अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२९ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर २०२४)

Astroshodh- bestastrologerinpune, famousastrologerinpune, topastrologerinpune, bestastrologerinindia, famousastrologerinindia, topastrologerinindia

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी गुरु, हर्षल, तृतीयस्थानी मंगळ, षष्ठस्थानात सूर्य, बुध, केतू, सप्तमस्थानात शुक्र, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात शनि(व) आणि व्ययस्थानात राहू, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला सूर्य-बुध युती होईल, चंद्राचा शनिशी प्रतियोग तर मंगळ व शुक्राशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राची सूर्य व बुधाशी युती होईल. ३ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व गुरुशी त्रिकोण होईल. ५ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. काहींना छोटसं बक्षिस, भेटवस्तू, प्रमोशन, पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना, कलाकारांना व प्रेमिकांना चांगला कालावधी आहे. संततीबाबत चांगली बातमी कळू शकेल. स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. सप्ताह मध्यात भावंडांच्या किंवा शेजार्‍यांच्या विचित्र वागण्याचा त्रास होऊ शकेल. नोकरीनिमित्त प्रवासयोग शक्य आहेत. मात्र प्रवासात काळजी घा. तब्येतीचीही काळजी या काळात घ्यावी. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. शनिवारी जोखीम असलेली कामे टाळा.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु, हर्षल, धनस्थानी मंगळ, पंचमस्थानात सूर्य, बुध, केतू, षष्ठस्थानात शुक्र, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात शनि(व) आणि लाभस्थानात राहू, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला सूर्य-बुध युती होईल, चंद्राचा शनिशी प्रतियोग तर मंगळ व शुक्राशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राची सूर्य व बुधाशी युती होईल. ३ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व गुरुशी त्रिकोण होईल. ५ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला घरातील वातावरण चांगले राहील. मन प्रसन्न असेल. राहत्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे काही प्रश्न असतील तर ते मार्गी लावू शकाल. प्रॉपर्टीची खरेदी विक्री करणार्‍यांना अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यात लाभदायक ग्रहमान आहे. मानसन्मान मिळेल. संततीसौख्य लाभेल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. विद्यार्थ्यांना व कलाकारांना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल. आत्मविश्वास वाढविणार्‍या घटना घडतील. सप्ताहाच्या शेवटी तब्येतीची काळजी घ्यावी. वैद्यकीय व्यवसाय करणारे, थेरपिस्ट, आहारतज्ञ, यांना मात्र अनुकूल ग्रहमान आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात मंगळ, चतुर्थस्थानात सूर्य, बुध, केतू, पंचमस्थानात शुक्र, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात शनि(व), दशमस्थानात राहू, नेपचून आणि व्ययस्थानात गुरु, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला सूर्य-बुध युती होईल, चंद्राचा शनिशी प्रतियोग तर मंगळ व शुक्राशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राची सूर्य व बुधाशी युती होईल. ३ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व गुरुशी त्रिकोण होईल. ५ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला काहींना प्रवासयोग शक्य आहेत. भावंडांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग आहेत. लेखक, कवी व कलाकारांना हा काळ खुप चांगला आहे. कागदपत्रांसंबंधीच्या कामांतून फायदा होऊ शकेल. सप्ताह मध्यात कौटुंबिक सौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. प्रॉपटींची कामे मार्गी लागतील. नवीन विषयाचा अभ्यास सुरु करायचा असेल किंवा आपल्या छंदासाठी काहीतरी नव्याने करायचं असेल तर त्यासाठी हा कालावधी उत्तम आहे. सप्ताहाच्या शेवटी लाभदायक ग्रहमान आहे. संततीसौख्य लाभेल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. मानसन्मान मिळेल. कलाकारांना व खेळाडूंना हा काळ विशेष यशाचा असेल.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी सूर्य, बुध, केतू, चतुर्थस्थानात शुक्र, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात शनि(व), भाग्यस्थानात राहू, नेपचून, लाभस्थानात गुरु, हर्षल आणि व्ययस्थानात मंगळ, अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला सूर्य-बुध युती होईल, चंद्राचा शनिशी प्रतियोग तर मंगळ व शुक्राशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राची सूर्य व बुधाशी युती होईल. ३ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व गुरुशी त्रिकोण होईल. ५ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताह छान जाणार आहे. सप्ताहाची सुरूवात लाभदायक आहे. अचानक एखादा धनलाभ होऊ शकतो. आपल्या संभाषण कौशल्यामुळे कामे होतील. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. सप्ताह मध्यात भावंडांशी किंवा शेजार्‍यांशी वाद संभवतात. प्रवास या काळात टाळलेलेच बरे. प्रवास करावाच लागणार असेल तर सर्व प्रकारची काळजी घेणे गरजेचे आहे. लेखक/ ब्लॉगर्स यांना प्रतिकूल कालावधी आहे. वादग्रस्त लिखाण टाळावे. सप्ताह अखेर घरगुती उत्सव समांरंभाची असेल. प्रॉपर्टीच्या कामासाठी अनुकूल कालावधी आहे. मन प्रसन्न करणार्‍या घटना शक्य आहेत.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी सूर्य, बुध, केतू, तृतीयस्थानी शुक्र, षष्ठस्थानात प्लूटो, सप्तमस्थानात शनि(व), अष्टमस्थानात राहू, नेपचून, दशमस्थानात गुरु, हर्षल आणि लाभस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला सूर्य-बुध युती होईल, चंद्राचा शनिशी प्रतियोग तर मंगळ व शुक्राशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राची सूर्य व बुधाशी युती होईल. ३ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व गुरुशी त्रिकोण होईल. ५ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात चांगली होणार आहे. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील. मन आनंदी राहील. सप्ताह मध्यात तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम झाल्याने वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. मात्र डोळे/ दातांच्या समस्या या दरम्यान जाणवू शकतील. काळजी घ्या. सप्ताह अखेरीस कामात सुयश लाभेल. प्रवासयोग या दरम्यान शक्य आहेत. सोशल मिडियावर केलेली एखादी पोस्ट प्रसिध्दी मिळवून देऊ शकेल. लेखक, कवी व कलाकारंना खूप चांगला काळ आहे. मन आनंदी असेल.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात सूर्य, बुध, केतू, धनस्थानात शुक्र, पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी शनि(व), सप्तमस्थानात राहू, नेपचून, भाग्यस्थानात गुरु, हर्षल आणि दशमस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला सूर्य-बुध युती होईल, चंद्राचा शनिशी प्रतियोग तर मंगळ व शुक्राशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राची सूर्य व बुधाशी युती होईल. ३ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व गुरुशी त्रिकोण होईल. ५ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान खरेदीची असेल. प्रवासासाठी व परदेश प्रवास करण्यासाठी अनुकूल कालावधी आहे. पारमार्थिक उन्नतीचे प्रयत्न करणार्‍यांसाठी हा काळ विशेष चांगला. सप्ताह मध्यात मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मन आनंदी राहील. सप्ताहाच्या शेवटी काही अनपेक्षित लाभ होऊ शकतील. घरात छान वातावरण असेल. कलाकारांना विशेषत: गायकांना चांगला काळ आहे. धार्मिक गोष्टींसाठीही अनुकूल काळ आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात शुक्र, चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात शनि(व), षष्ठस्थानी राहू, नेपचून, अष्टमस्थानात गुरु, हर्षल, नवमस्थानात मंगळ आणि व्ययस्थानात सूर्य, बुध, केतू अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला सूर्य-बुध युती होईल, चंद्राचा शनिशी प्रतियोग तर मंगळ व शुक्राशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राची सूर्य व बुधाशी युती होईल. ३ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व गुरुशी त्रिकोण होईल. ५ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताह संमिश्र आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला काही आर्थिक लाभ होता होता रहाणार आहेत. मित्र-मैत्रिणी किंवा आप्तेष्टांच्या विचित्र वागण्याचा त्रास होऊ शकतो. काही खर्च अचानक उद्भवू शकतील. कोणाशीहि वाद होणार नाही याची दक्षता घ्या. आपली धार्मिक मते दुसर्‍यांवर लादू नका. व्यसनांपासून लांब रहा. बेहिशोबी/ गैरमार्गाने पैसे मिळवण्याचा प्रयत्न केल्यास या काळात अंगाशी येऊ शकेल. ज्यांना ज्योतिष, मानसशास्त्र, परामानसशास्त्र अशा विषयांची आवड आहे किंवा जे अशा विषयांचा अभ्यास करत असतील त्यांना मात्र अतिशय चांगले ग्रहमान आहे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात शनि(व), पंचमस्थानात राहू, नेपचून, सप्तमस्थानात गुरु, हर्षल, अष्टमस्थानात मंगळ, लाभस्थानात सूर्य, बुध, केतू आणि व्ययस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला सूर्य-बुध युती होईल, चंद्राचा शनिशी प्रतियोग तर मंगळ व शुक्राशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राची सूर्य व बुधाशी युती होईल. ३ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व गुरुशी त्रिकोण होईल. ५ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला कार्यक्षेत्रात चांगले काम झाल्याने नोकरदार व्यक्तींना वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल. व्यवसायातील लोक भरपूर आणि मनाजोगते काम झाल्याने खूष असतील. मन प्रसन्न असेल. सप्ताह मध्यात उत्तम काळ आहे. आवडत्या व्यक्तीच्या भेटी होतील. आर्थिक सुयश लाभेल. एखादी महत्वाकांक्षा या दरम्यान पूर्ण होऊ शकेल. सप्ताहाच्या शेवटी मनासारखी खरेदी होईल. काहींना लांबचे प्रवास किंवा परदेशगमन शक्य. ज्यांचा आयात-निर्यातीचा व्यवसाय आहे किंवा ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध परदेशाशी आहे त्यांना अनुकूल काळ आहे. कलाकारांना अनुकूल ग्रहमान आहे,
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी शनि(व), चतुर्थस्थानात राहू, नेपचून, षष्ठस्थानी गुरु, हर्षल, सप्तमस्थानी मंगळ, दशमस्थानात सूर्य, बुध, केतू आणि लाभस्थानी शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला सूर्य-बुध युती होईल, चंद्राचा शनिशी प्रतियोग तर मंगळ व शुक्राशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राची सूर्य व बुधाशी युती होईल. ३ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व गुरुशी त्रिकोण होईल. ५ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीलाच भाग्यकारक ग्रहमान आहे. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. प्रवास लाभदायक ठरु शकतील. सप्ताह मध्यात व्यावसायिकांचे प्रलंबीत असलेले निर्णय मार्गी लागतील. नोकरीत समाधानकारक स्थिती असेल. वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. एखादी महत्वाची जबाबदारी तुमच्यावर सोपावली जाऊ शकेल. सप्ताहाच्या शेवटी उत्तम ग्रहमान आहे. आर्थिक सुयश लाभेल. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचा योग शक्य आहे. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल.
उपासना: रोज किमान ११ वेळा महालक्ष्मीअष्टक या काळात म्हंटलेले फ़ायदेशीर ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात शनि(व), तृतीयस्थानी राहू, नेपचून, पंचमस्थानात गुरु, हर्षल, षष्ठस्थानात मंगळ, नवमस्थानात सूर्य, बुध, केतू आणि दशमात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला सूर्य-बुध युती होईल, चंद्राचा शनिशी प्रतियोग तर मंगळ व शुक्राशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राची सूर्य व बुधाशी युती होईल. ३ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व गुरुशी त्रिकोण होईल. ५ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात संमिश्र ग्रहमानाची आहे. अती दगदग टाळावी. जीवनशक्तीची कमतरता किंवा थकवा जाणवत राहू शकेल. काही लोकांना अचानक धनलाभाचे योग संभवतात. गूढ गोष्टींकडे मनाचा ओढा राहील. ज्योतिषशास्त्रासारखे विषय शिकण्यासाठी अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यात भाग्यकारक ग्रहमान आहे. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. सप्ताह अखेरीस नोकरीत किंवा व्यवसायात चांगले काम झाल्याने खूश असाल. मन प्रसन्न असेल.
उपासना: रोज किमान ११ वेळा महालक्ष्मीअष्टक या काळात म्हंटलेले फ़ायदेशीर ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि(व), धनस्थानात राहू, नेपचून, चतुर्थस्थानात गुरु, हर्षल, पंचमस्थानात मंगळ, अष्टमस्थानात सूर्य, बुध, केतू, भाग्यात शुक्र आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला सूर्य-बुध युती होईल, चंद्राचा शनिशी प्रतियोग तर मंगळ व शुक्राशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राची सूर्य व बुधाशी युती होईल. ३ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व गुरुशी त्रिकोण होईल. ५ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात चांगली होईल. आपल्या जिवाभावाच्या लोकांबरोबर वेळ मजेत जाईल. एखाद्या कार्यक्रमात किंवा समारंभात सहभागी व्हाल. मन प्रसन्न असेल. सप्ताह मध्यात मात्र अचानक आलेल्या अडचणींनी त्रस्त व्हाल. मन शांत ठेवावे. संततीशी व जोडीदाराशी वाद टाळावेत. एखाद्या गोष्टीतील बदल किंवा परीवर्तन फायदेशीर ठरु शकेल. सप्ताहाच्या शेवटी पुन्हा ग्रहस्थिती अनुकूल होत आहे. भाग्यवर्धक घटना संभवतात. धार्मिक स्थळांना भेट द्याल. मन प्रसन्न करणार्‍या घटना घडण्याची शक्यता आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, नेपचून, तृतीयस्थानी गुरु, हर्षल, चतुर्थस्थानात मंगळ, सप्तमस्थानी सूर्य, बुध, केतू, अष्टमस्थानात शुक्र, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात शनि(व) अशी ग्रहस्थिती असेल. ३० तारखेला सूर्य-बुध युती होईल, चंद्राचा शनिशी प्रतियोग तर मंगळ व शुक्राशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राची सूर्य व बुधाशी युती होईल. ३ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व गुरुशी त्रिकोण होईल. ५ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांना अनुकूल आहे. वैद्यकिय व्यवसाय करणार्‍यांनाही हा काळ चांगला आहे. तब्येतीची मात्र काळजी घ्यावी. सप्ताह मध्यात लाभदायक ग्रहमान आहे. मनोबल उत्तम राहील. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. सप्ताह अखेर संमिश्र घटनांचा ठरेल. काहींना सूचक स्वप्ने पडतील. अचानक धनलाभ होण्याचीही शक्यता आहे. मात्र जोखीम किंवा धोका असलेली कामे करू नका.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)