
अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१३ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०२६)
Astroshodh, bestastrologerinpune, famousastrologerinpune, topastrologerinpune, bestastrologerinindia, famousastrologerinindia, topastrologerinindia

या सप्ताहात गणपती बाप्पांचे आगमन होत आहे. सर्वांच्या आयुष्यात गणपती बाप्पा सुख, समृध्दी आणो, सगळ्यांना चांगल्या आरोग्याचा लाभ होवो, सगळ्यांचे मंगल होवो हीच मनोकामना बाप्पाच्या चरणी 🙏
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी हर्षल, तृतीयस्थानी मंगळ, चतुर्थस्थानात गुरु, पंचमस्थानात सूर्य, केतू, षष्ठस्थानी बुध, सप्तमस्थानात शुक्र, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात राहू आणि व्ययस्थानात शनि(व), नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग व मंगळाशी केंद्रयोग होईल. १४ तारखेला मंगळाचा सूर्याशी लाभयोग व चंद्राची शुक्राशी युती होईल. १६ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग होईल. १७ तारखेला सूर्य कन्या राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण तर बुधाचा शनिशी प्रतियोग होईल आणि मंगळ कर्क राशित प्रवेश करेल. १९ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- रविवार लेखक, कलाकार, साहित्यिक यांना चांगला असणार आहे. भावंडांशी संपर्क होईल. प्रवासयोगही शक्य. मात्र अती दगदग टाळा. आपले आरोग्य सांभाळा. त्यानंतरचे दोन दिवस जोडीदाराबरोबर मजेत जाणार आहेत. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. व्यावसयिकांना फायदा देणार्या नवीन संधी चालून येतील. सप्ताहाच्या मध्यानंतर गूढ गोष्टींबद्दल आकर्षण वाटत राहील. अचानक धनलाभाचे योग संभवतात. ज्यांना ध्यानधरणा, ज्योतिषशास्त्र, मानसशास्त्र, परामानसशास्त्र अशा विषयांचा अभ्यास करायचा असेल त्यांना ग्रहमान अनुकूल आहे. मात्र या काळात जोखीम असलेल्या व्यवहारांपासून लांब रहावे. सप्ताहाच्या शेवटी एखादी भाग्यवर्धक घटना शक्य आहे. चांगले लाभही होतील. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी हर्षल, धनस्थानी मंगळ, तृतीयस्थानी गुरु, चतुर्थस्थानात सूर्य, केतू, पंचमस्थानात बुध, षष्ठस्थानी शुक्र, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात राहू आणि लाभस्थानात शनि(व), नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला मंगळाचा सूर्याशी लाभयोग व चंद्राची शुक्राशी युती होईल. १६ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग होईल. १७ तारखेला सूर्य कन्या राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण तर बुधाचा शनिशी प्रतियोग होईल आणि मंगळ कर्क राशित प्रवेश करेल. १९ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- रविवारी धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. नवीन परिचय होतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. एखादा छंद किंवा आवडीचे पुस्तक वाचनात वेळ चांगला जाईल. नंतरचे दोन दिवस नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. वैद्यकीय क्षेत्रातील लोक, आहारतज्ञ यांच्यासाठी चांगला काळ आहे. आरोग्याच्या किरकोळ समस्या मात्र जाणवतील. हितशत्रूंवर या काळात नजर ठेवायला हवी. सप्ताहाच्या मध्यात उत्तम ग्रहमान आहे. घरात आनंदी वातावरण असेल. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल. लाभ होतील. आयात-निर्यातीचा व्यवसाय असणार्यांना विशेष अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या शेवटी विमा प्रतिनिधी, ज्योतिषी, सर्जन यांना फायदेशीर ग्रहमान आहे. अचानक धनलाभ या काळात शक्य. पारमार्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्यांना काही चांगले अनुभव या काळात येऊ शकतील.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, धनस्थानी गुरु, तृतीयस्थानी सूर्य, केतू, चतुर्थस्थानात बुध, पंचमस्थानात शुक्र, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात राहू, दशमस्थानात शनि(व), नेपचून आणि व्ययस्थानात हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला मंगळाचा सूर्याशी लाभयोग व चंद्राची शुक्राशी युती होईल. १६ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग होईल. १७ तारखेला सूर्य कन्या राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण तर बुधाचा शनिशी प्रतियोग होईल आणि मंगळ कर्क राशित प्रवेश करेल. १९ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला घरात छान वातावरण असेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. एखाद्या समारंभ किंवा पार्टीत सामिल होण्याचे योग आहेत. राहत्या जागेचे/ व्यवसायाच्या जागेचे प्रश्न मार्गी लावू शकाल. संततीची प्रगती मनाला आनंद देईल. विद्यार्थ्यांना व कलाकारांना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल. सप्ताह मध्यात नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. नोकरीच्या शोधात असाल तर काही संधी मित्र-मैत्रिणी किंवा ओळखीच्या माध्यमातून चालून येण्याची शक्यता आहे. मात्र या काळात अती दगदग टाळा. आपले आरोग्य सांभाळा. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील. काहींना धनलाभ शक्य आहे. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु, धनस्थानी सूर्य, केतू, तृतीयस्थानी बुध, चतुर्थस्थानात शुक्र, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात राहू, भाग्यस्थानात शनि(व), नेपचून, लाभस्थानात हर्षल आणि व्ययस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला मंगळाचा सूर्याशी लाभयोग व चंद्राची शुक्राशी युती होईल. १६ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग होईल. १७ तारखेला सूर्य कन्या राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण तर बुधाचा शनिशी प्रतियोग होईल आणि मंगळ कर्क राशित प्रवेश करेल. १९ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला लाभदायक ग्रहमान आहे. आत्मविश्वास वाढेल. भावंडांशी संपर्क होईल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुयश मिळेल. कलाकौशल्याला वाव मिळेल. प्रवासयोगही या काळात शक्य आहेत. सप्ताह मध्यात मनोबल उत्तम राहील. घरातील कामांसाठी वेळ काढावा लागेल. राहत्या जागेचे व व्यवसायाच्या जागेचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील. मन प्रसन्न असेल. सप्ताह मध्यानंतर संमिश्र ग्रहमान आहे. नवीन परिचय होतील. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. विद्यार्थ्यांनी मात्र अती आत्मविश्वास टाळावा. अभ्यासाकडे दुर्लक्ष नको. सप्ताहाच्या शेवटी शारीरिक सौख्यासाठी योग्य आहार व नियमित व्यायाम करायला हवा याची जाणीव होईल.
उपासना: या काळात रोज महालक्ष्मीअष्टक जरुर म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात सूर्य, केतू, धनस्थानी बुध, तृतीयस्थानी शुक्र, षष्ठस्थानी प्लूटो, सप्तमस्थानात राहू, अष्टमस्थानात शनि(व), नेपचून, दशमस्थानात हर्षल, लाभस्थानात मंगळ आणि व्ययस्थानात गुरु अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला मंगळाचा सूर्याशी लाभयोग व चंद्राची शुक्राशी युती होईल. १६ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग होईल. १७ तारखेला सूर्य कन्या राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण तर बुधाचा शनिशी प्रतियोग होईल आणि मंगळ कर्क राशित प्रवेश करेल. १९ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताह अतिशय छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला कुटुंबीयांबरोबर वेळ मजेत जाईल. धनलाभाचे योग आहेत. कलाकारांना विशेषत: गायक, वक्ते, रेडिओ जॉकी अशा संभाषणाशी संबंधीत ज्यांचे कार्यक्षेत्र आहे त्यांना संस्मरणीय यश यादरम्यान मिळू शकेल. आवडत्या लोकांच्या भेटी मनाला आनंद देतील. सप्ताह मध्यात मनोरंजनाकडे कल राहील. खरेदीसाठी काळ अनुकूल आहे. प्रवासात मात्र या काळात काळजी घ्या. तुमच्या चीजवस्तू सांभाळा. सप्ताहाच्या शेवटी भाग्याची साथ मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. संततीसौख्य लाभेल. मित्रमैत्रिणींचा/ नातेवाईकांचा सहवास लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. आर्थिक सुयश लाभेल. मन प्रसन्न असेल.
उपासना: ’विठ्ठल’ नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात बुध,, धनस्थानी शुक्र, पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी राहू, सप्तमस्थानात शनि(व), नेपचून, भाग्यस्थानात हर्षल, दशमस्थानात मंगळ, लाभस्थानात गुरु आणि व्ययस्थानात सूर्य, केतू अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला मंगळाचा सूर्याशी लाभयोग व चंद्राची शुक्राशी युती होईल. १६ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग होईल. १७ तारखेला सूर्य कन्या राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण तर बुधाचा शनिशी प्रतियोग होईल आणि मंगळ कर्क राशित प्रवेश करेल. १९ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- रविवारी आत्मविश्वास वाढविणार्या घटना घडतील. मनासारखं काम होईल. केलेल्या श्रमाचं सार्थक झाल्याने खुश असाल. वरीष्ठांची मर्जी राहील. मानसन्मान मिळेल. प्रसिध्दी मिळेल. त्यानंतरचे दोन दिवस उत्तम आहेत. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. धनलाभाची शक्यता आहे. घरातील वातावरण मस्त असणार आहे. कलाकारांना ग्रहमान उत्तम आहे. संभाषणकौशल्याच्या जोरावर कामे मार्गी लावू शकाल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. एखाद्या खाऊगल्लीला आपल्या जिवलगांबरोबर फेरफटका मारुन यायला हरकत नाही. सप्ताह मध्यात कौटुंबिक सौख्य लाभेल. प्रॉपटींची कामे मार्गी लागतील. मित्रमैत्रिणींचा/ नातेवाईकांचा सहवास लाभेल. सप्ताहाच्या शेवटी संततीबद्दल चांगली बातमी कळेल. प्रेमिकांना लग्न ठरविण्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे. तब्येतीकडॆ मात्र दुर्लक्ष करु नका.
उपासना: रोज महालक्ष्मीअष्टक या काळात जरुर म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात शुक्र, चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात राहू, षष्ठस्थानी शनि(व), नेपचून, अष्टमस्थानात हर्षल, भाग्यस्थानात मंगळ, दशमस्थानात गुरु आणि लाभस्थानात सूर्य, केतू आणि व्ययस्थानात बुध अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला मंगळाचा सूर्याशी लाभयोग व चंद्राची शुक्राशी युती होईल. १६ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग होईल. १७ तारखेला सूर्य कन्या राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण तर बुधाचा शनिशी प्रतियोग होईल आणि मंगळ कर्क राशित प्रवेश करेल. १९ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीस एकप्रकारची चिंता किंवा हुरहुर मनाला लागून राहिल. पारमार्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्यांना मात्र काळ उत्तम आहे. धार्मिक गोष्टींसाठी खर्च कराल. काही अचानक खर्चही उद्भवू शकतील. याउलट नृत्यकलेशी संबंधितांना मात्र विशेष अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यात मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील. मन आनंदी राहील. सप्ताह मध्यानंतर मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. सोशल मिडियावर केलेली एखादी पोस्ट प्रसिध्दी मिळवून देऊ शकेल. सप्ताहाच्या शेवटी रागावर नियंत्रण ठेवा. घरात वाद होणार नाहीत याचीही काळजी घ्या. प्रॉपर्टीची कामे शक्यतो पुढे ढकला.
उपासना: या काळात रोज गणपती स्तोत्र म्हणणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात राहू, पंचमस्थानात शनि(व), नेपचून, सप्तमस्थानात हर्षल, अष्टमस्थानात मंगळ, भाग्यस्थानात गुरु, दशमस्थानात सूर्य, केतू लाभस्थानात बुध, आणि व्ययस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला मंगळाचा सूर्याशी लाभयोग व चंद्राची शुक्राशी युती होईल. १६ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग होईल. १७ तारखेला सूर्य कन्या राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण तर बुधाचा शनिशी प्रतियोग होईल आणि मंगळ कर्क राशित प्रवेश करेल. १९ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. काहींना धनलाभाचे योग आहेत. मित्रांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीची शक्यता आहे. मन प्रसन्न असेल. वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. सप्ताह मध्य खरेदीसाठी अनुकूल आहे. आपल्या जिवलगांबरोबर मस्त खरेदीला जायला हरकत नाही. पूर्वी केलेल्या एखाद्या गुंतवणुकीतून या दरम्यान चांगला फायदा मिळण्याची शक्यता आहे. मनोरंजनाकडे कल राहील. नृत्यकलाकारांना उत्तम ग्रहमान आहे. सप्ताह मध्यानंतर दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. जोखीम असलेली कामे करु नका. महत्त्वाची कामे पुढे ढकला. वाहने सावकाश चालवा. सप्ताहाच्या शेवटी लाभदायक ग्रहमान आहे. उपासनेत मन लागेल. वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. आर्थिक सुयश लाभेल.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी राहू, चतुर्थस्थानात शनि(व), नेपचून, षष्ठस्थानी हर्षल, सप्तमस्थानात मंगळ, अष्टमस्थानात गुरु नवमस्थानात सूर्य, केतू, दशमस्थानात बुध, आणि लाभस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला मंगळाचा सूर्याशी लाभयोग व चंद्राची शुक्राशी युती होईल. १६ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग होईल. १७ तारखेला सूर्य कन्या राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण तर बुधाचा शनिशी प्रतियोग होईल आणि मंगळ कर्क राशित प्रवेश करेल. १९ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. आत्मविश्वास वाढविणार्या घटना घडतील. वरीष्ठांचं चांगलं सहकार्य लाभणार आहे. एखादी सवलत न मागता तुम्हाला यादरम्यान मिळू शकेल. केलेल्या श्रमाचं सार्थक झाल्याने खुश असाल. जोडीदाराबाबत काही चांगल्या घटना शक्य आहेत. सप्ताह मध्यात धनलाभाचे योग आहेत. काही अडकलेली कामे अचानकपणे होऊन जातील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. तुमची एखादी महत्वाकांक्षा किंवा इच्छा अपूर्ण राहिली असेल तर आता थोड्याशा प्रयत्नात इच्छापूर्तीचा आनंद तुम्ही मिळवू शकाल. सप्ताहाच्या मध्यानंतर खर्च वाढणार आहेत. सप्ताहाचा शेवट संमिश्र आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. धोका असलेली कामे मात्र टाळा.
उपासना: रामरक्षेचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात राहू, तृतीयस्थानी शनि(व), नेपचून, पंचमस्थानात हर्षल, षष्ठस्थानी मंगळ, सप्तमस्थानात गुरु, अष्टमस्थानात सूर्य, केतू नवमस्थानात बुध, आणि दशमस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला मंगळाचा सूर्याशी लाभयोग व चंद्राची शुक्राशी युती होईल. १६ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग होईल. १७ तारखेला सूर्य कन्या राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण तर बुधाचा शनिशी प्रतियोग होईल आणि मंगळ कर्क राशित प्रवेश करेल. १९ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताहच अतिशय चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला भाग्यवर्धक घटना घडतील. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. प्रवासयोग शक्य. सप्ताह मध्यात तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. घरात आनंदी वातावरण असेल. व्यावसायिक भेटीगाठी होतील. कामे मार्गी लागतील. सप्ताह मध्यानंतर उत्तम ग्रहमान आहे. आर्थिक सुयश लाभेल. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचा योग शक्य आहे. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. आर्थिक सुयश लाभेल. सप्ताहाच्या शेवटी खरेदीसाठी काळ अनुकूल आहे. जुन्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. नृत्यकलाकारांसाठी विशेष चांगले ग्रहमान आहे.
उपासना: या काळात रोज महालक्ष्मीअष्टक म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, धनस्थानात शनि(व), नेपचून, चतुर्थस्थानात हर्षल, पंचमस्थानात मंगळ, षष्ठस्थानी गुरु, सप्तमस्थानी सूर्य, केतू, अष्टमस्थानात बुध, नवमस्थानात शुक्र आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला मंगळाचा सूर्याशी लाभयोग व चंद्राची शुक्राशी युती होईल. १६ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग होईल. १७ तारखेला सूर्य कन्या राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण तर बुधाचा शनिशी प्रतियोग होईल आणि मंगळ कर्क राशित प्रवेश करेल. १९ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस सोडला तर संपूर्ण सप्ताह चांगला आहे. रविवारी संमिश्र ग्रहमान आहे. काहींच्या बाबतीत मनाविरुध्द घटना शक्य आहेत. याच्या बरोबर उलट काहींना अचानक धनलाभ शक्य आहेत. नंतरचे दोन दिवस भाग्यवर्धक घटनांचे ठरतील. थोरामोठ्यांचे सहकार्य व आशीर्वाद या काळात मिळतील. लाभही होतील. प्रवासयोगही शक्य. सप्ताह मध्यात नोकरी/ व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. कामे मार्गी लागतील. सप्ताहाच्या शेवटी लाभदायक ग्रहमान आहे. धनलाभ होतील. आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभेल. एखादी महत्वाकांक्षा पूर्ण होऊ शकेल.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि(व), नेपचून, तृतीयस्थानी हर्षल, चतुर्थस्थानात मंगळ, पंचमस्थानात गुरु, षष्ठस्थानात सूर्य, केतू, सप्तमस्थानी बुध, अष्टमस्थानात शुक्र, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला मंगळाचा सूर्याशी लाभयोग व चंद्राची शुक्राशी युती होईल. १६ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग होईल. १७ तारखेला सूर्य कन्या राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण तर बुधाचा शनिशी प्रतियोग होईल आणि मंगळ कर्क राशित प्रवेश करेल. १९ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल.
फलादेश- रविवारी घरच्यांबरोबर वेळ छान व्यतीत करू शकाल. भागीदारीत व्यवसाय कणार्यांना अनुकूल कालावधी आहे. वैहाहिक सौख्य मिळेल. प्रेमिकांनाही विवाह ठरविण्यासाठी दिवस अनुकूल आहे. नंतरचे दोन दिवस संमिश्र आहेत. गूढ गोष्टींकडे कल वाढेल. सूचक स्वप्ने पडतील. या काळात काही कामे लांबण्याची शक्यता आहे. जोखीम असलेली कामे टाळा. सप्ताह मध्यानंतर काही भाग्यवर्धक घटना घडतील. मनोबल उत्तम राहील. प्रवास फलदायी ठरतील. गुरु किंवा गुरुतुल्य व्यक्तीच्या भेटीचे योग शक्य आहेत. काही लाभही होतील. सप्ताहाच्या शेवटी उत्तम ग्रहमान आहे. आत्मविश्वास वाढेल. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. घरात छान वातावरण असेल. मन प्रसन्न असेल.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)