अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२८ जुलै ते ३ ऑगस्ट २०२४)

Astroshodh- bestastrologerinpune, famousastrologerinpune, topastrologerinpune, bestastrologerinindia, famousastrologerinindia, topastrologerinindia

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी मंगळ, गुरु, हर्षल, चतुर्थस्थानात सूर्य, शुक्र, पंचमस्थानात बुध, षष्ठस्थानात केतू, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात शनि(व) आणि व्ययस्थानात राहू, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग आणि मंगळ व गुरुशी युती होईल. ३१ तारखेला शुक्र सिंह राशित प्रवेश करेल व तिथे त्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाची सुरुवात अनुकूल राहील. आत्मविश्वास वाढेल. मन प्रसन्न असेल. आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. ज्यांच्या पत्रिकेत अचानक धनलाभाचे योग आहेत त्यांना यादरम्यान पैसा/ जमीन किंवा इतर मार्गांनी अचानकपणे काही लाभ होण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यात कुटुंबीयांबरोबर छान सुर जमलेला असेल. विद्यार्थ्यांना व कलाकारांना उत्तम ग्रहमान आहे. छान यश मिळू शकेल. आर्थिक लाभसुध्दा शक्य आहेत. एखाद्या स्त्रीमुळे कामे मार्गी लागतील. सप्ताहाच्या शेवटी संततीसौख्य लाभेल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. तुमच्यातल्या कौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. प्रवासयोग संभवतात. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, गुरु, हर्षल, तृतीयस्थानी सूर्य, शुक्र, चतुर्थस्थानात बुध, पंचमस्थानात केतू, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात शनि(व) आणि लाभस्थानात राहू, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग आणि मंगळ व गुरुशी युती होईल. ३१ तारखेला शुक्र सिंह राशित प्रवेश करेल व तिथे त्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला जुनी येणी वसूल होतील. पूर्वीच्या एखाद्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. अध्यात्मिक क्षेत्रातील लोकांना चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे. मनाजोगती खरेदी होऊ शकेल. सप्ताहाच्या मध्यात तुमचा इतरांवर प्रभाव राहील. नोकरीत समाधानकारक स्थिती असेल. नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होऊ शकतील. प्रवासयोग आज शक्य. सोशल मिडियावर केलेली एखादी पोस्ट प्रसिध्दी मिळवून देऊ शकेल. सप्ताहाच्या मध्यानंतर दैनंदिन कामे रेंगाळतील. खरेदीसाठी मात्र अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या शेवटी तुमच्या कार्यक्षेत्रात सुयश मिळेल. कलाकौशल्याला वाव मिळेल.
या सप्ताहासाठी उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी सूर्य, शुक्र, तृतीयस्थानी बुध, चतुर्थस्थानात केतू, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात शनि(व), दशमस्थानात राहू, नेपचून आणि व्ययस्थानात मंगळ, गुरु, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग आणि मंगळ व गुरुशी युती होईल. ३१ तारखेला शुक्र सिंह राशित प्रवेश करेल व तिथे त्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल.
फलादेश- सोमवार रात्रीपर्यंतचा कालावधी उत्तम असणार आहे. आर्थिक सुयश लाभेल. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचा योग येईल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. त्यानंतरचे दोन दिवस गायकांना व नृत्यकलेशी संबंध असणार्‍या लोकांना खुप चांगले आहेत. काही चांगल्या संधी चालून येतील. धार्मिक गोष्टींसाठी वेळ काढाल. परदेशगमनासाठीही अनुकूल काळ आहे. मात्र खर्च या काळात वाढणार आहेत. या काळात केलेली गुंतवणूक दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरणार आहे. सप्ताह मध्यानंतर लाभदायक ग्रहमान आहे. संततीसौख्य लाभेल. विद्यार्थ्यांना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल. एखादं बक्षिस, भेटवस्तू किंवा शाबासकीची अचानक मिळालेली थाप सुखावून टाकेल. प्रेमिकांना लग्न ठरविण्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताहाच्या शेवटी आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. मन प्रसन्न असेल.
या सप्ताहासाठी उपासना: ’विठ्ठल’ नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात सूर्य, शुक्र, धनस्थानी बुध, तृतीयस्थानी केतू, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात शनि(व), भाग्यस्थानात राहू, नेपचून आणि लाभस्थानात मंगळ, गुरु, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग आणि मंगळ व गुरुशी युती होईल. ३१ तारखेला शुक्र सिंह राशित प्रवेश करेल व तिथे त्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाची सुरुवात छान असणार आहे. काहींना वरीष्ठांकडून न मागता सहकार्य मिळेल. नोकरी, व्यवसायातील लोक भरपूर आणि मनाजोगते काम झाल्याने खूष असतील. विद्यार्थी व खेळाडू यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या मध्यात छान लाभ होतील. मित्रांच्या/ आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. आवडत्या व्यक्तींबरोबर मजेत वेळ घालवाल. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील. सप्ताहाच्या शेवटी जुनी येणी वसूल होतील. पूर्वीच्या एखाद्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. अध्यात्मिक क्षेत्रातील लोकांना चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे. शनिवारी मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. मन आनंदी राहील.
या सप्ताहासाठी उपासना: श्रीसूक्ताचे नियमित पठण या कालावधीत केलेले चांगले.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात बुध, धनस्थानी केतू, षष्ठस्थानात प्लूटो, सप्तमस्थानात शनि(व), अष्टमस्थानात राहू, नेपचून, दशमस्थानात मंगळ, गुरु, हर्षल आणि व्ययस्थानात सूर्य, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग आणि मंगळ व गुरुशी युती होईल. ३१ तारखेला शुक्र सिंह राशित प्रवेश करेल व तिथे त्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. प्रॉपर्टीच्या कामांसाठी अनुकूल काळ आहे. बढती किंवा पगारवाढ या काळात शक्य आहे. वरीष्ठांकडून एखादे काम करुन घ्यायचे असेल तर त्यासाठी जरुर प्रयत्न करावेत. सप्ताह मध्य परदेश प्रवासासाठी चांगला आहे. खर्चही वाढतील. अध्यात्मिक क्षेत्रातील लोकांना चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर आवडत्या लोकांच्या भेटीचे योग येतील. काही लाभ होतील. तुमच्या कौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. भावंडांशी संपर्क होईल. सप्ताहाच्या शेवटी मनासारखी खरेदी होईल.
या सप्ताहासाठी उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात केतू, पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी शनि(व), सप्तमस्थानात राहू, नेपचून, भाग्यस्थानात मंगळ, गुरु, हर्षल, लाभस्थानात सूर्य, शुक्र आणि व्ययस्थानात बुध ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग आणि मंगळ व गुरुशी युती होईल. ३१ तारखेला शुक्र सिंह राशित प्रवेश करेल व तिथे त्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाची सुरुवात कंटाळवाणी व अडथळ्याची जरी झाली तरी नंतर पूर्ण सप्ताह छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला अध्यात्मिक उन्नतीसाठी काळ अनुकूल आहे. काहींना सूचक स्वप्ने पडतील. सप्ताहाचा मध्य विद्यार्थी, कलाकार व उपासक यांना चांगला आहे. लांबच्या प्रवासाच्या योजना मनात घोळू लागतील. काही भाग्यवर्धक घटनाही घडण्याची शक्याता आहे. सप्ताह मध्यानंतर तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. सप्ताहाचा शेवट उत्तम असणार आहे. काही लाभ होतील. आवडत्या व्यक्ती भेटतील. मन आनंदी असेल.
या सप्ताहासाठी उपासना: ’ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: ’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात शनि(व), षष्ठस्थानी राहू, नेपचून अष्टमस्थानात मंगळ, गुरु, हर्षल, दशमस्थानात सूर्य, शुक्र, लाभस्थानात बुध, आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग आणि मंगळ व गुरुशी युती होईल. ३१ तारखेला शुक्र सिंह राशित प्रवेश करेल व तिथे त्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल.
फ़लादेश- रविवारी कोणाशी वाद होणार नाहीत याची दक्षता घ्या. नंतरचे दोन दिवस संमिश्र आहेत. दैनंदिन कामे रेंगाळतील. जोखीम असलेली कामे करु नका. महत्त्वाची कामे पुढे ढकला. राजकारणाशी संबंधीत लोकांना मात्र हा कालावधी काही संधी देणारा ठरु शकेल. संशोधक, मानसोपचारतज्ञ, ज्योतिषी यांनाही अनुकूल काळ आहे. गूढ विषयांकडे मन आकर्षित होईल. सप्ताह मध्य विमासंबंधी काम करणारे, इतिहासकार, गुप्तहेर यांना अनुकूल कालावधी आहे. सप्ताह मध्यानंतर भाग्यवर्धक घटना घडू शकतील. धार्मिक कार्यांसाठी चांगला काळ आहे. सप्ताहाचा शेवट चांगला आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगलं काम होणार आहे.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात गणपतीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात शनि(व), पंचमस्थानात राहू, नेपचून, सप्तमस्थानात मंगळ, गुरु, हर्षल, भाग्यस्थानात सूर्य, शुक्र, दशमस्थानात बुध आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग आणि मंगळ व गुरुशी युती होईल. ३१ तारखेला शुक्र सिंह राशित प्रवेश करेल व तिथे त्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना चांगला कालावधी आहे. वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांनाही अनुकूल ग्रहमान आहे. मात्र तब्येतीच्या तक्रारी डोके वर काढतील. गुप्तशत्रूंच्या कारवायाही वाढतील. काळजी घ्यावी. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांनाही कालावधी चांगला आहे. सासरकडच्या नातेवाईकांची भेट होण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यानंतर जोखीम किंवा धोका असलेली कामे करू नका. सप्ताहाच्या शेवटी काही भाग्यवर्धक घटना चकित करतील. प्रवासासाठी व धार्मिक गोष्टींसाठी अनुकूल ग्रहमान आहे.
या सप्ताहासाठी उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी शनि(व), चतुर्थस्थानात राहू, नेपचून, षष्ठस्थानी मंगळ, गुरु, हर्षल, अष्टमस्थानात सूर्य, शुक्र, भाग्यस्थानात बुध, आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग आणि मंगळ व गुरुशी युती होईल. ३१ तारखेला शुक्र सिंह राशित प्रवेश करेल व तिथे त्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला विद्यार्थ्यांनी अती आत्मविश्वास टाळावा. अभ्यासाकडे दुर्लक्ष नको. संततीशी वाद टाळा. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी ग्रहांची अनुकूलता आहे. सप्ताह मध्य वैद्यकीय व्यवसाय करणारे, केमिस्ट, वकील, जीम ट्रेनर, न्युट्रीशियन यांना अनुकूल आहे. तब्येतीच्या कुरबुरी मात्र या काळात जाणवतील. सप्ताह मध्यानंतर जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. जोडीदाराचा उत्कर्ष किंवा जोडीदाराबद्दल एखादी चांगली घटना घडण्याची शक्यता आहे. भाग्याची साथ मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. सप्ताहाचा शेवट संमिश्र आहे. जोखीम असलेली कामे टाळा. ज्यांनी अध्यात्मिक उन्नतीसाठी गुरु केले आहेत त्यांना या काळात चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे.
या सप्ताहासाठी उपासना: ’विठ्ठल’ नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात शनि(व), तृतीयस्थानी राहू, नेपचून, पंचमस्थानात मंगळ, गुरु, हर्षल, सप्तमस्थानात सूर्य, शुक्र, अष्टमस्थानात बुध आणि नवमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग आणि मंगळ व गुरुशी युती होईल. ३१ तारखेला शुक्र सिंह राशित प्रवेश करेल व तिथे त्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला आराम तसेच मौज-मजा करण्याकडे कल असेल. एखाद्या समारंभात किंवा कार्यक्रमात सहभागी होण्याचे योग संभवतात. जुने मित्र भेटतील. धनलाभ होण्याचेही योग आहेत. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना अनुकूल आहे. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. केलेल्या कष्टाचे चीज होईल. मोठ्यांनी केलेलं कौतुक किंवा अचानक मिळालेल्या बक्षिसामुळे खुश व्हाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. प्रेमी युगुलांसाठी विशेष चांगला काळ आहे. प्रेमिकांना लग्न ठरविण्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह मध्यानंतर तब्येत सांभाळावी. नोकरीमध्ये आपल्या कामाकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि(व), धनस्थानात राहू, नेपचून, चतुर्थस्थानात मंगळ, गुरु, हर्षल, षष्ठस्थानात सूर्य, शुक्र, सप्तमस्थानात बुध, अष्टमस्थानात केतू आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग आणि मंगळ व गुरुशी युती होईल. ३१ तारखेला शुक्र सिंह राशित प्रवेश करेल व तिथे त्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला प्रवासाचे योग संभवतात. लेखकांसाठी चांगला काळ आहे. तुमच्या कार्यक्षेत्रातही चांगलं काम होईल. कामे मार्गी लागतील. व्यावसयिकांना लाभ देणार्‍या संधी प्राप्त होतील. कागदपत्रांसंबंधीच्या कामांतून फायदा होऊ शकेल. सोशल मिडियावर केलेली एखादी पोस्ट प्रसिध्दी मिळवून देऊ शकेल. सप्ताहाच्या मध्यात घरात छान वातावरण असेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मन प्रसन्न असेल. विवाहोत्सुकांना विवाह ठरविण्यास ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह मध्यानंतर अती दगदग टाळा. आरोग्य सांभाळा. घरात वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. सप्ताहाच्या शेवटी शारीरिक सौख्यासाठी योग्य आहार व नियमित व्यायाम करायला हवा याची जाणीव होईल.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, नेपचून, तृतीयस्थानी मंगळ, गुरु, हर्षल, पंचमस्थानात सूर्य, शुक्र, षष्ठस्थानात बुध, सप्तमस्थानी केतू, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात शनि(व) अशी ग्रहस्थिती असेल. २९ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. ३० तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग आणि मंगळ व गुरुशी युती होईल. ३१ तारखेला शुक्र सिंह राशित प्रवेश करेल व तिथे त्याचा चंद्राशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाची सुरूवात प्रिय घटनांनी होईल. आर्थिक सुयश लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल. वेळ छान जाईल. प्रिय व्यक्तींच्या किंवा गुरुतुल्य व्यक्तींच्या भेटीचे योग येतील. धार्मिक गोष्टींसाठीही चांगला काळ आहे. सप्ताह मध्यात कामात सुयश लाभेल. प्रवासयोग शक्य. सोशल मिडियावर केलेली एखादी पोस्ट प्रसिध्दी मिळवून देऊ शकेल. एखादं बक्षिस, कौतुकाचे शब्द किंवा पाठीवर मिळालेली शाबासकीची थाप तुम्हाला नवीन उमेद मिळवून देईल. सप्ताह मध्यानंतर प्रॉपर्टीच्या कामांसाठी प्रतिकूल कालावधी आहे. अती दगदग टाळा. नकारात्मक विचारांना मनात थारा देऊ नका. सप्ताहाच्या शेवटी विद्यार्थ्यांना व कलाकारांना कमी श्रमात जास्त यश देणारे योग आहेत. संततीसौख्य लाभेल.
या सप्ताहासाठी उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)