि लाभस्थानात बुध, शुक्र(व), अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला सूर्याचा शनिशी प्रतियोग होईल. ५ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व मंगळाशी युती होईल. ६ तारखेला चंद्राची गुरुशी तर बुधाची शुक्राशी युती होईल. ७ तारखेला चंद्राचा बुध व शुक्राशी लाभयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- रविवारी घरच्यांबरोबर वेळ छान व्यतीत करू शकाल. व्यावसयिकांना फायदा देणार्‍या नवीन संधी चालून येतील. सोमवार व मंगळवार हे दिवस संमिश्र आहेत. कामाचा ताण व दगदग जाणवेल. मात्र गूढ विषयांचा अभ्यास किंवा पारमार्थिक उन्नती ज्यांना करायची असेल त्यांना हा काळ अनुकूलच ठरणार आहे. सप्ताह मध्यात व नंतर काही भाग्यवर्धक घटना घडतील. प्रवासयोग या काळात शक्य. आर्थिक लाभही होऊ शकेल. सासरकडच्या नातेवाईकांचे सहकार्य मिळेल. प्रवास लाभदायक ठरतील. सप्ताहाचा शेवट उत्तम असेल. जिद्द व चिकाटी वाढेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. कामे मार्गी लागतील. वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. धनलाभ होण्याचेही योग आहेत.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात राहू, तृतीयस्थानी शनि(व), नेपचून, पंचमस्थानात हर्षल, सप्तमस्थानात मंगळ, गुरु, अष्टमस्थानात केतू नवमस्थानात सूर्य आणि दशमस्थानात बुध, शुक्र(व), अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला सूर्याचा शनिशी प्रतियोग होईल. ५ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व मंगळाशी युती होईल. ६ तारखेला चंद्राची गुरुशी तर बुधाची शुक्राशी युती होईल. ७ तारखेला चंद्राचा बुध व शुक्राशी लाभयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला तब्येतीची काळजी घेणे उचित ठरेल. वैद्यकीय क्षेत्रात व कायदेविषयक कामे करणार्‍यांना फ़ायदेशीर ग्रहमान आहे. नोकरीच्या शोधात असणार्‍यांना काही संधी चालून येतील. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वेळ मजेत घालवायला मिळेल. जोडीदाराबरोबर मस्त शॉपिंगला जायला हरकत नाही. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांनाही अनुकूल काळ आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर जोखीम किंवा धोका असलेली कामे करू नका. सप्ताह अखेर धार्मिक कार्यासाठी चांगला कालावधी आहे. लाभदायक ग्रहमान आहे.
उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, धनस्थानात शनि(व), नेपचून, चतुर्थस्थानात हर्षल, षष्ठस्थानी मंगळ, गुरु, सप्तमस्थानी केतू, अष्टमस्थानात सूर्य, नवमस्थानात बुध, शुक्र(व), आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला सूर्याचा शनिशी प्रतियोग होईल. ५ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व मंगळाशी युती होईल. ६ तारखेला चंद्राची गुरुशी तर बुधाची शुक्राशी युती होईल. ७ तारखेला चंद्राचा बुध व शुक्राशी लाभयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला मुलांकडून सुवार्ता कळतील. विद्यार्थ्यांना चांगले ग्रहमान आहे. एखादं बक्षिस किंवा शाबासकीची थाप मिळेल. कलाकारांना व खेळाडूंना अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्य तब्येतीच्या तक्रारींचा ठरु शकेल. सप्ताहाच्या मध्यानंतर जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना चांगला कालावधी आहे. काहींना अचानक धनलाभाचे योग संभवतात. सप्ताहाच्या शेवटी वाहने जपून चालवावीत. प्रवासात अडथळे येतील. गुरुजनांशी वाद टाळावेत.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि(व), नेपचून, तृतीयस्थानी हर्षल, पंचमस्थानात मंगळ, गुरु, षष्ठस्थानात केतू, सप्तमस्थानी सूर्य, अष्टमस्थानात बुध, शुक्र(व), लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. ४ तारखेला सूर्याचा शनिशी प्रतियोग होईल. ५ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व मंगळाशी युती होईल. ६ तारखेला चंद्राची गुरुशी तर बुधाची शुक्राशी युती होईल. ७ तारखेला चंद्राचा बुध व शुक्राशी लाभयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १० तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रॉपर्टीच्या कामासाठी चांगला काळ आहे. प्रियजनांच्या भेटीचे योग येतील. एखाद्या छानशा समारंभ, पार्टी किंवा धार्मिक उत्सवामधे सहभागी व्हाल. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना, खेळाडूंना व कलाकारांना अनुकूल आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांना अनुकूल कालावधी आहे. तब्येतीची मात्र काळजी घ्यावी. पूर्वी केलेल्या एखद्या गुंतवणूकीतून फ़ायदा संभवतो. सप्ताहाच्या मध्यानंतर आरोग्याच्या काही समस्या जाणवतील. काळजी घ्यावी. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर वाद टाळावेत.
उपासना: श्रीस्वामी समर्थांचा तारक मंत्र या काळात रोज म्हणावा किंवा ऐकावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)