अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१७ मार्च ते २३ मार्च २०२४)
(Astroshodh- bestastrologerinpune, famousastrologerinpune, topastrologerinpune, bestastrologerinindia, famousastrologerinindia, topastrologerinindia)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु, हर्षल, षष्ठस्थानात केतू, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात मंगळ, शुक्र, शनि आणि व्ययस्थानात सूर्य, बुध, राहू, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २१ तारखेला शुक्राची शनिशी युती होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. २३ चंद्राचा गुरु व हर्षलशी त्रिकोणयोग तर शुक्र व शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात संमिश्र असेल. तुमच्यातील जिद्द व चिकाटी वाढेल. धार्मिक कार्यात सहभाग असेल. परदेशाशी संबंधीत कामे करायला काळ अनुकूल आहे. मात्र वादग्रस्त होईल असं लेखन या दरम्यान सोशल मिडियावर करु नका. सप्ताह मध्यात घरातील कामांसाठी वेळ काढावा लागेल. प्रॉपर्टीच्या कामांसाठी अनुकूल काळ आहे. एखाद्या कार्यक्रमात किंवा समारंभात सामिल होण्याचे योग येऊ शकतात. सप्ताह अखेरीस कलाकार, खेळाडू व प्रेमिकांना चांगला कालावधी आहे. काही लाभही होण्याची शक्यता आहे. मन प्रसन्न असेल.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात रोज महालक्ष्मीअष्टक जरुर म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला पंचमस्थानात केतू, भाग्यस्थानात मंगळ, प्लूटो, दशमस्थानात मंगळ, शुक्र, शनि, लाभस्थानात सूर्य, बुध, राहू, नेपचून आणि व्ययस्थानात गुरु, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २१ तारखेला शुक्राची शनिशी युती होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. २३ चंद्राचा गुरु व हर्षलशी त्रिकोणयोग तर शुक्र व शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताह मस्त जांणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला मन आनंदी असेल. कुटुंबीयांबरोबर छान सूर जमलेला असेल. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होणार आहे. धनलाभाचे योग आहेत. सप्ताह मध्यात लेखक, ब्लॉगर्स, प्रकाशक यांना चांगला काळ आहे. प्रवासाचे योग संभवतात. सप्ताहाच्या शेवटी प्रॉपर्टीच्या व्यवहारांसाठी अनुकूल ग्रहमान आहे. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचे योग संभवतात. सप्ताहाच्या सुरुवातीला लागलेला चांगला सूर शेवटपर्यंत टिकणार आहे.
या सप्ताहासाठी उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात केतू, अष्टमस्थानात मंगळ, प्लूटो, भाग्यस्थानात मंगळ, शुक्र, शनि, दशमस्थानात सूर्य, बुध, राहू, नेपचून आणि लाभस्थानात गुरु, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २१ तारखेला शुक्राची शनिशी युती होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. २३ चंद्राचा गुरु व हर्षलशी त्रिकोणयोग तर शुक्र व शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताह चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला घरात छान वातावरण असेल आणि तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. व्यवसायात नवीन तंत्र अंमलात आणू शकाल. कार्यक्षेत्रासंबंधीत प्रलंबित असलेले काही निर्णय मार्गी लागतील. सप्ताह मध्य लाभकारक आहे. धनलाभ होण्याचे योग आहेत. मन प्रसन्न असेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. सप्ताहाच्य शेवटी तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. वरीष्ठ खुश असतील. या काळात केलेले प्रवास आनंद देणारे ठरतील. लेखक, कवी यांना ग्रहमान अनुकूल आहे.
या सप्ताहासाठी उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी केतू, सप्तमस्थानात मंगळ, प्लूटो, अष्टमस्थानात मंगळ, शुक्र, शनि, भाग्यस्थानात सूर्य, बुध, राहू, नेपचून आणि दशमस्थानात गुरु, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २१ तारखेला शुक्राची शनिशी युती होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. २३ चंद्राचा गुरु व हर्षलशी त्रिकोणयोग तर शुक्र व शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला चांगली खरेदी कराल. काही अनावश्यक खर्चही करावे लागू शकतील. धार्मिक कार्यात सहभाग असेल. ज्यांनी अध्यात्मिक उन्नतीसाठी गुरु केले आहेत त्यांना या काळात चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या मध्यात उत्तम ग्रहमान आहे. आत्मविश्वास वाढेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील. सप्ताह अखेरीसही छान कालावधी आहे. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. मन प्रसन्न असेल.
या सप्ताहासाठी उपासना: रविवारी नवग्रह मंदिरात जाऊन सूर्यनारायणाचे दर्शन जरुर घ्यावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी केतू, षष्ठस्थानात मंगळ, प्लूटो, सप्तमस्थानात मंगळ, शुक्र, शनि, अष्टमस्थानात सूर्य, बुध, राहू, नेपचून आणि भाग्यस्थानात गुरु, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २१ तारखेला शुक्राची शनिशी युती होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. २३ चंद्राचा गुरु व हर्षलशी त्रिकोणयोग तर शुक्र व शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान असणार आहे. मित्रमैत्रिणींच्या भेटी मनाला आनंद देतील. आर्थिक लाभ होतील. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल. सप्ताहाचा मध्य छान खरेदीचा ठरु शकेल. परदेशासंबंधीत असलेल्या गोष्टींसाठी ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताहाच्या शेवटी एखाद्या गोष्टीची उगीचच काळजी किंवा हूरहूर लागेल. जोखीम असलेली कामे टाळा. विमा प्रतिनिधी तसेच मानसोपचार तज्ञ यांना मात्र हाच काळ फायदेशीर ठरु शकेल. तसेच इतिहास, पुराण वस्तु संशोधन, सर्जन यांनाही अनुकूल ग्रहमान आहे.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात केतू, पंचमस्थानात मंगळ, प्लूटो, षष्ठस्थानी मंगळ, शुक्र, शनि, सप्तमस्थानात सूर्य, बुध, राहू, नेपचून आणि अष्टमस्थानात गुरु, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २१ तारखेला शुक्राची शनिशी युती होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. २३ चंद्राचा गुरु व हर्षलशी त्रिकोणयोग तर शुक्र व शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला अनुकूल काळ आहे. आत्मविश्वास वाढेल. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. व्यावसयिकांना फायदा देणार्या नवीन संधी चालून येतील. सप्ताह मध्य चांगला आहे. मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग संभवतात. काहींना धनलाभाचे योग येऊ शकतात. मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या शेवटी जोडीदारासाठी छान खरेदी कराल. आयात-निर्यातीचा व्यवसाय करणार्यांना ग्रहमान फायदेशीर आहे. बेकायदा गोष्टींपासून मात्र लांब रहावे.
या सप्ताहासाठी उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात मंगळ, प्लूटो, पंचमस्थानात मंगळ, शुक्र, शनि, षष्ठस्थानी सूर्य, बुध, राहू, नेपचून, सप्तमस्थानात गुरु, हर्षल आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २१ तारखेला शुक्राची शनिशी युती होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. २३ चंद्राचा गुरु व हर्षलशी त्रिकोणयोग तर शुक्र व शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश– सप्ताह अतिशय छान आहे. सप्ताहाच्या सुरूवातीलाच काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. उपासना करणार्यांसाठीही काळ चांगला आहे. काहींना प्रवास योग येतील. मात्र या दरम्यान अती दगदग टाळा. आपले आरोग्य सांभाळा. सप्ताह मध्यात नोकरीत किंवा व्यवसायात चांगले काम झाल्याने तुमच्यावर वरीष्ठ खुश असतील. धनलाभ होऊ शकेल. सप्ताह मध्यानंतर काहींना लाभदायक ग्रहमान आहे. मित्रांबरोबर किंवा नातेवाईकांबरोबर छान वेळ जाईल. सप्ताह अखेरीस आरोग्यासंबंधी काही तक्रारी जाणवतील. खाण्यापिण्याची काळजी घ्यावी.
या सप्ताहासाठी उपासना: सोमवारी महादेवाचे दर्शन घ्यावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी मंगळ, प्लूटो, चतुर्थस्थानात मंगळ, शुक्र, शनि, पंचमस्थानात सूर्य, बुध, राहू, नेपचून, षष्ठस्थानी गुरु, हर्षल आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २१ तारखेला शुक्राची शनिशी युती होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. २३ चंद्राचा गुरु व हर्षलशी त्रिकोणयोग तर शुक्र व शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला अती दगदग टाळावी. जीवनशक्तीची कमतरता किंवा थकवा जाणवत राहू शकेल. वाहने जपून चालवावीत. ज्योतिषी, मानसोपचारतज्ञ, थेरपिस्ट यांना मात्र ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह मध्यात काही भाग्यवर्धक घटना शक्य. वक्ते, पुरोहीत, शिक्षक यांना अनुकूल काळ आहे. प्रवासाचे योग येऊ शकतात. सप्ताह अखेरीस नोकरीत किंवा व्यवसायात चांगले काम झाल्याने खुश असाल. वरिष्ठांकडून एखादी मागणी मान्य करुन घेण्यास अनुकूल काळ आहे. विद्यार्थी व कलाकारांना कमी श्रमात जास्त यश मिळेल.
या सप्ताहासाठी उपासना: या सप्ताहात रोज ’ॐ ह्रां ह्रीं ह्रौं स: सूर्याय नम:’ या मंत्राचा १ माळ जप करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात मंगळ, प्लूटो, तृतीयस्थानी मंगळ, शुक्र, शनि, चतुर्थस्थानात सूर्य, बुध, राहू, नेपचून, पंचमस्थानात गुरु, हर्षल आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २१ तारखेला शुक्राची शनिशी युती होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. २३ चंद्राचा गुरु व हर्षलशी त्रिकोणयोग तर शुक्र व शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांना ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह मध्यात अचानक आलेल्या अडचणींनी त्रस्त व्हाल. मन शांत ठेवावे. महादेवाची किंवा मारुतीची उपासना उपयोगी ठरेल. सप्ताहाच्या शेवटी पुन्हा ग्रहस्थिती अनुकूल होत आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगलं काम घडेल. मन प्रसन्न करणार्या घटना घडण्याची शक्यता आहे. छोटासा प्रवासही घडू शकतो. घरात छान वातावरण असेल.
या सप्ताहासाठी उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, प्लूटो, धनस्थानात मंगळ, शुक्र, शनि, तृतीयस्थानी सूर्य, बुध, राहू, नेपचून, चतुर्थस्थानात गुरु, हर्षल आणि नवमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २१ तारखेला शुक्राची शनिशी युती होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. २३ चंद्राचा गुरु व हर्षलशी त्रिकोणयोग तर शुक्र व शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला तब्येतीची काळजी घेणे उचित ठरेल. वैद्यकीय क्षेत्रात व कायदेविषयक कामे करणार्यांना फ़ायदेशीर ग्रहमान आहे. नोकरीच्या शोधात असणार्यांना काही संधी चालून येतील. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वेळ मजेत घालवायला मिळेल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांनाही अनुकूल काळ आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. जोखीम किंवा धोका असलेली कामे टाळा. सप्ताहाच्या शेवटी धार्मिक कार्यासाठी चांगला कालावधी आहे.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात महालक्ष्मीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, शुक्र, शनि, धनस्थानात सूर्य, बुध, राहू, नेपचून, तृतीयस्थानी गुरु, हर्षल, अष्टमस्थानात केतू आणि व्ययस्थानात मंगळ, प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २१ तारखेला शुक्राची शनिशी युती होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. २३ चंद्राचा गुरु व हर्षलशी त्रिकोणयोग तर शुक्र व शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला मुलांकडून सुवार्ता कळतील. विद्यार्थ्यांना चांगले ग्रहमान आहे. एखादं बक्षिस किंवा शाबासकीची थाप मिळेल. कलाकारांना व खेळाडूंना अनुकूल काळ आहे. धनलाभाचेही योग आहे. सप्ताह मध्यात नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. सामाजिक कामात सहभागी व्हाल. मात्र अती दगदग टाळा. आपले आरोग्य सांभाळा. सप्ताहाच्या मध्यानंतर जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांना चांगला कालावधी आहे. काहींना अचानक धनलाभाचे योग संभवतात.
या सप्ताहासाठी उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, बुध, राहू, नेपचून, धनस्थानात गुरु, हर्षल, सप्तमस्थानी केतू, लाभस्थानात मंगळ, प्लूटो आणि व्ययस्थानात मंगळ, शुक्र, शनि अशी ग्रहस्थिती असेल. १८ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २१ तारखेला शुक्राची शनिशी युती होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग होईल. २३ चंद्राचा गुरु व हर्षलशी त्रिकोणयोग तर शुक्र व शनिशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला कौटुंबिक सौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मुलांच्या प्रगतीबाबत समाधनी असाल. प्रॉपर्टीच्या कामांसाठीही अनुकूल कालावधी आहे. मन प्रसन्न असेल. सप्ताह मध्य प्रेमिकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी चांगला जाईल. नवीन विषयाच्या अभ्यासाला सुरुवात करायची असेल तर हा काळ चागला आहे. सप्ताहाच्या शेवटी तब्येत सांभाळावी. नोकरीच्या शोधात असणार्यांना मात्र नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे.
या सप्ताहासाठी उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)