अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१० मार्च ते १६ मार्च २०२४)

(Astroshodh- bestastrologerinpune, famousastrologerinpune, topastrologerinpune, bestastrologerinindia, famousastrologerinindia, topastrologerinindia)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु, हर्षल, षष्ठस्थानात केतू, दशमस्थानात मंगळ, प्लूटो, लाभस्थानात सूर्य, शुक्र, शनि आणि व्ययस्थानात बुध, राहू, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल. ११ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल. १२ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राची गुरुशी युती तर शुक्र व शनिशी लाभयोग होईल. १४ तारखेला सूर्य मीन राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व हर्षलशी युती होईल. १५ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल व मंगळ कुंभ राशित प्रवेश करेल.
फलादेश- रविवारचा दिवस मस्त मजा करण्याचा आहे. काही जुन्या मित्रांच्या/ नातेवाईकांच्या संपर्कात याल. काही लाभही होऊ शकतील. सोमवार, मंगळवार खरेदीसाठी चांगले आहेत. परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांना अनुकूल काळ आहे. आयात-निर्यातीच्या व्यवसायात फ़ायदा होईल. पूर्वीच्या एखाद्या गुंतवणुकीतून चांगला फायदा या काळात शक्य. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. विशेषत: नृत्यकलेशी संबंधित असणार्‍यांना अतिशय चांगला काळ आहे. सप्ताह मध्य अनुकूल आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. लोकांचे सहकार्य मिळेल. काम करण्याची तुमची धडाडी आणि उत्साह वाढलेला तुम्हाला जाणवेल. सप्ताह अखेरीस आर्थिक स्थिती चांगली असेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. मन प्रसन्न असेल. काही लाभ होतील. आवडती माणसे भेटतील.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात रोज महालक्ष्मीअष्टक जरुर म्हणावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला पंचमस्थानात केतू, भाग्यस्थानात मंगळ, प्लूटो, दशमस्थानात सूर्य, शुक्र, शनि, लाभस्थानात बुध, राहू, नेपचून आणि व्ययस्थानात गुरु, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल. ११ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल. १२ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राची गुरुशी युती तर शुक्र व शनिशी लाभयोग होईल. १४ तारखेला सूर्य मीन राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व हर्षलशी युती होईल. १५ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल व मंगळ कुंभ राशित प्रवेश करेल.
फ़लादेश- रविवारचा दिवस अनुकूल आहे. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. तुमच्या कार्यक्षेत्रातही छान काम होईल त्यामुळे प्रसन्न असाल. व्यवसायातील लोकांना केलेल्या कामाचा मोबदला व्यवस्थित मिळेल. त्यानंतरचे दोन दिवस लाभदायक आहेत. मित्रांची भॆट शक्य आहे. काहींना धनलाभही होतील. सप्ताह मध्यात धार्मिक कार्यात सहभाग असेल. ज्यांनी अध्यात्मिक उन्नतीसाठी गुरु केले आहेत त्यांना या काळात चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे. खरेदीसाठीही काळ अनुकूल आहे. सप्ताह अखेरीस कौटुंबीक सौख्य मिळेल. काहींना धनलाभ शक्य आहे. तुमच्या संभाषणकौशल्यामुळे काही कामे मार्गी लागण्याणी शक्यता आहे.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात मारुतीची उपासना करणे, मारुतीचे दर्शन घेणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात केतू, अष्टमस्थानात मंगळ, प्लूटो, भाग्यस्थानात सूर्य, शुक्र, शनि, दशमस्थानात बुध, राहू, नेपचून आणि लाभस्थानात गुरु, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल. ११ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल. १२ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राची गुरुशी युती तर शुक्र व शनिशी लाभयोग होईल. १४ तारखेला सूर्य मीन राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व हर्षलशी युती होईल. १५ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल व मंगळ कुंभ राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रवास शक्यतो या काळात टाळावेत. मानसोपचार तज्ञ, इतिहासकार व विमा व्यावसायिकांना मात्र हा काळ फायदेशीर ठरू शकेल. सप्ताह मध्यात उत्तम ग्रहमान आहे. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. व्यावसायिकांना लाभदायक संधी चालून येतील. काही अनपेक्षित लाभ शक्य. सप्ताह मध्यानंतर तुमच्या कामात कसूर होणार नाही याची काळजी घ्यावी. वरीष्ठांचे सहकार्य या काळात मिळणार नाही. एखाद्या मित्राच्या/ आप्ताच्या विचित्र वागण्याने त्रास होऊ शकेल. काही लाभ होता होता थांबू शकतील. सप्ताहाच्या अखेरीस पूर्वीच्या एखाद्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. छान खरेदी करु शकाल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
या सप्ताहासाठी उपासना: श्रीस्वामी समर्थांचा तारक मंत्र या काळात रोज म्हणावा किंवा ऐकावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी केतू, सप्तमस्थानात मंगळ, प्लूटो, अष्टमस्थानात सूर्य, शुक्र, शनि, भाग्यस्थानात बुध, राहू, नेपचून आणि दशमस्थानात गुरु, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल. ११ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल. १२ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राची गुरुशी युती तर शुक्र व शनिशी लाभयोग होईल. १४ तारखेला सूर्य मीन राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व हर्षलशी युती होईल. १५ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल व मंगळ कुंभ राशित प्रवेश करेल.
फलादेश- रविवारचा दिवस कंटाळवाणा व अडथळ्याचा असू शकेल. तुमची व जोडीदाराच्या तब्येतीची काळाजी घ्यावी. वातविकार व हाडांसंबंधी काही आजार असतील तर योग्य ती काळजी व पथ्यपाणी सांभाळावे. सोमवार, मंगळवार चांगले जातील. भाग्यवर्धक घटना या दरम्यान शक्य. उपासनेसाठी चांगला काळ आहे. शिक्षण क्षेत्रातील लोकांना विशेष अनुकूल काळ आहे. अध्यात्मिक क्षेत्रातील लोकांना गुरु भेटणे किंवा काही अध्यात्मिक अनुभव या काळात शक्य आहेत. सप्ताह मध्यानंतर घरात छान वातावरण असेल. व्यावसयिकांना लाभदायक ग्रहमान आहे. कामे मार्गी लागतील. सप्ताहाचा शेवट संमिश्र आहे. आर्थिक सुयश लाभेल. मात्र एखाद्या मित्राचा विचित्र अनुभव येण्याची शक्यता आहे.
या सप्ताहासाठी उपासना: ’ श्री गुरुदेव दत्त ’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी केतू, षष्ठस्थानात मंगळ, प्लूटो, सप्तमस्थानात सूर्य, शुक्र, शनि, अष्टमस्थानात बुध, राहू, नेपचून आणि भाग्यस्थानात गुरु, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल. ११ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल. १२ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राची गुरुशी युती तर शुक्र व शनिशी लाभयोग होईल. १४ तारखेला सूर्य मीन राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व हर्षलशी युती होईल. १५ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल व मंगळ कुंभ राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराबरोबर वाद टाळावेत. तुमचे व जॊडीदाराचे काही आरोग्यविषयक प्रश्न असतील तर तिकडे लक्ष द्यावे लागेल. सप्ताह मध्य संमिश्र असेल. गूढ विषय तुम्हाला आकर्षित करतील. अचानक धनलाभाचेही योग शक्य. प्रवासाचे योग शक्य. मात्र दैनंदिन कामात अडचणी जाणवू शकतील. सप्ताह मध्यानंतर धार्मिक गोष्टींकडे मनाचा कल असेल. तुमची धार्मिक मते मात्र दुसर्‍यांवर लादू नका. गुरुची किंवा वरीष्ठांची अवज्ञा करु नका. अ‍ॅसिडिटी किंवा पोटाचे त्रास या दरम्यान संभवतात. आहारावर नियंत्रण ठेवावे. सप्ताहाचा शेवट कार्यपूर्तीचा असू शकेल. लाभ होतील. आवडती माणसे भेटतील. चांगला कालावधी आहे.
या सप्ताहासाठी उपासना: श्रीसूक्ताचे नियमित पठण या कालावधीत केलेले चांगले.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात केतू, पंचमस्थानात मंगळ, प्लूटो, षष्ठस्थानी सूर्य, शुक्र, शनि, सप्तमस्थानात बुध, राहू, नेपचून आणि अष्टमस्थानात गुरु, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल. ११ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल. १२ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राची गुरुशी युती तर शुक्र व शनिशी लाभयोग होईल. १४ तारखेला सूर्य मीन राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व हर्षलशी युती होईल. १५ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल व मंगळ कुंभ राशित प्रवेश करेल.
फलादेश- रविवारचा दिवस नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांना व वकिलांना चांगला आहे. तब्येतीच्या कुरबुरी मात्र जाणवत रहातील. विद्यार्थ्यांनी अती आत्मविश्वास टाळावा. अभ्यासाकडे दुर्लक्ष नको. त्यानंतरचे दोन दिवस संमिश्र आहेत. जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. जोखीम असलेली कामे मात्र या दरम्यान करु नका. सप्ताह मध्यानंतर अचानक धनलाभाचे योग शक्य आहेत मात्र वाहन चलवितांना योग्य ती काळजी घ्यावी. मूळव्याध किंवा उष्णतेच्या विकारांचा ज्यांना त्रास आहे त्यांनी या काळात योग्य ते पथ्यपाणी सांभाळावे. सप्ताहाच्या शेवटी वरीष्ठांशी वाद टाळा.
या सप्ताहासाठी उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात मंगळ, प्लूटो, पंचमस्थानात सूर्य, शुक्र, शनि, षष्ठस्थानी बुध, राहू, नेपचून, सप्तमस्थानात गुरु, हर्षल आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल. ११ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल. १२ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राची गुरुशी युती तर शुक्र व शनिशी लाभयोग होईल. १४ तारखेला सूर्य मीन राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व हर्षलशी युती होईल. १५ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल व मंगळ कुंभ राशित प्रवेश करेल.
फलादेश- रविवारी मुलांबरोबर वेळ मजेत जाईल. नवीन काही शिकण्यासाठी चांगला दिवस आहे. भावंडे किंवा आप्तेष्ट यांच्या भेटी होतील. सोमवार, मंगळवार तब्येतीच्या तक्रारी काहींना जाणवतील. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना तसेच वकील व आहारतज्ञ यांना मात्र अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यात घरात आनंदी वातावरण असेल. व्यावसायिक भेटी यशस्वी होतील. व्यवसायात नवीन तंत्र अमलात आणाल. शासकीय कामे मार्गी लागतील. सप्ताह मध्यानंतर लाभदायक ग्रहमान आहे. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. वरीष्ठांची मर्जी राहील. सप्ताह अखेरीस गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. अचानक धनलाभाचे योगही शक्य आहेत.
या सप्ताहासाठी उपासना: मारुतीची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी मंगळ, प्लूटो, चतुर्थस्थानात सूर्य, शुक्र, शनि, पंचमस्थानात बुध, राहू, नेपचून, षष्ठस्थानी गुरु, हर्षल आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल. ११ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल. १२ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राची गुरुशी युती तर शुक्र व शनिशी लाभयोग होईल. १४ तारखेला सूर्य मीन राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व हर्षलशी युती होईल. १५ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल व मंगळ कुंभ राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहातील सुरुवातीला मौज-मजा करण्याकडे कल असेल. घरात छान पार्टी करायला हरकत नाही. प्रॉपर्टी खरेदी/ विक्री साठी अनुकुल काळ आहे. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना व कलाकारांना अनुकूल आहे. नोकरीसाठी/ स्पर्धा परीक्षा लाभदायक ठरु शकतील. प्रेमिकांसाठी मात्र प्रतिकूल काळ आहे. याचबरोबर तब्येतीच्या तक्रारी जाणवत रहातील. सप्ताह मध्यानंतर हितशत्रूंचा त्रास वाढेल. या काळात कोणाशीही वाद होणार नाही याची दक्षता घ्या. प्रवासात योग्य ती काळजी घ्या. वाहने सावकाश चालवा. जोखीम असलेली कामे टाळा. सप्ताहाच्या शेवटी घरात आनंदी वातावरण असेल. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल.
या सप्ताहासाठी उपासना: मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसेचा नित्य पाठ या काळात करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात मंगळ, प्लूटो, तृतीयस्थानी सूर्य, शुक्र, शनि, चतुर्थस्थानात बुध, राहू, नेपचून, पंचमस्थानात गुरु, हर्षल आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल. ११ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल. १२ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राची गुरुशी युती तर शुक्र व शनिशी लाभयोग होईल. १४ तारखेला सूर्य मीन राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व हर्षलशी युती होईल. १५ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल व मंगळ कुंभ राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रवासाचे योग संभवतात. लेखकांसाठी चांगला काळ आहे. भावंडाशी संवाद साधाल. धनलाभाचेही योग काहींना आहेत. सप्ताहाच्या मध्यात कौटुंबिक सौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. प्रॉपटींची कामे मार्गी लागतील. घरात मित्र किंवा आप्तेष्टांबरोबर एखादी छानशी पार्टी किंवा गेट टुगेदर आयोजित करायला हरकत नाही. सप्ताह मध्यानंतर विद्यार्थ्यांना अनुकूल ग्रहमान आहे. विद्यार्थ्यांना कमी श्रमात जास्त यश मिळेल. काहींना धनलाभ शक्य आहे. सप्ताहाच्या शेवटी नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. सामाजिक कामात सहभागी व्हाल. मात्र अती दगदग टाळा. आपले आरोग्य सांभाळा.
या सप्ताहासाठी उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, प्लूटो, धनस्थानात सूर्य, शुक्र, शनि, तृतीयस्थानी बुध, राहू, नेपचून, चतुर्थस्थानात गुरु, हर्षल आणि नवमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल. ११ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल. १२ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राची गुरुशी युती तर शुक्र व शनिशी लाभयोग होईल. १४ तारखेला सूर्य मीन राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व हर्षलशी युती होईल. १५ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल व मंगळ कुंभ राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात प्रिय घटनांनी होईल. प्रिय व्यक्तींच्या भेटी शक्य. धनलाभाचे योग आहेत. लेखक, वक्ते, ब्लॉगर्स व कलाकार यांच्यासाठी चांगला कालावधी आहे. सप्ताह मध्यात प्रवासयोग आहेत. तुमच्या चांगल्या नियोजनामुळे कामे मार्गी लागतील. तुमच्या कार्याची प्रशंसा लोक करतील. भावंडांसंदर्भात चांगली बातमी कळेल. प्रॉपर्टीची कामे पार पडतील. मन प्रसन्न असेल. सप्ताह अखेरीस लाभदायक ग्रहमान आहे. संततिसौख्य चांगले लाभेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. धनलाभाचे योग आहेत. आर्थिक स्थिती चांगली राहील.
या सप्ताहासाठी उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, शुक्र, शनि, धनस्थानात बुध, राहू, नेपचून, तृतीयस्थानी गुरु, हर्षल, अष्टमस्थानात केतू आणि व्ययस्थानात मंगळ, प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल. ११ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल. १२ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राची गुरुशी युती तर शुक्र व शनिशी लाभयोग होईल. १४ तारखेला सूर्य मीन राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व हर्षलशी युती होईल. १५ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल व मंगळ कुंभ राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला जुनी येणी वसूल होतील. पूर्वी केलेल्या एखाद्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. खरेदीसाठीही काळ चांगला आहे. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. सप्ताह मध्य उत्तम आहे. कौटुंबीक सौख्य लाभेल. धनलाभाचे योग आहेत. संभाषणकौशल्याच्या जोरावर कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. मन प्रसन्न असेल. सप्ताह मध्यानंतर शक्यतो प्रवास टाळावेत. सोशल मिडियावर वादग्रस्त होईल असे काहीही या कालावधीत प्रसिध्द करू नका. सप्ताह अखेरीस भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. काहींना धनलाभाचे योग आहेत. प्रॉपर्टीच्या कामांमधून लाभ संभवतो.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी बुध, राहू, नेपचून, धनस्थानात गुरु, हर्षल, सप्तमस्थानी केतू, लाभस्थानात मंगळ, प्लूटो आणि व्ययस्थानात सूर्य, शुक्र, शनि अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला चंद्राची सूर्याशी युती होईल. ११ तारखेला चंद्राची बुधाशी युती होईल. १२ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राची गुरुशी युती तर शुक्र व शनिशी लाभयोग होईल. १४ तारखेला सूर्य मीन राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व हर्षलशी युती होईल. १५ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल व मंगळ कुंभ राशित प्रवेश करेल.
फलादेश- रविवारचा दिवस खरेदीसाठी चांगला आहे. आयात- निर्यातीचा ज्यांचा व्यवसाय आहे त्यांना फायदेशीर ग्रहमान आहे. सोमवार, मंगळवार भाग्यवर्धक घटनांचे ठरु शकतील. काही लाभ होतील. मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. सप्ताह मध्य चांगला आहे. कौटुंबीक सौख्य मिळेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. या दरम्यान धनलाभ शक्य आहे. सप्ताह अखेरीस सोशल मिडियावर काही शेअर करीत असाल तर ते वादग्रस्त होणार नाही याची काळजी घ्यावी. तुमच्यावर एखादी अनावश्यक जबाबदारी येऊन पडेल. अनपेक्षित खर्च करावा लागू शकेल.
या सप्ताहासाठी उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)