अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (६ जुलै ते १२ जुलै २०२५)
Astroshodh, bestastrologerinpune, famousastrologerinpune, topastrologerinpune, bestastrologerinindia, famousastrologerinindia, topastrologerinindia
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी शुक्र, हर्षल, तृतीयस्थानी सूर्य, गुरु, चतुर्थस्थानात बुध, पंचमस्थानात मंगळ, केतू, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात राहू आणि व्ययस्थानात शनि, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व शुक्राशी प्रतियोग होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल. १० तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. ११ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल.
फलादेश- रविवार संध्याकाळपर्यंत तुमच्या आवडत्या व्यक्तींबरोबर वेळ छान जाईल. व्यावसायिकांना फायदा देणार्या नवीन संधी चालून येतील. काहींना धनलाभ शक्य आहे. नंतरचे दोन दिवस तितकेसे चांगले नाहीत. तुमच्या कार्यक्षेत्रात अडचणी संभवतील. प्रवास या काळात टाळलेलेच बरे. प्रवास करणारच असाल तर सर्व प्रकारची काळजी घ्या. वाहने सावकाश चालवा. मात्र हाच कालावधी विमा व्यावसायिक व मानसोपचारतज्ञ यांना चांगला आहे. याच काळात काहींना भविष्यदर्शक सूचक स्वप्ने पडणे किंवा भविष्यकाळातील घटनांबाबत काही संकेत मिळू शकतील. सप्ताह मध्य लाभ देणारा आहे. प्रवास लाभदायी ठरतील. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. गुरु किंवा गुरुतुल्य व्यक्तीच्या भेटीचे योग शक्य. सप्ताह अखेर संमिश्र ग्रहमान आहे. दैनंदिन कामे रेंगाळतील. तुमच्या कार्यक्षेत्रात सर्व कामे व्यवस्थीत होतील याची काळजी घ्या. कामातील दिरंगाई महागात पडू शकेल. खरेदीसाठी मात्र अनुकूल ग्रहमान आहे.
या सप्ताहासाठी उपासना: श्रीस्वामी समर्थांचा तारक मंत्र या काळात रोज म्हणावा किंवा ऐकावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शुक्र, हर्षल, धनस्थानी सूर्य, गुरु, तृतीयस्थानी बुध, चतुर्थस्थानात मंगळ, केतू, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात राहू आणि लाभस्थानात शनि, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व शुक्राशी प्रतियोग होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल. १० तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. ११ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल.
फलादेश- रविवारी आरोग्याची काळजी घ्या. त्यानंतरचे दोन दिवस घरात छान वातावरण असेल. एखाद्या समारंभ किंवा पार्टीत सामिल होण्याचे योग आहेत. व्यावसायिकांना फायदा देणार्या नवीन संधी चालून येतील. आर्थिक सुयश लाभेल. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील. सप्ताह मध्य संमिश्र असेल. गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. अचानक धनलाभाचे योग शक्य. मात्र जोखीम असलेली कामे यादरम्यान करु नका. सप्ताहाच्या शेवटी भाग्यवर्धक घटना घडतील. प्रवासाचे बेत ठरवाल. शिक्षण क्षेत्रातील लोकांना विशेष अनुकूल ग्रहमान आहे. आर्थिक सुयश लाभेल. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचा योग शक्य आहे. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल.
या सप्ताहासाठी उपासना: या सप्ताहात रोज संध्याकाळी मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसा म्हणावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, गुरु, धनस्थानी बुध, तृतीयस्थानी मंगळ, केतू, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात राहू, दशमस्थानात शनि, नेपचून, आणि व्ययस्थानात शुक्र, हर्षल, अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व शुक्राशी प्रतियोग होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल. १० तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. ११ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल
फलादेश- रविवार दुपारपर्यंतचा काळ लाभदायक आहे. आवडत्या छंदांसाठी वेळ काढाल. प्रेमी युगुलांसाठी छान कालावधी आहे. नंतरचे दोन दिवस तब्येतीच्या तक्रारी जाणवत रहातील. अॅसिडीटी/ मायग्रेन किंवा पोटाचे आजार असतील तर काळजी घ्या. नोकरीनिमित्त प्रवासयोग शक्य. लोकांशी व्यवहार करतांना तसेच सोशल मिडियावर काही शेअर करतांना काळजी घ्या. मात्र हाच काळ वैद्यकीय क्षेत्रातील लोक, वकील, जीम ट्रेनर तसेच आहारतज्ञ यांना चांगला लाभ मिळवून देईल. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर आनंदात वेळ घालवाल. व्यवसायातील निर्णय योग्य ठरतील. कामे मार्गी लागतील. सप्ताहाच्या शेवट थोडासा कंटाळवाणा व त्रासदायक ठरू शकतो. एखादी मनाविरुध्द घटना घडू शकेल. जोखीम असलेली कामे या काळात टाळलेलीच बरी. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. एखादी महत्वाची जबाबदारी तुमच्यावर सोपावली जाऊ शकेल. परीवर्तनाला तुम्ही तयार असलात तर हीच भविष्यातील लाभदायक संधी ठरु शकेल.
या सप्ताहासाठी उपासना: ’ श्री गुरुदेव दत्त ’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी बुध, धनस्थानी मंगळ, केतू, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात राहू, भाग्यस्थानात शनि, नेपचून, लाभस्थानात शुक्र, हर्षल, आणि व्ययस्थानात सूर्य, गुरु अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व शुक्राशी प्रतियोग होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल. १० तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. ११ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल
फलादेश- रविवारचा दिवस गृहसौख्याचा असणार आहे. घरातील कामांसाठी वेळ काढावा लागेल. मन प्रसन्न असेल. नंतरचे दोन दिवस लाभदायक आहेत. मानसन्मान मिळेल. संततीसौख्य लाभेल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. विद्यार्थ्यांना व कलाकारांना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल. धनलाभ होण्याचेही योग शक्य आहेत. सप्ताह मध्यात प्रतिकूल ग्रहमान आहे. तब्येतीची काळजी घ्या. अती दगदग टाळा. कर्मचार्यांचे सहकार्य आज मिळणार नाही. हितशत्रूंवरही लक्ष ठेवा. सप्ताह अखेर उत्तम आहे. घरात आनंदी वातावरण असेल. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल. व्यापार्यांना फायदेशीर ग्रहमान आहे.
या सप्ताहासाठी उपासना: गणपतीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात मंगळ, केतू, षष्ठस्थानी प्लूटो, सप्तमस्थानात राहू, अष्टमस्थानात शनि, नेपचून, दशमस्थानात शुक्र, हर्षल, आणि लाभस्थानात सूर्य, गुरु, व्ययस्थानात बुध अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व शुक्राशी प्रतियोग होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल. १० तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. ११ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला तुमच्या कला/ कौशल्याला वाव मिळेल. सोशल मिडियावर केलेली एखादी पोस्ट प्रसिध्दी मिळवून देऊ शकेल. आत्मविश्वास वाढेल. काहींना प्रवास योग आहेत. सप्ताहाच्या मध्यात कौटुंबिक सौख्य लाभेल. राहत्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे काही प्रश्न असतील तर ते मार्गी लावू शकाल. धार्मिक कार्यात सहभाग असेल. अध्यात्मिक उन्नतीसाठी गुरु केलेल्यांना चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या शेवटी अडकलेली कर्ज प्रकरणे मार्गी लागू शकतील. वकिल व जीम ट्रेनर्स यांना अनुकूल काळ आहे. तब्येतीची मात्र या दरम्यान काळजी घ्यायला हवी.
या सप्ताहासाठी उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी राहू, सप्तमस्थानात शनि, नेपचून, भाग्यस्थानात शुक्र, हर्षल, दशमस्थानात सूर्य, गुरु, लाभस्थानात बुध आणि व्ययस्थानात मंगळ, केतू अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व शुक्राशी प्रतियोग होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल. १० तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. ११ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल
फलादेश- सप्ताह छान असणार आहे. सप्ताहाची सुरुवात चांगली होईल. लाभ होतील. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. काहींना प्रवासयोग शक्य. भावंडांची खुशाली कळेल. परदेशात शिकायला जाण्याची इच्छा असणार्यांना अनुकूल ग्रहमान आहे. या दरम्यान खर्च मात्र वाढणार आहेत. सप्ताह मध्यात आत्मविश्वास वाढेल. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. राहत्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे काही प्रश्न असतील तर ते मार्गी लावू शकाल. सप्ताह मध्यानंतर घरात छान वातावरण असेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. एखाद्या समारंभात किंवा कार्यक्रमात सहभाग घ्याल. प्रॉपर्टी खरेदी-विक्रीचे व्यवहार फायदेशीर ठरु शकतील. सप्ताह अखेरीस विद्यार्थ्यांना संमिश्र काळ आहे. अभ्यासाकडे दुर्लक्ष करु नये.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात राहू, षष्ठस्थानी शनि, नेपचून, अष्टमस्थानात शुक्र, हर्षल, भाग्यस्थानात सूर्य, गुरु, दशमस्थानात बुध आणि लाभस्थानात मंगळ, केतू अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व शुक्राशी प्रतियोग होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल. १० तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. ११ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल
फलादेश- रविवारी मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. मन प्रसन्न असेल. नंतरचे दोन दिवस आर्थिक सुयश लाभेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. कौटुंबीक सौख्य मिळेल. तुमच्या संभाषणकौशल्यामुळे एखादं काम मार्गी लागण्याणी शक्यता आहे. सप्ताह मध्यात चांगले ग्रहमान आहे. भाग्याची साथ मिळेल. तुमच्या कार्यक्षेत्रात मान व प्रतिष्ठा लाभेल. वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. तुमच्या कौशल्याला वाव मिळेल. नवीन परिचय होतील. प्रवास लाभदायक ठरु शकतील. सप्ताह अखेरीस रागावर नियंत्रण ठेवावे. घरात वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. प्रॉपर्टीची कामे शक्यतो पुढे ढकला.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात रोज गणपती स्तोत्र म्हणणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात राहू, पंचमस्थानात शनि, नेपचून, सप्तमस्थानात शुक्र, हर्षल, अष्टमस्थानात सूर्य, गुरु, भाग्यस्थानात बुध आणि दशमस्थानात मंगळ, केतू अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व शुक्राशी प्रतियोग होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल. १० तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. ११ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल
फलादेश- रविवारचा दिवस खरेदीसाठी चांगला आहे. खर्चही वाढणार आहेत. मनोरंजनाकडे कल राहील. नंतरचे दोन दिवस अनुकूल आहेत. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. वरीष्ठांची मर्जी राहील. तुमचे सहकारी मदत करतील. मात्र हितशत्रूंवर दुर्लक्ष होऊ देऊ नका. सप्ताह मध्यात संमिश्र ग्रहमान आहे. आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. मात्र बोलण्यावर संयम ठेवावा. जोखीम असलेली कामे टाळा. सप्ताहाच्या शेवटी भावंडांशी वार्तालाप होईल. संततीसौख्य लाभेल. विद्यार्थ्यांना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल. तुमच्या कलाकौशल्याला वाव मिळेल. सोशल मिडियावर केलेली एखादी पोस्ट प्रसिध्दी मिळवून देऊ शकेल. प्रवासयोग शक्य.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी राहू, चतुर्थस्थानात शनि, नेपचून, षष्ठस्थानी शुक्र, हर्षल, सप्तमस्थानात सूर्य, गुरु, अष्टमस्थानात बुध आणि नवमस्थानात मंगळ, केतू अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व शुक्राशी प्रतियोग होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल. १० तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. ११ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल
फलादेश- रविवारी आवडत्या व्यक्तींच्या भेटीचे योग संभवतात. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. काही लाभही होतील. त्या नंतरचे दोन दिवस संमिश्र असतील. दैनंदिन कामे रेंगाळतील. खरेदीसाठी मात्र अनुकूल ग्रहमान आहे. जुनी येणी वसूल होतील. काहींना अचानक धनलाभाचीही शक्यता आहे. सप्ताह मध्यात काही छान अनुभव येतील. आत्मविश्वास वाढलेला असेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. प्रॉपर्टीची कामे पार पडतील. कौटुंबीक सौख्य लाभेल. मन प्रसन्न असेल. सप्ताह अखेरीस कुटुंबीयांबरोबर वेळ मजेत जाणार आहे. धनलाभही होण्याची शक्यता आहे.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात दत्तबावनी रोज म्हणावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात राहू, तृतीयस्थानी शनि, नेपचून, पंचमस्थानात शुक्र, हर्षल, षष्ठस्थानी सूर्य, गुरु, सप्तमस्थानात बुध आणि अष्टमस्थानात मंगळ, केतू अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व शुक्राशी प्रतियोग होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल. १० तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. ११ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होईल. रविवारी व्यावसायिकांना अनुकूल ग्रहमान आहे. मित्रमंडळींच्या/ नातेवाईकांच्या भेटीचे योग संभवतात. काही लाभ होण्याचीही शक्यता आहे. नंतरचे दोन दिवस तब्येतीची काळजी घ्या. जोखीम असलेली कामे करु नका. महत्त्वाची कामे पुढे ढकला. वाहने सावकाश चालवा. एखाद्या मित्राचा विचित्र अनुभव या दरम्यान येण्याची शक्यता आहे. वाद टाळा. सप्ताह मध्यात मनाजोगती खरेदी होऊ शकेल. काही खर्चही उद्भवू शकतात. उपासना करण्यार्यांना खूप चांगला कालावधी आहे. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. सप्ताह अखेरीस आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबिक सौख्यही मिळेल.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, धनस्थानात शनि, नेपचून, चतुर्थस्थानात शुक्र, हर्षल, पंचमस्थानात सूर्य, गुरु, षष्ठस्थानी बुध, सप्तमस्थानी मंगळ, केतू आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व शुक्राशी प्रतियोग होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल. १० तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. ११ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला भाग्याची साथ मिळेल. नोकरीत, व्यवसायात अनुकूलता जाणवेल. वरीष्ठांचे चांगले सहकार्य या काळात मिळू शकेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. अध्यात्मिक उन्नतीसाठी गुरु केलेल्यांना चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यात उत्तम ग्रहमान आहे. लोकांचे सहकार्य मिळेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. आर्थिक सुयश लाभेल. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचा योग शक्य आहे. व्यवसायिकांना भरपूर लाभ होतील. सप्ताहाच्या शेवटी जुनी येणी वसूल होतील. पूर्वीच्या एखाद्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. नृत्यकलेशी संबंधीत असलेल्यांना यश देणारा काळ आहे.
या सप्ताहासाठी उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि, नेपचून, तृतीयस्थानी शुक्र, हर्षल, चतुर्थस्थानात सूर्य, गुरु, पंचमस्थानात बुध, षष्ठस्थानात मंगळ, केतू, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. ६ तारखेला शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. ७ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व शुक्राशी प्रतियोग होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल. १० तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग होईल. ११ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल
फलादेश- रविवारी गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. जोखीम असलेली कामे मात्र टाळा. मनात येणार्या नकारात्मक विचारांना प्रयत्नपूर्वक बाजूला ठेवा. नंतरचे दोन दिवस तब्येतीच्या तक्रारी जाणवत रहातील. तुमच्या बोलण्याने किंवा वागण्याने लोक दुखावले जाणार नाहीत याची काळजी घ्या. शिक्षण क्षेत्रातील लोकांना मात्र अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात उत्तम ग्रहमान आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. आत्मविश्वास वाढेल. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. धनलाभ होण्याचेही योग आहेत. सप्ताहाच्या शेवटी जुनी येणी वसूल होतील. पूर्वीच्या एखाद्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांना अनुकूल कालावधी आहे.
या सप्ताहासाठी उपासना: श्रीस्वामी समर्थांचा तारक मंत्र या काळात रोज म्हणावा किंवा ऐकावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)