
अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२७ जुलै ते २ ऑगस्ट २०२५)
Astroshodh, bestastrologerinpune, famousastrologerinpune, topastrologerinpune, bestastrologerinindia, famousastrologerinindia, topastrologerinindia
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी हर्षल, तृतीयस्थानी गुरु, शुक्र, चतुर्थस्थानात सूर्य, बुध(व), पंचमस्थानात मंगळ, केतू, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात राहू आणि व्ययस्थानात शनि(व), नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २८ तारखेला मंगळ कन्या राशित प्रवेश करेल. २९ तारखेला चंद्राची मंगळाशी युती, सूर्याशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. ३० तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ३१ तारखेला सूर्याची बुधाशी युती होईल आणि १ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला मुलांबरोबर वेळ छान जाईल. एखाद्या मेजवानी किंवा समारंभात भाग घ्याल. विद्यार्थी व कलाकारांना अनुकूल कालावधी आहे. प्रेमिकांना हा काळ विशेष चांगला आहे. विवाहोत्सूक व्यक्तींना ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह मध्य नोकरदारांसाठी चांगले आहे. कर्मचार्यांचे व सहकार्यांचे सहकार्य लाभेल. नोकरीबदल, बदली किंवा बढतीच्या प्रयत्नात असणार्यांना काही अनुकूल घटना अपेक्षित आहेत. मात्र तब्येतीच्या काही तक्रारी या काळात जाणवू शकतील. काळजी घ्या. सप्ताहाच्या मध्यानंतर जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांना चांगला कालावधी आहे. सप्ताहाच्या शेवटी जोखीम असलेली कामे करू नका.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी हर्षल, धनस्थानी गुरु, शुक्र, तृतीयस्थानी सूर्य, बुध(व), चतुर्थस्थानात मंगळ, केतू, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात राहू आणि लाभस्थानात शनि(व), नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २८ तारखेला मंगळ कन्या राशित प्रवेश करेल. २९ तारखेला चंद्राची मंगळाशी युती, सूर्याशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. ३० तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ३१ तारखेला सूर्याची बुधाशी युती होईल आणि १ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला कौटुंबिक सौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. राहत्या जागेचे व व्यवसायाच्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. घरातील कामांसाठी वेळ काढावा लागेल. मन प्रसन्न असेल. सप्ताहाचा मध्य उत्तम आहे. तुमच्या कलाकौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. विद्यार्थ्यांना व कलाकारांना अनुकूल आहे. कमी श्रमात जास्त यश मिळेल. अचानक धनलाभ सुखावून टाकेल. ब्लॉगर्स, लेखक, प्रकाशक यांना विशेष अनुकूल काळ आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर काहींना नवीन नोकरीच्या संधी चालून येतील. वैद्यकीय व्यावसायिक, आहारतज्ञ, जीम ट्रेनर्स, वकील यांना चांगले लाभ होतील. सप्ताहाच्या शेवटीसुध्दा उत्तम ग्रहमान आहे. घरात आनंदी वातावरण असेल. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल.
उपासना: विठ्ठल नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु, शुक्र, धनस्थानी सूर्य, बुध(व), तृतीयस्थानी मंगळ, केतू, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात राहू, दशमस्थानात शनि(व), नेपचून आणि व्ययस्थानात हर्षल, अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २८ तारखेला मंगळ कन्या राशित प्रवेश करेल. २९ तारखेला चंद्राची मंगळाशी युती, सूर्याशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. ३० तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ३१ तारखेला सूर्याची बुधाशी युती होईल आणि १ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला भावंडे/ नातेवाईक यांच्या भेटीची शक्यता आहे. प्रवासाचे योग संभवतात. कवी, कलाकार व लेखकांसाठी चांगला काळ आहे. सप्ताह मध्यात घरात छान वातावरण असेल. आपल्या आवडत्या लोकांबरोबर मस्त पार्टीचे आयोजन करायला हरकत नाही. प्रॉपर्टीचे व्यवहार करण्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर संततीबाबत चांगली बातमी कळेल. सप्ताहाच्या शेवटी स्पर्धा परिक्षेत चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. अॅसिडिटी, पोटाचे/उष्णतेचे काही त्रास असतील तर त्यांनी मात्र या काळात काळजी घ्यावी.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, बुध(व), धनस्थानी मंगळ, केतू, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात राहू, भाग्यस्थानात शनि(व), नेपचून, लाभस्थानात हर्षल आणि व्ययस्थानात गुरु, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २८ तारखेला मंगळ कन्या राशित प्रवेश करेल. २९ तारखेला चंद्राची मंगळाशी युती, सूर्याशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. ३० तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ३१ तारखेला सूर्याची बुधाशी युती होईल आणि १ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात प्रिय घटनांची असेल. आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. छानशी पार्टी किंवा मेजवानीचा बेत आखायलाही हरकत नाही. कलाकौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. सप्ताह मध्यात प्रवासाचे योग येऊ शकतात. प्रवास लाभदायक ठरु शकतील. तुमच्या चांगल्या नियोजनामुळे कामे मार्गी लागतील. भावंडांच्या भेटी शक्य आहेत. सप्ताह मध्यानंतर प्रॉपर्टीच्या कामांसाठी प्रतिकूल काळ आहे. घरात वाद होणार नाहीत याचीही काळजी या काळात घ्या. सप्ताह अखेर तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. विद्यार्थी, कलाकार, खेळाडू यांना अनुकूल आहे. मात्र शेअर मार्केट सारख्या जोखीम असलेल्या ठिकाणी गुंतवणूक करतांना योग्य ती काळजी घ्यावी.
या सप्ताहासाठी उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात मंगळ, केतू, षष्ठस्थानी प्लूटो, सप्तमस्थानात राहू, अष्टमस्थानात शनि(व), नेपचून, दशमस्थानात हर्षल, लाभस्थानात गुरु, शुक्र आणि व्ययस्थानात सूर्य, बुध(व) अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २८ तारखेला मंगळ कन्या राशित प्रवेश करेल. २९ तारखेला चंद्राची मंगळाशी युती, सूर्याशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. ३० तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ३१ तारखेला सूर्याची बुधाशी युती होईल आणि १ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला चार दिवस प्रतिकूल आहेत. बेकायदा गोष्टींपासून लांब रहा. खर्चाचे प्रमाण वाढेल. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. अती दगदग टाळा. नकारात्मक विचारांना बाजूला ठेवा. वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. तुमच्या लेखनामुळे किंवा बोलण्यामुळे कोणी दुखावले जाणार नाहीत याचीही काळजी घ्यायची आहे. मात्र हाच काळ गुंतवणूक करण्यास चांगला आहे. सप्ताह अखेरीस उत्तम ग्रहमान आहे. आत्मविश्वास वाढेल. गृहसौख्य लाभेल. धनलाभ होण्याचेही योग आहेत. लोकांचे सहकार्य मिळेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल.
उपासना: या काळात महालक्ष्मीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी राहू, सप्तमस्थानात शनि(व), नेपचून, भाग्यस्थानात हर्षल, दशमस्थानात गुरु, शुक्र, लाभस्थानात सूर्य, बुध(व) आणि व्ययस्थानात मंगळ, केतू अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २८ तारखेला मंगळ कन्या राशित प्रवेश करेल. २९ तारखेला चंद्राची मंगळाशी युती, सूर्याशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. ३० तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ३१ तारखेला सूर्याची बुधाशी युती होईल आणि १ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला खरेदीसाठी काळ अनुकूल आहे. जुनी येणी वसूल होतील. जुन्या गुंतवणुकीतूनही फायदा शक्य आहे. आयात-निर्यातीचा ज्यांचा व्यवसाय आहे त्यांना लाभ होतील. सप्ताह मध्यात लाभदायक ग्रहमान आहे. अपेक्षित गाठीभेटी होतील. आर्थिक सुयश लाभेल.
आत्मविश्वास वाढविणार्या घटना शक्य आहेत. मन प्रसन्न असेल. अनेकांचे सहकार्य मिळेल. सप्ताह मध्यानंतर गृहसौख्य लाभेल. काहींना धनलाभाचे योग येतील. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. वरीष्ठांची मर्जी राहील. मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या शेवटी भावंडांशी वाद टाळा. प्रवासात योग्य ती काळजी घ्या. लेखकांनी या काळात वादग्रस्त लिखाण टाळावे.
उपासना: या काळात महालक्ष्मीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात राहू, षष्ठस्थानी शनि(व), नेपचून, अष्टमस्थानात हर्षल, भाग्यस्थानात गुरु, शुक्र, दशमस्थानात सूर्य, बुध(व) आणि लाभस्थानात मंगळ, केतू अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २८ तारखेला मंगळ कन्या राशित प्रवेश करेल. २९ तारखेला चंद्राची मंगळाशी युती, सूर्याशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. ३० तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ३१ तारखेला सूर्याची बुधाशी युती होईल आणि १ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवातीला लाभदायक ग्रहमान आहे. मित्रांच्या किंवा आवडत्या व्यक्तींच्या भेटीचे योग शक्य. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. काहींना धनलाभ होतील. सप्ताह मध्यात पूर्वी केलेल्या एखद्या गुंतवणूकीतून फ़ायदा होऊ शकेल. कलाकारांना विशेषत: नृत्यकलेशी संबंधितांना अतिशय चांगला काळ आहे. अती दगदग मात्र या काळात टाळावी. सप्ताह मध्यानंतर काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. उपासनेत मन लागेल. वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. सासरकडच्या नातेवाईकांचे सहकार्य मिळेल. प्रवास लाभदायक ठरतील. सप्ताह अखेरीस जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील. आर्थिक सुयश लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.
उपासना: या सप्ताहात रोज ’ॐ ह्रां ह्रीं ह्रौं स: सूर्याय नम:’ या मंत्राचा १ माळ जप करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात राहू, पंचमस्थानात शनि(व), नेपचून, सप्तमस्थानात हर्षल, अष्टमस्थानात गुरु, शुक्र, भाग्यस्थानात सूर्य, बुध(व), आणि दशमस्थानात मंगळ, केतू अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २८ तारखेला मंगळ कन्या राशित प्रवेश करेल. २९ तारखेला चंद्राची मंगळाशी युती, सूर्याशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. ३० तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ३१ तारखेला सूर्याची बुधाशी युती होईल आणि १ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला कार्यक्षेत्रात छान काम होणार आहे. वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. व्यवसायातील लोकांना केलेल्या कामाचा मोबदला व्यवस्थित मिळाल्याने मन प्रसन्न राहील. सप्ताह मध्यात प्रवासाचे योग येऊ शकतील. आवडत्या लोकांच्या भेटी होतील. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. लाभ होतील. सप्ताह मध्यानंतर मनाविरुध्द काही अनपेक्षित खर्च करावे लागू शकतात. जोखीम असलेली कामे करु नका. सप्ताह अखेरीस आपल्या कामात हलगर्जीपणा नको. आपली मते दुसर्यांवर लादू नका. वाद टाळा व तब्येतीची काळजी घ्या.
उपासना: विठ्ठल नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी राहू, चतुर्थस्थानात शनि(व), नेपचून, षष्ठस्थानी हर्षल, सप्तमस्थानात गुरु, शुक्र, अष्टमस्थानात सूर्य, बुध(व) आणि नवमस्थानात मंगळ, केतू अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २८ तारखेला मंगळ कन्या राशित प्रवेश करेल. २९ तारखेला चंद्राची मंगळाशी युती, सूर्याशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. ३० तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ३१ तारखेला सूर्याची बुधाशी युती होईल आणि १ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला संमिश्र घटनांचा काळ आहे. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. काहींना प्रवासाचे योग संभवतात. मात्र प्रवासात योग्य ती काळजी घ्या. सप्ताह मध्यात सामान्य काळ आहे. दैनंदिन कामे रेंगाळतील. जोखीम असलेली कामे करु नका. मनात येणार्या नकारात्मक विचारांना प्रयत्नपूर्वक बाजूला ठेवा. महत्वाचे निर्णय पुढे ढकला.या दरम्यान गूढ विषय तुम्हाला आकर्षित करतील. सप्ताह मध्यानंतर मित्रमैत्रिणिंच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग संभवतात. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. काहींना धनलाभ शक्य आहेत. घरात छान वातावरण असेल. सप्ताह अखेर मनासारखी खरेदी करु शकाल. पारमार्थिक उन्नतीसाठी ग्रहमान अनुकूल आहे.
उपासना: या काळात महालक्ष्मीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात राहू, तृतीयस्थानी शनि(व), नेपचून, पंचमस्थानात हर्षल, षष्ठस्थानी गुरु, शुक्र, सप्तमस्थानात सूर्य, बुध(व) आणि अष्टमस्थानात मंगळ, केतू अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २८ तारखेला मंगळ कन्या राशित प्रवेश करेल. २९ तारखेला चंद्राची मंगळाशी युती, सूर्याशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. ३० तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ३१ तारखेला सूर्याची बुधाशी युती होईल आणि १ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. महत्त्वाची कामे पुढे ढकला. ज्यांचे काम संशोधन/ Data analysis/ reconciliation संबंधीत असेल त्यांना लाभदायक कालावधी आहे. ज्योतिषी, सर्जन, पूराण वस्तू संशोधक, मानसशास्त्राशी संबंधीत लोकांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्य भाग्यकारक घटनांचा ठरु शकेल. प्रवासयोग येतील. वरीष्ठांशी जमवून घेतल्यास तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. मात्र यादरम्यान तब्येतीची काळजी घ्या. हितशत्रूंवर लक्ष ठेवा. सप्ताह मध्यानंतर तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. सप्ताह अखेरीस मित्रांच्या/ आप्तांच्या भेटीचे योग संभवतात. लाभदायक ग्रहमान आहे.
उपासना: ’ विठ्ठल ’ नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, धनस्थानात शनि(व), नेपचून, चतुर्थस्थानात हर्षल, पंचमस्थानात गुरु, शुक्र, षष्ठस्थानी सूर्य, बुध(व), सप्तमस्थानी मंगळ, केतू आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २८ तारखेला मंगळ कन्या राशित प्रवेश करेल. २९ तारखेला चंद्राची मंगळाशी युती, सूर्याशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. ३० तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ३१ तारखेला सूर्याची बुधाशी युती होईल आणि १ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला स्पर्धा परीक्षेसाठी अनुकूल ग्रहमान आहे. व्यापार्यांनाही छान यश मिळेल. मात्र या दरम्यान जोडीदाराबरोबर वाद टाळा. अती दगदगही टाळा. सप्ताह मध्यात संमिश्र ग्रहमान आहे. मनात येणार्या नकारात्मक विचारांना प्रयत्नपूर्वक बाजूला ठेवा. धोका असलेले कुठलेही काम करु नये. विमा क्षेत्रातील लोकांना मात्र काळ अनुकूल आहे. सप्ताह मध्यानंतर संततीसौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मानसन्मानाचे योग आहेत. धार्मिक गोष्टींसाठी चांगला काळ आहे. काहींना प्रवासाचे योग येतील. कलाकारांना हा कालावधी छान आहे. सप्ताहाच्या शेवटी लाभदायक ग्रहमान आहे. आत्मविश्वास वाढलेला असेल. व्यावसयिकांना फायदा देणार्या नवीन संधी चालून येतील.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि(व), नेपचून, तृतीयस्थानी हर्षल, चतुर्थस्थानात गुरु, शुक्र, पंचमस्थानात सूर्य, बुध(व), षष्ठस्थानात मंगळ, केतू, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २८ तारखेला मंगळ कन्या राशित प्रवेश करेल. २९ तारखेला चंद्राची मंगळाशी युती, सूर्याशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल. ३० तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. ३१ तारखेला सूर्याची बुधाशी युती होईल आणि १ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात प्रतिकूल असणार आहे. आरोग्याची काळजी घ्यावी. कोणाशीही वादविवाद होणार नाही याची दक्षता घ्यावी. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वेळ छान व्यतीत कराल. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील. व्यावसयिकांना फायदा देणार्या नवीन संधी चालून येतील. सप्ताह मध्यानंतर गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. अचानक धनलाभाचे योग शक्य. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. ज्योतिष, अध्यात्म, मानसशास्त्र, योगशास्त्र या विषयाच्या अभ्यासकांना अनुकूल ग्रहमान आहे. काहींना सूचक स्वप्ने पडतील. सप्ताहाच्या शेवटी लाभदायक ग्रहमान आहे. भाग्याची साथ मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. सासरकडच्या नातेवाईकांची भेट होण्याची शक्यता आहे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)